प्रहरणकलिका
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
प्रहरणकलिका कवि म्हणति तिला ॥
न न भ न ल ग हे गण असति जिला ॥
अवयव चवदा प्रतिपदिं भरले ॥
गुरुपद धरितो जन बहु तरले ॥
चरणांत अक्षरें १४. गण - न, न, भ, न, ल, ग.
उदाहरण * रामचंद्र जोशी.
निशिदिनिं रिपुचें भय जरि तुजला ॥
अठिव सतत तूं विषधरसतिला ॥
अवन करिल ती जननि तशि सदा
त्यजिल न महिषासुरमथनि कदा ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP