एक तूं ही निरंकार (३२१)
अंग संग माझ्या प्रभु असूनी मी राहतो या प्रभुमाजी ।
खाणे पिणे व्यवहार सारे करितो मी याच्यमाजी ।
श्वासोच्छवासी स्मरण करूनी याच्या संगे प्रेम करू ।
सदैव माझ्या समक्ष राहे दर्शन याचे सदा करू ।
धन्य धन्य सदगुरुनाथाचे योग असा हा घडविला ।
'अवतार' गुरु ज्ञानाने जीवा यमापासुनी सोडविला ।
*
एक तूं ही निरंकार (३२२)
हरि न गवसे मंदिर मशिदी पर्वत वनात जाण्याने ।
प्रभु न गवसे जन समुदायी ना गवसे एकांताने ।
मिळे ना प्रभु उपवासाने ना दौलत लुटविण्याने ।
कधा किर्तनी पाठ पूजेने मिळे न अन्य प्रपंचाने ।
प्रभु मिळे गुरु चरणी येतां पडदां स्वये हटवील जरी ।
'अवतार' शिष्य तेव्हां हे समजे सदगुरुवचन विलास करी ।
*
एक तूं ही निरंकार (३२३)
मानव समजे पाठ व पूजा पैलतीरा नेतील मला ।
चौर्याऐंशीच्या चक्रामधूनी सोडवीती येऊनी मला ।
व्रत रोजे अन नेम नमाजे साथ मला देती अंती ।
काबा काशी तीर्थे सारी दुःख लया माझे नेती ।
बंधन कारण कर्मे सारी मानव हा यातच फसला ।
'अवतार' म्हणे ही नागीण माया दंश जीने याला केला ।
*
एक तूं ही निरंकार (३२४)
कैक गुरु बैसोनी आसनी पूजा आपुली करवीती ।
मार्ग प्रभुला पुसता कोणी तयास ते भय दाखवीती ।
साधु होऊन करिती चेले उपजीविका त्यावर करीती ।
स्वतः बुडाले सवे आपुल्या चेल्यानाही बुडवीती ।
जन्म मृत्युच्या फेर्यामाजी सैदव दुःखाने रडती ।
'अवतार' म्हणे या अमोल जन्मा मूर्ख व्यर्थची घालवीती ।
*
एक तूं ही निरंकार (३२५)
कुणा कळे ना रूप प्रभुचे जोवर हा समजावीना ।
स्वंये हटवूनी माया जोवर समक्ष आपण येई ना ।
स्वरूप याचे न कळे कोना जोवर आपण दाखवीना ।
प्रसन्न हा जोवर ना होई मिळे न याची देन कुणा ।
मानव देहामाजी ब्रह्मा सदगुरु रूपे अवतरतो ।
'अवतार' म्हणे हा जीवा शिवाची भेट स्वतः करवीतो ।
*
एक तूं ही निरंकार (३२६)
गुरु पीर पथदर्शक सारे जगताचे वाटप करीती ।
अपुले स्थान टिकविण्यासाठी जनमत क्लेशाने भरीती ।
धर्म जत वर्णाश्रम ऐसे विभाग पाडीयले यांनी ।
घराघरातुन आग लाविली सर्व अशी यांची करणी ।
स्वार्थाचे हे पुतळे सारे जन्म व्यर्थची घालवीती ।
'अवतार' म्हणे हे अपुल्या हस्ते घर आपुले जाळीती ।
*
एक तूं ही निरंकार (३२७)
एक दुजा गुरुनिष्य भेटता आनंदित अती होती ।
श्रद्धा पूर्वक एक दुजाच्या पयी लोटांगण घेती ।
भक्तजनांची रित खरी ही हेच खरे गुरु भक्ती सार ।
सुक्ष्म यास केसांहूनी म्हणती असे धार जैसी तलवार ।
नम्र भाव गुरुशिष्य विसरता गुरु न त्याला समीप दिसे ।
'अवतार' म्हणे ऐशा गुरु शिष्या गुरु सहाय्य करीत नसे ।
*
एक तूं ही निरंकार (३२८)
गुरुशिष्य तोची गुरुकरवी अंगसंग जाणे हरिला ।
नम्र सदा अभिमान त्यागुनी ओळखितो सन्मार्गाला ।
गुरुशिष्य तो गुरु जे दावी त्यावरती विश्वास करी ।
मृदृभाषी आणि संतोषी गुरुभक्तावर प्रेम करी ।
प्रतिपल गुरु सहाय्यक त्याचा जो सदगुरुचे ध्यान धरी ।
शिष्य असा 'अवतार' गुरुचा जगताचे कल्याण करी ।
*
एक तूं ही निरंकार (३२९)
अंग संग जो हरि आमुच्या हाच आमुचा आप्त सखा ।
संगे सोयर्यामाजी सार्या हा संबंधी असे पक्का ।
हीच आमुची मशीद मंदिर हाच असे काबा मक्का ।
धन वैभवही हेच आमुचे हाच असे पैसा अडका ।
प्रभु ध्यान ज्यांनी ना केले व्यर्थ विचारे ते गेले ।
'अवतार' म्हणे ते पथिक सारे करता शोध हरून गेले ।
*
एक तूं ही निरंकार (३३०)
ऐकून कांनी पाहून नयनी त्याउपरी विश्वास करा ।
कथना ऐसे कर्म करुनी जीवन अपुले स्थिर करा ।
कुसंगतीचा त्याग करोनी गुरुभक्तांना संग धरा ।
ऐकू नका लोकांचे तर्क निज ठायी मन दृढ करा ।
विचार करूनी माना वचना मानिल्यावरी फिरू नका ।
'अवतार' मिळवूनी सत्य कधीही असत्य जवळी करू नका ।