एक तूं ही निरंकार (१८१)
गवताचे घर उत्तम जेथे गुरुचा सेवक वास करी ।
उत्तम वाणी त्या शिष्याची जो गुरु महिमा गान करी ।
सुंदर धरती नगरी सुंदर गुरुभक्त जेथे वास करी ।
सकल काज शिष्याचे पावन जो कांही व्यवहार करी ।
मनमार्गी महालात राहूनी माये संगे प्रीत करी ।
जो नर हरिचे नाम न घेई धरतीला अपवित्र करी ।
दौलत असूनी शांती ना मनी रडुन जीवन व्यतीत करी ।
मनमार्गीचे सर्वच खोटे मिथ्यासंगे प्रीत करी ।
मनमार्गीचे सर्वच मिथ्या गुरुशिष्याचे पवित्र काम ।
'अवतार' म्हणे धर्माहुनी सर्व उत्तम एक हरिचे नाम ।
*
एक तूं ही निरंकार (१८२)
सर्व सुखांचा असो भोगता किंवा असो कुनी धनवान ।
असेल तो जगताचा राजा नित्य करी लाखोंचे दान ।
दीन दुबळ्यांना दान करोनी अजोड त्याची शान असो ।
दीन दुःखी रोग्यांवर सुद्धा परउपकार करीत असो ।
दानधर्म हे समजूनी पूण्य दया दीनावर करीत असो ।
सर्व याचका तृप्त करोनी महादानी म्हणवीत असो ।
शोभा येथील राहे येथे येई न ती कामी अंती ।
म्हणे 'अवतार' हरिवाचोनी काही न जाई संगती ।
*
एक तूं ही निरंकार (१८३)
मायेचे रूप रंग पाहूनी भुलून जे प्राणी जाती ।
तूटल्या तार्यासम गगनीच्या मातीला मिळुनी जाती ।
परिवार स्त्री पुत्रासाठी नित्य अशी पापे करीसी ।
रात्रंदिवशी कपट करूनी उदर जयांचे तू भरीसी ।
लाख करोडो माया जोडी शांती न येई परी मनी ।
सर्वही सांठा राहील येथे कामी ना येणार कुणी ।
माय राहील सारी येथे नाम सवे जाईल अंती ।
त्यागुन हे संतच देती सोडवील जे तुज अंती ।
त्यागुन सारे खोटे धंदे कर प्राण्या स्वरुपाची जाण ।
कोठून आला कुठे जायचे 'अवतार' गुरु करवी हे जाण ।
*
एक तूं ही निरंकार (१८४)
बेमुख जो गुरुपासुन झाला ठाव नसे त्याला जगती ।
बेमुख जो गुरुपासुन झाला मान कुणी ना त्या देती ।
बेमुख जो गुरुपासुन झाला मरण जन्म त्या त्रस्त करी ।
बेमुख जो गुरुपासुन झाला जीवन दुःखे व्यतीत करी ।
बेमुख जो गुरुपासुन झाला करील माय त्यावर मात ।
बेमुख जो गुरुपासुन झाल सैतान सम राहे जगात ।
बेमुख होणे गुरुपासोनी याहून मोठे नाही पाप ।
सदुगुरुचे होऊन राहतां नसे दुःख आणी संताप ।
लख चौर्यांऐशीं फिरुनी मनमार्गीला नाही माफ ।
विना शरण 'अवतार' गुरुला कर्मलेखा ना होती साफ ।
*
एक तूं ही निरंकार (१८५)
गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी सोने माती एक समान ।
गुरु शिष्याला एक सारखे निर्धन असो कुणी धनवान ।
गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी हर्ष शोक हे एक समान ।
गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी सुख दुःखाचे नाही ध्यान ।
गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी सारे मानव एक समान ।
गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी राव रंक हे एक समान ।
शिष्य गुरुचा गुरुचरणांचे क्षणाक्षणाला करितो ध्यान ।
शिष्य गुरुचा म्हणे सदैव आहे सर्व तुझे भगवान ।
करी दर्शन ऐशा शिष्याचे त्याचे होईल रे कल्याण ।
म्हणे 'अवतार' अशा शिष्यांवर ओवाळीन मी माझे प्राण ।
*
एक तूं ही निरंकार (१८६)
करणी आणि कथन जयाचे भिन्न भिन्न दिसूनी येते ।
मनात वैर विरोध ठेवुनी सोंग करितो प्रेमाचे ।
सकलांची हा जाणी अंतरे सकल जाणीतो अवगुण ।
त्याला तू लपवीसी कैसे दोष तुझे मानव प्राण्या ।
स्वतः करी ना कारज कांही दुजास सांगे करावया ।
आपण स्वतः तरू शके ना यमराजा सोडी न तया ।
बसला हृदयी असे जयाच्या अंतर्यामी हा निरंकार ।
त्याच्या निर्मळ उपदेशाने तरून जाऊ शके संसार ।
मस्तकी अपुल्या संतजनांची चरण धुळीला जो लावी ।
'अवतारी' म्हणे तोची नर जगती सकल पदार्थानी मिळवी ।
*
एक तूं ही निरंकार (१८७)
ज्या देवाने दिधली तुजला यौवन आणि सुंदरता ।
नकोस विसरू क्षणभर त्याला व्यापुनी जो आहे जगता ।
सदगुरु तोची राम दाखवी लेख न मगे कर्माचा ।
यालाच तुम्ही माना भगवंत येऊ नको मनी शंका ।
सर्व जीवाहुन श्रेष्ठ नरा तू आहे श्रेष्ठ तुझा वाली ।
तरिही जीवन तुझे मानवा याच्या नामावीण खाली ।
रोग अहंमचा तुला लागला दुजा कोणता दोष नसे ।
बघेनास तू स्वतःच याला तुजपासुनी हा दुर नसे ।
त्यागुनी सारे झगडे जर तू शरण सदगुरुला येशी ।
म्हणे 'अवतार' क्षणात एक जीवन मुक्ती मिळवीशी ।
*
एक तूं ही निरंकार (१८८)
खोटी कमाई जे का करती ऐशा नरा असो धिक्कार ।
खोते ज्याच्या मनी सांचले पावन ते कैसे होणार ।
धृग धृग आहे जीवन त्याचे प्रभु कृपा ना प्राप्त करी ।
सुकून जाईन सारी शेती वर्षा जर होई न वरी ।
धृग धृग ऐसे धन कॄपणाचे कामी कुणाच्या येत नसे ।
धृग धृग ऐसे सुंदर तन ते श्रीहरिला जे प्रिय नसे ।
धृग धृग ऐशा मानव प्राण्या मैल मनाचा घालवीना ।
भाग्यहीन तोची नर जाणा शरण येई ना संतजना ।
आस जयाला प्रभु मीलनाची थोर तयाचे भाग्य असे ।
'अवतार' जयाला गुरु मिळाला कृपा पात्र तो प्राणी असे ।
*
एक तूं ही निरंकार (१८९)
निराकार या प्रभुला जाणा जो जगती व्यापक आहे ।
याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे ।
शस्त्र न याला कांपू शकले हवा न याला सुकवू शके ।
पाण्याचा परिणाम न यावर अग्नी न याला जाळू शके ।
अंश तू याचा अरे मानवा याच स्वरूपाची ज्योती ।
कौडी समान जीवन झाले असता तू अस्सल मोती ।
हेच तुझे असली घर आहे हेच असे तव रूप महान ।
परि गुरुवीण अशक्य होणे निजसामर्थ्ये याचे ज्ञान ।
ठेवून श्रद्धा यावर अपुली ध्यान तू याचे नित्य करी ।
'अवतार' जाणुनी सदगुरुकरवी नंतर तूंही तूंही करी ।
*
एक तूं ही निरंकार (१९०)
अंतसमयी जव हा प्राणी सोडून जाईल जगताला ।
यमराजा येऊनी तोडीला सर्व गोत्र संबंधाला ।
धन यौवन अन् रूप हे सूंदर संगे नसे जाणे यानी ।
हरी नामावीण दौलत सारी कामी ना येणार कुणी ।
बुद्धीबळ ना येईल कामी चालू शके ना चतुराई ।
वाळुवर ही असे इमारत खोटी आंस तिचे ठायी ।
मानियले जे धन तू अपुले असे सर्व ते परक्याचे ।
अखेर समयी येई न कामी ओझे कर्मा धर्माचे ।
रंगून जाई जो हरिनामी तरून जाईल तो संसार ।
हसत मुखाने जाईल तोची ऐका संत म्हणे 'अवतार' ।