एक तूं ही निरंकार (३११)
नाम दवा सार्या रोगाची सर्वही दःखे मिटवी नाम ।
बलशाली प्रभुनाम असूनी काम बिघडले बनवी नाम ।
ज्ञानदृष्टी ज्यापाशी नाही मार्ग तया दाखविते नाम ।
स्वर्ग रूप ते बनुन जाते घरात ज्याच्या राहे नाम ।
पूरा सदगुरु जगी लोकही नामाचा व्यापार करी ।
नाम असे याचे निरंकार जो जाणे तो निरंकारी ।
*
एक तूं ही निरंकार (३१२)
जन्म मरण या फेर्यामाजी मानवास फिरणे लागे ।
मोह मायेतच, भुलुन गेला प्रीत नसे देवा संगे ।
निज सामर्थे प्रभु ना मिळे आणि कधी नाही मिळणार ।
हृदय कमले सदगुरु वाचोनी ना फूलले नाही फुलणार ।
नाही मरण तो अमर जाहला ज्याचे हरि सवे नाते ।
पूर्ण वचन 'अवतार' असे हे समज गुरुकरवी येते ।
*
एक तूं ही निरंकार (३१३)
तीर्थे फिरूनी प्रभु ना मिळे मिळे न भस्म लाविण्याने ।
जप तप संयम करूनी मिळे ना मीले न पूजा पाठाने ।
हांक तुझी ऐकणार नाही उंच स्वरे गाणे गाता ।
खुष ना होई स्तुती ऐकूनी आणि दुजाला ऐकविता ।
जो येई सदगुरुच्या चरणी प्रभु तयास मिळू शकतो ।
'अवतार' म्हणे भवसागरातूनी बेडा पार करू शकतो ।
*
एक तूं ही निरंकार (३१४)
मधूर वाणी आणि नम्रता सदगुरु हेची शिकवीतो ।
जगताचे हित ठेवा हृदयी सदगुरु हेची शिकवीतो ।
माना मंगल प्रभु इच्छेला सदगुरु हे समजावीतो ।
चुकलेल्यांना नित्य सदगुरु प्रभुच्या संगे मिळवीतो ।
पोहोचलो आता निजधामी जन्म मरण माझे चुकले ।
'अवतार' गुरुचे वचन मानीता प्रभुचे दर्शन मिळविले ।
*
एक तूं ही निरंकार (३१५)
चंद्र सूर्य आज्ञेने कुणाच्या गगनी उदय अस्त होती ।
कोणाच्या आज्ञेने अंबरी तारे चमचम करताती ।
कोण आम्हांला देतो सर्वही अन्न वस्त्र वापरण्याला ।
श्रवण वदन हे कोणी दिधले ऐकण्यास ऐकविण्याला ।
जे जन येती सदगुरुपाशी ज्ञान प्रभुचे करवीतो ।
'अवतार' म्हणे विरही जीवांना सदगुरु प्रभुशी भेटवीतो ।
*
एक तूं ही निरंकार (३१६)
देह मानवा ब्रह्म नसे हा वास अंतरी ब्रह्माचा ।
स्वंये नाचवी सर्व जगाला आड राहूनी मायेच्या ।
घरांत आपण स्वंये राहूनी द्वार तेही आपण खोली ।
नश्वरामध्ये वसुनी दाता सत्याचा सौदा तोली ।
सत्यच्या शोधार्थ हा मानव असत्यात धोका खातो ।
म्हणे 'अवतार' गुरु तो पुरा जो आवरणा हटवितो ।
*
एक तूं ही निरंकार (३१७)
ज्याने प्रभुने दर्शन केले सात्कार तयाचा तुम्ही करा ।
घटातूनी त्या ईश्वर बोले वंदन तुम्ही तयास करा ।
जड देही या चेतन शक्ती तिला जाणूनी प्रेम करा ।
जीवनाचे या महत्व जाणुनी सार्थक हा नर जन्म करा ।
पाहुनी प्रभुला जे मानीती तन मन ओवाळीन तया ।
'अवतार' अशा ब्रह्मज्ञानीला समर्पित माझी काया ।
*
एक तूं ही निरंकार (३१८)
शीख ईसाई कोणी हिन्दु कोणी जाहले मुसलमान ।
प्रत्येकाने जगात अपुले भिन्न भिन्न बनविले स्थान ।
स्वार्थ भावना मनी ठेवूनी ऐक्य साधण्याशी जाती ।
मानव मूर्ख आग जगी त्या आगीने विझवू पहाती ।
ऐक्य कधी होऊ न शकते जर ना बसला एक मनी ।
'अवतार' सदगुरुवाचून यांना समजवू शके ना कोणी ।
*
एक तूं ही निरंकार (३१९)
अग्री जैसा जळे रवि हा जो आहे उंचावरती ।
अहंपणाने असाच मानव सदा जळत राहे जगती ।
खाली असुनी धरती माता हिरवीगार सदैव दिसे ।
असो ग्रीष्म वा शरद ऋतु ती आनंदाने सदा हंसे ।
धैर्य नम्रता सहनशीलता संतजनांना प्रिय असे ।
म्हणे 'अवतार' गुरु भक्तांची रीत जगी या न्यारी असे ।
*
एक तूं ही निरंकार (३२०)
काठी एक यमाच्या हाती पापीजनी शिक्षा करण्या ।
रक छडी सदगुरुच्या हाती पापी जीवांना उद्धरण्या ।
काठी एक लुटाऊ हाती मार देई जी पथिकाला ।
काठी एक करीते रक्षण मिळे जी शुर शिपायाला ।
एक मानव ना मानव होई एक पहा होती भगवान ।
म्हणे 'अवतार' एकची वस्तु जो समजे तो मानव जाण ।