मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
स्रग्विणी

स्रग्विणी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


स्रग्विणी. य० पा०.
स्रग्विणी वृत्त हें नांव देती तया । पादिं येती र हे संघ चारी जया ॥
होति बारा पदीं अक्षरें मोजितां ॥ सौख्य होतें मना ईश्वरीं योजितां ॥
चरणांत अक्षरें १२. गण - र, र, र,र.
उदाहरण * रामचंद्र जोशी.
राधिका रात्रिं दारीं उभी राहिली ॥ श्रीधरानें शरत्कालिं ती पाहिली ॥
पूर्णचंद्रानना ध्वांतविद्राविणी ॥ पूर्णमासीच मुक्ताफलस्रग्विणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP