मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ६४ वा

पांडवप्रताप - अध्याय ६४ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नामः ॥ आदिपुरुषा दत्तात्रेया ॥ श्रीमद्भीमातट विला सिया ॥ ब्रह्मानंदा यतिवार्य ॥ सद्नुरुराया सुखाब्धे ॥१॥
सच्चिदानंदा नीलगात्रा ॥ कमलोद्भवजनका शत पत्र नेत्रा ॥ सनकादिवंद्या त्रिनेत्रमित्र ॥ सुत्रामा सदा ध्यातसे ॥२॥
स्वर्धुनी उद्भवली चरणीं ॥ आम्नाय गाती दिनर जनीं ॥ ह्रदयमांदुसेंत विद्वज्जनीं ॥ ठेविला अससी प्रेम भरें ॥३॥
मत्स्यरूपिया वेदोद्धारका ॥ कमठरूपा सृष्टिपालका ॥ द्विजांवरी क्षमा धरिली देखा ॥ प्रर्‍हादरक्षका नरहरे ॥४॥
दानव मोहना बलिबंधना ॥ क्षत्रियांतका जामदग्न्या ॥ अयोध्यापते दश मुखमर्दना ॥ कंसांतका मुरारे ॥५॥
कारुण्यवेष धारका ॥ कुतर्कयवन संहारका ॥ पुरुषोत्तमा द्वारकानायका ॥ पंढरीशा परात्परा ॥६॥
धरणिजोद्भव आत्मज जात ॥ त्यांत उत्पन्न त्यांत राहात ॥ त्याचे तनयेचा कांत ॥ प्रसन्न हो कां सर्वदा ॥७॥
तव कृपेच्या बळें यथार्थ ॥ संपला हा पांडवप्रताप ग्रंथ ॥ आश्रमवासिक पर्व येथ ॥ कळ साध्यायीं कथियेलें ॥८॥
अश्वमेध जाहला संपूर्ण ॥ जन मेज यासी म्हणे वैशंपायन ॥ धर्में न्याय नीती करून ॥ चौपन्न वर्षें राज्य केलें ॥९॥
यावरी अहोरात्रीं ॥ भीम धृत राष्ट्राचा द्वेष करी ॥ पूर्व वैर आठवूनि अंतरीं ॥ कौरवीं जें जें केलें तें ॥१०॥
म्हणे हा वृद्ध तत्त्वतां ॥ मज मारावया जपत होता ॥ तें समजलें द्वारकानाथा ॥ तेणें तेव्हां वांच विलें ॥११॥
लोह प्रतिमा निर्मिली ॥ ते या वृद्धासी भेट विली ॥ येणें रगडूनि चूर्ण केली ॥ मग अनुताप उपजला ॥१२॥
म्यां या भुजबळें करून ॥ याचे पुत्र मारिले आपटून ॥ येणेंचि आम्हांसी जाचिलें पूर्ण ॥ जाहला दीन आतां हा ॥१३॥
धृत राष्ट्र गांधारी जाण ॥ ऐकोनि भीमाचीं वचनें तीक्ष्ण ॥ म्हणती आतां द्यावा प्राण ॥ परी हें आमुचेन सोसवेना ॥१४॥
आंतचे आंत चडफडती ॥ धर्मासी कदा न सांगती ॥ दोघेंही अन्न त्यजिती ॥ उपवास करिती सर्वदा ॥१५॥
दिलें सर्व सुख सोडून ॥ तृणा सनीं करिती शयन ॥ पुत्रांचें दुःख आठवून ॥ क्षणक्षणां आरं बाळती ॥१६॥
दर्शना आला धर्म राज देख ॥ उभयांचे चरणीं ठेवी मस्तक ॥ इच्छिले पदार्थ सकळिक ॥ कणक्षणां पुरवीतसे ॥१७॥
धृत राष्ट्र होऊनि दीन ॥ धर्म प्रति बोले वचन ॥ मी सेवितों आतां तपोवन ॥ समाधान तेणें मज ॥१८॥
धर्म म्हणे पितया जाण ॥ तूं जासी जरी सदनांतून ॥ तरी मी देईन आपुला प्राण ॥ किंवा येईन तुझ्या संगें ॥१९॥
तूं जातां वना प्रती ॥ मज परत्रींचे लोक हांसती ॥ मी राज्य नेघें निश्चितीं ॥ सेवक सांगातीं होईन ॥२०॥
सत्यवती ह्रदय रत्न ॥ धर्मासी सांगे येऊन ॥ तपा जाऊं दे अंबिका नंदन ॥ तेणें करून उद्धार तयाचा ॥२१॥
संग्रामीं पडावा क्षत्री ॥ किंवा तप आचरोनि अहो रात्रीं ॥ देह ठेवावा धरित्रीं ॥ स्वर्धुनीचे तीरीं जाण पां ॥२२॥
मग सर्व प्रजा आणोन ॥ धृत राष्ट्रें तयांसी पुसोन ॥ धर्माचें करी समाधान ॥ नीति सांगितली बहुतचि ॥२३॥
अपार दानें ते वेळां ॥ धृत राष्ट्रें दिधलीं याच कांला ॥ द्रव्य गज घोडे गायी सकलां ॥ ब्राह्मणांसी देतसे ॥२४॥
आपुल्या ज्या सर्व संपत्ती ॥ त्या वेंचिल्या विप्रांहाती ॥ भीष्म श्राद्ध करूनि प्रीतीं ॥ आणी कही तिथी वडिलांच्या ॥२५॥
धृत राष्ट्र जातो जाणोन ॥ कौरव स्त्रिया आल्या धांवोन ॥ पांडवललना मिळोन ॥ खेद करिती त्यालागीं ॥२६॥
यावरी वसुदेव भगिनी ॥ कुंतीही निघाली तये क्षणीं ॥ धर्मासी सांगे प्रीती करूनी ॥ नकुळ सहदेव पाळिंजे ॥२७॥
हे घेतील जे जे आळी ॥ ते ते त्वां वडिलें पुरविजे सकळी ॥ कर्ण वीराचीं श्राद्धें सकळी ॥ करीत जाईं धर्मा तूं ॥२८॥
वृषकेत नेणतें बाळ ॥ याचा करीं बरवा सांभाळ ॥ कष्टी जाहली द्रौपदी वेल्हाळ ॥ पुत्र शोकेंकरो नियां ॥२९॥
धर्मा इचें मन समाधान ॥ रक्षीत जाईं अनुदिन ॥ मी वडिलां सांगातीं जात्यें जाण ॥ सेवा वनीं करा वया ॥३०॥
पांचही कुमार सद्नर होऊनी ॥ लागती तेव्हां पृथेचे चरणीं ॥ हें राज्य तुझें टाकूनी ॥ कां हो जननी जातेस ॥३१॥
तुझे मनीं ऐसें होतें ॥ तरी कां वनाहूनि आणिलें आम्हांतें ॥ सुभद्रा द्रौपदी रडती तेथें ॥ कुंती त्यांतें सांवरीत ॥३२॥
धृत राष्ट्र म्हणे कुंती अवधारीं ॥ तूं राहें आपुले मंदिरीं ॥ परी ते नायके निर्धारीं ॥ निश्चय न सोडी सर्वथा ॥३३॥
धृत राष्ट्र कुंती गांधीरी ॥ विदुर निघाला झडकरी ॥ आकांत करिती सकल नारी ॥ देह गेह नाठवे तयां ॥३४॥
गायी विण वत्सें दीन ॥ तैसे दिसती पंडुनंदन ॥ कौरव पांडवस्त्रिया परतोन ॥ शोक करीत सदना गेल्या ॥३५॥
ते दिवशीं भागी रथी ॥ तीरीं जाऊनि सर्व राहती ॥ संजय आणि ब्राह्मण निघती ॥ घेऊनि राज अग्नि होत्र ॥३६॥
धर्मासी आशी र्वाद देऊन ॥ परत विला घालोनि आण ॥ अधं म्हणे पुत्रा तूं पुण्य परायण ॥ राज्य चालवी नीतीनें ॥३७॥
यावरी वृद्धांसी नमून ॥ पांडव घालिती प्रदक्षिण ॥ खेद करीत परतती तेथोन ॥ स्फुंदत जाती गजपुरा ॥३८॥
विरस दिसे हस्तिनापुरा ॥ सभा भण भणित समग्र ॥ कौरवांचीं मंदिरें सुंदर ॥ ओस सर्व पडियेलीं ॥३९॥
उत्तर पंथें वृद्धें जाती ॥ ऋषींचे आश्वम पाहती ॥ तप करीत शतायु नरपती ॥ तेथें राहती दिवस कांहीं ॥४०॥
वल्कलें नेसूनि समस्तीं ॥ सर्वांगीं चर्चिल्या विभूती ॥ मग व्यासा श्रमा प्रति जाती ॥ शरीरें कृश चौघांचीं ॥४१॥
विदुर आणि धृत राष्ट्र ॥ मस्तकीं धरिती जटाभार ॥ उरले अस्थींचे पंजर ॥ कलेवर मात्र दिसतसे ॥४२॥
धृत राष्ट्राच्या भेटीसी ॥ येती नारदादि सर्व ऋषी ॥ अंबिका सुत पूजी तयांसी ॥ तोय पुष्प फलांनीं ॥४३॥
धृत राष्ट्राचें आयुष्य साचार ॥ उरलें तीन ॥ संवत्सर ॥ वृद्धाकरणें युधिष्ठिर ॥ खंती करी गजपुरीं ॥४४॥
धर्म सर्वदा उदास ॥ राज्य करा वया नेघे मानस ॥ जैसा धरिला वेठीस ॥ तैसें राज्या चालवी तो ॥४५॥
कीं पाहुणा बैसला घरांत ॥ तो कोठें न घाली चित्त ॥ कीं छायेसी बैसला मार्गस्थ ॥ क्षणभरी उगाचि ॥४६॥
वारिज पत्र असोनि जळीं ॥ कोरडें न भिजे कदाकाळीं ॥ तैसा धर्म ह्रदय कमळीं ॥ उदास आणि अलिप्त ॥४७॥
खंती वाटे धर्मा लागून ॥ पहावया वडिलांचे चरण ॥ सेने सहित पंडुनंदन ॥ निघते जाहले तेधवां ॥४८॥
सेना चाला वया वाट ॥ खणूनि करिती नीट ॥ वापी कूप तडागें अवीट ॥ करिती उदक प्राशना ॥४९॥
कौरव पांडवललना ॥ द्रौपदी सुभद्रा त्या क्षणा ॥ नरयानीं आरूढोनि जाणा ॥ चालिल्या दर्शना वडिलांच्या ॥५०॥
अठरा जाती व्रज जन ॥ निघाले तेव्हां गाडे करून ॥ कृपाचार्य रथीं बैसोन ॥ निघता जाहला धर्मा सवें ॥५१॥
धर्मा वरी धरिलें छत्र ॥ आत पत्र मेघडंबर ॥ मकर बिरुदें अति सुंदर ॥ पुढें चालती तेजस्वी ॥५२॥
युयुत्सु धृत राष्ट्र नंदन ॥ गज पुरीं ठेविला रक्षण ॥ ध्ॐय पुरोहित जाण ॥ तोही ठेविल त्या जवळी ॥५३॥
द्रौपदी पुढें आधीं देख ॥ तिचे मागें ललना सकळिक ॥ जाती वेत्र पाणी गर्जत सुरेख ॥ सहस्त्रावधि त्यां पुढें ॥५४॥
धृत राष्ट्राचा आश्रम जाण ॥ जवळी उरला देखोन ॥ पांडवीं सांडोनि स्यंदन ॥ जाती चरण चालीनें ॥५५॥
पांचाळी आदि सकल युवती ॥ चरणीं हंसगती चमकती ॥ सहदेव नकुल पुढें धांवती ॥ पाहावया कुंती माउलीतें ॥५६॥
अत्यंत कृश देखोन ॥ रडती गळां मिठी घालून ॥ धृत राष्ट्र गांधारींचे चरण ॥ धर्म राजे वंदिले ॥५७॥
कुंतीचे वंदूनि पाय ॥ विदुरासी पाहती लवलाहें ॥ तंव तपासी गेला पाहें ॥ आणिके स्थळीं एकांतीं ॥५८॥
कुंती घट उदकें भरून ॥ येत होती आश्रमा लागून ॥ पांडवीं तियेसी वंदून ॥ घट आपण घेतला ॥५९॥
मग तिघांसी बैस वून ॥ हस्तिना पुरींचे सर्व जन ॥ धर्में भेट विले आणून ॥ नाम कर्म सांगो नियां ॥६०॥
धर्म रायासी भेटा वया ॥ सर्व ऋषी आले धांनो नियां ॥ धर्म शिबिरें उभारो नियां ॥ भोजन देत ऋषींतें ॥६१॥
न्य़ून नाहीं तेथें कांहीं ॥ रायाराणीचे सोहळे पाहीं ॥ मग स्त्रियांसी लवलाहीं ॥ संजय भेटवी वृद्धांतें ॥६२॥
नांवें घेऊनि सांगे ते क्षणीं ॥ हे द्रौपदी सुभद्रा श्रीकृष्ण भगिनी ॥ हे बभ्रुवाहनाची जननी ॥ चित्रांगी नामें जाणिजे ॥६३॥
हे उलूपी शेषतनया ॥ हे प्रमिला पार्थ भार्या ॥ हे उत्तरा अभिमन्य़ूची जाया ॥ परीक्षितीची माता जे ॥६४॥
या धृत राष्ट्रा तुझ्या सुना ॥ आल्या सर्व कौरव ललना ॥ वृद्धाचिया चरणां ॥ सकळ नमूनि बैसती ॥६५॥
सद्नद होऊनि पुसे युधिष्ठिर ॥ कोठें आहे वडील विदुर ॥ त्रिकालज्ञानी हरि कृपापात्र ॥ अति चतुर महाराज तो ॥६६॥
संजय बोले वचन ॥ पैल वृक्षातळीं उदास नग्न ॥ तप करी वायु आकर्षून ॥ जाहला निमग्न निजरूपीं ॥६७॥
तेथें एकला युघिष्ठिर ॥ पहावया गेला सत्वर ॥ तों जटामंडित नग्न दिगंबर ॥ नेत्र झांकून बैसला ॥६८॥
देहावरी नाहीं विदुर ॥ धर्में घातला नमस्कार ॥ चरम वृत्ति बाणली साचार ॥ चलनवलन राहिलें ॥६९॥
धर्म पाहे निरखून ॥ तों विदुर जाहला श्रीकृष्ण ॥ पर ब्रह्मरूप होऊन ॥ ब्रह्मानंदीं मिळाला ॥७०॥
सद्नदित होऊनि युधिष्ठिर ॥ नमूनि परतला सत्वर ॥ गांधारी कुंती धृत राष्ट्र ॥ तयां जवळी बैसला ॥७१॥
फलें मूलें भक्षून ॥ पांडव भूमीसी करिती शयन ॥ मृगया दिधली टाकून ॥ पांचही जणीं तेधवां ॥७२॥
श्वापदें तेथें निर्वैर ॥ रम्य उद्यानीं तरुवर ॥ वस्त्रें पादुका कमंडलु अपार ॥ धर्म राज देत ऋषींतें ॥७३॥
धृत राष्ट्र माता दोघी जणी ॥ तप करिती कैशीं बैसोनी ॥ पांडव पाहती दुरोनी ॥ तंव वेदव्यास पातला ॥७४॥
पांडवीं केलें पूजन ॥ व्यास अंधा लागून ॥ पुत्र शोकें तुझें मन ॥ दुःख पावत नाहीं कीं ॥७५॥
रज आणि तम जाण ॥ केलीं दूर कीं मनांतून ॥ ज्ञानचिन्हें संपूर्ण ॥ सत्त्वबुद्धि असे कीं ॥७६॥
एक मास पर्यंत ॥ धर्म राज राहिला तेथ ॥ तों ऋषी आले समस्त ॥ व्यास धर्मास ॥ भेटा वया ॥७७॥
तितुकियांचेंही पूजन ॥ धर्म करी प्रीती करून ॥ यावरी सत्यवती नंदन ॥ धृत राष्ट्रा प्रति बोलत ॥७८॥
इच्छित असेल मागें कांहीं ॥ अंबिकात्मज बोले ते समयीं ॥ पांडवांचा अन्याय नाहीं ॥ किंचितही पाहतां ॥७९॥
परम कपटी माझे कुमार ॥ पृथ्वी आटूनि गेले दुराचार ॥ तों गांधारी बोले जोडूनि कर ॥ एक इच्छा पूर्ण कीजे ॥८०॥
मज सकळ सुत आठवती ॥ सुना अवघ्या दुःख करिती ॥ सुभद्रा उत्तरा सती ॥ सदा चिंतिती अभिमन्या ॥८१॥
द्रौपदी चिंती पंच पुत्र ॥ कुंती पाहूं इच्छी कर्ण वीर ॥ द्रोण भीष्मादि महाशूर ॥ सकळ दाखवीं एकदां ॥८२॥
व्यास म्हणे अवश्य ॥ मग नेलीं स्वर्धुनीतीराम ॥ व्यासें स्नान करूनि त्यांस ॥ आव्हानिलें तेधवां ॥८३॥
अठरा अक्षौहिणी पृतना ॥ बाहेर निघाली तये क्षणा ॥ आपुलाले वहनीं जाणा ॥ शतही कौर्व आरूढले ॥८४॥
कर्ण द्रोण गंगा कुमार ॥ भग दत्त सोमदत्त बाल्हीक वीर ॥ वस्त्रालंकारमंडित समग्र ॥ घवघवित विराजती ॥८५॥
पुत्रां सह द्रुपद ॥ विराट पुत्रां सह विशद ॥ द्रौपदीचे पंच पुत्र अभिमन्यु सिद्ध ॥ सेनारथ समवेत उभे ॥८६॥
वाद्यें वाजती अपार ॥ ऐसी सेना निघाली समग्र ॥ धृत राष्ट्रा सही दिव्य नेत्र ॥ व्यासें दिधले तेधवां ॥८७॥
होत अप्सरांचें गायन ॥ रंभा उर्वशी करिती नर्तन ॥ रजनीमाजी संपूर्ण ॥ व्यासें रचना दाख विली ॥८८॥
द्दष्टी उघडूनि धृत राष्ट्र ॥ प्रीतीनें पाहे पुत्रपौत्र ॥ झळकत असे दिवटयांचा भार ॥ आणि अपार चंद्र ज्योती ॥८९॥
अठरा अक्षौहिणी दळ पाहीं ॥ निर्वैर उभें एके ठायीं ॥ मग परस्परें सर्वही ॥ भेटते जाहले आदरें ॥९०॥
कर्णाचे तेव्हां चरण ॥ धर्म राज धरी धांवोन ॥ कौरवांसी आलिंगन ॥ पांचही देती आदरें ॥९१॥
अभिमन्यादि पंच कुमार ॥ सर्वांसी भेटती मनोहर ॥ माता आलिंगी कुमार ॥ एकी भ्रतारा वंदिती ॥९२॥
बंधूंसी बंधु अति प्रीतीं ॥ विराट द्रुपद भेटती ॥ भीष्म द्रोण आलिंगिती ॥ पांढवांसी आदरें ॥९३॥
कुंती भेट तसे कर्णा ॥ गांधारी आलिंगी शंतनुनंदना ॥ अरुणो दय पर्यंत रचना ॥ व्यासें अद्भुत दाविली ॥९४॥
सवेंचि भागी रथी जीवनीं ॥ सेनाभार गुप्त जाहला ते क्षणीं ॥ बाहरे आला व्यास मुनी ॥ म्हणे सर्वांसी पाहिलें कीं ॥९५॥
धृत राष्ट्र म्हणे गुरु राया ॥ कां सेना नेली जी विलया ॥ जैसें स्वप्न दावूनियां ॥ जागें जाहलिया मिथ्या तें ॥९६॥
मग जग द्नुरु बोले हास्य मुख ॥ हें ऐसेंचि आहे क्षणिक ॥ आतां सोडीं माया सुख ॥ कैवल्य धामा जाऊनी ॥९७॥
सकल स्त्रियांसी सांगे व्यास ॥ जरी भ्रतारापाशीं असेल मानस ॥ तरी करा गंगा प्रवेश ॥ पावा परत्रास परलोकीं ॥९८॥
मग कौरव स्त्रिया सर्वही ॥ गंगा प्रवेश करितो ते समयीं ॥ दिव्य रूपें लवलाहीं ॥ परत्रीं पतीस पावल्या ॥९९॥
इकडे जन मेज यासी हे कथा ॥ वैशंपायन सांगे तत्त्वतां ॥ व्यास देव समर्थ आतां ॥ सर्प सत्रा आला असे ॥१००॥
जन मेजय वंदोनि व्यास चरण ॥ म्हणे तुझा महिमा ऐकिला पूर्ण ॥ मृत्यु पावले जे जे जाण ॥ ते ते सर्व दाख विले ॥१०१॥
तरी माझा पिता परीक्षिती ॥ तो दाखवीं स्वामी मज प्रती ॥ व्यासें आव्हानूनि चित्तीं ॥ जन मेज यासी भेट विला ॥१०२॥
जाहलिया वरी एक मुहुर्त ॥ सवेंचि जाहला परीक्षिति गुप्त ॥ आस्तिक ऋषि स्तवन करीत ॥ जन मेज याचें तेधवां ॥१०३॥
धन्य धन्य नृपनाथ ॥ धन्य धन्य पराशर सुत ॥ जो परीक्षिति पावला मृत्य ॥ तो आणूनि तुज भेट विला ॥१०४॥
जन मेजय म्हणे वैशंपायना ॥ पुढें सांगें कथेची रचना ॥ व्यासा श्रमीं अंबिका नंदना ॥ सर्वही मृत भेट विले ॥१०५॥
वैशंपायन म्हणे कुरुकुलावतंसा ॥ सर्प संहारका पुण्य पुरुषा ॥ पुसो नियां वेदव्यासा ॥ ऋषि गेले स्वस्थाना ॥१०६॥
धृत राष्ट्र म्हणे पंडुनंदना ॥ अजात शत्रु सद्नुण निधाना ॥ तुज पासूनि मी सर्वज्ञा ॥ सुख पावलों अपार ॥१०७॥
तूं ज्ञान गंगेचा लोट ॥ तूं परमार्थाचा क्षेम मुकुट ॥ स्वानंद वैरागरींचा अवीट ॥ दिव्य हिरा धर्मा तूं ॥१०८॥
तूं शांतीचें उद्यान थोर ॥ तूं औदार्य सत्त्वसरोवर ॥ सोमवं शाचा साचार ॥ विजय ध्वज धर्मा तूं ॥१०९॥
माझा क्रोध गेला पूर्ण ॥ धर्मा तुझें हो कल्याण ॥ आतां तुम्हीं जावें येथून ॥ सहपरिवारें गज पुरा ॥११०॥
तुम्ही असतां येथ ॥ तप वृद्धि न पावे यथार्थ ॥ माझी मन कामना सर्व तृप्त ॥ तुवां केली पुत्र राया ॥१११॥
धर्म म्हणे मी तुझी सेवा करीन ॥ येथेंचि सदा राहीन ॥ सेना सर्व देतों धाडून ॥ तप करीन तुज पाशीं ॥११२॥
धृत राष्ट्र तेव्हां म्हणत ॥ तरी राज्य बुडेल क्षणांत ॥ तैसेंचि कुंती सांगत ॥ धर्मा येथें राहों नको ॥११३॥
सहदेव बोले वचन ॥ मी कुंती मातेची सेवा करीन ॥ तंव ती म्हणे पुत्रा जा येथोन ॥ नाहीं कारण तुझें येथें ॥११४॥
तपासी क्षय न करीं येथ ॥ आमुचें आयुष्य उरलें किंचित ॥ पांचही पुत्रांसी आलिंगीत ॥ धृत राष्ट्र कुंटी गांधारी ॥११५॥
पांचही पांढव सद्नदित ॥ नयनीं टपटपां अश्रु ढाळीत ॥ वडिलांचीं मुखें न्याहाळीत ॥ काय बोलत तेधवां ॥११६॥
तुमचें दर्शन यावरी ॥ दुर्लभ वाटतें अंतरीं ॥ मग चरण वंदोनि झडकरी ॥ गज पुरासी परतले ॥११७॥
पांचाळी सुभद्रादि कामिनी ॥ वडिलांसी वंदूनि ते क्षणीं ॥ सुखासनीं आरूढोनी ॥ जात्या जाहल्या तेधवां ॥११८॥
धर्म पावला स्वस्थाना ॥ चित्तासी स्वस्थता वाटेना ॥ हेंचि सदा आवडे मना ॥ जावें वना वडिलां पाशीं ॥११९॥
ऐसा लोटला एक संवत्सर ॥ तों आला नारद मुनीश्वर ॥ तयासी पुसे युधिष्ठिर ॥ वडिलें आमुचीं सुखी कीं ॥१२०॥
नारद मुनि सांगत ॥ गंगा द्वारीं पर करीत ॥ दोघी माता आणि अंबिका सुत ॥ शुष्क बहुत जाहलीं ॥१२१॥
अस्थीं वरी त्वचा जाण ॥ उरली असे जाहलीं क्षीण ॥ डोळां उरले त्यांचे प्राण ॥ हिमाचल कठिण बहु ॥१२२॥
योगबळें करोनि विदुर ॥ निज धामा गेला साचार ॥ ब्रह्मानंदीं निरंतर ॥ सुखरूप राहिला ॥१२३॥
इकडे गंगा द्वारीं निराहारी सकळें ॥ मासांती एकदां भक्षिती फळें ॥ तेणें शरीरीं क्षीणत्व आलें ॥ जातां पाउलें नुचलती ॥१२४॥
एकदां गंगेंत स्नान करून ॥ कुंती गांधारी अंबिकानंनदन ॥ आश्रमासी येतां जाण ॥ मंद प्राण जाहले ॥१२५॥
तंव तो उष्ण काळ दारूण ॥ वनीं चेतला थोर अग्न ॥ मोठे वृक्ष जाती जळोन ॥ प्रभंजनही सूटला ॥१२६॥
निराहार कृश बह्त ॥ पळवेना पायांसी तिडि पडत ॥ अग्नि संनिध देखोनि म्हणत ॥ संजया त्वरें ॥ आतां ॥१२७॥
आम्हां येथें आलें मरण ॥ आतां तू जाईं वेगें करून ॥ मग तो तत्काळ तेथून ॥ ऋषि मंडळींत पातला ॥१२८॥
तंव तीं वृद्धें तिघें ते काळीं ॥ पूर्वं मुख उभीं ठाकलीं ॥ कृष्णा गोविंदा हरि वनमाळी ॥ उच्चारिती तेधवां ॥१२९॥
योगबळें अवरो धून ॥ तिघांनीं तेथें सोडिला प्राण ॥ तों इतुक्यांत पातला अग्न ॥ तिघें जणें जळालीं ॥१३०॥
धृत राष्ट्राचें अग्नि होत्र ॥ आश्रमांत होतीं कुंडें पवित्र ॥ तोचि हा अग्नि चेतला सत्वर ॥ समीरगती करो नियां ॥१३१॥
शरीरें गेलीं दग्ध होऊन ॥ नारद म्हण मी आलों पाहून ॥ धर्म राया तूं सर्वज्ञ ॥ सर्वथा शोक करूं नको ॥१३२॥
तीं उत्तम गतीस पावलीं ॥ धर्में ऐकोनि हांक फोडिली ॥ बंधूं सहित तये वेळीं ॥ शोकार्णवीं पडियेला ॥१३३॥
अंतःपुरांत हांक गाजली ॥ स्त्रियां सहित पांचाळी ॥ शोकाग्नीनें आहाळली ॥ पृथादेवी आठवू नियां ॥१३४॥
धर्म म्हणे राज्य जावो जळोन ॥ वृद्धें वनीं गेलीं दग्ध होऊन ॥ अनाथ अत्यंत दीन ॥ समयीं कोणी नाहीं तेथें ॥१३५॥
म्हणे हा अग्नि कृतघ्न ॥ पार्थें दिधलें खांडववन ॥ अश्वमेध राज सूय यज्ञ ॥ करोनि अग्नि तोष विला ॥१३६॥
धिग्‍ मैत्री धिग्‍ अग्नी ॥ माझीं वृद्धें मारिलीं जाळोनी ॥ नकुळ सहदेव हांक फोडूनी ॥ कुंतीलागीं बाहती ॥१३७॥
अहा पृथा माउली ॥ माद्री नाहीं आठवूं दिली ॥ अहा वनीं जळोनि गेली ॥ धिक्‍  पुत्र धर्म आमुचा ॥१३८॥
धर्माचे गळां मिठी घालून ॥ शोक करिती माद्री नंदन ॥ नारद करी समाधान ॥ लौकिकाग्नि नव्हे तो ॥१३९॥
इष्ट जाहलिया वरी तोचि अग्न ॥ गेला जाळी तचि कानन ॥ उत्तम त्यांसी जाहलें मरण ॥ सोडिले प्राण योगबळें ॥१४०॥
आपुल्या अग्नीनें मरण पावलीं ॥ उत्तम त्यांसी जाहली ॥ ऐसें बोलिली ऋषि मंडळीं ॥ तें म्यां सर्व ऐकिलें ॥१४१॥
मग उत्तर क्रिया समस्त ॥ धर्म राज तिघांची करीत ॥ त्रयोदश दिवस पर्यंत ॥ गंगातीरीं राहिला ॥१४२॥
बहुत दानें देऊन ॥ सुखी केले सर्व ब्राह्मण ॥ कौरव मेलियावरी अंबिकानंदन ॥ अष्टादश वर्षें होता ॥१४३॥
धर्में गंगा द्वारा पर्यंत ॥ विप्र पाठवूनि त्वरित ॥ तिघांच्या अस्थि भागी रथींत ॥ सोडू नियां दिधल्या पैं ॥१४४॥
कौरव निमाल्या समस्त ॥ चौपन्न वर्षें पर्यंत ॥ धर्म राज राज्य करीत ॥ हस्तिना पुरींचें नीतीनें ॥१४५॥
श्रोते पंडित भक्त जन ॥ श्रीधरें तयां करोनि नमन ॥ म्हणे आश्चमवा सिक पर्व जाण ॥ सत्रावें हें संप विलें ॥१४६॥
यावरी कथानु संधान ॥ निज धामा गेले श्रीकृष्ण ॥ यादव संहारिले संपूर्ण ॥ तें माझेनें वदवेना ॥१४७॥
तें स्वर्गारोहण पर्व ॥ निज धामा गेले पांडव ॥ तें निरूपण अभिनव ॥ पंढरीनाथ लिहों नेदी ॥१४८॥
क्षणक्षणां कानीं सांगत ॥ पांडवप्रताप सुरस ग्रंथ ॥ निज धाम न वर्णीं यथार्थ ॥ करीं समाप्त येथूनी ॥१४९॥
तुझा ग्रंथ पाहतां सप्रेम ॥ पंढरीस उभा मी पुरुषोत्तम ॥ तरी न वर्णीं तूं निज धाम ॥ अज अक्षय मी असें ॥१५०॥
न जायते म्रियते वा हें वचन ॥ गीते माजी बोलिलों मी जान ॥ क्षराक्षरातीत पूर्ण ॥ उत्तम पुरुष अक्षय मी ॥१५१॥
ऐसें सांगतां पंढरीनाथ ॥ कोणी एक बोलिला पंडित ॥ परी पूर्ण जाहलें नाहीं भारत ॥ अपुरता ग्रंथ दिसे कीं ॥१५२॥
तरी लिहीं तूं स्वर्गारोहण ॥ तेचि दिवशीं रुक्मिणी जीवन ॥ स्वप्ना माजी सांगे येऊन ॥ सर्व थाही लिहूं नको ॥१५३॥
हरि विजय राम विजय ग्रंथ ॥ तिसरा हा पांडवप्रताप अद्भुत ॥ तिहींत निज धाम यथार्थ ॥ वर्णूं देत नाहीं मी ॥१५४॥
तथापि करिसी अतिशय ॥ तरी लिहितां वाचितां होईल प्रलय ॥ तुझी स्फूर्ति पावेल लय ॥ ग्रीष्मकाळींचें तोय जैसें ॥१५५॥
ऐसी आज्ञा होतां सत्वर ॥ श्रीधरें घातला नमस्कार ॥ करो नियां जय जय कार ॥ पांडवप्रातप संपविला ॥१५६॥
चौसष्ट अध्याय समस्त ॥ अवघा वर्णिला हा ग्रंथ ॥ चौदा अध्याय पर्यंत ॥ आदिपर्व जाणिजे ॥१५७॥
आठ अध्याय ॥ सभापर्व ॥ वनपर्व अध्याय नव ॥ चार अध्याय अभिनव ॥ विराटपर्व जाणिजे ॥१५८॥
उद्योग पर्व पांच अधाय जाण ॥ भीष्म पर्व अध्याय तीन ॥ तीन अध्यायचि द्रोण ॥ पर्व असे वर्णिलें ॥१५९॥
कर्ण पर्व अध्याय तीन ॥ एक अध्याय शल्य पर्व पूर्ण ॥ गदा पर्व ही जाण ॥ एका अध्यायीं वर्णिलें ॥१६०॥
एक अध्याय सौप्तिक ॥ एकचि अध्याय ऐषिक ॥ तैसेंचि जाणावें विशोक ॥ एके अध्यायें वर्णिलें ॥१६१॥
एकेचि अध्यायीं स्त्रीपर्व ॥ दोन अध्याय शांति पर्व अभिनव ॥ सहा अध्याय अश्वमेध ॥ अपूर्व ॥ अति सुरस वर्णिला ॥१६२॥
शेवटीं आश्रमवा सिक ॥ एकेचि अध्यायीं वर्णिलें देख ॥ एकूण चौसष्ट अध्याय अमोलिक ॥ आदिपर्वापासोनी ॥१६३॥
सवालक्ष मूळ भारत ॥ तितूक्याचा जो मथितार्थ ॥ आला चौसष्ट अध्यायांत ॥ कथा सर्व आकर्षूनी ॥१६४॥
पाल्हाळ केला नाहीं बहुत ॥ अथवा नसे संकलित ॥ नेमस्त धरोनि मथितार्थ ॥ पांडवप्रताप संपविला ॥१६५॥
शुद्धभावार्थें करून ॥ परम शुचिर्भूत होऊन ॥ श्रवण करितां एक आवर्तन ॥ धन धान्य वृद्धि होय पैं ॥१६६॥
आवर्तनें करितां तीन ॥ रोग जाय मुळींहून ॥ आणि कोणीएक विघ्न ॥ बाधूं न शके तयातें ॥१६७॥
गृहीं संग्रहितां हा ग्रंथ ॥ आधि व्याधि न होय तेथ ॥ संसार सुखरूप होय समस्त ॥ आनंद भरित सर्वदा ॥१६८॥
पांच आवर्तनें करितां समूळीं ॥ परम सुपुत्र होय कुळीं ॥ शत्रुक्षय तत्काळीं ॥ एक आवर्तनें होय पां ॥१६९॥
गंडांतर अपमृत्य ॥ येणें दूर होईल यथार्थ ॥ ज्ञान विचारी अद्भुत ॥ होईल पंडित अर्थ पाहतां ॥१७०॥
ब्राह्मणांसी विद्या वर्धन ॥ क्षत्रियांसी प्राप्त राज्य धन ॥ कनक धान्य पदार्थ पूर्ण ॥ वैश्यां प्रति होय पां ॥१७१॥
कृषि वृक्ष सुफळ ॥ श्रेय शूद्रासी होय तत्काळ ॥ जितांचि मुक्त सुख प्रबळ ॥ अंतीं हरिपद पावे तो ॥१७२॥
भक्त मुमुक्ष साधक संत ॥ तेही तेथें निवती समस्त ॥ नवरसीं भरला ग्रंथ पाहोत पंडित सर्वदा ॥१७३॥
भक्ति ज्ञान वैराग्य जाण ॥ ठायीं ठायीं निरूपण ॥ चातुर्य नीति तर्कविवरण ॥ करावें श्रवण ॥ राज यांनीं ॥१७४॥
श्रवणें पुण्याचे पर्वत ॥ असो हा जेथें असेल ग्रंथ ॥ जे तीर्थें व्रतें नित्य शिणत ॥ तेही येथें निवतील पैं ॥१७५॥
गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ ॥ संन्यासी निवतील समस्त ॥ एवं समस्तां इच्छिलेम प्राप्त ॥ श्रीकृष्ण लक्ष्मी वसे तेथें ॥१७६॥
वंध्या होय पुत्रवती ॥ बंधु पिता हो कां पती ॥ दूरी अंतरले ते भेटती ॥ ऋण फिटे श्रवणें पां ॥१७७॥
संसारीं नव्हे आपदा ॥ अंतीं पावतील विष्णुपदा ॥ व्यास वैशंपायनें सर्वदा ॥ फल श्रुति कथियेली ॥१७८॥
आणिक हा वरद ग्रंथ ॥ पंढरीनाथें कथियेला यथार्थ ॥ श्रीधर नाम निमित्त ॥ पुढें केलें लौकिकीं ॥१७९॥
ज्या मूळ भारतीं कथा ॥ त्याचि येथें लिहिल्या तत्त्वतां ॥ प्राकृत कवींचे संमता ॥ नाहीं कदा धरियेलें ॥१८०॥
चौसष्ट अध्याय हा ग्रंथ ॥ कीं हे महत्पुण्याचे पर्वत ॥ नातरी चौसष्ट कलांची अद्भुत ॥ माळा सुंदर गुंफिली ॥१८१॥
कीं हें चौसष्ट खणांचें गोपुर ॥ यावरी निजती सभाग्य नर ॥ कीं चौसष्ट कोहळीं द्र्व्य अपार ॥ भवदरिद्रनाशकें ॥१८२॥
कीं हें चौसष्ट कलांचें भार ॥ कीं हें चौसष्ट योगिनींचें मंदिर ॥ कीं हें चौसष्ट हिर्‍यांचें पदक सुंदर ॥ सभाग्य भक्त घालिती ॥१८३॥
कीं भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त ॥ प्रयागतीर्थ हें यथार्थ ॥ कीं चोसष्ट गंगा अद्भुत ॥ ह्यासी येऊनि मिळाल्या ॥१८४॥
कीं पांडवप्रताप ग्रंथ राजेंद्र ॥ चौसष्ट अध्याय प्रचंड वीर ॥ कीं चौसष्ट कोठडया परिकार ॥ संत भक्तां पहुडावया ॥१८५॥
कीं हीं चौसष्ट तीर्थें ॥ पापहारकें अद्भुतें ॥ शैव अथवा वैष्णवांतें ॥ वंद्य होती सर्वदा ॥१८६॥
गाणपत्य सौर शाक्त ॥ सर्वांसी वंद्य होय ग्रंथ ॥ बह्मानंदें पंढरीनाथ ॥ वर देत ऐसा हा ॥१८७॥
श्रीधर म्हणे माझा जनिता यथार्थ ॥ श्रीब्रह्मानंद अतिविख्यात ॥ सावित्री माता गुण भरित ॥ पतिव्रता तपस्विनी ॥१८८॥
पंढरीहूनि चार योजनें दूरी ॥ नैऋत्य कोणीं नाझरें नगरीं ॥ तेथील देशले खक अवधारीं ॥ ब्रह्मानंद पूर्वा श्रमीं ॥१८९॥
पंढरीस संन्यास घेऊन ॥ समाधिस्थ तेथेंचि पूर्ण ॥ वाळवंटा मध्यें वृंदावन ॥ विश्वजन पाहती ॥१९०॥
क्षीरसागरी नारायण ॥ त्याचा शिष्य चतुरानन ॥ तेथूनि अत्रि जाहला निर्माण ॥ दत्तात्रेय त्यापासोनी ॥१९१॥
त्रिदेवात्मक शरीर शुद्ध ॥ त्यापा सोनि यति सदानंद ॥ तेथूनि रामानंद प्रसिद्ध ॥ समाधिस्थ वाराणसीं ॥१९२॥
तेथूनि अमलानंद यती ॥ पुढें गंभीरानंद महामती ॥ तेथूनि ब्रह्मानंद सुमती ॥ सहजानंद तेथो नियां ॥१९३॥
कल्याणीं जयाची वस्ती ॥ तेथोनि पूर्णा नंद महामती ॥ तेथूनि दत्तानंद सुमती ॥ नाझरें नगरीं समाधिस्थ ॥१९४॥
तो पितामह आमुचा सत्य ॥ तेथोनि ब्रह्मानंद यति अद्भुत ॥ पिता गुरु तोचि समर्थ ॥ जो कां विख्यात महाराज ॥१९५॥
विजय नाम संवत्सरीं ॥ ग्रंथ जाहला पंढरपुरीं ॥ शके सोळाशें चौतीस निर्धारीं ॥ ग्रंथ आकारा तैं आला ॥१९६॥
चौसष्ट अध्याय ग्रंथ तत्त्वतां ॥ तुज प्रीत्यर्थ पंढरीनाथा ॥ वाचकां श्रोतयां समस्तां ॥ करीं कल्याण सर्वदा ॥१९७॥
लेखक पाठका रक्षक निर्धारीं ॥ त्यांसी रक्षीं अंतरीं बाहेरीं ॥ यावत्‍ चंद्रार्कवरी ॥ तावत्‍ ग्रंथ जतन करीं हा ॥१९८॥
माघ मास विजय संवत्सरीं ॥ शुद्ध दशमी बुधवारीं ॥ श्रीपांडुरंग नगरीं ॥ ग्रंथ ते दिवशीं संपविला ॥१९९॥
आदि पुरुषा दिगंबरा ॥ श्रीमद्भीमातीर विहारा ॥ श्रीधरवरदा निर्विकारा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धे ॥२००॥
हेंचि प्रार्थितों वारंवार ॥ नमस्कारूनि जोडितों कर ॥ जेथें हा ग्रंथ असे सुंदर ॥ तेथें निरंतर तिष्ठें तूं ॥२०१॥
ऐकोनि ऐसें उत्तर ॥ धांवूनि आला रुक्मिणीवर ॥ आलिंगूनि म्हणे वर ॥ ऐकें श्रीधरा सखया तूं ॥२०२॥
जेथें असे हा ग्रंथेंद्र ॥ तेथें वसें मी निरंतर ॥ तूं बोलिलासी तें समग्र ॥ सिद्धीस नेता मी असें ॥२०३॥
ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ ग्रंथ दिधला उचलोन ॥ श्रीधरें ऐसें पाहोन ॥ जय जय कार पैं केला ॥२०४॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ चौसष्टाध्यापर्यंत ॥ ग्रंथ जाहला समाप्त ॥ तुजप्रीत्यर्थ पावो कां ॥२०५॥
इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे आश्रमवासिकपर्वणि धृतराष्ट्रादिनिजधामगमनं फलश्रुतिकथनं नाम चुतःषष्टितमाध्यायः ॥६४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ इति आश्रमवासिकपर्व समाप्त ॥

॥ इति श्रीपांडवप्रताप ग्रंथ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP