मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
नमुनि ईशचरणा । करिन मग गज...

संगीत सौभद्र - नमुनि ईशचरणा । करिन मग गज...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


नमुनि ईशचरणा । करिन मग गजाननाच्या पादस्मरणा । नमु० ॥धृ०॥
सुकविरत्‍नमाला । अतिशोभा दे यदीय सुंदर वृक्षाला ।
जिच्यामध्ये महामणी प्रकाश पाडित सुवर्णपदकी बसोनिया कालिदास राणा ॥नमु०॥
तुम्हा तो शंकर सुखकर हो । हिमधरस्थित विकट काननि तप करी प्रियकरीशुभकरी सुंदरी तिजवरी भुलत निज कैलासनगि तो! शंकर सुखाकर हो ॥धृ०॥
पद्मजा मुररिपुसही अवमानुनी इंद्रा चंद्रा सकला सोडुनी पर्णनी कुंदरदनि सुकुंतलावेणी जाहली शिववरानुसारिणी पर्वताग्रशिरोमणी अर्पि कन्या सद्‌गुणी हर्षनिर्भर करग्रहणी झाला महादेवास तो । शंकर सुखकर हो । तुम्हा० ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP