Dictionaries | References उ उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला Script: Devanagari Meaning Related Words उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मस्कतचा व्यापार पूर्वी फार मोठा असे. एक उंदीर एका मोठ्या गलबतात राहात असे ते गलबल सफरीकरितां मस्कतास जाऊन आले. त्याबरोबर तो उंदीरहि मस्कतास जाऊन आला पण तो होता तसाच राहिलात्याला काही लाभ-हानि झाली नाही. उंदीर कितीहि दूर गेला तरी आपल्या सामर्थ्याप्रमाणेच कोणतीहि जिन्नस आणू शकतो. त्याला कितीहि प्राप्ति झाली तरी मर्यादितच. त्याप्रमाणें एखाद्या मनुष्यानें कितीहि देशपर्यटण केले तरी त्याच्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणेच त्याला लाभ व्हावयाचा. तो त्यापेक्षां जास्त काहीहि करू शकत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP