मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १५५१ ते १६००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५५१ ते १६००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


इकडे आठवण तिकडे नेणीव । हे दोन्ही विद्या अविद्येचे
स्वभाव ।आवरण विक्षेप जयेतें नांव । ज्ञानाज्ञान हेंचि मुख्य
संकल्पाविण वृत्ति । स्वाभाविक स्फुरे सजगति ।
तयामाजीं ज्ञानाभास उमटती । जीवेश दोन्ही ॥५२॥
विद्याप्रतिबिंबित तो ईश । अस्पष्टपणें प्रेरी जीवास ।
अविद्या प्रतिबिंबित अनेश । तोही अस्पष्ट ॥५३॥
पुढें जेंव्हां संकल्पासहित । मनबुद्धीचे विकार उमटत ।
ते समयीं जीव स्पष्ट दिसत । यापूर्वीं अस्पष्ट ॥५४॥
असो एक स्फुरणरूप मूळमाया । आणि विद्या अविद्या कन्या तिचिया ।
त्यांत प्रतिबिंबरूप जें नाम तया । जीवेश दोन जैसें पाणी झऱ्यांतून उसळे ।
तैशी मूळमायेची स्फूर्ति चंचळे । स्वतां पाणी श्र्वेत पाहतां
कळे । तेवीं विद्या स्फूर्तीची श्र्वेतपणा असोनि आच्छादिला ।
नसोनि काळेपणा उमटला । तैसा अविद्या नेणिवेसी जाहला ।
ठाव विद्यारूप असोनी मुख्य पाणियाचे पाझरीं ।
आकाश प्रतिभासेना झडकरी । अथवा श्र्वेत काळेपणाही माझारीं । जलाकाश स्पष्ट नव्हे ॥५८॥
तैसें मूळ स्फुरणीं जीवेश असती । परी पाहणाराचे अनुभवा न येती ।
विद्या अविद्येंतही अनुमानिजेती । कीं जल तेथें प्रतिबिंब ॥५९॥
स्पष्ट जेव्हां जल स्थिरावलें । तेव्हां आकाश स्पष्ट दिसे बिंबलें ।
तैसें संकल्प होतां दिसों लागलें । जीवाचें रूप ॥६०॥
मूळीं स्फुरणचि असतां चंचळ । परी तें कळेना निवळ ।
मा त्यांतील प्रतिबिंब सकळ । कोण पाहे ॥६१॥
तेचि प्रकृतिपुरुष दोन्ही । ओळखावीं चंचळ जाणीव निवडुनी ।
त्या दोहींचे परिणाम होउनी ।
जाहले विद्या ईशादि चंचळपणे जो स्फूर्तीचा ।
विद्या अविद्या हा परिणाम तिचा । तैसाचि परिणाम ज्ञानाभासाचा । जीवेश दोन्ही ॥६३॥
तोचि जडपणा अस्पष्ट होता । स्पष्ट जाला प्राणा आंतौता ।
इकडे जीवेशाची जे प्रकाशता । बुद्धींत स्पष्ट जाहली प्राण जड असून वावरती ।
त्यामुळें चंचळ ऐसे दिसती ।
परी ते जाणती ना कल्पांतीं । म्हणून ते जड ॥६५॥
तैसेचि मनबुद्धि हे चंचळ खरे । त्यांत जाणीव दिसे साचाकोरें ।
परी ते जीवाचे भासकत्वें सारे । विषय निवडिती जैसें पाणी दिसे
झळझळित । परी आकाश बिंबतां दिसत ।
तैसें मनबुद्धि परप्रकाशित । स्वतां चंचळत्वें जड ॥६७॥
असो घटजलाचेनि पडिपाडें । देहीं सूक्ष्मदेह निवडे ।
जलाकाशापरी प्रतिबिंब पडे । जीवेशाचें सूक्ष्मीं ॥६८॥
भिंतीसहित ब्रह्मांड मठ । त्यांत उत्तमाधम पिंड घट ।
घटीं जल जैसें तैसें स्पष्ट । सत्रा कळांचें सूक्ष्म ॥६९॥
जल पातळ वोलें चंचळ । तैसा हा प्राणमयकोश सकळ ।
प्रतिबिंबासहित पाण्याची झळझळ । तैसे जीवासहित संकल्प श्वेतपणा तैशी विद्या ।
काळाभास तैशी अविद्या ।
पाझर तैशी मूळमाया । एवं दृष्टांतीं सर्व साम्य ॥७॥
पाझरीं किंवा श्र्वेतकाळेपणीं । जलाकाश दिसेना नयनीं ।
तैशी माया कीं विद्या अविद्या दोन्ही । स्पष्ट नसती जीवेश त्यांत बुद्धीमाजीं जीवत्व एकलें ।
चिदाभासरूपें स्पष्ट जाहलें ।
जैसें जलामाजीं प्रतिबिंबलें । सनक्षत्र आकाश ॥७३॥
तो चिदाभास वृृत्तीसहित । इंद्रियद्वारा । विषंयांकार होत ।
जैशा घटछिद्रांतून झळझळित । मठाच्या भिंती ॥७४॥
ऐसें स्फुरणादिदेहांत मिथ्याभूत । सांगितलें जड चंचळ समस्त ।
