मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४९ वा

पांडवप्रताप - अध्याय ४९ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ जो पांडवांचा कैवारी ॥ नंदाचे घरींचा खिल्लारी ॥ पांचाळीचा साह्यकारी ॥ द्वारपाळ बळीचा ॥१॥
जो क्षीराब्धीचा जामात ॥ जो होय कमलोद्भवाचा तात ॥ सनका दिक योगी जे समस्त ॥ आराध्यदैवत तयांचें जो ॥२॥
जो आनकदुंदुभीचा कुमार ॥ जो त्रिनेत्राचा प्राण मित्र ॥ जो निगमाचें आद्यसूत्र ॥ पाठिराखा शतमखाचा ॥३॥
जो पुराण पुरुष प्रर्‍हादवरद ॥ उद्धवाक्रूर ह्रदया ञमिलिंद ॥ तो अर्जुनरथीं मुकुंद ॥ बैसोनि काय बोल तसे ॥४॥
अर्जुना होईं सावधान ॥ तुवां मारिला कर्ण नंदन ॥ त्या दुःखें करून ॥ तप्त जाहला वीर तो ॥५॥
तों काळचे मनीं बैसे दचक ॥ ऐसी अर्जुनें फोडिली हांक ॥ तैसीच कर्णें ही देख ॥ गर्जना केली समरांगणीं ॥६॥
दोघांचे रथ श्वेत वर्ण ॥ श्वेततु रंग गति समान ॥ दोघांचें सौंदर्य देखोन ॥ मीन केतन तटस्थ ॥७॥
समवय समविद्या समठाण ॥ समसमान ओढिती समसंधान ॥ दोघेही पृथेचे नंदन ॥ तेजें दिशा उजळती ॥८॥
कर्णाचे ध्वजीं रेखिला कुंजर ॥ पार्थ ध्वजीं वायु कुमर ॥ दोन्ही दळीं वाद्य गजर ॥ तुंबळ जाहला तेधवां ॥९॥
सर्व वीरांची आरोळी ॥ दोन्ही दळीं गाजली ॥ शल्य कृष्ण सारथी बळी ॥ दोहीं कडे दोघांचे ॥१०॥
एक मेरु एक मंदार ॥ एक भार्गव एक रघुवीर ॥ एक रमावर एक उमावर ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥११॥
एक सागर एक आकाश ॥ एक वासुकी एक शेष ॥ एक धैर्य एक यश ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥१२॥
एक सूर्य एक प्रलयाग्न ॥ एक वसिष्ठ एक गाधिनंदन ॥ तैसे कर्ण आणि अर्जुन ॥ समरांगणीं शोभले ॥१३॥
एक स्मार्त एक वैष्णव ॥ एक सद्भाव एक गौरव ॥ विजय श्री वरा वया अभिनव ॥ रण नोवरे केवळ ते ॥१४॥
दोन्ही दळें चिंतेनें व्याकुळ ॥ कोणासी विजय श्री घालील माळ ॥ सर्व देशींचे भूपाळ ॥ पक्षीं बोलती आपुला लिया ॥१५॥
कोणी वर्णिती वीर कर्ण ॥ कोणी म्हणती धन्य अर्जुन ॥ सूर्य आणि संक्रंदन ॥ चिंतिती कल्याण निज पुत्रां ॥१६॥
पार्थाचें कल्याण चिंतिती ॥ सुरवर सर्व निश्चितीं ॥ कर्णासी व्हावी जय प्राप्ती ॥ दैत्य इच्छिती मनांत ॥१७॥
ब्रह्म यासी पुसती देव आणि मुनी ॥ सांग जय प्राप्त कोणा लागूनी ॥ ते ऐका वया विधीची वाणी ॥ शक्र सादर जाहला ॥१८॥
मग बोले विष्णु नाभ ॥ जिकडे असेल रुक्मिणी वल्लभ ॥ जय आणि लाभ ॥ तिकडे सर्व विलोका ॥१९॥
ऐसें ऐकतां पाकशासन ॥ आनंद भरित त्रिभुवन ॥ जय वाद्यें वाजवून ॥ वर्षेम सुमनें पार्था वरी ॥२०॥
अमर दाटले विमानीं ॥ नरनरेश्वरीं भरली मेदिनी ॥ निज भारेंशीं दुरोनी ॥ कित्येक विलो किती ॥२१॥
असो कौरव पांडव रणीं ॥ झुंजतां पडल्या शीर्षाच्या श्रेणी ॥ कंपाय मान होय धरणी ॥ उरगेंद्र मस्तक सरसावी ॥२२॥
दिग्गज चळचळां कांपत ॥ आदिवराह सरसावी दांत ॥ कूर्म पृष्ठ सरसावीत ॥ चिंता ग्रस्त भुवनत्रय ॥२३॥
आकाश मंडप आसडत ॥ भडभडां नक्षत्रें रिचवत ॥ महाधाकें बलवंत ॥ हिमज्वरें कांपती ॥२४॥
तया कल्होळांत उभय कृष्ण ॥ वाजविती देवदत्त पांच जन्य ॥ तेव्हां सृष्टि गेली म्हणोन ॥ एकचि हांक जाहली ॥२५॥
त्या माजी अंजनी नंदन ॥ भुभुःकारें गाजवी त्रिभुवन ॥ वेष्टित भूतें आवेशें करून ॥ हांका फोडिती ते वेळीं ॥२६॥
अगाध जीवनीं नौका डळमळी ॥ तैसी कुंभिनी डोलों लागली ॥ तों हनुमंतें कंव घातली ॥ ध्वजावरी कर्णाचे ॥२७॥
कुंजररेखित कर्ण ध्वज ॥ तो विदारीत वायुतनुत ॥ कौतुक पहा वया धर्म राज ॥ पाठींशीं उभा पार्थाच्या ॥२८॥
शल्या कडे शेष शयन ॥ क्रोधें पाहे विलोकून ॥ तुरंगांवरी तुरंग जाण ॥ रथींचे धांवले सक्रोधें ॥२९॥
विजय म्हणे चक्र पाणी ॥ जरी मज कर्णें मारिलें रणीं ॥ तरी तूं काय रे करिसील ये क्षणीं ॥ सांग मजला गोविंदा ॥३०॥
यावरी यादवकुल दिवाकर ॥ बोलात काय श्रीकरधर ॥ अघटित घडेल साचार ॥ परी पराजय नव्हे तूतें ॥३१॥
सूर्य मार्ग ॥ चुकेल करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावेल अग्न ॥ मशकाची थडक लागून ॥ जरी मेरु उपडेल ॥३२॥
पाषाण प्रहारें करून ॥ जरी वायु पडेल मोडूनि चरण ॥ पिपीलिका शोषी सिंधु जीवन ॥ विजेसी धांवोनि शलभ धरी ॥३३॥
धडधडीत प्रलय ज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी परा जय नव्हे तूतें ॥३४॥
पार्थ म्हणे ब्रह्मांड नायका ॥ सूत्रधारका विश्वव्यापक ॥ तुझी करणी भक्त पालका ॥ ब्रह्मादिकां नेणवेचि ॥३५॥
कर्णाच्या नितंबिनी सकल ॥ विगत धवा आदि होतील ॥ वैकुंठींचा वेल्हाळ ॥ करी भविष्य आधींच हें ॥३६॥
तों दुर्यो धन गुरु सुत ॥ कृत वर्मा आणि शारद्वत ॥ बाणांची वृष्टि करीत ॥ पार्था वरी लोटले ॥३७॥
गज भार रथ भार ॥ पाय दळ आणि अश्वभार ॥ लक्षो नियां सुभद्रावर ॥ हाणिती शस्त्रें एकदांचि ॥३८॥
तितुक्यांचीं शस्त्रें छेदून ॥ टाकिता झाला अर्जुन ॥ आपुले अंगीं एक बाण ॥ लागों नेदी कुशल तो ॥३९॥
स्वभारेंशीं धांवले जे वीर ॥ तितुके पार्थें केले जर्जर ॥ शिरें उडविलीं अपार ॥ कंदुका ऐसीं तेधवां ॥४०॥
पक्षी उडती वृक्षां वरूनी ॥ तैसीं शिरें उसळती गगनीं ॥ तो महाप्रलया देखोनी ॥ द्रौणी म्हणे सुयो धना ॥४१॥
अजूनि तरी होईं सावधान ॥ ऐकें माझें हितवचन ॥ मित्र करूनि पंडुनंदन ॥ समसमान नांदा तुम्ही ॥४२॥
माझिया बोलांत निश्चित ॥ आहेत पांचही पंडुसुत ॥ तूं ऐकतां आपुलें हित ॥ कल्याण यांत सर्वांचें ॥४३॥
दुःखार्णव भरला देखा ॥ मम वचन द्दढनौका ॥ बैसोनि पावसी परतटाका ॥ विरोधवार्ता सांडीं कां ॥४४॥
कर्णासी वारीं तूं सत्वर ॥ मी आवरितों सुभद्रा वर ॥ अभिमान हा महाक्रूर ॥ सांडीं संग तयाचा ॥४५॥
धृत राष्ट्राचें वंशवन ॥ विरोधें गेलें शुष्क होऊन ॥ तेथें पांच पांडव पंचाग्न ॥ जाळीत पूर्ण चालिले ॥४६॥
गुरु सुत मी गुरू समान ॥ सुधारस मानीं मम वचन ॥ दूर करील सर्वांचें मरण ॥ सांडीं अभिमान सुयोधना ॥४७॥
म्ग दुर्यो धन बोले वचन ॥ आतां सोडूनियां अभिमान ॥ पांडवांसी न जाऊं शरण ॥ मैत्री करा म्हणो नियां ॥४८॥
वेंचूं समरांगणीं प्राण ॥ कीर्तीनें भरूं त्रिभुवन ॥ अर्जुनासी मारील कर्ण ॥ पाहें कौतुक आतां हें ॥४९॥
इभमस्त कींचें मुक्त ॥ घेऊं गेला मृगनाथ ॥ तो होऊनि भयभीत ॥ परतेल काय घडेल हें ॥५०॥
माझ्या दुःशासनाचें रक्तपान ॥ केलें भीमें समरीं जाण ॥ त्याचा मी घेईन प्राण ॥ किंवा देईन आपुला ॥५१॥
माझ्या मस्तकींचा मुकुट ॥ लत्ताप्रहारें करीन पिष्ट ॥ समरीं भीम बोलिला स्पष्ट ॥ तें तुवां श्रवण केलें कीं ॥५२॥
आतां करूनि पुरुषार्थ ॥ प्राण द्यावा हाचि इत्यर्थ ॥ असो इकडे कर्ण आणि पार्थ ॥ रणरंगीं भिडती पैं ॥५३॥
पूर्वीं इंद्र आणि वृत्रा सुर ॥ कीं श्रावणारि सुत मय जावर ॥ शक्रारि आणि ऊर्मिला प्रिय कर ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥५४॥
व्यो मकेश आणि त्रिपुरा सुर ॥ कीं तारका सुर आणि कुमार ॥ तैसे कर्ण आणि कृष्ण प्रियकर ॥ निःशंक वीर दोघेही ॥५५॥
मग कर्ण पार्थासी लक्षून ॥ सोडिता जाहला दहा बाण ॥ ते अर्जुनें छेदून ॥ सोडिले द्विगुण तयावरी ॥५६॥
कर्णें सोडिले बाण शत ॥ सहस्त्र बाणीं ताडीत पार्थ ॥ लक्ष बाणीं सूर्य सुत ॥ ताडिता जाहला तयातें ॥५७॥
यावरी तो वीर जग जेठी ॥ सोडिता जाहला बाण कोटी ॥ अक्षय्य तूणीर पृष्ठी ॥ अर्जुनाचा भरला असे ॥५८॥
अमोघ धनंजयाचे बाण ॥ सुटते जाहले चापा पासून ॥ जैसे चतुराचे मुखांतून ॥ अपार शब्द निघती पैं ॥५९॥
कीं पद क्रम वर्ण क्रमे करून ॥ वैदिक करिती वेदाध्ययन ॥ तैसे चपलत्वें अर्जुन ॥ शर सोडी असंख्य ॥६०॥
कीं मेघा पासूनि अवधारा ॥ अपार पडती तोय गारा ॥ कीं ओंकारा पासूनि अपारा ॥ ध्वनि जैसे निघती पैं ॥६१॥
कीं मूल माये पासूनि एकसरें ॥ असंख्य जीव सृष्टि उभारे ॥ कीं चपल लेखका पासूनि त्वरें ॥ असंख्य अक्षरें उमटती ॥६२॥
कर्णाचें जें बाण जाळ ॥ एक सरें छेदी कुंती बाळ ॥ जैसें उगवतां सूर्य मंडळ ॥ भगणें सर्व झांकती ॥६३॥
कीं एक उठतां विनायक ॥ अपार संहरी दंदशूक ॥ कीं सुटतां चंडवात देख ॥ जलद जाल वितळे पैं ॥६४॥
कीं विष्णु नामें करून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥ कीं चेततां द्विमूर्धान ॥ होती विपिनें दग्ध पैं ॥६५॥
शत्रु बाण जाल समस्त ॥ छेदूनि पाडी एके क्षणांत ॥ जैसे एका सिंहनादें गज बहुत ॥ पडती गत प्राण होऊनी ॥६६॥
ह्रदयीं प्रकट तांचि बोध ॥ सहपरिवारें पळती काम क्रोध ॥ कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद विरूनि जाती ॥६७॥
अर्कज सोडी एक शर ॥ त्यापासूनि निघती अपार ॥ जैसा एकुलता एक पुत्र ॥ संतति वाढे बहु त्याची ॥६८॥
तैलबिंदु जळीं पडतां ॥ तो पसरे चहूंकडे अवचितां ॥ कीं सत्पात्रीं दान देतां ॥ कीर्ति प्रकटे सर्वत्र ॥६९॥
कीं कुलवंतासी उपकार करितां ॥ यश प्रकटे न सांगतां ॥ तैसा कर्ण एक बाण सोडितां ॥ पसरती बाण चहूंकडे ॥७०॥
बाणांसी झगडतां बाण ॥ तेव्हां वर्षत प्रलयाग्न ॥ बाण खंड पडतां उसळोन ॥ कित्येक वनें दग्ध होती ॥७१॥
शस्त्रांसी झगडतां शस्त्रें ॥ भयें रिचवती नक्षत्रें ॥ सप्तसमुद्रांचीं नीरें ॥ तप्त जाहलीं तेधवां ॥७२॥
कलाहीन शशितरणी ॥ विमानें पळविती सुधापानी ॥ वायु फिरों न लाहे धरणीं ॥ दिवसचि रजनी वाटत ॥७३॥
जळती सकल पांडवभार ॥ ऐसें कर्णें सोडिलें अग्न्यस्त्र ॥ वीरांचे रथ शस्त्रें समग्र ॥ जळों लागलीं तेधवां ॥७४॥
हरिनामें निरसती दोष समग्र ॥ तेवीं पार्थें सोडिलें जल दास्त्र ॥ अग्नि विझाला समग्र ॥ जैसी मत्सरें प्रीति मरे ॥७५॥
जलद माजले अद्भुत ॥ कौरवांची सेना वाहात ॥ जैसा विवेक होतां प्राप्त ॥ काम क्रोध निरसती ॥७६॥
मग तो लोक प्राणे शास्त्र ॥ सोडिता जाहला सूर्य पुत्र ॥ पार्थ सेना समग्र ॥ वायुचक्रीं पडियेली ॥७७॥
पार्थें सोडूनि पर्वत ॥ प्रभंजन कोंडिला समस्त ॥ जैसे मद अहंकार महंत ॥ सत्यज्ञानें विभांडी ॥७८॥
मग वज्रास्त्र जपोन ॥ सोडिता जाहला सूर्य नंदन ॥ पार्थें माहेश्वर टाकून ॥ संहारिलें तेधवां ॥७९॥
पार्थें कर्णाचा रहंवर ॥ निज बाणीं भेदिला समग्र ॥ जैसे शोभती तृणां कुर ॥ तेवीं रथ दिसतये ॥८०॥
निज राथीं शोभे सूर्य कुमार ॥ जैसा निरभ्रनभीं सहस्त्रकर ॥ कर्णें तेव्हां कार्तवीर्यास्त्र ॥ अनिवार सोडिलें ॥८१॥
सहस्त्रकरांचे तीव्र वीर ॥ कोटयवधि उठिले अपार ॥ मग पार्थें भार्ग वास्त्र ॥ असं भाव्य सोडिलें ॥८२॥
कर्णें सोडिलें महिषास्त्र ॥ पार्थें शक्ति सोडिल्या समग्र ॥ कर्णें जपतां सर्पास्त्र ॥ गारुडास्त्र फाल्गुन जपे ॥८३॥
कर्णें सोडिला अपांपती ॥ किरीटीनें पाठ विला अगस्ती ॥ कर्णें प्रेरिली काळराती ॥ सोडी गभस्ति पार्थ तेव्हां ॥८४॥
यावरी कर्णें कृष्णार्जुन ॥ शरधारीं खिळिले संपूर्ण ॥ मग पार्था प्रति भीम सेन ॥ बोलता जाहला तेधवां ॥८५॥
कर्णें संहारिली पृतना ॥ कौतुक काय पाहसी अर्जुना ॥ मग बाण जाळीं शल्य कर्णां ॥ पार्थें खिळिलें तेधवां ॥८६॥
शल्य आणि सौती ॥ मयूरा ऐसेचि दिसती ॥ पांडवांचे बहुत हस्ती ॥ कर्णें मारिले तेधवां ॥८७॥
रथी आटिले बहुत ॥ स्वारांसी तेथें नाहीं गणित ॥ धर्म राज कौतुक पाहात ॥ कर्णार्जुनांचें तेधवां ॥८८॥
गांडीवाचा गुण जान ॥ कर्णे छेदिला टाकूनि बाण ॥ सवेंचि अर्जुनें आपण ॥ लाविला नूतन ॥ तत्काळ ॥८९॥
थोर युद्धाचा कडकडाट ॥ वार्‍यासी मध्यें न फुटे वाट ॥ तेथें द्विजांचा संघट्ट ॥ होईल कैसा त्या ठाया ॥९०॥
कृष्णा वरी साठ बाण ॥ सोडिता जाहला वीर कर्ण ॥ शल्या वरी नऊ मार्गण ॥ पार्थें तेव्हां घातले ॥९१॥
दोन्ही दळींचे वीर ॥ पाहती उगेचि भया सुर ॥ जैसे चित्रीं लिहिले चित्र भार ॥ तैसे दिसती तेधवां ॥९२॥
हस्तला घव करी कर्ण ॥ त्या हूनि विशेष करी अर्जुन ॥ तों कर्णाचे भातां येऊन ॥ तक्षक पुत्र बैसला ॥९३॥
त्याची माता खांडववनीं ॥ पळतां मारिली पार्थें बाणीं ॥ तेथील वैर स्मरोनी ॥ शर होऊनि गुप्त वसे ॥९४॥
कर्णार्जुन ॥ श्रमले फार ॥ अंगीं चालिले घर्मपूर ॥ विंझणे घेवोनि सेवक नर ॥ वारा घालिती दोघांवरी ॥९५॥
चंदन कर्पूर मिश्रित नीर ॥ सेवक शिंपिती वारंवार ॥ घेघेही कौंतेय सुंदर ॥ तनु सुकुमार दोघांची ॥९६॥
त्यावरी तो तक्षक बाण ॥ कर्णें काढिला जेवीं सहस्त्र किरण ॥ अर्जुनाचा कंठ लक्षून ॥ अकस्मात सोडित ॥९७॥
तो बाण अनिवार ॥ अर्जुनाचा प्राण घेणार ॥ शक्रा दिदेव समग्र ॥ हाहाकार करिती तेव्हां ॥९८॥
नित्य पूजिला तो बाण ॥ चर्चिला चंदनें करून ॥ त्याचि बाणीं तक्षक नंदन ॥ गुप्तरूपें संचरला ॥९९॥
कळवळला शचीरमण ॥ त्याची शांतवी चतुरानन ॥ तूं धीर धरीं एक क्षण ॥ व्याकुल मन होऊं नेदीं ॥१००॥
अर्जुनासी रक्षक पाहीं ॥ आहे क्षीराब्धीचा जांवई ॥ कौतुक करील ये समयीं ॥ साव धान पाहा तें ॥१०१॥
प्रलयच पलेसी मागें टाकून ॥ निघता जाहला निर्वाण बाण ॥ द्वादश सूर्यांचें तेज पूर्ण ॥ तया शरीं एक वटलें ॥१०२॥
कीं सुटला कालदंड ॥ विदारील वाटे ब्रह्मांड ॥ मेरु मंदार शत खंड ॥ घायें करील वाटतसे ॥१०३॥
सहस्त्र विजा कडकडती ॥ तैसा बाण जाय सत्वरगती ॥ दोन्ही दळें मोह पावती ॥ वीर पळती दशदिशां ॥१०४॥
धर्म भीम नकुल सहदेव ॥ भयभीत वीर सर्व ॥ म्हणती हे विश्वव्यापक कमला धव ॥ रक्षीं रक्षीं निजदासा ॥१०५॥
परम आनंदला दुर्यो धन ॥ आतां सर्वथा न उरे अर्जुन ॥ माझें राज्य आणि प्राण ॥ ओंवाळीन कर्णा वरूनी ॥१०६॥
वृक्षाग्रीचें फळ पाहोन ॥ पक्षी ये जैसा झेंपावोन ॥ तैसा पार्थाचा कंठ लक्षून ॥ प्रलय बाण पातला ॥१०७॥
पांडवकैवारी जगन्नाथ ॥ बळें दडपिला विजय रथ ॥ गुडघे टेंकूनि तेथ ॥ तुरंग बैसवीत रथाचे ॥१०८॥
चक्रां सहित विजय रथ ॥ खालीं लवला हें अद्भुत ॥ तों मुकुट छेदूनि अकस्मात ॥ बाणें नेला तेधवां ॥१०९॥
तिल प्राय तुकडे करून ॥ मुकुट पडला चूर्ण होऊन ॥ तो मुकुट चतुराननें निर्मून ॥ शक्रासी पूर्वीं दिला होता ॥११०॥
तो किरीट परम प्रीतीनें ॥ पार्थासी दिधला सहस्त्र नयनें ॥ असो अर्जुन जावा प्राणें ॥ परी मुकुटा वरीच तें गेलें ॥१११॥
सूत्र धारी याद वेंद्र ॥ भक्तरक्षक दया समुद्र ॥ विमानांतूनि पुरंदर ॥ आनंदाश्रु ढाळीतसे ॥११२॥
लक्षोनि पार्थ श्रीधर ॥ सुमनें वर्षे वारंवार ॥ पांडव करिती जय जय कार ॥ स्तविती तेव्हां श्रीरंगा ॥११३॥
अस्तमाना जाय चंड किरण ॥ तैसा किरीट नेला उडवून ॥ मग पार्थें मूर्धज सांव रून ॥ वस्त्र बांधिलें तेधवां ॥११४॥
यावरी तो तक्ष कसुत ॥ कर्णापाशीं येऊनि बोलत ॥ म्हणे संधान चुकलें यथार्थ ॥ पुन्हां सोडीं मजलागीं ॥११५॥
कर्ण पुसे तूं कोण ॥ तो सांगे पूर्व वर्त मान ॥ मी मातेचा सूड घेईन ॥ करीं संधान ॥ मागुती ॥११६॥
कर्ण म्हणे मी काय बलहत ॥ तुझ्या आश्रयें युद्ध करूं येथ ॥ मज वीर हांसतील समस्त ॥ जाईं तूं त्वरित निज स्थाना ॥११७॥
मग सर्पास्त्राचें रूप धरून ॥ चालिला पार्थासी लक्षून ॥ कृष्ण म्हणे पार्था लागून ॥ तक्षक पुत्र शत्रु तुझा ॥११८॥
मग बाण सोडूनि कृष्ण मित्रें ॥ खंडविखंड केलीं गात्रें ॥ यावरी त्या कुंती पुत्रें ॥ द्वादश शर सोडिले ॥११९॥
ते कर्णाचें फोडूनि अंग ॥ पलीकडे गेले सर्वग ॥ सवेग ॥ सवेंचि कर्णाचा मुकुट सुरंग ॥ चूर्ण केला शरघायें ॥१२०॥
कवच अंगींचें छेदून ॥ ह्र्दयीं भेदिले नव बाण ॥ मूर्च्छना येऊनि कर्ण ॥ ध्वजस्तंभीं टेंकला ॥१२१॥
मूर्च्छना जाय निरसोन ॥ तोंवरी अर्जुन न मारी बाण ॥ मग सावध होऊनि कर्ण ॥ सरसावून बैसला ॥१२२॥
अस्ता आतां वासरमणी ॥ तैसा कर्ण आरक्त दिसे ते क्षणीं ॥ मग सवेंचि शत बाणीं ॥ श्रीरंगासी खिळियेलें ॥१२३॥
सवेंचि टाकोनि शत शर ॥ कर्णें पार्थ केला जर्जर ॥ मग पार्थासी म्हणे श्रीकरधर ॥ काढीं बाण शिव दत्त जो ॥१२४॥
पृथ्वी आप तेज वायु अंबर ॥ यांचीं सत्त्वें काढूनि समग्र ॥ एकादश रुद्र द्वादश मित्र ॥ यांचीं तेजें घेऊनी ॥१२५॥
तो बाण रची हिमनगजामात ॥ पूर्वीं त्रिपुरवधानिमित्त ॥ मग प्रसन्न होऊ नियां देत ॥ पार्था लागीं प्रीति भरें ॥१२६॥
तों कर्णाचें कर्म गहन ॥ न सुटे कदा भोगिल्या विण ॥ गुरु शाप विप्रशाप दारुण ॥ सरसावले अंतकाळीं ॥१२७॥
समीरगतीं चालतां रथ ॥ पृथ्वीनें चक्रें गिळिलीं अकस्मात ॥ मंत्र आठवेना समयो चित ॥ अस्त्रही कदा स्मरेना ॥१२८॥
अस्त्रें शक्ति अद्भुत बाण ॥ असतां कदा नव्हे स्मरण ॥ हस्तल घव गेलें गळोन ॥ तेजोहीन मुख जाहलें ॥१२९॥
दशदिशा वाटती शून्य ॥ वाटे जवळी आलें मरण ॥ परीतो भास्करी धैर्य धरून ॥ पुढती रण माज वीत ॥१३०॥
मग चाप ओढूनि आकर्ण ॥ कर्णें सोडिले सात बाण ॥ सच्चिदानंदतनूसी भेदून ॥ बाण गेले पलीकडे ॥१३१॥
सप्त बाण भेदूनि गेले ॥ परी कृष्णाचें आसन न ढळे ॥ पंचशरांचेनि मेळें ॥ न ढळे जैसा मारुती ॥१३२॥
हाणितां कुठार तीक्ष्ण ॥ वृक्ष न जाय सोडूनि स्थान ॥ कीं वर्षतां अपार घन ॥ अचल स्थान सोडीना ॥१३३॥
कीं निंदक निंदितां अपार ॥ न चळे साघूचें अंतर ॥ प्रर्‍हादासी लाविले विखार ॥ परी तेणें धीर न सोडिला ॥१३४॥
जो षड्विकाररहिततनु ॥ जो नरवीर पंचाननु ॥ तो आदि पुरुष पुरातनु ॥ सप्तशरीं भेदिला ॥१३५॥
पार्थाचे ह्रदयीं जाण ॥ कर्णें भेदिले द्वादश बाण ॥ सवेंचि प्रत्यंचा छेदून ॥ गांडीवाची टाकिली ॥१३६॥
पार्थ आणिक लावी नूतन ॥ सवेंचि तोडूनि टाकी कर्ण ॥ असो एकामागें एक गुण ॥ शंभर तोडून टाकिले ॥१३७॥
अर्जुने निर्वाण शरीं ॥ कर्ण खिळिला ते अवसरीं ॥ तेव्हां कर्णाचा रथ धरित्री ॥ गिळिती जाहली विप्रशापें ॥१३८॥
ते वेळीं सूर्य नंदन ॥ रथा खालीं उतरोन ॥ रथचक्र काढी उपटोन ॥ परी कदा नुपटेचि ॥१३९॥
धन्य कर्णाचें अद्भुत बळ ॥ डळमळलें उर्वी मंडळ ॥ परी समीप आला काळ ॥ चक्र सहसा उपटेना ॥१४०॥
तों अर्जुनाचे येती बाण ॥ मग बोलता जाहला उदार कर्ण ॥ भो भो पार्थ पंडुनंदन ॥ क्षणैक स्थिर राहें तूं ॥१४१॥
तूं वीर परम ख्यातिवंत ॥ अवकाशा देईं एक महूर्त ॥ मज चक्र उपटूं दे येथ ॥ संकटीं बहुत पडलों असें ॥१४२॥
पार्थें मुकुट नेला छेदून ॥ कर्णाची वीर गुंठी सुटोन ॥ सुवास केश पसरले जाण ॥ ते शोभाय मान दिसती पैं ॥१४३॥
असो तो कर्ण उदार ॥ पार्थासी विनवी वारंवार ॥ मी व्यसनीं पडलों साचार ॥ भीत नाहीं मरणातें ॥१४४॥
धर्मा धर्म विचार बहुत ॥ तूं सर्व जाणसी रणपंडित ॥ त्या प्रति द्वारकानाथ ॥ प्रत्युत्तर देतसे ॥१४५॥
म्हणे कर्णा धर्म न्याय नीती ॥ आतां काय रे तुज स्मरली चित्तीं ॥ सभेसी नेली द्रौपदी सती ॥ कपटद्यूत खेळोनियां ॥१४६॥
तेव्हां धर्म न्याय नीती ॥ तुज नाठवली कदा चित्तीं ॥ अजात शत्रु धर्म नृपती ॥ कपटें करू नि नाडिला ॥१४७॥
विष घालोनि मारिला वृकोदर ॥ वर्मीं दंशविले विखार ॥ लक्षा सदनीं लाविला वैश्वानर ॥ तेव्हां धर्म न विचारिला ॥१४८॥
वना धाडिले पंडुकुमार ॥ रात्रीस मिळूनि तुम्ही समग्र ॥ घाला घालावया दुराचार ॥ येत होतां कपटी हो ॥१४९॥
मिळूनि तुम्ही अवघे जणीं ॥ बाळ अभिमन्यु मारिला रणीं ॥ तुज धर्म नाठवला ते क्षणीं ॥ मदेंकरूनि भुललासी ॥१५०॥
द्रौपदी नव्हें देवकी जाण ॥ सभेंत गांजिली नेऊन ॥ वस्त्रें घेतलीं फेडून ॥ तेव्हां धर्म न विचारिला ॥१५१॥
आतां शत्रू निवटूनि सर्वत्र ॥ धर्मा वरी मी धरीन छत्र ॥ ऐसें बोलतां शत पत्र नेत्र ॥ सुर्य पत्र न बोलेचि ॥१५२॥
पार्था वरी सोडी शर ॥ सवेंचि उपटी रथ चक्र ॥ पार्थासी म्हणे नीलगात्र ॥ सोडीं अस्त्र काय पाहसी ॥१५३॥
कर्ण तिकडूनि शर सोडी ॥ सवेंचि रथ चक्रें बळें उपटी ॥ शत बाण सोडूनि प्रौढी ॥ अर्जुन मूर्च्छित पाडिला ॥१५४॥
इतुक्यांत उपटी रथ चक्र ॥ परी तें न ढळेचि अणु मात्र ॥ ब्रह्म शाप परम दुस्तर ॥ कदा टाळिला नव जाय ॥१५५॥
श्रीकृष्ण म्हणे पार्था पाहीं ॥ हा वधीं जों रथा वरी चढला नाहीं ॥ तों बाण सोडूनि लवलाहीं ॥ ध्वज छेदिला कर्णाचा ॥१५६॥
हाहाकार करिती कौरव जन ॥ आतां न वांचे कदा कर्ण ॥ जय पारखा जाहला येथून ॥ कर्म गहन पूर्वींचें ॥१५७॥
काढिला पार्थें शिव दत्त बाण ॥ प्रलय विजे ऐसा देदीप्य मान ॥ कीं तो माध्यान्हींचा चंड किरण ॥ तैसा मार्गण दिसतसे ॥१५८॥
कीं तो शिव हस्तींचा त्रिशूळ ॥ किंवा वज्र सुटलें प्रबळ ॥ कीं सुदर्शन तेजाळ ॥ कृष्ण हस्तींचें चालिलें ॥१५९॥
पार्थ करी तेव्हां शपथ ॥ जरी सत्यविद्या हे शिवदत्त ॥ आणि विबुधेश्वराचें सामर्थ्य ॥ अपरिमित असेल ॥१६०॥
द्रोण गुरुचें पदकमल ॥ माझें मन तेथें भ्रमर असेल निश्चल ॥ कायावाचामनें निर्मळ ॥ कृष्णो पासक मी जरी असें ॥१६१॥
तरी याचि बाणें तत्काळ ॥ तुटो कर्णाचें शिरकमळ ॥ तो बाण जातसे तेजाळ ॥ मूर्च्छित जाहलीं दोन्ही दळें ॥१६२॥
पर्व तावरी पडे चपला ॥ तैसा शर कर्ण कंठीं बैसला ॥ कीं सूर्य अस्तमाना गेला ॥ तैसें शिर उडविलें ॥१६३॥
शिर ऊर्ध्व गेलें देखा ॥ मूखांतूनि निघाली तेजकलिका ॥ ते मिळाली जाऊनि अर्का ॥ लवण जलन्यायेंशीं ॥१६४॥
जय वाद्यांचे गजर ॥ पांडवदळीं जाहले अपार ॥ वरी आनंदला पुरंदर ॥ दुंदुभिवाद्यें वाजवी ॥१६५॥
दिव्य सुमनांचा वर्षाव तेव्हां ॥ वारंवार करी मघवा ॥ कौरव दळीं तेधवां ॥ शिर पडलें कर्णाचें ॥१६६॥
कर्ण पडतां रण मंडळीं ॥ दुःखाश्रु ढाळी चंडांशुमाळी ॥ निज करें स्पर्शोनि अस्ताचळीं ॥ सागर स्नान करीतसे ॥१६७॥
उरले जे पांडवांचे वीर पूर्ण ॥ एकमेकां देती आलिंगन ॥ उत्तम दानीं संपूर्ण ॥ भूसुर जाण तोष विले ॥१६८॥
रिता रथ घेऊनि ते वेळीं ॥ शल्य प्रवेशला कौरव दळीं ॥ धरणी वरी आंग घाली ॥ दुर्यो धन अतिशोकें ॥१६९॥
तेव्हां नेत्रोदकें करूनी ॥ खालीं भिजतसे अवनी ॥ अहा बाल मित्रा मज टाकूनी ॥ कर्ण वीरा गेलासी ॥१७०॥
अहा कर्णा परमोदारा ॥ अहा कर्णा अतिसुंदरा ॥ अहा कर्णा समर धीरा ॥ सद्नुण मी किती आठवूं ॥१७१॥
हे कर्ण वीरा चंड किरण ॥ पावलासी आजि अस्त माना ॥ उदय नव्हेचि पुन्हां ॥ पडली सेना अंधारीं ॥१७२॥
तुझिया स्वरूपावरून ॥ शंबरारि टाकावा ओंवाळून ॥ कवच कुंडलें मागों आला जाण ॥ ब्राह्मण वेषें शक्र तो ॥१७३॥
तूं सकल उदारांचा राणा साच ॥ तत्काळ दिधलीं कुंडलें कवच ॥ कार्प ण्यता न धरिसीच ॥ काया वाचा मानसें ॥१७४॥
औदार्य सात्त्विकता परोपकार ॥ धर्म राया सम गंभीर ॥ परा क्रमी पुण्यपवित्र ॥ तुज ऐसा नसेचि ॥१७५॥
तों रण मंडळ सांडूनी ॥ पळे तेव्हां कौरव वाहिनी ॥ इकडे भीमें आनंदे करूनी ॥ हांक फोडिली आवेशें ॥१७६॥
प्रति शब्द उठिला निराळीं ॥ कौरव सेना कांपे चळीं ॥ स्वदेशासी तये काळीं ॥ कित्येक जाती जीव भयें ॥१७७॥
वीर बोलती भयें करून ॥ पैल पाहा आला अर्जुन ॥ एक म्हणती दुःशासनाचें रक्तपान ॥ कर्ता भीम आला हो ॥१७८॥
अहो ते भय समुद्रांत ॥ कौरव सेना ॥ अवघी पडत ॥ कर्णाचें स्तवन ॥ अद्भुत ॥ शल्य करी तेधवां ॥१७९॥
म्हणे कर्णा ऐसा वीर पाहीं ॥ नोहेचि कदा भुवनत्रयीं ॥ होणार न टळे सहसाही ॥ रणीं मारिला फाल्गुनें ॥१८०॥
इकडे धर्म राज कृष्णार्जुनां ॥ प्रीतीनें देत आलिंगना ॥ म्हणे हे कृष्णा जना र्दना ॥ किती उपकारा आठवूं ॥१८१॥
आमुची शोभा संपत्ति बळ ॥ तूंचि अवघा तमालनीळ ॥ तूंचि ब्रह्मा नंद निर्मळ ॥ सगुणपणा आलासी ॥१८२॥
चिंतामणीचे धवला गारीं ॥ जो पहुडला सुखसेजेवरी ॥ तो ओसणतां बोलिला जरी ॥ तरी तें सर्व प्राप्त होय ॥१८३॥
तैसा आमुचे मनोरथीं ॥ हरि तूं जाहलासी सारथी ॥ जें जें आम्ही इच्छितों चित्तीं ॥ तें श्रीपति पुरविसी तूं ॥१८४॥
खाऊनि करकरां दांत ॥ दुर्यो धन धांवला सेने सहित ॥ पांडवसेना संहारीत ॥ वीर पळती दश दिशां ॥१८५॥
जैसा चापापा सूनि सुटे बाण ॥ तैसा धांवला भीम सेन ॥ प्रचंड गदा घायें करून ॥ कौरव सेना विभांडिली ॥१८६॥
पंचवीस सहस्त्र वीर ॥ मारीत तेव्हां वृकोदर ॥ धृत राष्ट्राचा ज्येष्ठ कुमार ॥ परा भवून पळविला ॥१८७॥
रात्र जाहली परम घोर ॥ शिविरीं जाऊनि बैसला चिंतातुर ॥ कर्णासी आठवूनि वारंवार ॥ दुर्यो धन अश्रु गाळी ॥१८८॥
जेणें द्रव्याचे पर्वत ॥ ब्राह्मणांसी दिधले अमित ॥ रणा आला सुर्य सुत ॥ करूनि समस्त ग्रहदानें ॥१८९॥
तों हरिवर ध्वजाचे रथीं ॥ द्विजवर ध्वज जाहला सारथी ॥ म्हणो नियां जय प्राप्ती ॥ जाहली निश्चितीं तयातें ॥१९०॥
देव ऋषी स्वस्थाना ॥ चालिले वर्णीत भीमार्जुनां ॥ कोणी वर्णिती कर्णा ॥ धीर उदार म्हणो नियां ॥१९१॥
धर्म राज रथीं बैसोन ॥ सुगंधस्नेहदीपिका लावून ॥ कर्पूर दीपिका पाजळून ॥ सह्स्त्र सेवक चालती ॥१९२॥
कर्ण पडला रण मंडळीं ॥ धर्म जवळी येऊनि न्याहाळी ॥ महावीर पडले स्थळो स्थळीं ॥ दिव्य अलंकारीं मंडित ॥१९३॥
नक्षत्रें क्षितीवरी पडती ॥ तेवीं अलंकार शस्त्रें झगमगती ॥ असो पांडव शिबिरा प्रती ॥ जाते जाहले तेधवां ॥१९४॥
कृष्ण कृपेचें बळ अद्भुत ॥ रणीं मारिला सूर्य सुत ॥ सुखें निद्रा पांडव करीत ॥ सर्व चिंता सोडुनियां ॥१९५॥
इकडे धृत राष्ट्रालागून ॥ संजय सांगे वर्त मान ॥ रणीं पहुडला वीर कर्ण ॥ जो कां प्राण कौरवांचा ॥१९६॥
धृतराष्ट्र आणि गांधारी ॥ बुडालीं तेव्हां शोक सागरीं ॥ संजय विदुर नानापरी ॥ शांतविती दोघांतें ॥१९७॥
जन मेजय जो धरणीनाथ ॥ त्यासी वैशंपायन सांगत ॥ शौनका दिकां प्रति सूत ॥ कथा सांगत नैमिषारण्यीं ॥१९८॥
कर्ण पर्व संपलें येथून ॥ पुढें शल्य पर्व करा श्रवण ॥ श्रीधर ब्रह्मानंदें करून ॥ विनवीतसे श्रीतियांसी ॥१९९॥
हें कर्ण पर्व ऐकतां निर्मळ ॥ हाता येत अश्वमेधफळ ॥ श्रवण करी जो पुण्य शीळ ॥ इच्छिलें फळ पावे तो ॥२००॥
तो होय धन धान्य संयुक्त ॥ पुत्र पौत्रीं तोचि नांदत ॥ माधव आणि उमा धव समस्त ॥ कृपा करिती त्यावरी ॥२०१॥
ब्राह्मणांसी होय विद्या प्राप्त ॥ क्षत्रिय ऐकतां विजय सत्य ॥ निरंतर धन धान्य युक्त ॥ वैश्य शूद्र होती श्रवणें ॥२०२॥
कर्ण पर्व क्षीराब्धि देख ॥ पार्थ रथ शेष मंचक ॥ जेथें विराजे वैकुंठ नायक ॥ सर्व सामर्थ्य सहित पैं ॥२०३॥
जेथें जयश्री हेचि कमला ॥ अर्धागीं वसतसे वेल्हाळा ॥ म्हणो नियां होतसे सोहळा ॥ पांडव घरीं सर्वदा ॥२०४॥
श्रीमद्भी मातट विहारा ॥ ब्रह्मानंदा सौख्य समुद्रा ॥ पांडुरंगा श्रीधरवरा ॥ दिगंबरा आदिंपुरुषा ॥२०५॥
येथूनि शल्यपर्व अवधारा ॥ पांडित श्रोते श्रवण करा ॥ श्रीधरवरदा जग दुद्धारा ॥ मन्मनोरथीं बैसें कां ॥२०६॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्ण पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकुणपन्नाव्यांत कथियेला ॥२०७॥

इति श्री श्रीधरकृतकर्णपर्वणिकर्णनिधनंनाम एकोनपंचाशत्तमाध्यायः ॥४९॥

इति - कर्णपर्व - समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP