दिंडी छंद
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
दिंडीला चार चरण असतात, आणि चरणाच्या शेवटीं अनुप्रास किंवा यमक असतें. त्यांत तीं कोठें दोन दोन चरणांचीं सारखीं, कोठें चारी चरणांची सारखीं अशीं असतात. ह्या छंदास अक्षरांचा नियम नाहीं; पण मात्रांचा नियम आहे. प्रत्येक चरणास एकोणीस मात्रा असतात आणि नवव्या मात्रेवर अवसान असतें; म्हणून नऊ मात्रांचा एक व दहा मात्रांचा एक असे दोन भाग होतात. त्यांच्या मात्रांची रचना अशी असावी कीं, पहिल्या भागांत प्रथम तीन मात्रांचा एक गण, म्हणजे एक गुरु, एक लघु; किंवा एक लघु, एक गुरु; किंवा तीनही लघु असा असावा. त्यापुढें तीन गुरु; किंवा सहा लघुप; किंवा लघुगुरु मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसर्या भागांत पहिल्याप्रमाणें प्रथम तीन मात्रांचा गण, मग पुन्हा तसाच आणखी तीन मात्रांचा गण, व त्यांच्या पुढें म्हणजे शेवटीं दोन गुरु असावे.
१ लें उदाहरण . रघुनाथ पंडित.
कथा बोलूं हे मधुर सुधाधारा । होय शृंगारा करुणरसा थारा ॥
निषधराजा नळनामधेय होता । वीरसेनाचा तनय महाहोता ॥१॥
२ रें. उदाहरण. रघुनाथ पंडित.
चौगुणीनें जरि पूर्ण शीतभानू । नळा ऐसा तरि कळानिधी मानूं ।
प्रतापाचा जो न मावळे भानू । तयासारीखा कोण दुजा वानूं ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP