अवतारवाणी - भजन संग्रह १८

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह १८

एक तूं ही निरंकार (१७१)

हंसाचे तू सोंग करुणी लपून बेडूक तू खाशी ।

अपणाला तू भ्रमर म्हणवीसी परी विष्टा स्थानी जाशी ।

सिंहाचे घालून कातडे सिंह आपणा म्हणविशी ।

बोल बोलसी जव तू अपले गर्दभ ओळखला जाशी ।

पूर्ण गुरुला शरण येई तू जर काही बनणे तुजला ।

'अवतार' मिळे तेव्हां ही पदवी करी जो अपणाला ।

*

एक तूं ही निरंकार (१७२)

अरे नरा या जगती तुजला कोनी संगी साथी नसे ।

जाती न संगे तुझीया कोनी जीव एकटा जात असे ।

माय रडे तव धाई धाई बंधु तुज घेऊन जाती ।

सुत दारा कन्याही रडूनी तुझ्या गुणाना आठवीती ।

शुभाशुभ जी कर्मे केली तोच तुझ्या संगे जाती ।

म्हणे 'अवतार' हरिवीन सारी जगताची खोटी नाती ।

*

एक तूं ही निरंकार (१७३)

निरंकार हा केवळ सत्य मिथ्या बाकी सकल जगती ।

एकची सत्य येईल कामी बाकी बोल मिथ्या असती ।

देणारा अविनाशी दाता देन सर्व आहे मिथ्या ।

एका हरिच्या नामावीणा हे चमत्कार सारे मिथ्या ।

संग पतीच्या नित्य वसे जी राहे सदा आनंदाने ।

पती जीवा राहे परदेशी दुःखीत होई विरहाने ।

गृहस्वामी जर घरी दिसे ना शोभा ना देती शृंगार ।

म्हणे 'अवतार' गुरुभेटीने हरिसवे होतील विचार ।

*

एक तूं ही निरंकार (१७४)

लटकून उलटा लावी समाधी तीर्था जाऊन स्नान करी ।

आपण लुटवूनी आपणाला सोने चांदी दान करी ।

निशीदिनी पूजापाठ करूनी आयु आपुले घालवीतो ।

नेमव्रता आचरुनी संयम अभिमानाला वाढवीतो ।

प्राप्त करो कुणी रिद्धी सिद्धि किंवा पवन अहारी असो ।

असो कुणी जरी निपुण वक्ता कींवा उच्च विचारी असो ।

त्यागुनी घर संसारा अपुल्या वनात जाऊनी वस करो ।

जखडूनी कर्मा धर्मामाजी देह आपुला नाश करो ।

अंगसंग जो देव तयाचे तरिही ना तुज होणे ज्ञान ।

म्हणे 'अवतार' विना गुरुभेटी जीवनाचे नाही कल्याण ।

*

एक तूं ही निरंकार (१७५)

अगाध रचना तव भगवंता अंत कुणा कळला नाही ।

गीता ग्रंथ अनू वेदांनीही महिमा तुझीच वर्णीयली ।

अजोड अविनाशी तू दाता उपमा नाही तुझ्या गुणा ।

गुप्त असे हा जगतासाठी दिसे समक्ष भक्तांना ।

तव आज्ञेने तुझी माया सर्व जीवांना भुलवीते ।

धन तारूण्याच्या चक्राने सार्‍या जगता फिरवीते ।

तिळभर सुद्धां करू न शकले बुद्धीमान तुझा विस्तार ।

तूच जाणीसी महिमा अपुला अंत नसे तव पारावार ।

मनमार्गीला तुझी न भेटी भक्तांनी तुज जाणीयले ।

'अवतार' सदगुरुपासून ज्यांनी ज्ञान प्रभुचे मिळविले ।

*

एक तूं ही निरंकार (१७६)

नामतुल्य आणिक ना कांही प्रभुची महानता सारी ।

अधांग अन बेअंत अगोचर ज्याची रचना ही सारी ।

नाम तुझे अणरेणुमाजी नामाने सारे नटरे ।

दृष्य आणि अदृष्य़ हे सारे नामामाजी समावले ।

रवि शशी अन तार्‍यामाजी प्रकाश नामाचा भरला ।

आवागमन या सर्व जगाचे नामाचीच असे लीला ।

दृष्य आणि अदृष्य रूपाने कामी जगता लावियले ।

विविधरंगी मायाजाळी जगताला या गुंतविले ।

उत्तम भाग्य तयाचे जाणा ज्याने तुजला जाणीयले ।

नाम नसे 'अवतार' ज्यापाशी व्यर्थची जीवन घालविणे ।

*

एक तूं ही निरंकार (१७७)

पाऊस पडुनी अडती रस्ते सुसाट वारेही सुटती ।

रात्र भयानक अवघड मार्गी जाता पायही लडखडती ।

मेघ गर्जती नाद भयानक सारे जीवही घाबरती ।

भिजून सारे होती चिंब नदीनाले भरूनी जाती ।

सेवक सदगुरु मिलनासाठी पर्वत पार करुनी जाती ।

भीती नसे वादळ वर्षाची पाऊल पुढती टाकीती ।

तळहातावर घेऊनी मस्तक सदगुरुच्या जवळी येती ।

म्हणे 'अवतार' गुरुचे प्रेमी मृत्युच्या संगे लढती ।

*

एक तूं ही निरंकार (१७८)

जन्मताच तू अरे मानवा नव्हता धर्म आणि इमान ।

जन्मताच तू अरे मानवा कर्मकांड नव्हते सामान ।

जन्मताच तू अरे मानवा नव्हते जनीव्ह नाही कृपाण ।

जन्मताच तू अरे मानवा नव्हती तुजला काही शान ।

जन्मताच तु अरे मानवा नव्हती जाण तुझी तुजला ।

जन्मताच तू अरे मानवा नव्हते माय्हा प्रेम तुला ।

जन्मताच तू अरे मानवा अहंकार तव मनी नव्हता ।

जन्म्ताच तू अरे मानवा द्वेष कुणासंगे नव्हता ।

आपण स्वयेची फांस लावूनी व्यर्थ घेतला माथी भार ।

'अवतार' म्हणे हे वृष्यमान जे भ्रम ना तयांत सार ।

*

एक तूं ही निरंकार (१७९)

बिन आधारी ऐसा कोणी असेल जगती या प्राणी ।

जीवन नौका बुडूं पहाते दिसे ना किनारा नयनी ।

संगे सोयरे झिडकरिती देई न कोन तया थारा ।

ग्रसित होऊनी दूःखामाजी फिरे बापुडा जग सारा ।

व्याधीने देहास भक्षिले फिरे उदासी होऊनी ।

धन संपत्ती रुसुन गेली नसे तया आधार कुणी ।

पदार्थ सारे रुसले त्यावर त्या दुःखे कष्टी होई ।

कुठे मिळे ना तया सहारा मिळत नसे वस्तु काही ।

ऐसा नर येतां गुरु द्वारी सदगुरु लावीतसे कंठी ।

'अवतार' म्हणे जाणुन प्रभुला दुःखातुन होईल मुक्ती ।

*

एक तूं ही निरंकार (१८०)

हिन्दु मुस्लिम सीख इसाई सारे मानव एक समान ।

एक प्रभुची महिमा गाती गीता वेद व ग्रंथ कुराण ।

सकळांचा हा एकच स्वामी आहे एकच हा भगवान ।

सर्व भिकारी याच्या द्वारी प्रजा असो किंवा सुलतान ।

जग निर्माता एक प्रभु हा कठपुतळी परी नाचवीतो ।

पुतळ्यामाजी प्राण टाकूनी अनेक लीला करवीतो ।

प्रकाश देण्या जगतालागी रवि चंद्राला चमकवीतो ।

आपण एकची मालक आहे हुकुम जगावर चालवीतो ।

खेळे कुणाचा कोन खिलाडी जाणील जो हे राज कुणी ।

'अवतार' म्हणे तो क्षणाक्षणाला आनंदी राहील जीवनी ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-22T09:09:52.5870000