अवतारवाणी - भजन संग्रह ७

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह ७

एक तूं ही निरंकार (६१)

निरंकार ज्या हृदयी बैसला ब्रह्माज्ञानी तथा म्हणती ।

निरंकार ज्या हृदयी बैसला प्रभुसंगे त्याची प्रीती ।

निरंकार ज्या हृदयी बैसला शोध करी त्याचा ईश्वर ।

निरंकार ज्या हृदयी बैसला स्वयं तोच असे ईश्‍वर ।

निरंकार ज्या हृदयी बैसला मौल्यवान तो या जगती ।

निरंकार ज्या हृदयी बैसला कोण तया तोलू शकती ।

निरंकार ज्या हृदयी बैसला कोण तया ओळखू शके ।

ब्रह्माज्ञानीच्या भेदा केवळ ब्रह्माज्ञानी जाणू शके ।

निरंकार जर बसे अंतरी सौख्य खरे त्याच्या पदरी ।

निरंकार जर हृदयी विराजे प्रणाम त्या 'अवतार' करी ।

*

एक तूं ही निरंकार (६२)

सकळ जगाचा सदगुरु दाता करील जे वाच्छील मनी ।

चरण धरी जरी निष्ठूर प्राणी भवसागर जाईल तरूनी ।

सदगुरुच्या जो येतो द्वारी क्षणात झोळी भरीत असे ।

मिटवी अंधपणा दृष्टीचा उज्वल मना करीत असे ।

सदगुरु देऊनी नाम औषधी सर्वही व्याधी मुक्त करी ।

मिळेल जर 'अवतार' सदगुरु क्षणात प्रभुची भेट करी ।

*

एक तूं ही निरंकार (६३)

दोष गुण पाहुन कुणाच्या गुरु मनी आणीत नाही ।

पूर्ण गुरुने दिधला ठेवा संपणार कधीही नाही ।

पूर्ण सदगुरु पार लावीतो वेळ लावी ना क्षण एका ।

पूर्ण सदगुरुला जो समसे ईश्‍वर तोच नसे शंका ।

स्वये सदगुरु आहे हीरा हिर्‍याच्या व्यापार करी ।

'अवतार' गुरु स्वये नारायण क्षमा करूनी पार करी ।

*

एक तूं ही निरंकार (६४)

सदगुरुची जर होईल मर्जी सुख शांती नांदेल घरी ।

सदगुरुची जर होईल मर्जी प्रकाशित तव मना करी ।

सदगुरुची जर होईल मर्जी कंचन बनवी मातीला ।

सदगुरुची जर होईल मर्जी दुर करी आज्ञानाला ।

सदगुरुची जर होईल मर्जी पंगू पर्वत पार करी ।

'अवतार' गुरुमर्जी जर होई अशक्य तेही शक्य करी ।

*

एक तूं ही निरंकार (६५)

सदा सर्वदा धनवंतांचा पाठलाग तस्कर करीती ।

संतजनंच्या मागे निंदक युगे युगे निंदा करीती ।

संत हरिचे ऐकून निंदा ना धरीती अपुल्या चित्ती ।

हरिभक्तांच्या मेळ्यामाजी नित्य प्रभुचे गुण गाती ।

निंदक लाखो जोर लावूनी शब्द न ते काटू शकती ।

'अवतार' म्हणे या पूर्ण गुरुचा मार्गही ना अडवू शकती ।

*

एक तूं ही निरंकार (६६)

लाखो कष्ट दिले संताना धर्म जातीच्या प्रमुखांनी ।

कितीकांना भितीत चिरडले जातीच्या उन्मत्तांनी ।

सुळावरी चढविले कितीकां आग्नीमध्ये जाळीले किती ।

निष्ठूर जगताने संतांनां कष्टविले या जगी किती ।

भक्तजनांनी तरी मानीला सर्व आपुला हा संसार ।

दुःख कष्ट सोशियले त्यांनी मानुन हरि इच्छा 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (६७)

सदगुरु येत असे या जगती सुखमय करण्याची संसार ।

सदगुरु येत असे या जगती केवळ करण्या परउपकार ।

सदगुरु येत असे या जगती जगताचा करण्या उद्धार ।

सदगुरु येत असे या जगती एकाचा करण्याचा प्रचार ।

सदगुरु जैसा कुणी न दाता बुद्धीमान त्यासम नाही ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण प्रभुद्वारी किंमत नाही ।

*

एक तूं ही निरंकार (६८)

प्रबुरंगी जो भक्त रंगला बोले तैसा चालतसे ।

प्रभुरंगी जो भक्त रंगला हरिच्यासंगे राहतसे ।

जे होणे ते होते राहू दे स्पर्श करी ना दुःख मना ।

काही जाहले जगी तरिही काम न काही नामावीना ।

जगकर्ता जे करील काही गोड मानुनी राहतसे ।

आठो प्रहर जयांच्या हृदयी नामाचा दीप तेबत असे ।

स्वरूपा मधूनी आले संत अंती स्वरुपी समावती ।

हांसत हांसत जीवन जगती अंती मान यश कमवीती ।

गौरव करता संतजनांचा प्रभुचा गौरव त्यांत असे ।

'अवतार' म्हणे प्रभु संतामाजी तीळभर सुद्धा भेद नसे ।

*

एक तूं ही निरंकार (६९)

निरंकार जाणीला जयांनी महता त्यांची असे न्यारी ।

याच जनांच्या दया कृपेने तरली ही दुनिया सारी ।

ऐसे प्रेमी भक्त प्रभुचे पार जगाला उतरवीती ।

ऐसे प्रेमी भक्त प्रभुचे रोग जगाच्या घालवीती ।

हरि सुद्धा ऐशा भक्तांना अपुल्या संगे मिळवितो ।

नाम जपे गुरुमुखे जाणुनी सर्व सुखे तो मिळवितो ।

ऐशा भक्तजनांची सेवा आपण स्वये प्रभु करितो ।

उच्च तोच सर्वाहुनी जगती जो सदगुरु सेवा करीती ।

'अवतार' जपे जो नाम हरिचे पावन तोची श्रेष्ठ असे ।

धन्य तयाचे जीवन आहे जो सर्वाहुन श्रेष्ठ असे ।

*

एक तूं ही निरंकार (७०)

स्तंभ ज्यापरी मस्तकी अपुल्या भार छताचा धरीत असे ।

तैशापरी मन या भक्ताचे गुरुकरवी धीर मिळवीतसे ।

दीप ज्यापरी एक तेवता अंधाराला दुर करी ।

तैसेही सदगुरुचे दर्शन प्रकाशित आत्म्यास करी ।

पाहुनी जळता दीप ज्यापरी मार्ग मिळतसे पधिकाला ।

जरी मिळे 'अवतार' सदगुरु क्षणामध्ये दावी प्रभुला ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-21T07:19:45.8100000