मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
लाल शालजोडी जरतारी झोकदार...

संगीत सौभद्र - लाल शालजोडी जरतारी झोकदार...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


लाल शालजोडी जरतारी झोकदार शिरि बांधोनी ।
नाचत चाले जैसा येतो रंगभूमिवर नट सजुनी ।
वाजे कडकड छाटि गुलाबी माळ जपाची करि धरुनि ।
ध्यान धरुनि बैसता दिसे मज दांभिकपण वर ये फुटुनि ।
सर्वांगावर भस्माचे ते पुंड्‌ लावि किति रेखोनी ।
त्यावरि रुद्राक्षांच्या माळा घालितसे तरि किती जपुनी ।
स्फटिकाची ती सुबक कुंडले डुलताना हलती कानी ।
पायि खडावा चटचट करिती दंड शोभती करि तीन्ही ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP