अवतारवाणी - भजन संग्रह ९

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह ९

एक तूं ही निरंकार (८१)

अंत न पारावार जयाचा दाखवीना तो गुरु नसे ।

भरलासे अणुरेणु जयाने दाखवीना तो गुरु नसे ।

जगताचा जो पालनकर्ता दाखवीना तो गुरु नसे ।

जीवनदाता विश्‍वविधाता दाखवीना तो गुरु नसे ।

बेसुमार बेअंत असा जो दाखवीना तो गुरु नसे ।

आधार जो या नभ धरतीचा दाखवीना तो गुरु नसे ।

एक अंध दुजा अंधाला मार्ग खरा दावील कसा ।

'अवतार' म्हणे जो स्वयं न जाणे समजावील हे गुन्हा कसा ।

*

एक तूं ही निरंकार (८२)

जीवन जगण्या देहामाजी असे जरुरी प्रणाची ।

मृगया कारण जात जरुरी असे धनुष्य बाणाची ।

काम न चाले धरतीवीना तसे गगन आहे जरुरी ।

तैसे प्रेमा भक्तीसाठी गुरुज्ञान आहे जरूरी ।

तैशपरी नरदेह धारुनी आहे प्रभु येणे जरूरी ।

'अवतरा' मिळे जे सदगुरुकरवी ऐसे दान असे जरूरी ।

*

एक तूं ही निरंकार (८३)

साबण साबण वदता वाचे वस्त्र आपुले धुपेल कां ।

भर भरुनी अंधार फेकीता प्रकाशित घर होईल कां ।

औषध वर्णन वाचन करूनी रोग कुणाचा जाईल कां ।

सोने सोने अखंड वदतां वैभव घरात येईल कां ।

भाकर भाकर वदता वाचे भुक कुणाची मिटेल कां ।

गोष्टी सुखाच्या करता कोनी दुःख्ह निर्वारण होईल कां ।

घरात राहुन घर घर बोले सार घराचे ना जाणी ।

क्षणांत मिळवील निजधामाला धाम ओळखील जर प्राणी ।

नसे मार्ग ज्ञानवीण काही सर्व व्यापका मिळण्याचा ।

जाणकार जो आहे याचा उद्धारक तो पाप्याचा ।

लावील प्रभु प्राप्तीचे साधन ना करवी जो प्रभुचे ज्ञाने ।

तो साधु वा संत नसे रे त्यापासुन ना मुक्ती दान ।

रमा रमा प्रत्यक्ष दाखवी साधु जाणीजे तोच पुरा ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण अपुर्ण आहे जग सारा ।

*

एक तूं ही निरंकार (८४)

जो मायेचा लोभी आहे कर्मी धर्मी फसवितो ।

जो मायेचा लोभी आहे नामाचा जप करवितो ।

जो मायेचा लोभी आहे अनेक देवांना भजतो ।

मायेचा लोभी प्रतिमेला नैवेद्य अर्पण करीतो ।

जो मायेचा लोभी आहे तीर्थस्नाने करवितो ।

जो मायेचा लोभी आहे नाना दैवत गुण गातो ।

जाणील जो मायेचा स्वामी माया त्याची असे दासी ।

'अवतार' धरी जो चरण गुरुचे चुकवील तो जीवन फांसी ।

*

एक तूं ही निरंकार (८५)

घडुण गेलेल्या गोष्टीचे करणे ध्यान असे माया ।

स्वप्न भविष्याचे रंगविण्या समय दवडणे ही माया ।

निरंकार विसरून धनावर आस ठेविणे ही माया ।

दिखावटीचे प्रेम करुनी अभिमानी होणे माया ।

संत जनांची सेवा करण्या अंग चोरणे ही माया ।

रिद्धी सिद्धी प्राप्तीसाठी धूनी लाविणे ही माया ।

ब्रह्माज्ञानावाचून सारे खाणे पिणे असे माया ।

रज, तम सत्याचे अवडंवर ही सुद्धां आहे माया ।

नेम व्रत अन आरती पूजा करणे दान असे माया ।

या मायेतुन मुक्तीसाठी करणे कर्म असे माया ।

मनमजींने जे जे करिती तीच असे माया सारी ।

'अवतार' करी जर सदगुरु कृपा माया कधी न जोर करी ।

*

एक तूं ही निरंकार (८६)

मूर्ख लोक जे प्रभुज्ञानावीण हरि हरि वदनी वदती ।

मूर्ख मानव असती तेची आधार कर्माचा घेती ।

मूर्ख लोक तव दर्शन हेतू देह आपुला कष्टवीती ।

मूर्ख लोक सोसूनी थंडी भोजन निद्रेवीण मरती ।

मूर्ख लोक जे सागरातुनी स्वये तरून जाऊ पाहती ।

मूर्ख लोक जे कर्मकांडी अहंभावनेने मरती ।

शरण येई जो संतजनांना त्यागुन निजमन चतुराई ।

म्हणे 'अवतार' सहज तयाला दर्शन या प्रभुचे होई ।

*

एक तूं हि निरंकार (८७)

अंध मूर्ख बहिरे अज्ञानी न सोडिती अविचाराला ।

बसुन बसून मंथन करिती दुध समजूनी पाण्याला ।

निरंकार बेअंत प्रभुला पहाण्या तीर्थावर जाती ।

स्मशान आणि समाधीवरी जाऊन दीपक लावीती ।

मूढ लोक कणकणवासीला शोध वनी जाऊन करीती ।

ग्रंथ वंदन करूनी थकले आणि मूर्ती पूजा करीती ।

शोध करीता आयु गेले परी न कोठे हा दिसला ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण राम कुणा ना सांपडला ।

*

एक तूं ही निरंकार (८८)

वसे अंतरी गुरुमत ज्याच्या तिमीर मनाचा दुर करी ।

वसे अंतरी गुरुमत ज्याच्या हृदयांतरी प्रकाश करी ।

वसे अंतरी गुरुमत ज्याच्या तुच्छ असा होईल महान ।

वसे अंतरी गुरुमत ज्याच्या होऊन जाईल प्रकाशमान ।

वसे अंतरी गुरुमत ज्याच्या मिळेल मार्ग जीवनाला ।

वसे अंतरी गुरुमत ज्याच्या राजा बनवी गरिबाला ।

भाग्यहीन ही दुनिया सारी तत्व खरे जाणत नाही ।

'अवतार' गुरु शरणांगतीवीना प्रभु हा मिळू शकत नाही ।

*

एक तूं ही निरंकार (८९)

ग्रंथ पुरातन सर्व पाहिले मागील साधु संतांचे ।

गुरुनेच बदलुन टाकीले लेख तयांच्या नशिबाचे ।

आजवरी जे होऊन गेले निज यत्‍ने पाहू न शकले ।

राम कृष्ण अन नानक स्वतः पडदा ना हटवू शकले ।

मार्ग दाविण्या जगताला या नियमाचे पालन केले ।

वली पीर यांनी गुरु चरणी मस्तक अपुले झुकविले ।

युगे युगे ज्ञानाची दोरी राहिली असे गुरु करी ।

'अवतरी' म्हणे रे अंध जगत हे वृथाची सारे कर्म करी ।

*

एक तूं ही निरंकार (९०)

एक दोन हे नाही चुकले चुकला हा सारा संसार ।

देवाची तर ओळख नाही करीतो नामाचा उच्चार ।

मन मार्गाने निज बुद्धीला मार्गी उलट्य़ा लाविवले ।

तर्‍हे तर्‍हेच्या घडवूनी मूर्ती कैक देव करुनी बसले ।

चंद्र सूर्य ज्याने बनविले दीप तयाला दाखवीती ।

सुगंध ज्या स्वामीने बनविला धुप जाळीती त्यापुढती ।

कर्मकाडा अंधारामाजी चाले आंधळा करोबार ।

नैवेद्य दाविती तयाला जो जगताचा असे दातार ।

सीमा याला घालू पाहती असीम जो आहे जगती ।

परमेशाच्या भेटींलागी आपणची धोका खाती ।

कल्पीत ऐसे महल बनवीती पायावरती स्वप्नांच्या ।

म्हणे 'अवतार' दय कर स्वामी जीवावरी या जगताच्या ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-21T07:24:40.3830000