एक तूं ही निरंकार (३४१)
मोह मायेचा कीडा मानव मायेतच फसूनी गेला ।
मायेची हा स्वप्ने पाहतो ऐसा मायेमध्ये फसला ।
तन मन मायेने ग्रासीले तयार हे जखडूनी जाती ।
माया जाता रडती प्राणी येता आनंदे हंसती ।
मरते समयी कैसी प्राण्या साथ हिला घेऊन जाशी ।
'अवतार' म्हणे ही माया मिथ्या इथेच तू सोडुन जाशी ।
*
एक तूं ही निरंकार (३४२)
नम्र स्वभावे सदा असावे वचन असे या सदगुरुचे ।
विनम्र होऊनी जगी चालणे हेच दागिने शिष्याचे ।
नळापुढे नत मस्तक होतां तहान पाण्याने जाई ।
फळा फुलांनी वृक्ष बहरतां खाली तो वाकत जाई ।
पाणी उतरते वाहून अंती सागरास जाऊन मिळे ।
'अवतार' नम्रता धारण करता मानवास श्रीहरी मिळे ।
*
एक तूं ही निरंकार (३४३)
कोणी म्हणे प्रभाती उठूनी शीत जळे न्हाणे पूण्य ।
कोणी म्हणती तीर्थस्थानी नित्य नहाणे हे पुण्य ।
कोणी म्हणती घर त्यागुनी साधु होणे हे पुण्य ।
कुणी म्हणे मन शुद्धीसांठी शिकणे शिकविणे पुण्य ।
पाप पुण्य या झगड्यामाजी मानव हा फसूनी गेला ।
'अवतार' जयाने प्रभु जाणीला भेद तयाला हा कळला ।
*
एक तूं ही निरंकार (३४४)
राम शाम गोपाळ म्हणूनी करा तयांचा जयजयकार ।
वाहेगुरु अन म्हणती आल्ला लाख करा त्यांचा सत्कार ।
गॉड गॉड ही म्हणा हवेतर अनेक अकरा ऐसे उच्चार ।
तरी हरि ना होणे प्रसन्न बोलून तुमची होईल हार ।
पाहून याला ध्यान करी जो होईल त्याचा बेडापार ।
'अवतार' म्हणे की कलियुगी या नांव असे याचे निरंकार ।
*
एक तूं ही निरंकार (३४५)
पापाने जे धन मिळविले जाई न तें संगें अंती ।
जीवनात मानव हा समजे काळाची मज ना भीती ।
स्त्रिया पुत्र कुंटुबी सारे सर्व इथे राहुन जाती ।
आशेचे हे महाल सारे क्षणामध्ये ढळूनी जाती ।
मानियले तू ज्यास आपुले कांही तुझे हे नरा नसे ।
'अवतार' सदगुरु ज्ञानावाचून प्रभात कधीही होत नसे ।
*
एक तूं ही निरंकार (३४६)
येऊन करा प्रभुचे दर्शन हेच सांगणे जगताला ।
मानवता शिकवी सदगुरु मज ऐशा हैवानाला ।
पापी कपटी अन मुर्खाला प्रभुच्या संगे मिळवीतो ।
आहार अन जीवन मर्यादा सारी काही शिकवीतो ।
दूर करी सारी मन चिंता कमल मनाचे फुलवीतो ।
म्हणे 'अवतारी' सुयोग ऐस जीवा शिवा भेटी करीतो ।
*
एक तूं ही निरंकार (३४७)
मिथ्या सत्याचे हे झगडे काय सत्य परिभाषा असे ।
काय असे अविनाशी जगती नाशिवंत ते काय असे ।
मिथ्या मिथ्या म्हणसी ज्याला ओळखिले कां सत्याला ।
निर्मळ जे बहुमोल पवित्र जाणीयले कां तू त्याला ।
आत्म्याचा मळ धुवूं पहासी पावन पवित्र वेषाने ।
म्हणे 'अवतार' गुरुवीण सारे प्रयास हे व्यर्थची करणे ।
*
एक तूं ही निरंकार (३४८)
इच्छीत स्थान नसे जर ठावे पथिक होय भयभीत मनी ।
मृत्यु भय दुःखाची शंका ऐसा संशय येई मनी ।
कुठे जायचे कसे जायचे कांही होत नसे आभास ।
पाऊल टाकी पुढे परंतु मार्गाचा नाही विश्वास ।
ठाऊक आहे स्थान जयाला त्याच्या संकेता करवी ।
'अवतार' म्हणे भय मिटेल सारे सहजपणे इच्छीत मिळवी ।
*
एक तूं ही निरंकार (३४९)
सुख आशेच्या प्रेमी जनांनो जाणा सौख्य कशाचे नांव ।
सदैव दुःखाला घाबरला जाणा दुःख कशाचे नांव ।
व्याकुळ करते भूक अती जी जाणा भुक कशाचे नांव ।
इच्छित पुरवी सकल जीवांना कल्पवृक्ष कोणाचे नांव ।
शोध करितो ज्या वस्तुंचा वस्तु ती ठाऊक नसे ।
'अवतार' ठिकाणा जाणिल्पावीना गाठशील मुक्काम कसे ।
*
एक तूं ही निरंकार (३५०)
अग्नीने अग्नी विझवीण तीव्र अती अग्नी करणे ।
गटबाजीतुन ऐक्य शोधणे समया व्यर्थची घालविणे ।
नाश घृणेचा घृणा करूनी शक्य कधी नाही होणे ।
पंथामधूनी प्रभु शोधणे जीव आपुला घालविणे ।
एकाचा हा प्रचार मिथ्या जर ना एक जाणीयला ।
म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीणा हरि कुणाला ना दिसला ।