एक तूं ही निरंकार (२११)
सोन्याची लगडी घेऊनी अलंकार कितीही घडवा ।
हार बांगड्या कर्णफुले वा असेल मर्जी ते घडवा ।
भिन्न भिन्न हे सर्व दागिने फिरूनी जर कां वितळविले ।
सोने राहिल सोने अंती अनेक रुपे जरी नटले ।
तैशापरी हा मानव प्राणी मुसलमान हिन्दु बनला ।
निज रूपा 'अवतार' विसरूनी झगडे व्यर्थ करीत बसला ।
*
एक तूं ही निरंकार (२१२)
गीता वाचन करुन पाहे तत्व त्यामध्ये जे लिहिले ।
विराट रूप प्रभुचे जाणा हे जगता या समजविले ।
गुरु ग्रंथाचे वाचन करिता हाच बोध अपणा मिळतो ।
ॐ कार एक जाणा गुरुकरवी जो सन्मार्गा दाखवीतो ।
कुराणा अंजील म्हणती सत्य प्रभु एक आहे अवतार' ।
मूर्ख आपुल्या करिती मनाचे विद्वानांचे एक विचार ।
*
एक तूं ही निरंकार (२१३)
अंगसंग हा प्रभु राहतो काय बनी जाऊन घेणे ।
देहाच्याही असे जवळ जो तयास कां हांकारीणे ।
सहज सुखाने मिळता स्वामी कष्ट कशासाठी करणे ।
कर्मधर्म आचरूनी नित्य काय त्यागुनी मिळवीणे ।
पुरान पोथी हेच सांगती शीस झुकवीता प्रभु गवसे ।
निरंकार 'अवतार' पाहता मनोकमल फूलूनी विलसे ।
*
एक तूं ही निरंकार (२१४)
मी म्हणतो मज प्रभु मिळाल जगताचा नाही विश्वास ।
निज अनुभव मी स्वये सांगतो फसविण्याचा नाही प्रयास ।
जीवन मुक्ती मला मिळाली हाच असे माझा दावा ।
जन्ममरण या पाशामधूनी सोडविले मी माम जीवा ।
ऐका जनहो सत्य कथन हे जन्ममरण मज ना आता ।
'अवतार' म्हणे या यमधर्माची भीती मज नाही आता ।
*
एक तूं ही निरंकार (२१५)
एकच या जगताचा स्वामी समज मनाला एक दिली ।
झगडे संपवूनी सदगुरुचे गोष्ट एक समजाविली ।
पूजन ध्यान सुद्धां एकाचे एक धडा गुरुने दिधला ।
उरेल केवळ एकची बाकी मार्ग एकची दावियला ।
एकावाचून दृष्यमान जे इथेच राहील हा संसार ।
याच्या नौके मधुनी आत्मा होईल स्वार म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (२१६)
मन रोगी अन् भोगी ज्याचे धनही पाप कमाईचे ।
कुणास ना विश्वास तयावर करितो काम कसाईचे ।
रात्रंदिन हा कष्ट करितो क्षणभर ना आराम करी ।
स्वयें कलंकीत कुसंगतीने कुळासही बदनाम करी ।
ऐशा दुष्ट जनांवर सदगुरु करील कृपादृष्टी जरी ।
'अवतार' तयाचे पूजन प्रेमे करील ही दुनिया सारी ।
*
एक तूं ही निरंकार (२१७)
पवित्र तन अन मनही पावन करुन कष्ट कमाई करी ।
विश्वासु अन असे दयाळू अहंभाव ना मनी धरी ।
शांती धैर्य भरोसा ठेवी भजनही सांज सकाळे करी ।
गुणवंतांचा संग करोनी नाम कुळाचे उच्च करी ।
तुच्छ तरी हे सदगुण सारे ज्ञान प्रभुचे जर नाही ।
म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण योग असा येणे नाही ।
*
एक तुं ही निरंकार (२१८)
कठीण आहे मानवास या तुझ्या कृपेने गुण गाणे ।
कठीण आहे मानवास या तव इच्छेला ठोकरणे ।
कठीण आहे मानवास या सफल जीवना बनविणे ।
अती कठीण आहे गुरुवीण क्षंमादान प्राप्ती करणे ।
सांठा असो भला गवताचा क्षनात ठिकाणी भस्म करी ।
'अवतार' म्हणे कण एक कृपेचा सारी पापे नष्ट करी ।
*
एक तूं ही निरंकार (२१९)
गुणहीन जरी असेल मानव अवगुणांचे असो भांडार ।
चाल चलन बिशिस्त तयांचे कलंकिते तो असे अपार ।
असो भिकारी आणि दरिद्री कर्जाचा माथ्यावर भार ।
सारे जगत तयाचे वैरी मुख मोडी सारा परिवार ।
सदगुरु ज्याला घेई पदरी करील सारा जग सत्कार ।
मरणोन्मुखास जीवन देई होय कृपाळू जर 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (२२०)
स्यंव आपुली करूनी बढाई मिळवू पहाशी तू सन्मान ।
निंदा वैर मनात ठेऊनी होऊ पहाशी जगी महान ।
जाऊनी मक्का काशी काबा मनास पावन करु पाहे ।
दानपूण्य करूनी दिनराती सुख निद्रा येऊ पाहे ।
सर्व निरर्थक कर्मे तव ही गुरुपाशी येणे लागे ।
'अवतार' सदगुरु चरणी अपुले मस्तक झुकविणे लागे ।