एक तूं ही निरंकार (२२१)
सुख अभिलाषा धरुन प्राण्या समीप दूःखाच्या जागी ।
पूर्व दिशेला जाऊ पाहसी परि उलट मागे जाशी ।
चालतोस तू ज्यामार्गाने तोच खरा आहे म्हणशी ।
घर राहिल तुझे बाजुला भतकून तू धक्के खाशी ।
मिळने ना घर सदगुरुवीना नकोस होऊ तू बेजार ।
सदगुरु चरणी जीवन प्राण्या अर्पण करी म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं हि निरंकार (२२२)
इच्छीता गुरु कुणाकडुनही सर्व काम करवू शकतो ।
करवी पार गिरी पंगूला मुक्या बोलता करू शकतो ।
सदगुरु कृपा जयावर होई सुप्त भाग्य येई उदया ।
मोह भ्रम दुर्भाग्य सर्वही जाईल ही निघूनी माया ।
पाय धरीता पूर्ण गुरुचे यम पाशाची नाही भीती ।
अवतार म्हणे गुरु शिष्य जवळी दूत यमाचे ना येती ।
*
एक तूं ही निरंकार (२२३)
बोल अमोलक साधु जनांचे ऐकूनी इतरां कथन करा ।
येऊनी पायी सत्संगाला सेवा करकमलांनी करा ।
रसनेने हरि किर्तन गाणे नयनांनी दर्शन घ्यावे ।
प्रेम नम्रतेने गुरुचरणी मस्तक अपुले झुकवावे ।
जे गुरुप्रेम काम हे करिती सर्व सुखे त्यांना मिळती ।
'अवतार' गुरु जर होईल राजी जग सारे गाईल किती ।
*
एक तूं ही निरंकार (२२४)
फसूनी मानव मायाजाळी क्षणोक्षणी होई हैराण ।
वैर व निंदा मनी ठेऊनी फिरे जगी जैसे सैतान ।
दुष्यमान ही मापा मिथ्या मिथ्या आहे जग सारा ।
साधु जनांचे चरण धरीतां होईल मानव भवपारा ।
आहे गुरु सहारा मोठा शिष्यांचा रक्षण कर्ता ।
'अवतार' श्रेष्ठ तोची नर जाणा मानी जो सदगुरु मता ।
*
एक तूं ही निरंकार (२२५)
सार्थक करण्या नर जन्माचे मानव पूण्य व दान करी ।
पूजा पाठ तपस्या कोणी देश भक्तीचा मान करी ।
जनसेवेला वाहून येणे हेच कुणी उत्तम म्हणती ।
मधूर बोल अन शुभकर्माला सर्वोत्तम कोनी म्हणती ।
भले बुरे परि कर्म कोणते जाणी ना मानव प्राणी ।
मतीहीन 'अवतार' म्हणे तो रहस्य जो हे ना जाणी ।
*
एक तूं ही निरंकार (२२६)
तन मन धन सर्वाहुनी उत्तम सेवा ती गणली जाते ।
जी होई निष्काम निरिच्छीत सदगुरुला जी आवडते ।
देश काल समया पाहुनी मार्गी ज्या गुरु चालवीतो ।
गुरु आज्ञेचे पालन करूनी सेवक त्या मार्गे जातो ।
इहलोकी परलोकी ऐशा मिळेल भक्तजना सन्मान ।
'अवतार' सदा ऐशा भक्तांचे रक्षण करी स्वये भगवान ।
*
एक तूं ही निरंकार (२२७)
रामनाम हा ध्यास जयाचा तोची खरा आहे धनवान ।
धन वैभव जगताचे त्याला तुच्छ असे मृत्तिके समान ।
नाशिवंत संसार जाणुनी प्रभुच्या संगे प्रीत करी ।
शिष्य जगी निश्चिंत होऊनी नित्य प्रभुचे भजन करी ।
सत्य जाणूनी सदगुरु करवी असत्य नाती जो तोडी ।
'अवतार' असे तोची गुरुभक्त जो हरिसी नाते जोडी ।
*
एक तूं ही निरंकार (२२८)
जाणूनी सर्व घटी एकाला सर्वा संगे प्रीत करी ।
जाणूनी सर्व घटी एकाला सकलांचा सत्कार करी ।
एकाचे गुण गाई केवळ दर्शन एकाचेच करी ।
एका संगे जोडूनी जगता सकलांचा उद्धार करी ।
सदैव स्मरण करी एकाचे ध्यान दुजे नाही चित्ती ।
गुरुभक्त 'अवतार' पुर्ण तो जो एका विसरे न कधी ।
*
एक तू ही निरंकार (२२९)
भ्रमात पडूनी दुनिया सारी ग्रंथ कथा वाचन करीती ।
नसे ध्यान जे लिहिले त्यावर उगाच ते कटकट करीती ।
केवळ वाचन कामी न येई धर्मग्रंथ ऐसे वदती ।
सदगुरुवाचुन ज्ञान न उपजे जाईल जन्म अधोगती ।
सदगुरुवीना जगतामाजी शक्य नसे होणे उद्धार ।
गुरुवीण बह्मज्ञान कधीही मिळणे नाही म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (२३०)
ज्ञानावाचूनी पाठ व पूजा पदोपदी ठोकर खाणे ।
जप तप पूजा वंदनारती स्वये आपणा लुटविणे ।
पुण्यदान अन् स्नाने करण्या जे नर तीर्थीला जाती ।
अपुल्या हस्ते ते नर अपणा रोग अहंमचा जडवीती ।
मी माझेपण जाणी नाही पूर्ण गुरु उपदेशावीना ।
म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण प्राप्त न होई सौख्य कूणा ।