एक तूं ही निरंकार (१९१)
आहार अन् प्रावर्नावरती घृना कुणाची कां करिशी ।
वैभवास पाहूनी कुणाच्या मनी आपुल्या कां जळसी ।
धर्म जातीच्या पडुन घाणीत घाण लावूनी कां घेशी ।
यावरून कां संसाराला घर त्यागुन वनी जाशी ।
भले बुरे पाहुन कुणाला द्वेष मनी तू कां करीसी ।
वाईट तितुके कमवुनी कां व्यर्थ जीवना घालवीसी ।
सोडून या उत्तम भक्तीला मिथ्या ढोंगी कां बनशी ।
कर्म धर्म नौकेत बैसूनी उगाच कां वाहत जाशी ।
त्यागी मानवा तू चतुराई नतमस्तक हो गुरुपदी ।
'अवतारी' नको तू घुसळु पाणी संतानी दाविली विधी ।
*
एक तूं ही निरंकार (१९२)
कृपावंत तू होसी ज्यावर त्याच्या जीवनी येई बहार ।
कृपावंत तू होसी ज्यावर त्याच्या कधी ना होई हार ।
कृपावंत तू होसी ज्यावर पूजील त्याला हा संसार ।
कृपावंत तू होसी ज्यावर जीवन नौका होईल पार ।
कृपावंत तू होसी ज्यावर पूर्ण करिसी कामे तूं ।
कृपावंत तू होसी ज्यावर नाम खजिना देशी तूं ।
कॄपावंत तू होसी ज्यावर होईल त्याचा जयजयकार ।
कृपावंत तू होसी ज्यावर शासन कोन तया करणार ।
तुजलागी वश आहे दुनिया भक्तांना वश तू दातार ।
अपुली करणी स्वयें प्रभु हा जाणीत असे म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (१९३)
कैक समजती श्वास चढवूनी ध्यान लावीणे ही भक्ती ।
कैक समजती घर त्यागूनी वनात जाणे ही भक्ती ।
कैक समजती जाऊन तीर्था करणे स्नान असे भक्ती ।
कैक बोलती डोल पिटुनी किर्ती गाणे ही भक्ती ।
कैक बोलती तन्मय होऊन गायन करणे ही भक्ती ।
'अवतार' सन्तजन ऐका सारे हरि प्राप्ति करणे भक्ती ।
*
एक तूं ही निरंकार (१९४)
म्हणती देव कुणी सूर्याला कोणी म्हणती गगनाला ।
पाण्याला कुणी देव बोलती म्हणती कोनी मनुष्याला ।
कब्रस्तानी जाऊन कोणी अपुले मस्तक झुकवीती ।
पितळ तुळसी वटवृक्षाला कोनी पाणी शिंपीती ।
पुराण वेदामाजी लिहिले व्यापक आहे चराचरा ।
'अवतार' म्हणे हा चक्रचिह्न अन् रंग रूपाहूनही न्यारा ।
*
एक तूं ही निरंकार (१९५)
अदभुत लीला आहे ऐसी मानव झगडे व्यर्थ करी ।
मनुजाचा हा मानव वैरी दानवतेचे काम करी ।
धर्म जतीचे झगडे कोठे कोठे शस्त्र अन् चिह्नाचे ।
विचित्र ऐसे अनेक झगडे बोली आणि भाषेचे ।
एक प्रभुची रचना सारी सारी मानव एक बना ।
'अवतार' जाणूनी एका प्रभुला बंधुभाव मनी आणा ।
*
एक तूं ही निरंकार (१९६)
लोक बोलती कलीयुगी या देव पाहणे खेळ नसे ।
घोर तपस्या करी न जोवर देव भेटणे शक्य नसे ।
घर गृहस्थी त्यागुन सारे वनांत जाणे लागतसे ।
त्याग न करता मोह मायेचा हरि भेटणे शक्य नसे ।
प्रसन्न करी जो सदगुरुराया होईल तो भवसागर पार ।
क्षणात तोची निज घर पाहे ऐका जन हो म्हणे 'अवतार' ।
*
एक तूं ही निरंकार (१९७)
झाली भेटी पूर्ण गुरुची अवागमन संपून गेले ।
सहज अवस्था प्राप्त जाहली दुःख कष्ट संपून गेले ।
जीवाशिवाची भेटी झाली विलापही मिटूनी गेले ।
एक धडा देऊन गुरुने दुजे पाठ ते संपविले ।
परमात्मा आत्म्यास मिळाला गेले दुःख अन् संताप ।
'अवतार' म्हणे की गुरुकृपेने क्षणात झाला प्रभु मिलाप ।
*
एक तूं ही निरंकार (१९८)
कोणी म्हणे पहाटे उठूनी शीतजले नहाणे पूण्य ।
कोणी म्हणती तीर्थे सारी नित्य करणे पुण्य ।
कोणी म्हणती पक्षीगणांना दाणे देणे हे पूण्य ।
कोणी म्हणती शनिदेवाला तेल नित्य वाहाणे पुण्य ।
कोणी म्हणती डोळे मिटूनी समाधीस्त होणे पुण्य ।
'अवतार' म्हणे हे सर्वही खोटे प्रभु ध्यान करणे पूण्य ।
*
एक तूं ही निरंकार (१९९)
दीपावाचुनी तिमीरामाजी प्रकाश कधी झाला नाही ।
मलीन कपडा कधीही कोणी साबुवीण धुतला नाही ।
गुरुवाचूनी मानव कोणी कधी न विद्या मिळवू शके ।
मार्गदर्शका वाचून कोणी निजधामी ना जाऊ शके ।
करण्या स्वच्छ शरीरा जैसे अती जरुरी आहे स्नान ।
'अवतार' ब्रह्म प्राप्तीला तैसे अती जरुरी सदगुरु ज्ञान ।
*
एक तूं ही निरंकार (२००)
कोणी म्हणती मारूनी जीवा मांस भक्षिणे आहे पाप ।
कोनी म्हणती अन्य कुणाच्या पाया पडणे आहे पाप ।
कोणी म्हणती स्नाना आधी अन्य भक्षिणे आहे पाप ।
कोणी म्हणती उच्छिष्ट वदने नाम हरिचे घेणे पाप ।
व्यर्थ पूण्य पापाचे झगडे मर्म खरे ठावे नाही ।
'अवतार' म्हणे की पाप हे मोठे निरंकार भेटी नाही ।