मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
अमृतध्वनि

अमृतध्वनि

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


अमृतध्वनि. य० ४, ७,७,४.
सारामृतध्वनि उदारा नरा सुखवि दारा तिलाच म्हणती ॥
ता भा य जा स र न गा हेच जेथ गण एकैक पादिं गणती ॥
बेवीस येति चरणीं अक्षरें गणुनि पाहींच संशय जरी ॥
रक्षावया परमभक्तास संकटिच दैत्या वधी नरहरी ॥१॥
चरणांत अक्षरें २२ - त, भ, य, ज, स, र, न, ग.
उदाहरण * आनंदतनय.
माला करीं हृदयभालासि तें भरित ज्याला मृगाजिन कटी ॥
लोला जटा रुळति दोलापरी परप कोलाहलध्वनि उठी ॥
हा लाभ मानुनिच नीलालका सुकृतशीला तयास नमिती ॥
आला मुनी  निज घराला म्हणूनि मग झाला पुढें नरपती ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP