एक तूं ही निरंकार (३७१)
नितांत जरूरी आहे गुरुची कला हस्तगत करण्यासी ।
नितांत जरुरी आहे गुरुची विद्या सर्व शिकविण्यासी ।
नितांत जरुरी आहे गुरुची सर्व काम करण्यासाठी ।
नितांत जरुरी आहे गुरुची परमार्थी होण्यासाठी ।
आत्मज्ञान निज बळे न होई प्रयास केले जरी हजार ।
सत्य असत्य तत्व निवाडा क्षणात करी गुरु 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (३७२)
हरिनामाने तरूनी जाती असता नर पाषाण समान ।
पुर्ण गुरुच्या कृपा प्रसादे अजामेळ गणिका हे प्रणाम ।
भवसागर हा स्वतः तरुनी जाऊ शके ना हा संसार ।
पूर्ण सदगुरु क्षणात एका सर्व इच्छुका करील पार ।
पूर्ण सदगुरुची ही निशाणी येई शरण त्या माफ करी ।
'अवतार' सदगुरु भक्त जनांचे कर्म लेखही साफ करी ।
*
एक तूं ही निरंकार (३७३)
सदगुरु कधीही निज शिष्याचे गुण अवगुण ना मनी धरी ।
कर्म धर्म जाती वर्णाचा विचार कधी ना गुरु करी ।
आहार कुणाचा असो कसाही गुरु कधी ना घृणा करी ।
पेहरावाही असो कसाही विचार कधी ना गुरु करी ।
पूर्ण गुरुचे मानव हेतु नित्य असे मन अती विशाल ।
म्हणे 'अवतार' दयाळू गुरुचे भक्त राहती सदा खुशाल ।
*
एक तूं ही निरंकार (३७४)
सदगुरु तोची पथिकजनांना इच्छित ठायी पोचवितो ।
सदगुरु तोची जिज्ञासुचे भाग्य नासले बनवितो ।
तोच सदगुरु भक्त जनांची पापें सारी नष्ट करी ।
तोच सदगुरु भक्त जनांचे दुःख तापही दूर करी ।
दया दृष्ट सकलांवर ठेवो सकलांवरती प्रेम करो ।
'अवतार' झांकूनी ठेवो अवगूण सर्वानांही साह्य करो ।
*
एक तूं ही निरंकार (३७५)
पुर्ण सदगुरु निजभक्तांची सारी संकटे दूर करी ।
पूर्ण सदगुरु निजभक्तांची कृपा दृष्टी उपकार करी ।
पूर्ण सदगुरु निजभक्तांची सर्व सुखाने झोळी भरी ।
पूर्ण सदगुरु निजभक्तांची दुःख दुवीधा दूर करी ।
लाभ जीत होईल तयाची जो गुरुच्या वचनी राहे ।
म्हणे 'अवतार' देईल शोभा कृपा दृष्टी जर गुरु पाहे ।
*
एक तूं ही निरंकार (३७६)
सदगुरुचा जो प्रेमी सेवक घेई पांच प्रण आधार ।
सदगुरुचा जो प्रेमी सेवक नम्र असे तो सेवादार ।
सदगुरुचा जो प्रेमी सेवक भक्तांचा सत्कार करी ।
सदगुरुचा जो प्रेमी सेवक जो सत्संगीं प्रीत करी ।
यशोगान जो करी भक्तांचे संतजनांचे गुण गातो ।
'अवतार' पाहता तया सदगुरु मनोमन हर्षीत होतो ।