एक तूं ही निरंकार (१३१)
मायेमाजी झोपून प्राण्या अमोल जन्मा घालवीसी ।
हरिनामावीण पाप सर्व ते जे ते तू सेवन करिसी ।
दुष्टासंगे करिशी प्रीती वैर करिशी संतांसी ।
नर्कवास मनमार्गी तुजला फळ करणीचे भोगीसी ।
नाही गुरुवीण मुक्ती मिळणे कोटी कर्म जरी करिशी ।
जन्म मरण लागे तुजपाठी त्या दुःखाने तु रडशी ।
संतवचन जर नाही मानीले अनुताप अंती तुजला ।
कर्मधर्म या पाशामाजी जखडून घेशी अपणाला ।
समय न गेला आहे अजूनी शरण सदगुरुला येई ।
'अवतार' म्हणे तू ऐक बांधवा भवसागर तरूनी जाई ।
*
एक तूं ही निरंकार (१३२)
सदगुरु पूरा ज्यास मिळाला सर्व भोग त्याचे सरले ।
लावून माथी चरनधुळीला भाग्य तयाचे पालवटे ।
ज्याने आपुला प्रभु जाणीला होईल तो भव सागर पार ।
तोच सुखी या विश्वामाजी बाकी सर्व दुःखी संसार ।
दुःख कधी ना येई तयाला गुरुचा वरहस्त असता ।
इहलोकी परलोकी सुखी तो सदैव संगे राही सखा ।
भक्तांचे मुख राहे उज्वल जयजयकर जगी ज्यांचा ।
निदकाचे मुख होईल काळे ताडन करीता यमराजा ।
गुरु भक्तांचा मार्ग वेगळा दुजा मार्ग मनमार्गीचा ।
'अवतार' म्हणे हे संत जनांनो मेळ कधी दोघांचा ।
*
एक तूं ही निरंकार (१३३)
रूप मनोहर यौवन आणि संपत्तीला नाही सुमार ।
प्रणाम करिते दुनिया सरी करिती जरी सारे सत्कार ।
नोकर चाकर यांच्याकडूनी करून येई सारे काम ।
पलंगावरी सुंदर गाद्या सुख निद्रा ऐशो आराम ।
दान धर्मही अमाप केले यश गाईल जरी संसार ।
'अवतार' हरिला जो ना जाणे ऐशा नरा असो धिक्कार ।
*
एक तूं ही निरंकार (१३४)
ठायी ठायी पुशीत आहे ओळख प्रभुची कशी करू ।
जोडीला जो हरिसंगे कोनी जीवन हे बलिदान करु ।
त्याच्या घरच्या होईन चाकर त्याचे भरीन मी पाणी ।
तन मन धन त्याला वाहूनी राहीन मी सेवक बनूनी ।
मान मनाचे त्यागुन सारे घेईन त्याचे दिधले नाम ।
रोम रोम माझ्या देहाचा सदा करील तयास प्रणाम ।
लावूनी त्याच्या चरणधुळीने हे तन माझे धुवीन मी ।
पूर्ण गुरुला शरण जाऊनी मिटवी आपण अपनाला ।
'अवतार' मागुता करी विनंती प्रभुसवे भेटवी मला ।
*
एक तूं ही निरंकार (१३५)
निरंकार सर्वाहुन मोठा नाही जयाचा पारावार ।
जयी तपी संन्याशी कोणी जाणू न शकतो याचे सारे ।
चंद्र सूर्य तारे आकाशी याच्या हुकुमाने फिरती ।
वायु जीव आकाशही याच्या आज्ञेचे पालन करीती ।
जल अग्नी धरती हे तिन्ही हुकमी याच्या वावरती ।
सृष्टीचे या कण कण सारे समर्पित याला होती ।
इच्छी जरी मनाने तर हा क्षणात सृष्टी नष्ट करी ।
येता मनी करी विस्तार मनात येता संहारी ।
नाशिवंत ही सारी माया पवित्र दयाळू तू भगवान ।
म्हणे 'अवतार' गुरुवाचोनी तुझे न होईल उज्वल नाम ।
*
एक तूं ही निरंकार (१३६)
गंगा यमुना स्नान करुनी धुवुनी जर पापे जाती ।
तरी मग सारे जलचर प्राणी कासव बेडूकही तरती ।
स्वप्नमाजी केले कोणी होत नसे ते यथार्थ दान ।
मलीनता जाई न मनाची व्यर्थची आहे ऐसे स्नान ।
कर्मामाजी फसून प्राण्या जीवन व्यर्थ घालवीशी ।
गेला समय न येई हाती अनुतापाने तू रडशी ।
गुरु केवळ धर्माची धरती धर्माची होए शेती ।
गोड फळे जीवन मुक्तीची गुरुसेवक प्रेमे खाती ।
संतांच्या सेवेहुन जगती श्रेष्ठ कर्म आणिक नाही ।
'अवतार म्हणे ज्ञानाहुन उच्च आणिक धर्म दुजा नाही ।
*
एक तूं ही निरंकार (१३७)
काय असे कर्माची नीती भार मस्तकी असे वृथा ।
काय गुढ स्वर्गा नर्काचे काय आत्मा परमात्मा ।
काम क्रोध कशाला म्हणतो काय लोभ अन अहंकार ।
काय त्याग अन योग कोणता काय असे गुरुमत प्रचार ।
बुद्धीला एक प्रश्न विचार शुद्धी तव कोठे गेली ।
पुण्य पाप चक्रात फसूनी भ्रमित अशी तू कां झाली ।
काय घ्यावया आला मानव काय गमवूनी बसलासी ।
कळले ना कळणारही नाही ब्रह्म काय माया कैसी ।
शब्द गुरु अन स्वरुप चेला ओलखी न अंतरी कोणी ।
म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण भेद न जाणु शके कोणी ।
*
एक तूं ही निरंकार (१३८)
न मानीता संतांची वचने सुखशांती ना येई मना ।
परिवर्तन ना होई जीवन संतजनांच्या कूपेवीणा ।
सतसंगाने रुक्ष जीवना सदैव प्रफूल्लता मिळणे ।
दुःख गरीबी नाश पावती सुखशांती पदरी येते ।
खाणे पिने आणी झोपणे जीवनाचा नाही आधार ।
सर्व असो धिक्कार तयाचे जया न चित्ती निरंकार ।
असे जरी राजा सृष्टीचा मुखी परंतु नाही लगाम ।
धन्यवाचूनी वारु जाणा मुखी जयाच्या नाही लगाम ।
एकची असुनी खेळही त्याचा गणती आन दुजी नाही ।
म्हणे 'अवतार' गुरुच देव यांत मूळी शंका नाही ।
*
एक तूं ही निरंकार (१३९)
कर्मी धर्मी जखडून प्राण्या व्यर्थ वेळ कां घालविसी ।
चौर्याऐंशीची फांस गळी कां पुन्हां पुन्हां ओढून घेशी ।
होय मुक्त तव आत्मा ज्याने युक्ती आहे काय अशी ।
बेडी केवळ बेडीच आहे लोखंडी वा सोन्याची ।
बंधन मुक्त होणे नाही ज्ञानावाचून कर्मानी ।
अशक्य मिळणे जीवन मुक्ती देवावीण तुजला प्राणी ।
बेडीने बेडी ना तुटते प्रयत्न हा करणे बेकार ।
लाख कागदी फुलापासुनी कधीही ना येणार बहार ।
मिळता ज्योत असा ज्योतीला अमर ज्योत होऊन जाते ।
'अवतार सागरी थेंब मिसळती सागर नांव तया मिळते ।
*
एक तूं ही निरंकार (१४०)
ज्याने धरती अग्नी बनविली मधूर अन शीतल पाणी ।
ज्याने जीव आकाश निर्मिले जीवनही दिधले त्यानी ।
लेखक लिहुन थकले महिमा वेद ग्रंथ हरले सारे ।
ज्याने सुंदर वायु दिधले सूर्य चंद्र आणि तारे ।
कान दिले श्रवणासी वचने नेत्र सुमंगल पहाण्याशी ।
सुंदर ऐसे हात बनविले पाय गुरुचे धरण्याशी ।
ज्याने सुंदर पाय बनविले संत संगती जाण्याशी ।
सुंदर ऐशी जिव्हा दिधली सदगुरुचे गुण गाण्याशी ।
दाखवील जर ऐसा स्वामी की न भजावे त्या आम्ही ।
'अवतार' म्हणे मी अशा प्रभुची करील धन्यता क्षणोक्षणी ।