चिदाभास जो उमटला त्यांत । तोही सद्दष्टांत सांगितला ॥७५॥
मिथ्याभूत इतुकेंही जाहलें । तितुकें सद्दष्टांत सांगितलें ।
आता सत्य परब्रह्म जें संचलें । तें आत्मत्वही देहीं ॥७६॥
जैसें मुख्य गगन सर्व मठासी । अंतर्बार्ह्य व्यापून अलिप्तत्वेंसी ।
घट जल आणि जलाकाशाशीं । व्यापकत्वें संचलें ॥७७॥
तैसें ब्रह्मात्मत्व सघन । मायेसी ईशादि अंततृण ।
इतुकेंही ब्रह्मांड संपूर्ण । व्यापून असे ॥७८॥
ब्रह्मांडी जितुके देह सान थोर । आदिकरून हरिहर ।
या इतुक्या अंतर्बाह्य निर्विकार । व्यापून असे ॥७९॥
स्थूलदेहीं सूक्ष्मशरीरीं । जे पंचीकृत अपंचीकृताची परी ।
तिसरें कारण जे स्फूर्ति निर्धारी । विद्या अविद्यात्मक ॥८०॥
त्यांत जीवेश जे प्रतिबिंबित । एवं सकळ धर्म धर्मीसहित ।
व्यापूनियां असे अनंत । गगन जेवीं सर्व घटीं ॥८१॥
ऐसिया अनंताची व्यापकता । जे सचिद्घन सर्वीं परिपूर्णता ।
ते पुढील पदीं विस्तारता । अन्वयें बोलिजे ॥८२॥
परी प्रस्तुत यया पदामाझारीं । जितुकीं मायादि तृणांत सारीं ।
रूप नाम जितुकें निर्धारी । स्थूल कीं सूक्ष्म ॥८३॥
इतुक्याहि नामरूपांहून । भिन्न असे ब्रह्मात्मा पूर्ण ।
अंतबाह्य जेवीं गगन । परी विलक्षण घटादिकां ॥८४॥
स्थूलदेह हा अन्नमय । ज्याची अन्नीं उत्पत्ति स्थिति लय ।
जेवीं घट सर्वही मृण्मय । तेवींच साकार जितुका ॥८५॥
त्यांत सूक्ष्मदेह सत्रा कळांचा । जो त्रिकोशात्मक दृष्टांत जलाचा ।
प्राण मन विज्ञानमय साचा । जया प्रेरिता ईश आणि प्रतिबिंबरूप जीव ।
बुद्धीपासून प्रगट स्वभाव । या इतुकियामाजींही स्वयमेव । असून ब्रह्मात्मा वेगळा ॥८७॥
हें असो देहद्वयाचें कारण । जें सहजत्वें जाहलें निर्माण ।
त्यांतही परब्रह्म परिपूर्ण । व्यापून भिन्न सर्वां ॥८८॥
विद्याअविद्यामूळमायास्फूर्ति । त्यांत जीवेशही अस्पष्ट प्रतिबिंबती ।
तया कारणा आनंदमयकोश म्हणती । जेथें सुखैकगती जीवा ॥८९॥
एवं अन्नमय स्थूल देहे । प्राणमय मनोमय विज्ञानमय कोशत्रय हे ।
आनंदमय कारण पाहे । जीवेशासह ॥१५९०॥
इतुकेही एकेक देहाआंत । असती स्थूल सूक्ष्म जीवासहित ।
तितुकेही व्यापून अनंत । सर्वां विलक्षण ॥९१॥
आकाश घटीं जलीं जलाकाशीं । व्यापून भिन्न जैसें सर्वांशी । तेवीं स्थूल सूक्ष्म कारण जीवेशीं ।
व्यापून आत्मा विलक्षण निर्माण तितुकेंवेगळालें । धर्मही भिन्न भिन्न उमटले ।
तया धर्मधर्मीसहित व्यापिलें । परी नव्हे त्या त्या ऐसें ॥९३॥
मिथ्याचे धर्म जे जे अनेक । ते ते आधी करूं रूपक ।
मग सर्वों विलक्षण केवीं व्यापक । आपेआप कळे ॥९४॥
मुख्य परब्रह्म अनंत । केवढें किती नव्हें अंत ।
तयामाजीं एकदेशी होत । स्फूर्ति रज्जुसर्पापरी ॥९५॥
तयेचा स्वभावचि चंचळ । उमटे आटे जेवीं मृगजळ ।
परी उत्पत्तीसी हेतु सकळ । तेचि एक असे ॥९६॥
जल जैसें किंचितही असतां । गगन प्रतिभास दिसे आंतौता ।
तेवीं वृत्ति निर्विकारेंही स्फुरतां । सत्याचें प्रतिबिंब पडे असो स्फूर्तीचें जें चंचळपण ।
तेथें सहज विद्या अविद्या होती दोन ।
अविद्येनें करावें आवरण । हा धर्मचि तिचा ॥९८॥
पाणी काळेपणें जरी असे । परी प्रतिबिंब त्यामाजीं दिसे ।
अविद्येमाजीं प्रतिबिंब तैसें । नेणीव रूप स्फूर्ति ॥९९॥
कळणियासी विद्या म्हणावी । तेणें पहावें दिसेल जें स्वभावीं ।
मग यथार्थ कीं अन्यथा भावी ॥१६००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP