मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
तोटक

तोटक

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


तोटक. य० पा०.
वदती कवि तोटक वृत्त तया ॥ चरणीं स चतुष्टय येत जया ॥
दश आणिक दोन पदाक्षर तीं ॥ दृढ हीं असती तरि कां क्षरती ॥
चरणांत अक्षरें १२ गण. स, स, स, स.
उदाहरण * नवनीत.
जर विस्तृतनेत्र अशी असली ॥ हरिणी तुजला दिसली असली ॥
तर मानवरुपवती हरिणी ॥ चल सत्वर दाखिव ती रमणी ॥१॥
जलोध्दतगति.य ० ६, ६.
जलोध्दतगती तिलाच म्हणती ॥ जिथें गण ज सा ज सा च घडती ॥
पदीं असति अक्षरें रविमिती ॥ अनंत सुख तें मुखें वदूं किती ॥
चरणांत अक्षरें १२. गण - ज, स, ज, स.

उदाहरण *
अनन्यगतिकां जनां निरखितां ॥ तुझीच करुणार्णवा सदयता ॥
उभी असति त्यापुढें म्हणुनि मी ॥ अनन्यगति होउनी पद नमीं ॥२॥


N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP