संगीत सौभद्र - गंगानदि ती सागर सोडुनी । ...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
गंगानदि ती सागर सोडुनी । कृपा मिळण्या धावे । किंवा राका चंद्रकलेने राहुमुखात पडावे ।
अथवा चांडालाच्या सदनी श्रुतिने काय रिझावे ।
किंवा कोमल हरिणीने त्या वृकगेहात शिरावे ।
कामधेनुने आनंदाने खाटिकहस्ति पडावे ।
तरि सुभद्रे तू मज सोडुनी अंधसुतासि वरावे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP