मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
वीरशिरोमणि सकलधनुर्धरनायक...

संगीत सौभद्र - वीरशिरोमणि सकलधनुर्धरनायक...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


वीरशिरोमणि सकलधनुर्धरनायक तू नरवरा । मग का वदसी दीना गिरा ॥धृ०॥
महावात सुटला म्हणूनि का कंप येत भूधरा । महागर मूर्च्छवि का शंकरा । (चाल)
मिळतिल तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा । यद्रूप बघुनी लाजतील रति इंदिरा ।
मग म्हणशिल दृष्टिस नको सुभद्रा जरा । (चाल)
काय उणे तुज आणिशि चित्ती तरि मिळविसि अप्सरा । मग० ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP