संगीत सौभद्र - नाही झाले षण्मास मला राज्...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
नाही झाले षण्मास मला राज्य सोडुनी ।
तोच विपरीत हे काय ऐकण्यात ये जनी । नाही० ॥धृ०॥
काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो ।
काय देवकिचा तनय कृष्ण वचन मोडितो ।
काय हलधर नवरत्न मर्कटासि अर्पितो ।
नवल हेचि मन्मनी । नाही० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP