मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १५१ ते २००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


पृथ्वी रजाचें गुद । एवं पंचकर्मेंद्रियें प्रसिद्ध ।
हें असाधारण बोलिजे सिद्ध । वेगळालें म्हणोनी ॥५१॥
आतां साधारण रजोभूतांचा । येकदांच काढिला सर्वांचा ।
तोचि प्राण पंचधा साचा । व्यापारभेदें जाला ॥५२॥
हृदयीं वाहे तो प्राण । तेणें सुख होय जीवालागून ।
विसर्ग करी तो अपान । अधोगामी ॥५३॥
समान तो संधी हालवी । उदान तो क्षुत्पान करवी ।
सर्व नाडीद्वारा तृप्ति द्यावी । वावरून ज्यानें ॥५४॥
एवं पंचप्राण कर्मेंद्रिय । हा दशधा भूतरजाचा समुदाय ।
पहिले सात मिळून अन्वय । सत्रा तत्त्वें ॥५५॥
ऐसें हे भूतांपासून जालें । अपंचीकृत भौतिक पहिलें ।
पुढें पंचीकृत करून जें निर्मिलें । स्थूळ देहासी ॥५६॥
तया स्थूळदेहा माझारीं । सत्रा येऊन राहिलीं सारीं ।
मन प्राण हे राहती अंतरीं । गोलकीं दशेंद्रियें ॥५७॥
इतुकीं मिळून एक वासना । विभागली ते बोलिली वचना ।
व्यापार याचे ते वर्णना । पुढें करणें ॥५८॥
असो वासना तिकडे सत्रा जाती । झोंपेंत तरी गुप्त राहती ।
जडत्वें प्राण मात्र वावरती । क्रियेवांचून ॥५९॥
जेव्हां प्राण प्रयाणसमय । तेव्हां वासना जो जो धरी काय ।
ते समयीं हा सर्व समुदाय । जाय तिकडे तिकडे ॥१६०॥
देहांत प्राण जेव्हां प्रगटती । मन बुद्धि तेथें उमटती ।
आणि इंद्रियें हीं वावरतीं । स्वस्वव्यापारीं ॥६१॥
म्हणोनि ज्ञान कर्मेंद्रियांसहित । प्राण मन बुद्धि विख्यात ।
हे लिंगदेहग सर्व असत । वासना तिकडे सत्रा ॥६२॥
एवं स्थूळ सूक्ष्म देह दोन । याचें केलें निरूपण ।
आतां तिसरें याचें कारण । शरीर केवीं तें बोलिजे ॥६३॥
अज्ञानं कारणं साक्षी बोधस्तेषां विभासकः ।
बोधाभासो बुद्धिगतः कर्तास्यात्पुण्यपापयोः ॥२॥
अज्ञान हेंचि कारण शरीर । यासी आत्मा साक्षी भास्कर ।
बुद्धि प्रतिबिंबरूप विकार । तो बोधाभास जीव ॥६४॥
तोचि पुण्यपापाचा कर्ता । सुखदुःख भोगी तत्त्वतां ।
एक माथां घेऊन अहंता । देहबुद्धीची ॥६५॥
देहद्वय जालें जें निर्माण । कांहीं निमित्तास्तव होय दर्शन ।
तेंचि कारण शरीर अज्ञान । कल्पावें लागें ॥६६॥
जेवीं अंधारीं सर्प दिसे । हा कासयानें जाला असे ।
तया कल्पावें लागे अपैसें । दोरीचें न कळणें ॥६७॥
सर्पावरून न कळणें भावावें । परी तयासी रूप नोव्हे ।
तेवींच अज्ञान आहेसें कल्पावें । देहद्वय दिसतां ॥६८॥
अज्ञान म्हणजे न कळणें । निजरूपाचें विस्मरणें ।
हें आधीं जालियाविणें देहद्वय भासतीना ॥६९॥
हे अज्ञान म्हणसी कोणा । तरी नव्हे आत्मया आपणा ।
जेवीं दोरीचिये अज्ञाना । दोरिसी नाहीं ॥१७०॥
दोरीहून दोरीस पाहणार । जयासी होय मदांधकार ।
न कळणियाचा विकार । तयासी जाला ॥७१॥
तेवीं स्वस्वरूप जें असंग । पहिलें स्वतःसिद्ध अभंग ।
तेथें स्फूर्ति हें माया सोंग । न होऊन जालें ॥७२॥
जालें ते जरी सत्य असतें । तरी मायानामें कां उच्चारितें ।
तस्मात् जालेंच नसतां तयातें । जालेंसें कल्पिलें ॥७३॥
स्फूर्ति म्हणजे अहंब्रह्म-स्फुरण । उगीच आपआपली आठवण ।
जेवीं वायूची झुळूक उत्पन्न । गगना नातळतां उठे ॥७४॥
तेवीं स्वरूपाची स्फूर्ति । उठे परी स्वरूपा आरती ।
असो तया स्फुरणीं असती । ज्ञानाज्ञानें ॥७५॥
स्फूर्तीत स्फूर्तीचें कळणें । तयासी नाम ठेविलें ज्ञान ।
येर स्वरूप चिद्घन । विस्मरण जें तया ॥७६॥
त्या विस्मरणा अज्ञान नांव । तस्मात् स्फुरणासि आली नेणीव ।
आणि ज्ञानही तेथेंचि आठव । रूप जालें असे ॥७७॥
स्वरूपीं वृत्तीच असेना । विस्मरण कैचें जें आठवीना ।
यास्तव अर्तीत तें ज्ञानाज्ञाना । असे तैसें आहे ॥७८॥
स्फुरण होतांच तेथें उठलें । ज्ञानाज्ञान उत्पन्न जालें ।
तें ज्ञान परि न जाय कल्पिलें । चिद्रुपासम ॥७९॥
पाणियामाजी सूर्य बिंबला । तेथें प्रकाशही दिसों लागला ।
परी तो सूर्याचा नोव्हे भास जाला । मिथ्या उपाधीस्तव तेवींच चिद्रूपता अनंताची ।
स्फुरणीं प्रति भासली मिथ्याची ।
ते मानिजेना स्वस्वरूपाची । कवणेंही काळीं ॥८१॥
तस्मात् ज्ञानही असेना जेथें । तरी केवीं कल्पावें अज्ञान तेथें ।
हें विचारवंते जाणावें समर्थंे । व्यर्थचि येरां ॥८२॥
असो स्फुरणीं जें ज्ञानाज्ञान । तीच विद्या अविद्या ह्या दोन ।
आवरणशक्ति अविद्या म्हणून । विक्षेपशक्ति विद्या ॥८३॥
दोरीचें जें आवरक । तें आवरण शक्तीचें रूपक ।
सर्पाचें जें उत्पादक । ते विक्षेपशक्ति ॥८४॥
तेवींच स्वस्वरूपाचें आच्छादन । तें आवरण शक्तीचें लक्षण ।
जगाचें जें उत्पादन । ते विक्षेपशक्ती ॥८५॥
असो विद्येंत जें प्रतिबिंबत । चिता ऐसा भास दिसत ।
तो ईश्र्वर कर्ता सर्व जगांत । नाम ठेविलें ॥८६॥
अविद्या प्रतिबिंबित जीव । चिदाभास उमटला स्वभाव ।
हाचि भोक्ता जाला सर्व । सुखदुःखाचा ॥८७॥
परी हा देहद्वय न होतां । अज्ञानगर्भीं जाला राहाता ।
गुप्त असून जगा समस्ता । उपादान-कारण असे ॥८८॥
प्रतिबिंबयुक्त अविद्या माया । उपादान कारण जगा यया ।
तेवींच निमित्तकारण शिष्यराया । विद्यासह ईश ॥८९॥
नेणिवेचा जो जडपणा । आणि विद्यारूप विक्षेप जाणा ।
या उभयांस्तव जाली रचना । चंचळ जडाची ॥१९०॥
तेंचि ऐकावें कैसें कैसें । उत्पन्न जालें असे जैसें ।
मुळीं स्फुरण तों एकचि असे । ज्ञानाज्ञान रूप ॥९१॥
ज्ञानाचा जाला सत्त्वगुण । अज्ञानाचा तमोगुण ।
उभयात्मकें रजोगुण । जाला असे ॥९२॥
स्फुरणींच जें छिद्र पडिलें । म्हणजे चिद्घन असतां स्फुरण जालें ।
तया अवकाशा नाम ठेविलें । आकाश ऐसें ॥९३॥
स्फुरणाचा जो चंचलपणा । तो वायूचे पावला अभिधाना ।
भासलें स्फुरण तें वचना । तेज बोलिजे ॥९४॥
मुदु स्फुरण तेंचि आप । कठिण अज्ञान पृथ्वीचें रूप ।
एवं हे अष्टधा सूक्ष्मत्वें अल्प । स्फुरणींच असे ॥९५॥
पुढें तमोगुणापासून । स्पष्टत्वा आलीं भूतें संपूर्ण ।
एकेक भूत भिन्न भिन्न । दिसूं लागलें ॥९६॥
शब्दामुळें आकाश जालें । कीं आवकाशीं शब्दा स्फुरणस्व आलें ।
तेंचि आकाश नाम पावलें । शब्द विषय तन्मात्रा ॥९७॥
स्पर्शामुळें वायु जाला । वायुमुळें स्पर्श उठिला ।
यास्तव वायु हा नाम पावला । स्पर्श विषय तन्मात्रा ॥९८॥
रूपामुळें जालें आप । आपास्तव रसासी रूप ।
तस्मात् आप हा तयासी जल्प । रस विषय तन्मात्रा ॥९९॥
रसामुळें जालें आप । अपास्तव रसासी रूप ।
तस्मात् आप हा तयासी जल्प । रस विषय तन्मात्रा ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP