मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
शिखरिणी

शिखरिणी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


शिखरिणी. य०, ६, ११.
तया वृत्ता देती विबुध जन संज्ञा शिखरिणी ॥
जयामध्यें येती य म न स भ ला गा गण गणीं ॥
दहा आणी सात प्रतिचरणिं ही अक्षरमिती ॥
विसांवा तो घ्यावा गुरुचरणिं सांगूं तुज किती ॥
चरणांत अक्षरें १७. गण - य, म, न, स, भ,ल, ग.
उदाहरण * रघुनाथ पंडित.
कदा नेणों ओढी शरधिंतुनि काढी शर कदा ॥
कदा धन्वीं जोडी वरिवरिहि सोडी तरि कदा ॥
विपक्षाच्या वक्षावरि विवरलक्षास्तव रणीं ॥
कळे राजेंद्राची त्वरित शरसंधानकरणी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP