मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
नच सुंदरि करु कोपा । मजवर...

संगीत सौभद्र - नच सुंदरि करु कोपा । मजवर...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


नच सुंदरि करु कोपा । मजवरि धरि अनुकंपा ।
रागाने तव तनु ही पावत कशि कंपा । नच० ॥ध्रु०॥
नारी मज बहु असती । प्रीती परि तुजवरती ।
जाणसि हे तू चित्ती । मग काही अशि रीती ।
करि मी कोठे वसती । तरि तव मूर्ती दिसती (चाल)
प्रेमा तो मजवरिचा नेउ नको लोपा ॥नच०॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP