मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
पंचचामर

पंचचामर

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


पंचचामर. य० पा०
तयास पंचचामराख्या वृत्त बोलती सदां ॥
ज रा ज रा ज गा असेच संघ ज्याचिया पदा ॥
दहा सहा पहा गणून अक्षरें पदांत या ॥
जयाचिया मनासि शांति सौख्य सर्वदा तया ॥
चरणांत अक्षरें १६. गण - ज, र, ज, र, ज, ग.
उदाहरण * वेणीसंहार नाटक.
अजून केश तूमचे विमुक्त नाहिं जाहले ॥
कशी करील बध्द ही अधींच बाइ आपले ॥
अशा मदीय उत्तरें मनांत फार खोंचली ॥
जणूं गमे तिला उरीं सुरीच काय बोंचली ॥१॥
चामर वृत्तांत आरंभीं एक लघु अक्षर जास्त घातलें कीं, वरील पंचचामर वृत्तव बनतें व चामर वृत्ताच्याच शेवटीं लघु अक्षर घातलें कीं पुढील चित्रवृत्त वृत्त तयार होतें.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP