मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
गीतिलक्षण

गीतिलक्षण

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


गीतिलक्षण.
गीतीच्या प्रथमपदी व्दादश मात्रा तशाच तिसर्‍याला ॥
दुसर्‍या पादीं अठरा, मात्रा असती तशाच चवथ्याला ॥१॥
१ ल्या चरणांत मात्रा १२; २ र्‍या चरणांत मात्रा १८;
३ र्‍या चरणांत मात्रा १२; ४ थ्या चरणांत मात्रा १८.
उदाहरण * मोरोपंत.
तरला ययाति राजा, दर्शन होतांच संतरायाचें ॥
सद्दर्शनचि सुदर्शन, करि गट चट कटक अंतरायाचें ॥१॥
गीतींत पूर्वार्धात व उत्तरार्धातही चार चार मात्रांचे सात गण असून शेवटीं दीर्घ अक्षर असावें. मात्र विषम गण ज गण नसावे व सहावा गण ज गण अथवा न गण असावा; असा नियम आहेच.

स्कंधक मात्रा. ६४.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP