मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
चामर

चामर

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


चामर. य० पा०
चामराख्य वृत्त तेंच बोलती कवी सदा ॥
जेथ रा ज रा ज आ असेच लागती पदा ॥
मोजितां पदांत होति अक्षरें हि पंधरा ॥
पाहतांचि सज्जनास वांकवावि कंधरा ॥
चरणांत अक्षरें १५. गण - र, ज, र, ज, र.
उदाहरण * रामचंद्र जोशी.
राधिका पहावयास जातसे रमापती ॥
प्राकृतासमान त्यास वृध्द गोप कोपती ॥
त्यां कळे न हा हरीच गोकुळांत पामरां ॥
नीच मार्जनीसमान मानितात चामरा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP