Dictionaries | References उ उंदीर Script: Devanagari Meaning Related Words उंदीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 उंदीर is vulgarly written and pronounced उंदर. Pr. उं0 गेला मस्कतास पण सावकार नाहीं झाला A mean man becomes not great by visiting great places. Cœlum non animum mutant qui trans mare currunt. Pr. उंदिरास मांजर साक्ष Summon not your enemy to befriend you. उंदीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A rat; a mouse.उंदिरास मांजर साक्ष Summon not your enemy to befriend you. उंदीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लांब शेपूट असणारे, काळ्या वा पांढऱ्या रंगाचे, कुरतडणारे जनावर Ex. उंदराने धान्याचे पोते कुरतडले. MERO COMPONENT OBJECT:शेपटी ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मूषकWordnet:asmনিগনি bdएनजर benইঁদুর gujઉંદર hinचूहा kanಇಲಿ kasگَگُر kokकोळहुंदीर malഎലി mniꯎꯆꯤ nepमुसा oriମୂଷା panਚੂਹਾ sanमूषकः tamஎலி telఎలుక urdچوہا noun संगणकावर विशिष्ट कृती निवडण्यासाठी वापरायचे छोटे हातात धरायचे उपकरण Ex. ह्या संगणकाचे उंदीर बदलावे लागतील. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माउसWordnet:asmমাউচ bdमाउस benমাউস gujમાઉસ hinमाऊस kanಮೌಸ್ kasمَوُس malമൌസ് mniꯃꯥꯎꯁ oriମାଉସ panਮਾਊਸ urdماوؑس , کمپیوٹرموش उंदीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चोहोंकडे आढळणारा व सर्व पिकांनां त्रास देणारा एक लहान प्राणी ; आखु ; मूषक . प्राचीन भारतीय ग्रंथकारांनीं उल्लेखिलेल्या उंदराच्या जाती - लालन ; पुत्रक ; कृष्ण ; हंसिर ; चुछुंदर ; अलस ; कषायदंत ; कलिंग ; अजित ; कपिल ; कोकिल इ० घरगुती , रानटी व पिकाच्या हंगामाच्या वेळीं उत्पन्न होणारे असे उंदराचे तीन प्रकार आधुनिक प्राणिशास्त्रज्ञांनीं केलेले आहेत . म्ह०उंदरास मांजर साक्ष = शत्रूची मदत घेणें धोक्याचें असतें , तेव्हां अशी साक्ष घेणें व्यर्थ आहे .डोंगर खणून - पोखरुन - उंदीर काढणें = मोठे प्रयास करुन फार थोडी कार्यनिष्पत्ति होणें ; अचाट परिश्रमाचें अल्प फळ .उंदीर गेला मस्कतास पण सावकार नाहीं झाला = मोठ्या ठिकाणीं गेला म्हणून क्षुद्र माणूस काय मोठा बनतो ?०कानी स्त्री. लहान वेल . हिचीं फुलें गुलाबी रंगाचीं असून पानें उंदराच्या कानासारखीं असतात . ही फार उष्ण असून चीक पाचक आहे . सर्पदंशावर व पुरुषत्व येण्यास फारच गुणकारी . उंदराच्या विषावर ह्या वनस्पतीचा रस पोटांत घेतात . [ सं . आखु - मूषाकर्णी ; गु . उंदरकानी ; बं . इंदुरकाणी ]०खाद स्त्री. उंदराचा शेतास उपद्रव . कीडखाद टोळखाद व उंदीरखाद आसमानी सुलतानी जाहाली असता व स्वारीमुले नुकसानी जाहाली असतां चौकसी करुन मजुरा घ्यावयाची चाल आहे - हकिकत तर्फ नाते तालुके रायगड . ( मसाप २ . १८३ . )एक सरकारी कर . हा सरकारी कोठारांतील धान्य उंदीर खात तेवढें नुकसान भरुन काढण्याकरितां म्हणून बसवीत .०खुरी नखी गेळ - स्त्री . न .जनावरांच्या खुरांच्या वर पाठीमागें जो पुढें आलेला मांसल भाग असतो तो .( कांहीं ठिकाणीं ) खुरांचीं दोन गेळें .०धाड स्त्री. उंदरांचा उपद्रव ; उंदिरखाद .०बिब्बी कर्नाटकांत गणेशचतुर्थीच्या दुसर्या दिवशीं येणारा शूद्रांचा सण . या दिवशीं लेंड्या ( गोड कडबोळीं ) तळून नैवेद्य दाखवितात व तो दुसर्या दिवशीं पहांटे शेताच्या सीमेवर नेऊन ठेवतात . उंदरांनीं शेताची नासाडी करुं नये म्हणून हा सण पाळतात .०वासा पु. घरांतील भिंतीच्या वरील भाग आंतील बाजूस उतरता असल्यास छप्पर व वासा यांमध्यें उंदरास फिरावयास जागा राहाते म्हणून तेथें असणार्या वाशास हा शब्द लावितात . ही जागा बहुधा उंदरांचा त्रास वांचविण्यासाठीं चुन्यानें भरुन काढितात .०सांध स्त्री. उंदीरवाशामुळें उंदरांना वावरण्यास असलेली मोकळी जागा . उंदीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंदरांनी बोक्याचें मत घेणेंआपल्या शत्रूकडे सल्ला घ्यावयास जाणें हे आपणास घातकच होणार. ‘कॉलेजच्या प्रिन्सिपालांचे राजकीय बाबतीत मत घेणें म्हणजे उंदांनी बोक्यांचे मत घेण्यासारखे आहे.’ -टि ३.२९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP