एक तूं ही निरंकार (२०१)
मिथ्या सारा जगत पसारा प्रभुभेटी आहे सत्य ।
सत्यमार्ग दर्शवीला ज्याने वंदन त्या करणे सत्य ।
परम सत्य आहे ज्यापाशी त्यासंगे राहणे सत्य ।
असे जाण ज्याला सत्याची सकल कर्म ज्याचे सत्य ।
मिथ्या माया प्रभु हा सत्य करिल जो या संगे प्रीत ।
पुनजन्म 'अवतार' न त्याला हीच पुरातन आहे रीत ।
*
एक तूं ही निरंकार (२०२)
दृष्यमान ही माया मिथ्या खाणे पिणे असे मिथ्या ।
सुतदारा अन कुंटुंबासवे करणे प्रेम असे मिथ्या ।
महान माड्या सर्वही मिथ्या आवागमन जगी मिथ्या ।
कर्म धर्म हे सारे मिथ्या ग्रंथ पोथी वचन मिथ्या ।
मायाजाळी जो नर फसला जाणाव तो संसारी ।
निरंकार हा ज्याने जाणीला तो 'अवतार' निरंकारी ।
*
एक तूं ही निरंकार (२०३)
पहा पह अहो हे जगवासी स्मशान पूजा करताती ।
उत्तप मानव जन्म मिळुनी असुनि दैवतांना पूजीती ।
ज्ञानाचे भांडार सोडुनी लोक पुजीती वेद पुराण ।
अनादी पासुन मानवास या मानव देई प्रभुचे ज्ञान ।
गृहस्थी जीवन सोडुन प्राण्या वनांतरी जाणे नाही ।
'अवतारी' सदगुरु कृपेवाचूनी हरि दर्शन होणे नाही ।
*
एक तूं ही निरंकार (२०४)
सार्थ जन्म ना होई प्राण्या नाना कर्मे केली जरी ।
नसे नफा करूण लाखो माया तु लुटविली जरी ।
नसे नफा पाषाणापुढती मस्तक नित्य घासण्याने ।
तिळभर सुद्धां नसे फायदा घंटेमधील निनादाने ।
चौर्याऐंशीच्या फेंर्यामधूनी तरी न सुटणे शक्य तुला ।
'अवतार' सर्व हे मिथ्या जोवर नाही जाणीले सत्याला ।
*
एक तूं ही निरंकार (२०५)
मुसलमान जाऊनी मंदिरी कलमा ना ऐकवूं शके ।
जाऊनीया हिंदु गुरुद्वारी राम भजन ना गाऊ शके ।
शिख कोनी जाऊनी मशिदी वाहे गुरु ना बोलू शके ।
मंदिरात येऊन ईसाई गॉड गॉड ना बोलू शके ।
पूर्ण सदगुरु धर्म जातीचे झगडे सारे संपवीतो ।
'अवतार' गुरु या चहूं वर्णाना एका ठायी बसवीतो ।
*
एक तूं ही निरंकार (२०६)
कोण आणीतो गगनामाजी सूर्य चंद्रमा तार्यांना ।
नित्य बदलते हवामान जे कोन आणीतो या ऋतुंना ।
सुंदर ऐसे रो पदर्थ कोन पुरवीतो प्राण्यांना ।
दूध घृत अन् मधू शर्करा बनवी कोन या वस्तूंना ।
विचारी मना सकल वस्तु या कोण असे तुज पुरवीता ।
अंगसंग 'अवतार' असा जो पाहिलास कां तू दाता ।
*
एक तूं ही निरंकार (२०७)
धोबी धुवीता मलीन कपडे मनी विचार न आणी कदा ।
अपराध्याला क्षंआ करीता थकत नसे सदगुरु कदा ।
सदगुरु पूरा अपराधीचे दोष कधी आणी न मनी ।
उच्च नीच जती धर्माचा भेद कधी न धरी मनी ।
अलौकिक हे ज्ञान मिळवी तो गुरुला जो वंदन करीतो ।
'अवतार ' म्हणे तो क्षणात एका दर्शन प्रभुचे मिळवीतो ।
*
एक तूं ही निरंकार (२०८)
रवि न पाहे शेत कुणाचे समान देत असे किरणा ।
कुरुप मनोहर शशी न पाहे देई चांदणे सकलांना ।
उच्च नीच पाहे ना पानी तहान शमवी सकलांची ।
वायु सुखवी सकल जीवांणा भेदभाव ना त्यापाशी ।
ऐसीयापरी सदगुरु जगती सकलांचा स्वीकार करी ।
'अवतार' म्हणे तो असो कुणीही सर्वाना घेई पदरी ।
*
एक तूं ही निरंकार (२०९)
गोष्ट आपुली स्वयें सांगतो तीर्थस्नाने बहु केली ।
उंच उंच स्वरे आळवूनी कथा ऐकली ऐकवीली ।
जाऊन धर्मस्थानावरती पुण्यदानही बहू केले ।
तरिही मज न समज मिळाली मस्तक जरी हे घाशीयले ।
पुरा सदगुरु असा मिळाला गोष्ट एक समजावीली ।
'अवतार' म्हणे ही एकच गोष्ट माझ्या मनामध्ये बसली ।
*
एक तूं ही निरंकार (२१०)
कोणी म्हणती धुम्रपान अन् पान सुपारी खाणे पाप ।
कोणी म्हणती मांस मच्छीला हात लाविणे आहे पाप ।
कोनी म्हणे कुणाचे उष्टे खाणे अन देणेही पाप ।
कोणी म्हणती मानव चरणी शीस झुकवीणे आहे पाप ।
पाप पूण्य या झगड्यामाजी भुलला हा सारा संसार ।
'अवतार' म्हणे की तरेल तोची ज्याने जाणीला निरंकार ।