एक तूं ही निरंकार (३६१)
रवि शशी अन तारे ज्याच्या आज्ञेचे पालन करिती ।
बळे जयाच्या स्थिर ही धरती पाऊस धाराही पडती ।
शब्दामाजी आग बनविली माता करी तो अग्नीला ।
वायु जीव आकाश चालवी फिरवी या नऊ सृष्टीला ।
लपून हा सर्वास नाचवी ऐसी असे याची लीला ।
'अवतार' जाणूनी ऐशा हरिला वंदन करी सदा याला ।
*
एक तूं ही निरंकार (३६२)
ज्या तेजातून जग निर्मियले तेज पवित्र ते जाणा ।
ज्या ईशाची ज्योत मानव महा ज्योतीला त्या जाणा ।
थेंब एक तू समींदराचा जाणील तोची असे महान ।
अंश जयाचा तयात मिळणे ते तू सागर स्वरूप जाण ।
निरंकाराचा अंश नरा तू निरंकार जाणुन घेई ।
'अवतार' भेद जर असे मिळविणे शरण जाय सदगुरुपायी ।
*
एक तूं ही निरंकार (३६३)
दिले वचन तू विसरून गेला विसरलास तूं सर्व करार ।
तन मन धन मोहजाळी फसूनी जीवन ते केले बेकार ।
ज्याने निर्मिली सृष्टी सारी स्वामी सत्य हा सृजनहार ।
कायम दायम संगी साथी सत्य सर्व ठायी निरंकार ।
सुख संपत्ती ज्याने दिधली मानी तयाचे तू आभार ।
क्षणोक्षणी या पूण गुरुची महिमा गावी म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (३६४)
गाफील होऊन अरे मानवा अमुल्य समया घालवीसी ।
गाफील होऊन अरे मानवा जग पालन ना ओळखीसी ।
गाफील होऊन अरे मानवा कां मिथ्या करिसी बहाणा ।
गाफील होऊन अरे मानवा कां न जाणीसी निज धामा ।
बहुमुल्य या नर जन्माची किंमत ना कळली तुजला ।
'अवतार' गुरुज्ञानावाचोनी जन्म निरर्थक घालविला ।
*
एक तूं ही निरंकार (३६५)
नाशिवंत या शरीरामाजी दोन दिसाचा तु अतिथी ।
नाशिवंत या शरीरामाजी दुःख भोगणे लागे अती ।
नाशिवंत या शरीरामाजी खोटा कां धरिसी अभिमान ।
नाशिवंत या शरीरामाजी विसरूनी तु गेलास ठिकाण ।
नाशिवंत या शरीरामाजी राहुन विसरू नको निज धाम ।
तुझे तुला 'अवतार' दाखवी अजर अमर अविनाशी धाम ।
*
एक तूं ही निरंकार (३६६)
बहुमोल तुझे घर आहे एकरस जे राहे सदा ।
बहुमोल या तुझ्या घराला सूर्य चंद्र नाही उपमा ।
बहुमोल या तुझ्या घराला लागे ना पाऊस वारा ।
बहुमोल तव घरामध्ये या दुःख चिंतेला ना थारा ।
ऐसे हे तव घर अविनाशी केवळ सदगुरु दाखवितो ।
'अवतार' गुरु ते क्षणात एका अजर अमर घर दाखवितो ।
*
एक तूं ही निरंकार (३६७)
निजघर जो मानव ना जणी जीवन त्याचे व्यर्थ असे ।
निजघर जो मानव ना जाणी यमराजा त्या मारीत असे ।
निजघर जो मानव ना जाणी पदोपदी ठोकर खातो ।
निजघर जो मानव ना जाणी चौर्याऐंशी चक्कर फिरतो ।
लाख चौर्याऐंशी लागे फिरणे घर नाही जाणीले जरी ।
आदि अनादी सत्य घराचे ज्ञान गुरु 'अवतार' करी ।
*
एक तूं ही निरंकार (३६८)
विचार केला कां तू मानवा रूप व यौवन दिले कुणी ।
विचार केला कां तूं मानवा सुख सुविधा हे दिले कुणी ।
दिले जयाने सुख संपत्ती कोण असे याचा दाता ।
विचार केला कां तु प्राण्या कोण असे याचा कर्ता ।
भोग विलासामाजी प्राण्या व्यर्थ जन्म घालवू नको ।
'अवतार' भेद जाणी गुरुकरवी लख चौर्याऐंशी भोगू नको ।
*
एक तूं ही निरंकार (३६९)
मंत्र तंत्र अन पाठ व पूजा कोणी प्रसाद दान करी ।
पुराण संध्या अन गायत्री कुराण लाखो पठण करी ।
लाख करोडो वेष धरुनी साधन संयम करी हजार ।
रोज व्रत उपवास धरी अन बांग देऊनी करी पुकार ।
निज धर्माचे पालन करुनी निश्चय पूर्ण करी नमाज ।
'अवतार' जीवाला मिळे न मुक्ती गुरु न दावी जर हे राज ।
*
एक तूं ही निरंकार (३७०)
मिळेल जर संकेत गुरुचा परम धाम त्या मिळे नरा ।
मिळेल जर संकेत गुरुचा कृपा पात्र तो होय खरा ।
जीवात्मा सदगुरु कृपेने मिळवी तो बंधन मुक्ती ।
गुरु कृपेने जीवात्माला सौख्य धाम होईल प्राप्ती ।
एक इशार्यानेच गुरुच्या राम कृष्ण झाले अवतार ।
गुरु इशारार्यानेच मनुष्य होतो देवाचा 'अवतार' ।