मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १३०१ ते १३५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १३०१ ते १३५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


दूषित देहा त्यागिलें । शकलें स्त्रीपुरुष रूप जालें ।
तोचि स्वायंभूमनु नामें बोलिले । शतरूपा कामिनी ॥१॥
ऐसें ब्रह्मदेवें कल्पितां । निर्माण होती प्रजा समस्ता ।
परी ते ब्रह्मयाची नव्हे सत्ता । सामर्थ्य ईशाचें ॥२॥
जरी स्वसत्तेनें ब्रह्मदेव । उत्पन्न करिता प्रजा सर्व ।
तरी हें दुःखरूप अपूर्व । वाटतें कां तया ॥३॥
हे काय हो दुष्ट प्रजा जाली । तेव्हां खेदें नकोशी वाटली ।
मन्वादि पाहतां वृत्ति तुष्टली । तस्मात् खरी पराधीनता ब्रह्मदेवें अमुकसें कल्पावें ।
तें ईश्र्वरें आणून उभें करावें । जैसें बाळानें छंदें रडावें । तें पुरवावें जननीनें ॥५॥
जें जें होणार तें तें कल्पिता । उत्पन्न होतसे ईशसत्ता ।
न होणार तें येणें दांत खातां । काय होतें ॥६॥
जेवी व्हावयाजोगा छंद घेतला । तो बाळाचा मातेनें पुरविला ।
न होणार छंदें तो ताडिला । मुखावरी करें ॥७॥
जरी म्हणतील कोणी ब्रह्मयासी । न होणें हे वाणी कायसी ।
तरी पहा होणार जालियासी । पुढें खुंटली मानसिक ॥८॥
पुढें मैथुनसृष्टीच चालतां । मग मानसिका न ये उभवितां ।
होत असती जरी आतां । तरी प्रत्यया कां न येती ॥९॥
तस्मात् होणार तितुकें मात्र जालें । न होणार कल्पना न चले ।
म्हणोनि हें ईशसृष्ट जितलें । मैथुनी कीं मानसिक कल्पित भावना ते जीवाची ।
जी मागें निरोपिली मनोमयाची ।
प्रत्यक्षता करणें जे तृणाची । ती ईशाची कृति ॥११॥
येथें विरोध तो असे कोण । भास तितुका जीवनिर्माण ।
प्रत्यक्ष होणें तो मायावी ईशान । करी मायिकत्वें ॥१२॥
असो ब्रह्मदेवाचे कल्पनेस्तव । ईश्र्वरें निर्मिल्या प्रजा सर्व ।
तितुक्या ब्रह्मदेवापुढें स्वभाव । उभ्या तिष्ठती ॥१३॥
पाहें रविदत्ता पूर्वीचा । प्रणवरूप जो वेद साचा ।
जो सांगितला पंच अंगांचा । त्याचाचि हा परिणाम ॥१४॥
हे जितुकीं मानससृष्टि । उंच नीच योनींची दाटी ।
ब्रह्मादि कीटकांत थाटी । वरी येका प्रणवाच्या ॥१५॥
प्रवणरूप द्रव्याचें जाहलें । या इतुकियांत प्रणवेंचि व्यापिलें ।
तेंचि कैसें पाहिजे ऐकिलें । प्रणवचि येक अवघियां ॥१६॥
सर्वांचा साकार जो दिसे । तो येक अकार मात्र विलसे ।
सर्वांचा लिंगदेह चळतसे । तो भासरूप उकार ॥१७॥
सर्वही आपणातें न जाणती । यास्तव दों देहां जाहली उत्पत्ति ।
तोचि मकार अज्ञान भ्रांति । मात्रा तिसरी ॥१८॥
पुढें प्रवृत्ति पाहते जाले । तेंचि ज्ञान अन्यथा भाविलें ।
तया ज्ञानाचे प्रकार विभागले । सामान्य विशेष ॥१९॥
हे दोन्हीही कीटकांत असती । विशेष तया अर्धमात्रा बोलती ।
सामान्य प्रकाश बिंदु निश्चिती । एवं पंच अंगी प्रणव ऐसा एकला प्रणव सर्वांमाजी ।
ब्रह्मादि कीटकांत सहजीं ।
येथें परी नसे किमपि दुजी । सर्वही वेदरूप ॥२१॥
ऐसा सर्वही वेद असतां । त्या कीटकादिकांच्या अतौता ।
जेथें प्राणवायु जाला चळता । तेथें सोहं शब्दही उठे ॥२२॥
सोहं अक्षरें हाचि प्रणव । मांगें निरोपिला वेदराव ।
तोचि या सर्वात स्वयमेव । सर्वदा चाले ॥२३॥
हें असो पुरुषदेह जितुके । देवऋृषिमानवादिकें ।
तेथें मातृकासहित कौतुकें । शब्दब्रह्म प्रगटला ॥२४॥
परा पश्यंति मध्यमा तिसरी । ह्या तीन वाणी कीटकांत निर्धारी ।
यया पुरुषदेहीं चौथी वैखरी । प्रगटती जाली ॥२५॥
मागें पुढें मातृका उमटती । तयाचे शब्द अनंत होती ।
ऐसा अनंतरूप वेद निश्चिती । पुरुषदेहीं वसे ॥२६॥
पहिला प्रणवरूप वेद । तो कीटकांत सोहं शब्द ।
परी तेथें प्रवृत्ति निवृत्ति विशद । दोन्ही न होती ॥२७॥
आहार निद्रा आणि मैथुन । पशुदेहीं हे व्यापार तीन ।
होत असती पराधीन । म्हणोनि ते निकृष्ट ॥२८॥
पुरुषदेहीं मात्रा उमटल्या । वैखरीनें स्पष्ट जाल्या ।
तयाच्या श्रेणी प्रगटल्या । व्हावया प्रवृत्ति निवृति ॥२९॥
म्हणून पुरुषदेह उत्तम । प्रवृत्ति निवृत्तीचें धाम ।
जागृतिआदि मोक्षांत सम । करूं इच्छी तें घडे ॥१३३०॥
असो प्रणव आणि शब्दरूप । सांगितले वेदाचें स्वरूप ।
या उभयांसी किंचित् अल्प । जीवकृत्यता नसे ॥३१॥
हा प्रणवरूप जो वेद साचा । हाचि ईश्र्वर प्रेरक सर्वांचा ।
तथापि कर्ताही त्रिमात्रांचा । ईशचि मायावी ॥३२॥
दुसऱ्या मात्रा पन्नास असती । ज्या नादस्वरास्तव उमटती ।
हाही शब्द ब्रह्मयाची उद्भूति । ईश्र्वरापासुनी ॥३३॥
आतां तुझी आशंका मुख्य चित्ताची । कीं प्रवृत्तिनिवृत्तिरूप रचना ज्याची ।
तया मार्गप्रदर्शक वेदाची । उत्पत्ति कोणीं केली ॥३४॥
हे जीवें केली तरी सामर्थ्यहीन । ईश करी तरी त्या नसे योजन ।
म्हणून या रचनेसी कर्ते आपण । उभयतां जीवेश ॥३५॥
तरी हेंचि कैसें तें ऐकावें । कवणेपरी वेदें प्रगटावें ।
बोलिजे तें जैसें स्वभावें । यथातथ्य असे ॥३६॥
जितक्या मानसिक प्रजा जाल्या । त्यांत पश्र्वादि स्वव्यापारा लागल्या ।
पुरुषाकृति जितक्या उरल्या । त्
या तिष्ठती ब्रह्म्य़ासमीप ॥३७॥
प्रजापति देव ऋृषि संपूर्ण । मनु आदि मानवजन ।
ते ब्रह्मदेवासी कर जोडून । विनविते जाले ॥३८॥
तूंचि आमुचा मातापिता । तूंचि धाता स्वामी देवता ।
तरी आम्हांसी अज्ञापीं आतां । काय करावें तें ॥३९॥
करावें काय न करावें कोणतें । कोठें रहावें काय खावें तें ।
काय गावें काय घ्यावें चित्तें । आज्ञापिसी तें करूं ॥१३४०॥
हें ब्रह्मदेवें सर्वांचें ऐकोन । करिता जाला अंतरीं मनन ।
यासी काय सांगावें आपण । तें कृत्याकृत्य नेणें ॥४१॥
आणि हे मजलाचि कर्ता म्हणती । नेणती कवणाची सामर्थ्यशक्ति ।
आतां प्रवृत्तीच सांगू या प्रति । तरी निवृत्ति कळे कैसी निवृत्ती जरी सांगावी ।
तरी पुढें उत्पत्ति केवीं व्हावी ।
ऐसी रजोगुणें पडली गोवी । ब्रह्मदेवासी ॥४३॥
तेव्हां दुश्चितपणें स्तब्ध ठेला । कांहीं सुचेना वेडावला ।
तंव अंतरांतून भडाडिला । शब्दांचा वोघ ॥४४॥
हे प्रेरणा नव्हे विरिंचीची । कल्पना तों खुंटली जीवाची ।
परी अंतर्यामीं मायावी ईशाची । वस्ती जे असे ॥४५॥
मुख्य स्फूर्ति जे निर्विकल्पक । त्यांत भासला जो प्रकाशक ।
जो कर्तेपणाचा मायिक । इक्षणशक्ति जयाची ॥४६॥
तया ईश्र्वरापासून । उद्भवला हा वेद संपूर्ण ।
बुद्धि किंवा नसतां मन । संकल्पासहित ॥४७॥
संकल्पेविण जीवत्व मंदलें । योजना कैशी कांहीच न चले ।
जैसें निजेलें मनुष्य वोसणलें । तें बोले परी कळेना ॥४८॥
तैसा ब्रह्मदेव संकल्पासहित । मूर्छितापरी जाहला भ्रांत ।
परी शब्द उठताति अनंत । जेवीं भरतें समुद्रा ॥४९॥
अनंत शब्द दाटले अपार । फुटों पाहें सर्व शरीर ।
एका मुखांतून नव्हे वार । म्हणून चौमुखीं निघती ॥१३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP