एक तूं ही निरंकार (४१)
संत तोच ज्यासी नामावीण आणिक नाही दुजे काम ।
तोची संत नामावीण एक श्वासही घेत नसे विश्राम ।
रात्रंदिन हे संत सर्वदा श्रीहरिची महिमा गाती ।
नाम औषधा पिऊन सारे रोग आपुले घालवीती ।
नाम हरिचे हरिजनांचा केवळ एक आधार असे ।
उठता बसता खाता पीता गुरु नामावर प्रीत असे ।
संत हरीचे जगतामाजी सर्वांशी प्रेम राहती ।
'अवतार' गुरुला शरण येऊनी शुभ वदती शुभ आचरिती ।
*
एक तूम ही निरंकार (४२)
ज्ञान सदगुरुचेच मानवा घर देवाचे दाखवीतें ।
ज्ञान सदगुरुचेच मानवा मुक्ती मार्गा भेटवीत ।
गुरुवाले त्या रंगी रंगती ज्याला रंग रुप नसे ।
गुरुवाले त्या रंगी रंगती भंग जयाचा होत नसे ।
गुरुज्ञान संताचा ठेवा हीच तयाची महानता ।
ज्ञान गुरुचे हृदयी धरीता शोभा प्राप्त असे भक्ता ।
सार असे हरिनाम गुरुचे योग याग जप नेम असे ।
भक्तजनांन्चे प्राण नाम अहे सर्व रोग औषधी असे ।
जे प्रभुरंगी रंगुन जाती ते गुरुची सेवा करीती ।
हरिजन सारे हरि सारखे जन्म मरण विरहित होती ।
गात रहावे गुण देवाचे पाहुनी उत्तम नाही विचार ।
देह आज अन असेल उद्या नाही भरोसा म्हणे 'अवतार' ।
*
एक तु ही निरंकार (४३)
जय करी वा करी तपस्या खुप धरीले तु ।
वेद ग्रंथ पुस्तके असंख्य नित्य जरी वाचलीस तू ।
नित्य कर्म अन योगही करुनी कर्म धर्म केलेस जरी ।
सर्वस्वाचा त्याग करुनी बैसलास तू बनी जरी ।
उलट सुलट आसने लावूनी करीसी यत्न हजार जरी ।
बांधियली जरी लाख मंदिरे रत्न दान केलेस जरी ।
तुकडे तुकडे करुनी तनाचे हवन तया केलेस जरी ।
व्रत नेमाच्या उपवासाने कष्ट सहन केलेस जरी ।
प्राप्ती होई ना तरी प्रभुची सर्व समज आहे बेकार ।
एक वेळ तू गुरु मुखाने समजुन घ्यावे म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं हि निरंकार (४४)
भ्रमण करोनी या धरतीचे आयु सारे व्यतीत करी ।
काशी कावा जाऊन तीर्था गंगेमजी स्नान करी ।
कष्ट अती देउन देहाला प्राणही तू बलिदान करी ।
भक्षविला जरी देह पशुंना रक्ताचेही दान करी ।
अवघड कर्म करोनी लाखो खुप आसने केली जरी ।
साधन संयम करुनी लाखो बदली केले मार्ग जरी ।
नाना यत्न जरी तू केले पार उतरण शक्य नसे ।
जोवर नाही राम पाहिला प्रेम भाव मनी येत नसे ।
निरंकार अद्वीतीय आहे हरिनामाची महिमा अपार ।
'अवतार' म्हणे जाणी गुरुकडूनी तरीच तूं होशी भवपार ।
*
एक तूं ही निरंकार
बुद्धीमान जरी अती जाहला मृत्यु तया भयभीत करी ।
जैसी जैसी करील करणी अधिक तृषा हैराण करी ।
शांत न होई तृषा मनाची थंड नदीच्या पाण्याने ।
पूर्ण न होई जीवन यात्रा मन बुद्धी चातुर्याने ।
कर्म धर्म ना मानी मृत्यु लचके तोडील अंगाचे ।
मानलेच तर त्या मृत्युने प्रभु नाम घेता वाचे ।
घेतां नाग निरंकाराचे सुख येई अन दुःख जाई ।
'अवतार' गुरुला जाई शरण जो तरीच दर्शन होई ।
*
एक तूं ही निरंकार (४६)
निर्धर्निकाचे धन तु देवा असे खजाना नाम तुझे ।
घर नाही राहण्या जयाला त्यास ठिकाण नाम तुझे ।
मनी जयाच्या मान न येई असशी मान तयाचा तू ।
जग सारे मागे तुजपासेहे देशी सकलां दानही तू ।
सार्या कर्माचा तु कर्ता मालक तुच खरा स्वामी ।
सकलांचे मन तुच जाणसी तुच प्रभु अंतर्यामी ।
ठाव आपुला अपुली सीमा आहे ठाऊक तुझे तुला ।
होईल इच्चा जर का याची जाणील तरीच कुणी याला ।
तुझी स्तुती वर्णाची कैसी मजपाशी सामर्थ्य नसे ।
'अवतार' गुरुची कृपा ही सारी कशासही मी योग्य नसे ।
*
एक तूं ही निरंकार (४७)
आदि पासुन मालक दाता राहील जगताच्या अंती ।
प्रेम जयाचे नाही प्रभुशी समजा तो नर मंदमंती ।
दिसे रुपाने मानव किंतु व्यवहार ना मानवतेचा ।
फासवी रात्रंदिवस जगाला मागे लागून मायेच्या ।
भगवे कपडे अंगी घातले किल्मीष भरले परी मनी ।
उच्च समजतो स्वये आपणा भरलासे अभिमान मनी ।
ध्यान लावूनी माळा जपतो तीर्था जाऊनी स्नान करी ।
मनी लोभाचे श्वान भुंकते आणि मना हैराण करी ।
कामग्नीने मन आतुरले भस्म लावीले देहाला ।
सागर पार करावा वाटे गळ्यात धोंडा अडकविला ।
ज्यास मिळाला पूर्ण सदगुरु ठाव तया प्रभुच्या ठायी ।
'अवतार' म्हणे संताने तोची सत्यरुप होऊन जाई ।
*
एक तू ही निरंकार (४८)
पहा अती दुःखाने प्राणी अखंड जीवनभर रडतो ।
देवाचे हा ध्यान करी ना सहाय्य जो याला करतो ।
नश्वराससे प्रेम जोडिले ओळख देवाची न करी ।
मदांध झाला विषयामाजी मृत्युचे ना ध्यान करी ।
मृत्यु जन्म पाशत जखडुनी फिर फिरूनी येई जन्मा ।
'अवतार' म्हणे रक्षी या जगता धारण करुनी दयाधर्मा ।
*
एक तुं ही निरंकार (४९)
वर्णन मार्गाचे ऐकूनी अंध मार्ग ना चालू शके ।
धरी न जोवर हात सदगुरु निज घरास येऊ न शके ।
जैशापरी एक बहिरा प्राणी नाम तुझे ऐकू न शके ।
मनमार्गी तब नामामृत हे प्राशन कधी ना करू शके ।
मुका जगी जर असेल प्राणी महिमा तब गाईल कसा ।
यत्न त्यापुढे करेता लाखो करील तो गडबड गलका ।
पांगुळ्यामध्ये नाही शक्ति पर्वतावरी चढण्याची ।
'अवतार' रीत ना जाणे जग हे श्रीहरि महिमा गाण्याची ।
*
एक तूं ही निरंकार (५०)
तू मालक पालक तू माझा करू विनंती तुज पायी ।
तन मन धन ही तुझीच माया करू अर्पण सारे काही ।
माय बाप तूची सकलांचा आम्ही सारी मुले लहान ।
होय जरी तव दृष्टी दयेची सुख नांदेल घरात महान ।
ठाव तुझा लागे न कुनाला रुप आगळे तुझे असे ।
उत्तम तू सर्वाहुन उच्च तूच एक आधार असे ।
आहे ठावे सर्व आपले सर्व जाणीसी परिस्थिती ।
'अवतार' दास मी तव दांसाचा सकल त्यजू चरणावरती ।