एक तूं ही निरंकार (२४१)
पाप करिसी कोणा करिता कोण तुझे आहे जगती ।
फेड करावी तुलाच आहे सारे खाऊनीया जाती ।
दुष्कर्मे जोडूनी माया म्हणशी तिजला तु साथी ।
साथी तुजल करील स्वाहा ऐसी ही आहे पापी ।
माया त्याची होईल दासी प्रसन्न करी जो सदगुरुला ।
'अवतार' म्हणे तो क्षणात एका भेटवील माया पतीला ।
*
एक तूं ही निरंकार (२४२)
मायेमाजी भुलुन प्राण्या विसरून गेला तू दातार ।
जाई न काही अंती संगे इथेच राहील हा संसार ।
सगे सोयरे सारे स्वार्थी तुझीया कामी ना येती ।
आपदकाळी कळेल तुजला पाठ कशी ते फिरवीती ।
देई साथ जो कठीण समयी साधु तो परउपकारी ।
'अवतार' म्हणे संतावीण आहे स्वार्थी ही दुनिया सारी ।
*
एक तूं ही निरंकार (२४३)
दृष्यमान हे सारे मिथ्या संगे ना जाईल अंती ।
साधुकरवी हरिला जाणी तारील तुजला तो अंती ।
हरि नामावीण जन्म मरण सुटणे नाही शक्य तुला ।
चौर्याऐंशीच्या फेर्यामधुनी साडवील हे ज्ञान तुला ।
ब्रह्मज्ञान सदगुरु वाचोनी कुणी कधी ना मिळवियले ।
'अवतार' गुरु जर होय प्रसन्न तरीच ब्रह्मज्ञान मिळे ।
*
एक तूं ही निरंकार (२४४)
निपुण असुनी विद्येमाजी जगताला शिकवील जरी ।
असेल राजा वा महाराजा हुकूम चालवी जगावरी ।
शुरवीर बलवान असुनी आयुष्य वेचिले जरी ।
धनदौलतही अमाप असुनी सुखे जरी असती सारी ।
कौडीचेही मोल न त्याला जी काही कर्मे करीतो ।
'अवतार' प्रभु जर काही जाणीला अवागमन चक्री पडतो ।
*
एक तूं ही निरंकार (२४५)
जात्यामाजी दणे दळती इकडे तिकडे जे फिरती ।
खिळी सवे जे रहती निरंतर दाणे ते बाकी राहती ।
सुख दुःखाच्या चक्रामाजी सारेही चक्का खाती ।
नीच उच्च यामाजी फसूनी पदोपदी ठोकर खाती ।
जो नर सदगुरु चरणी येतो स्थान दुजे प्रिय जया ।
'अवतार' म्हणे चौर्याऐंशीमाजी जन्म फिरूनी नाही तया ।
*
एक तूं ही निरंकार (२४६)
आशा धरू नमो मायेची नकोस ठेवू मित्रांची ।
नकोस आशा धंधावरती धरु नको परिवाराची ।
चतुराईवर आस न ठेवी आस ना धरी विद्येची ।
आस न ठेवी कुंटुंबांवरी सोडी आस कमाईची ।
'अवतार' धरी आशा एकाची ठायी ठायी जो भरला ।
व्यापक प्रभुचा घेई आसरा जो सदगुरुचे दाखविला ।
*
एक तूं ही निरंकार (२४७)
संगी साधी स्वार्थी सारे जीवनाचा आधार गुरु ।
सकल जगाची नाती मिथ्या एकची नातेदार गुरु ।
धन दौलत ढलती पडछाया अचल एक दातार गुरु ।
मिथ्या बाकी सर्व आसरे भवसागर तारील गुरु ।
पूजन करी जो अशा गुरुचे होई तयाचा जयजयकार ।
'अवतार' सदगुरुवीना सर्व हा अर्थ शुन्य आहे संसार ।
*
एक तूं ही निरंकार (२४८)
ज्याने गुरु आधार घेतला जगी तया तोटा नाही ।
मन वाणी अन पावन कर्म क्लेश अनी तिळभर नाही ।
सार्या जगताचा राजा तो जाणील जो याच्या भेद ।
ओळखील जो गुरुस्वरुपा दःख गरीबी न ये कदा ।
अंगसंग हा बसला ज्याच्या श्वासोच्छवासी याचे ध्यान ।
'अवतार' अशा गुरु भक्तावरुनी ओवाळीन मी माझे प्राण ।
*
एक तूं ही निरंकार (२४९)
हाच अविनाशी ज्याचे चार वेद करिती यश गान ।
सहा शास्त्र अन गीतेमाजी लिहिले एकाचेच लिखाण ।
महिमा याच वर्णन करीती गुरु ग्रंथ कुराण पुराण ।
बायबलमध्ये एकावीण ना अन्य कुणाचे केले गान ।
मतैक्य सार्या विद्वानांचे भेद कुणी जाणू शके ।
म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण याची समज मिळू ना शके ।
*
एक तूं ही निरंकरा (२५०)
मानव अपुल्या कर्मानेही बंधनात बंदी होतो ।
कोळीयापरी जळे विणुनी जीव आपुला घालवीतो ।
भले बुरे हे कर्म मानवा बंधन लोहा सोन्याचे ।
ज्ञानावाचून कर्म हे सारे तिमीरा वाहुन नेण्याचे ।
कर्म एकची उत्तम आहे बाकी मिथ्या असे कहाणी ।
'अवतार' प्रभु ज्ञानावीण जैसे घुसळावे रवीने पाणी ।