संगीत सौभद्र - अति कोपयुक्त होय परी सुखव...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
अति कोपयुक्त होय परी सुखविते मला । भृकुटी वक्र करुनि बघत ।
गाल लाल सर्व होत । थरथर तनु कांपवीत ।
इंदुवदनि घर्म सुटला । अति० ॥धृ०॥
जणु कनकाची मुर्ति अग्निमाजि तावली ।
की नभ सोडुनि वीजचि ती खालि उतरली ।
की ज्वलनाची ज्वाला कुंडात पेटली ॥चाल॥
एक जागि पद न ठरत । ह्रदय भरत रिक्त होत ।
अधरबिंब काय फुटत तेवि वर दंत रोविला । अति० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP