मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २३०१ ते २३५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २३०१ ते २३५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


ऐसें ऐकतांचि रविदत्तासी । अति आल्हाद जाहला चित्तासी ।
साष्टांग नमितसे चरणासी । प्रदक्षणा करी ॥१॥
पुढें बद्धांजुळी जोडुनी । विनवीत मंद मंद वाणी ।
जी जी स्वामी कृपा करोनि । दीना उपदेशिलें ॥२॥
हे स्फुरणापासून बत्तीस । देहत्रयात्मक पंचकोश ।
याहून आत्मा तूं चिदंश । हें हें भ्रमें दिसे ॥३॥
हें सत्य सत्य जी सप्रमाण । हें अनात्मजात मी नव्हे संपूर्ण ।
तोचि आत्मा सच्चिद्धन । निजांगें ब्रह्म ॥४॥
यांत अन्यथा कधीं न घडे । वाजती श्रुतीचे चौघडे ।
परी हे सारे दिसती रोकडे । ज्ञानाचे दृष्टीं ॥५॥
तैसा आत्मा सच्चिद्रूप । अनुभवासी न ये अल्प ।
तरी निश्चयाचा साक्षेप । कैसा करावा ॥६॥
तस्मात् केवळ स्वरूप स्वभावें । केवढें किती तें अनुभवावें ।
जाणिल्यावरी निजांगें व्हावें । या रीतीं आज्ञा ॥७॥
परी आधीं जाणिल्यावीण । कवणिया निश्चयें अंगें होणें ।
तस्मात् मज दीनासी करावें पावन ।
माझें निजरूप मज द्यावें ऐशी प्रार्थना सच्छिष्याची ।
ऐकून वृत्ति तुष्टली गुरूची । प्रतीति बाणवूं पाहे आतांचि ।
ऐसें बोलून आलिंगिलें ॥९॥
परी आरंभीं आत्मा ब्रह्म । किती उघडा ऐस परम ।
हें हें दिसें जें रूप नाम । जाहलेंचि नाहीं तेंचि आहे ॥२३१०॥
जैसें अलंकारीं सुवर्ण । अंतर्बाह्य परिपूर्ण ।
नग नाहींच जाहले उत्पन्न । आहें तें सुवर्णचि ॥११॥
तैसें नाम रूप वाउगें कल्पिलें ।
तें काय दिसावया योग्य खरें जाहलें ।
अधिष्ठान मात्र तें न जाय लोपलें । कवणेंही काळीं ॥१२॥
तस्मात् रविदत्ता आत्मयाचे । जितुकें उघडेपण साचे ।
तितुकें नव्हे या पंचकोशाचें । जीवेशासहित ॥१३॥
आणि ब्रह्मात्मयाची जितुकी व्याप्ति । इतुकी जीवेशाची नव्हे वस्ती ।
तेचि कैशी ऐकें एकाग्र मतीं । सप्रतीत सांगू पुढें आपोआप तुझा तुजला ।
स्वानुभव जाईल बिंबला । परी प्रस्तुत साधने श्रवणाला ।
चित्त हें करावें ॥१५॥
रूपरसादीनांविकल्पनेसाएवअनुवर्तते ॥
रूप म्हणजे ईशादि ईशनिर्मित । रसादि विकल्प ते जीवकृत ।
या इतुकीयांचे ठायीं एकचि वर्तत । ते चित्कळा निश्चयें ॥१६॥
ईशादि तृणांत या सर्व रूपीं । आणि रसादि जीवकृताचे विकल्पीं ।
आत्मा ब्रह्मचि सच्चिद्रूपी । व्यापून असे ॥१७॥
ब्रह्मत्मयाचे ठाईं प्रथम । वाउगा स्फुरणासी जाहला उद्भम ।
जाहला परी तोचि नाशिला भ्रम ।
कार्यानुमेय कल्पिला ऐसी स्फूर्ति तेचि मूळमाया ।
होऊन दिसतसे वायां । जैशी शुक्तिकाची एक असोनियां ।
भ्रमें रजत भासे ॥१८॥
रजत नाहीं आणि दिसेना । तेवीं मूळ माया न दिसे असेना ।
शिंप जैसी दिसे आहेपणा । तेवीं ब्रह्म सच्चिद्रूप आहे शिंप दिसे शिंप ।
तेवी ब्रह्म असे भासे सच्चिद्रूप । रजत नाही दिसे आरोप ।
तेवीं माया नाहीं न दिसे ॥२१॥
एवं मायेसी निस्तत्त्व अभान । ब्रह्म तें अस्तित्वें भासमान ।
या उभयतांचेंही स्वभावलक्षण । येणेंरीतीं अकृत्रिम ।
तस्मात् ब्रह्म आत्माचि स्फुरणीं आहे ।
स्फूर्तिरूप माया पहातां न लाहे । तरी रविदत्ता उघडें पाहे ।
विचारें ब्रह्म ॥२३॥
शिंप जैशी उघड भासे । इतुकें रजतपण कोठें असे ।
ब्रह्मात्मरूप तें सिद्ध ऐसें । माया नाहीं गा नाहीं ॥२४॥
तया मायेच्या दोन शक्ति । विद्या अविद्या नाम पावती ।
परी त्या कवणें रीतीं रूपा येती । कारण तेवींच कार्य ॥२५॥
जैसें शिंपींचें न कळणें । दुसरें रजताचें उत्पादन ।
तैसें एक निजरूपाचें विस्मरण । दुजें उभवी जगा ॥२६॥
हेंचि विद्या अविद्येचें लक्षण । यासि कोणतें असे आहेपण ।
जेवीं काय असे शिंपीविण । तेवीं स्वरूपाविण काय ॥२७॥
आहे स्वरूपप्रतीति स्वरूपाची । निस्तत्त्वता विद्या अविद्येची ।
तेवींच प्रतीतिही नव्हेची । नसती म्हणोनी ॥२८॥
तस्मात् विद्या अविद्या अमुक परी । दावावया नसती निर्धारी ।
तया अविद्या विद्येमाझारीं । जीवेश बिंबले ॥२९॥
जरी प्रतिबिंब ब्रह्मात्मयाचें । परी नाहींपण विद्या अविद्येचें ।
तरी जीवेशासी रूप कैचें । मृगजल मीनापरी ॥
ब्रह्मात्मयाचा आहेपणा । तेणें प्रतिबिंब दिसती नयना ।
ब्रह्मात्मा चिद्रूपें देखणा । तो प्रकाश उमटे जीवशीवीं ॥३१॥
निजात्मयाची सुखरूपता । उमटली जीवेशांसी तत्त्वतां ।
येऱ्हवीं या उभयांसी पाहतां । रूपचि नाहीं ॥३२॥
रूप नाहीं या नांव असत् । रूपेंवीण चेतन कवणा येत ।
म्हणोनि जें का परप्रकाशयुक्त । तें जडचि खरें ॥३३॥
ऐसिया निस्तत्त्व जडासी । सुखरूपता असे कैशी ।
सुखदुःखाचिये मिरासी । राहणें जया ॥३४॥
तस्मात् जीवेश दुःखरूप । तया कैचें सच्चिदानंदरूप ।
वाउगा भासला प्रतिभासा आरोप ।
मुख्य स्वरूपाचा जेवीं दर्पणीं मुख्य सूर्याचें ।
प्रतिबिंब पडिलें जेवीं साचें । वाटोळें प्रकाशित तरी तें कैचें ।
असे सत्य ॥३६॥
तैसेचि जीवेश हे दोन्ही । निस्तत्त्वें पाहती मुख्य ज्ञानी ।
येरव्हीं सत्य मानिजे अज्ञानीं । बाळपणीं प्रतिबिंब खरें ॥३७॥
असो ब्रह्मात्माची एकरूप । जाहलाचि नाहीं जीवेश आरोप ।
तस्मात् नाहींच तयासी कैचें रूप । आहे तेंचि आहे ॥३८॥
एवं विद्या अविद्यात्मक मायास्फूर्ति । आणि जीवेश प्रतिभास भासती ।
ऐसे पांच प्रकार एकत्र वसती । तो आनंदमय हाचि कारण समष्टीचा ।
तोचि पृथक जाहला व्यष्टीचा । यासी ब्रह्मात्मयावीण कैंचा ।
असे प्रभाव ॥२३४०॥
ऐसिया आनंदमयापासूनी । भूतभौतिकांची उभवणी ।
प्रथम आकाश जाहलें दृश्यपणीं । तें पहावें विचारें ॥४१॥
गगनींही आहेपणा ब्रह्मींचा । म्हणोनि आकाश आहे बोलिजे वाचा ।
जेवीं रजतासी आहेपणा शिंपीचा । तेवीं सद्रूपा आकाश नांव ॥४२॥
शिंपीचा आहेपणा त्यागूनी । रजत घेतां न ये जोखुनी ।
तैसें ब्रह्म सद्रूपावांचोनी । गगन दृश्य होय कैसें ॥४३॥
तस्मात् वाउगें गगन नाम ठेविलें । परी तें निस्तत्त्वपणें नाथिलें ।
आहे तें ब्रह्म सद्रूप संचलें । दिसतांही जरी ॥४४॥
ऐसें असतां केवढें अज्ञान । खरेंच केलें नसोनि गगन ।
परी ज्ञाते जाणती नाहींच म्हणून । आहे तें ब्रह्मरूप ॥४५॥
जैसें मृगजळ दिसे उखरीं । तें सत्य मानिती मृगें सारीं ।
परी जे विवेकी दिसतांही नेत्रीं । सत्य कधी मानिती ना ॥४६॥
तैसें अज्ञानें जें सत्य भाविलें । तें ज्ञानया नवचे सत्य जाहलें ।
गगन नाहींच एक निर्धारिलें । सत्य ब्रह्म आत्मरूप ॥
ऐसेचि वायु तेज आप भूमि । निस्तत्त्व पहावे अनुक्रमीं ।
एक सद्रूप असे रूपनामीं । दुजा भाव असेना ॥४८॥
येक शीत चांचपावें । सर्व भिन्न भिन्न नलगे पहावें ।
तैसें आकाश विवेचितां समजावें । चारी भूतें निस्तत्त्व ॥४९॥
भूतांपासून जन्मल्या खाणी । त्या पंचप्रकारें दिसती नयनीं ।
जारज अंडज स्वेदज हे तिन्ही । उद्रिज्ज मानसिक पांचवी ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP