मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ४

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (३१)

जरी कुणाच्या मुखात जिव्हा एकाच्या लाखो झाल्या ।

लाखो लाखो वेळ गुणुनी लाख वेळ पुन्हा गुणिल्या ।

इच्चा असुन तरीही कोणी गाऊं शकेना तुझी स्तुती ।

जप तप संयम व्रत नेमाने शक्य नसे होणे प्राप्ती ।

स्वये जरी तु होशी कृपाळू सर्व काही होऊ शकते ।

मिळे जरी 'अवतार' सदगुरु पाषाणही तरू शकते ।

*

एक तुं ही निरंकार (३२)

बोल बोलता वश ना होई मौन आचरणाने ।

दान पुण्य वश करु शकेना वश ना देण्या घेण्याने ।

वश ना होई जीवन जगता वश ना हॊई मरणाने ।

शासन करता वश ना होई वश ना होई शक्तीने ।

मन बुद्धीने वश ना होई बाहेर योगा ध्यानच्या ।

धरतीलाही वश ना होई आणि बाहेर गगनाच्या ।

मंत्राने हा वश ना होई हार मानीली सकलांनी ।

'अवतार' भेटता साधु पूरा पडदा दुर करील क्षणी ।

*

एक तूं ही निरंकार (३३)

या स्वामीने रात्र बनविली ऋतु सुद्धा तयार करी ।

सूर्य चंद्र याने बनविले पक्ष तिथी अन वार करी ।

मम स्वामी सर्वाहुनी मोठा जाणे कुणी याला विरळा ।

धरती अग्नी जल निर्माता नभ धरती अन पाताळा ।

रंगी बेरंगी पुतळे करूनी तया चालवी घालून प्राण ।

ऐसा हा या रंग प्रभुचा विरळा करीती याची जाण ।

जैसे कर्म करीतो प्राणी मिळेल फळ तैसे त्याला ।

आहे खरा दरबार प्रभुचा पेरील तेची मिळे त्याला ।

सत्य जनांचा स्वय हा रक्षक सत्य जनांची वाढवी शान ।

जग हे पुजी सत्य जनांना प्रभुच्या द्वारी मिळतो मान ।

कच्चे पक्के जाऊन पुढती भोगतील ते निजकर्मा ।

म्हणे 'अवतर' गुरुच्या शिष्या पूर्णपणे होईल क्षमा ।

*

एक तूं ही निरंकार (३४)

जो नर जाणे निरंकार हा पुर्नजन्म नाही त्याला ।

जो नर जाणे निरंकार हा मरण दुःख नाही त्याला ।

जो नर जाणे निरंकार ह सदैव राहे आनंदी ।

जो नर जाणे निरंकार हा संकट त्या येई न कधी ।

जो नर जाणे निरंकर हा दुःख न येई जवळ कदा ।

जो नर जाणे निरंकार हा भय ना बाधे तया कदा ।

त्याग करू जर चतुराईचा तरीच हरीचा रंग मिळे ।

'अवतार' प्रभुची ओळख होई जव संताचा संग मिळे ।

*

एक तूं ही निरंकार (३५)

ओळखील अजो निरंकार हा सारी सृष्टी होईल दास ।

निकर धरती अग्नी पाणी चंद्र सूर्यही होतील दास ।

ध्यान करी तू याचे प्राण्या दौलतीने भरपुर होशी ।

ध्यान करी तु याचे प्राण्या देवरूप होऊनी जोशी ।

ध्यान अकरी तु याचे प्राण्या पुजा पाठ जप आहे हा ।

ध्यान करी तू याचे प्राण्या सारी दुःखे मिटवी हा ।

ध्यान करी तू याचे प्राण्या हेची पवित्र तीर्थस्थान ।

ध्यान करी तू याचे प्राण्य हेच खरे पुण्य अन दान ।

निरंकार जर ध्यानी धरिसी मिळेल सुख शांती तुजला ।

निरंकार जर ध्यानी धरिसी फल जन्माचे मिळे तुला ।

दिले ज्ञान साधुने ज्याला तोची स्मरू शके याला ।

'अवतार' म्हणे तो मित्र आमुचा ओळखिले ज्याने याला ।

*

एक तूं ही निरंकार (३६)

ओळखील जो निरंकार हा मालक सर्व खजान्याचा ।

ओळखील जो निरंकार हा जाणी भेद या जगताचा ।

ओळखील जो निरंकार हा मिळेल मान तया जगती ।

ओळखील जो निरंकार हा पतवाला तो श्रेष्ठ अती ।

ध्यान करीतो जो नर याचे उणीव कशाची नाही कदा ।

ध्यान करीतो जो नर याचे होय जगी तो प्रिय सदा ।

स्मरण प्रभुचे करील तोची ज्यावर कृपा असे गुरुची ।

चरणधूळ 'अवतार' तयाची आहे मज अती मोलाची ।

*

एक तूं ही निरंकार (३७)

निरंकार जर बसे अंतरी राहील अधरी हास्य मधुर ।

निरंकार जर बसे अंतरी सर्व दुःखही होती दूर ।

याचे ध्यान करी जो प्राणी राहे मनावर त्याची जीत ।

याचे ध्यान करी जो प्राणी निर्मळ होईल त्याचे चित्त ।

जोवर कायम असे ही धरती जोवर असती चारही धाम ।

राहील सृष्टी तोवर राहे कायम संत जनांचे नाम ।

मस्तकी लावून चरण धुळीला ज्याचा एक असे आधार ।

म्हणे 'अवतार' मी शरण तयाला ज्याला प्रभुशी स्नेह अपार ।

*

एक तूं ही निरंकार (३८)

माय बाप अन बंधुभगीनी कोणीही ज्याचे नसती ।

निरंकार हा त्या प्राण्यांचा क्षणोक्षणी राहील साथी ।

मृत्यु तुज पाहुन एकटा तुजवर जब करीतो हल्ला ।

प्रीति प्रभुची करीते रक्षण ऐशा दुर्धर समयाला ।

महा भयंकर संकट येऊन जरी तुला हैराण करी ।

निरंकार हा क्षणात येऊन प्रसंगातुनी पार करी ।

तर्‍हे तर्‍हेने जरी पुजीले तरी न हा मंजुर करी ।

एक वेळ जाणुनी भजता कोटी पापे दूर करी ।

गुरुमुखे जाणुन मना तू नाम प्रभुचे घेई सदा ।

'अवतार' म्हणे तू समजुन याला तूंही तुंही बोल सदा ।

*

एक तूं ही निरंकार (३९)

असो कुणी जगताचा राजा त्यासही दुःख पीडा होई ।

ओळखीले ज्याने या हरिला सदैव तोच सुखी राही ।

लाख करोडो अशी बंधने जीवन रस घेऊन जाती ।

नाम गुरुचे उच्चारिता होय सर्व बंधन मुक्ती ।

सौख्य साधनाने जगताच्या शांत होई ना मन तृष्णा ।

नाम हरिचे वदता वाचे संपून जाईल मन तृष्णा ।

जाशी एकला ज्या मार्गाने अखेरच्या त्या समयाला ।

निरंकार हा असेल संगे मुळीच भय नाही तुजला ।

निरंकार शीतलता केवळ मनात बसवुन घेई सदा ।

'अवतार' गुरुचे वचन मानुनी याला निजघर बनवी सदा ।

*

एक तुं ही निरंकार (४०)

लाखो हात जरी तव असेल तरी नाही सुटका मिळणार ।

नामाचा जप करी मुखाने यावीण नाही होणे पार ।

अनेक ऐसी महा संकटे आली तव मार्गात जरी ।

ध्यान प्रभुचे क्षणात येऊन तुजलागी भवपार करी ।

शत शत योनी भोगून प्राणी येणे जाणे लागतसे ।

परंतु ज्याने हरि जाणीला तो घरवाला होत असे ।

शक्य नसे निर्मळ मन होणे तीर्थजळाच्या स्नाने ।

नाश पावती अनंत पापे 'अवतार' गुरुचा झाल्याने ।

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP