एक तूं ही निरंकार (२६१)
माया अपुल्या भक्त जनांचे नाम निशाणी मिटवीते ।
नागीण जैशी जन्म देऊनी पिले आपुली भक्षियते ।
संकटकाळी माया राणी कुणा वाचवू ना शकते ।
जशी वानरी मूल आपुले पायी आपुल्या तुडवीते ।
हरि भक्तांना परी ही माया सदा सर्वदा घाबरते ।
'अवतार' म्हणे भक्ताघरी माय सर्वकाळ पाणी भरते ।
*
एक तूं ही निरंकार (२६२)
चंद्र समजूनी चकोर पक्षी तोंड लावितो अग्नीला ।
कमळामाजी भ्रमर फसूनी मुकतो अपुल्या प्राण्याला ।
दीपकावरी पंतग ऐसे कितीतरी जळूनी मरती ।
स्वातीच्या एक थेंबासाठी अती व्याकुळ चातक होती ।
एकंगी हे प्रेम करिती दुजास ते ठावे नाही ।
म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण खरे प्रेम मिळणे नाही ।
*
एक तूं ही निरंकार (२६३)
असो दरिद्री अंगी वस्त्रे अती मलीन असोत जरी ।
तन रोगी ना ठाव ठिकाणा अती गरीब असेल जरी ।
कुणी ना संगी साथी त्याचे जगी न कोणी नातेदार ।
अनाथ होऊनी जगी राहतो कोनी नसे तया आधार ।
परि असे गुरुभक्त खरा तो अंगसंग पाहे निरंकार ।
राजा तो जगताचा त्याला शरण सदैव म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (२६४)
ज्याला याचा मिळे आसरा काम न त्याचे अडूं शके ।
आधी व्याधी उपाधी त्याच्या सन्मुख कधी न येऊ शके ।
आपण स्वतः येऊन तेथे कार्य तयाचे पूर्ण करी ।
क्षणात येऊनी निज भक्तांची सारी कामे पुर्ण करी ।
कुणी न ज्याचे जगती आहे होय तयाचा पालनहार ।
अंगसंग 'अवतार' सदा जो राहे एक हा निरंकार ।
*
एक तूं ही निरंकार (२६५)
निराकार जाणिल्यावाचुनी व्यर्थ असे जगती जिणे ।
मायाधीन अशा प्रान्याचे धृगाकार खाणे पिणे ।
दुष्कर्मे संचित मायेचा मिथ्या मनी धरी अभिमान ।
सत्य मानूनी मिथ्यालाही व्यर्थ करी त्यावरती मान ।
नामविण ना संगे काही अंती होईल पश्चात्ताप ।
'अवतार' गुरुला शरण सदा मी ज्याने केला प्रभु मिलाप ।
*
एक तूं ही निरंकार (२६६)
दुःखी जना सुख मिळते सारे जाणियले जर हरिहरा ।
चढे ना माया रंग मनाला जडला ज्याला रंग खरा ।
निराकार प्रभु जे नाठविती चौर्याऐंशी फेरे फिरती ।
आठ प्रहर ते दुःखामाजी हाय हाय म्हणुनी रडती ।
मान मनाचा अधिक वाढे नाना कर्मे आचरिता ।
सर्व सुखें त्या नरास मिलती 'अवतार' पूरा सदगुरु मिळता ।
*
एक तूं ही निरंकार (२६७)
सर्वोत्तम दरबार तुझाची महिमाही तव अपरंपार ।
गुणातीता तव कृपाही तैसी तुझ्य दयेला नाही सुमार ।
रात्रंदिन जे गुण तव गाती अंगसंग पाहुनी दातार ।
अती कठोरही येता चरणी होईल तो भवसागर पार ।
पापी सुद्धां होईल पावन मुर्ख सुद्धां होईल विद्वान ।
'अवतार' म्हणे तव दासावरुनी ओवाळीन मी माझे प्राण ।
*
एक तूं ही निरंकार (२६८)
पतीत पुनीता करी पवित्र हे प्रभुस्वामी नाम तुझे ।
अनाथासही मिळे ठिकाणा ऐसे उत्तम धाम तुझे ।
सकळ जगत हे वैरी ज्याचे त्याचा तू रक्षण कर्ता ।
दीनदुःखी अन असाहितांचा एक तुची आश्रयदाता ।
कृपादृष्टी तू करिसी ज्यावर ताप तिन्ही मिटूनी जाती ।
'अवतार' मिळे जर नाम सहारा जन सारे अपुले होती ।
*
एक तूं ही निरंकार (२६९)
शोध करिसी कां तू हरिचा जाऊनी तीर्थी वनांतरा ।
अंगसंग या पहा हरिला प्रसन्न करूणी गुरु पुरा ।
आरशात पडछाया जैसे दुधामध्ये असते लोणी ।
तैसे अंतःर्बाह्य प्रभुला सदगुरु दाखवीतो नयनी ।
जिज्ञासू थकले शोधिता कर्माची शेखी हरली ।
अहंभावनेमाजी फसूनी बुद्धी चक्रावूनी गेली ।
सुगम्य ते जग बोले दुर्गम दुर्गम तेची सुगम म्हणे ।
'अवतार' पूर्ण सदगुरुवाचुनी अशक्य आहे प्रभु मिळणे ।
*
एक तूं ही निरंकार (२७०)
सदगुरुचरणी येतां माझी मिटली भ्रम शंका सारी ।
मुक्त जाहले मन चिंतेतुन तेज दिसे दश दिशांतरी ।
गेली दुःखे पीडा सारी सौख्यामाजी वास करु ।
ठाव ना दिसे आणिक कोठे एक तुझा आधार धरू ।
केली मजवर दया गुरुने जन्म मरण मज ना आता ।
'अवतार' म्हणे की ऐशा गुरुला जाईन शरण मी सदा सदा ।