एक तूं ही निरंकार (१११)
निरंकार हा उच्च गुणाहुन स्वयं सर्व गुणवान असे ।
भरुनी हा अणुरेणूमाजी सर्वाहुन हा भिन्न असे ।
अपुली लीला आपण जाणे स्वयेची लीला रचियता ।
ठाव आपुला आपण जाणे परिचय अपुला देई स्वतः ।
निज इच्छेने प्रगट होतो निज इच्छेने लोपत असे ।
आपण लावी आपन तोंडी बनवूनी लय करीत असे ।
स्तः आपण आपणा जिअसा नाही त्यासम कोण दुजा ।
देह स्वयेची स्वयेची आत्मा असे जीवांचा हा राजा ।
रूप एकची अनेक रंग रचना सारी असे हाची ।
स्वयंही सागर स्वयं तरंग आरंभ शेवद हाची ।
रंगी बेरंगी सृष्टी याची खेळ खेळवीतो हाची ।
'अवतार' म्हणे जो याला जाणे महिमा न्यारी असे त्याची ।
*
एक तूं ही निरंकार (११२)
संत जनांची संगत करूनी हरिचा मनी विचार करा ।
मनात ठेवा शब्द गुरुचा एकाचा आधार धरा ।
आणिक सर्वही प्रयत्न मिथ्या आणिक सर्व उपाय ।
मायेतून मनास काढून मनी धरा सदगुरुचे पाय ।
हा जगताचा कर्ता धर्ता जगताचा हाची दातार ।
याचा आश्रय घेई मानवा स्वामी हाच असे करतार ।
भरील जो या झोळी धनाने धनिक खरा तोची होई ।
म्हणे 'अवतार' मिळे जयाला दास गुरुचा जो होय ।
*
एक तूं हि निरंकार (११३)
संपत्ती धन धान्यासाठी मानव नित्य धावतसे ।
सदगुरु सेवा करण्याने ते धन चालूनी येत असे ।
ज्या सुख शोधासाथी मित्रा सदैव तू धडपड करिती ।
सर्व सुखांची होईल प्राप्ती जडता प्रीती संतांशी ।
मान प्रतिष्ठेसाठी ज्या तू उत्तम कर्मा आचरिसी ।
संत जनांची सेवा करीता क्षणी सर्व ते मिळवीसी ।
केली जरी तू लाख औषधें नाही मिटणे रोग तुझा ।
नाम औषधी घेशील जेव्हां मिटेल सारा भोग तुझा ।
सर्व धनाहुन आहे मोठा केवळ नामाचा खजिना ।
म्हणे 'अवतार' तयाला मिळतो वंदन करी जो गुरुचरण ।
*
एक तूं ही निरंकार (११४)
शब्द गुरुचा मनी बैसता तिमीर मनाचा दूर करी ।
मन संतोषी होईल आणि सारी दिविधा दुर करी ।
जीवन पथ होईल सुगम्य सुलभ होई जे कठिण महान ।
मिळेल आदर मान जगी या सोडी जो माना अभिमान ।
अग्नी जैश जळत्या जगती नामच शीतलता देई ।
स्मरण निरंकाराचे करिता सुखशांती मिळूनी जाई ।
सकल भिती भय जाती निघूनी सर्वेच्छा होती पूर्ती ।
स्वयंप्रकाशित होईल आत्मा मिळता खरीं प्रभु भक्ति ।
मिळेल ऐशा घरी ठिकाणा जे जगती शाश्वत आहे ।
'अवतार' जगत हे स्वप्नची सारे एकची सत्य हरी आहे ।
*
एक तूं ही निरंकार (११५)
जगातूनी ह अंतीम समयी दौलत संगे ना जाई ।
ज्या जगताशी प्रांत जोडीली अंती कामी ना येई ।
कुटुंबी सारे पुत्र स्त्रिया आणि तुझे साथी असती ।
यांचा कां तू मालक होशी तुझे यात कोणी नसती ।
सर्व सुखे तू जरी भोगोसी सुटका तरी ना तुज अंती ।
हत्ती घोडे असती जवळी असती गाड्या मोटारी ।
खोटी आहे माया सारी वाळूच्या त्या घरा परी ।
जो प्राणी या दीनदयाळा विसरूनी हरिला जाई ।
नामावीण 'अवतार' तयाला अनुताप अंती होई ।
*
एक तूं ही निरंकार (११६)
खरे भक्त जे भगंवंताचे एकची गोष्ट कथन करितो ।
ज्ञानी होऊनी भक्ती त्यागीता अनुताप होईल अंती ।
करी मानवा बह्क्ती प्रभुची भक्ती फळ मिळवाल तुम्ही ।
उज्ज्वल होईल मानस मंदिर पवित्र मन बनवाल तुम्ही ।
पवित्र कोमल पदकमलांचे प्रेम मनी बसवाल तुम्ही ।
धुपेल मळ जन्मोजन्मीचा कराल निजघरी वास तुम्ही ।
स्वयें ओळखुनी भगवंता मार्ग दाखवी दुसर्यांना ।
चुकले सारे जग मार्गाला सन्मागीं लावी त्यांना ।
नाम हरिचे महान धन हे याचा करा खरा व्यापार ।
'अवतार' म्हणे की सदैव बोला तुंही निरंकार ।
*
एक तूं हि निरंकार (११७)
तूंही तूंही निरंकार म्हणुनी गीतही याचे गान करा ।
याला अपुल्या चित्ती धरुनी मनात याचे ध्यान धरा ।
गान करा तुम्ही महिमा याची पवित्र हा बेअंत असे ।
स्मरण करावे क्षणाक्षणाला मालक हा भगवंत असे ।
पावन केवळ एक अनादी जळी स्थळी व्यापुन आहे ।
पानोपानी नांव हे याचे अणुरेणु छाया आहे ।
या एकातून अनेक झाले याच्यातून सारे येती ।
ओळखणारे या एकाला एकामाजी समावती ।
एकाच्या जे रंगी रंगले सदैव आनंदी असती ।
'अवतार' म्हणे ते संत हरिचे एकाला जाणून घेती ।
*
एक तूं ही निरंकार (११८)
चरण धुळी लावीता कपाळी निर्मळ मन होऊन जाई ।
चरण धुळी लावीता कपाळी सारे जगत मित्र होई ।
चरण धुळी लावीता कपाळी आनंदी रंगून जाशी ।
चरण धुळी लावीता कपाळी चुकेल जन्ममरन फाशी ।
चरण धुळी लावीता कपाळी श्रीहरिचे दर्शन होई ।
चरण धूळी लावीता कपाळी पाप पुण्य संपून जाई ।
चरण धूली लावीता कपाळी आवागमन संपून जाई ।
चरण धूळी लावीता कपाळी जीव मुक्त होऊन जाई ।
चरण धुळी तुम्ही लावा भाळी मिळता साधु संत फकीर ।
म्हणे 'अवतार' भाग्यवंत तो ज्यास मिळाला सदगुर पीर ।
*
एक तूं ही निरंकार (११९)
जयास वाटे ज्ञान मिळाले सदगुरुचा सत्कार करा ।
शीस झुकवूनी करा विनंती सदगुरु आपण कृपा करा ।
गरीब मी तव दारी आलो द्यावे मजला जीवनदान ।
प्रेम आपुले भरी अंतई दया करावी कृपानिधान ।
कोमल सुंदर चरण हे पावन धूळ तयांची दे मजला ।
भंग कधी ना होय जयाचा त्या रंगी रंगू दे मला ।
जीवनाच्या प्रति श्वासामाजी स्मरण तुझीची मज व्हावे ।
पाहून माया रंग बेरंग त्यामाजी ना भटकावे ।
जात नसे दारातुन खाली चालत आली रीत तुझी ।
जोवर चाले श्वास ह्या देही विसर न व्हावी प्रीत तुझी ।
तुझाचा स्वामी आश्रय मजला तुची असशी कृपानिधान ।
'अवतार' पवित्र चरण धूलीचे नित्य घडू दे मजला स्नान ।
*
एक तूं ही निरंकार (१२०)
मातेला प्रिय पुत्र आपुला बंधु प्रिय अती भगिनीला ।
पाणी प्रिय पिपासुला अन प्रिय भाकरी क्षुधिताला ।
प्रीत करी धनवंत धनावर बाळाला प्रिय दुध अती ।
तैशापरी 'अवतार' सेवका अती प्रिय सदगुरु जगती ।