मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ४८ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ४८ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ४८ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ कर्णपर्वऐकतां कर्णीं ॥ कर्णतृप्त होती तेचिक्षणीं ॥ ज्याची कीर्तिवर्णिती व्या करणी ॥ व्यास वैशंपायनादिक ॥१॥सावधान उर्वीपती ॥ तुझिया पूर्व जांची अगाध कीर्ती ॥ कर्ण आणि सुभद्रा पती ॥ रणांगणीं उभे तेव्हां ॥२॥तों समसप्तकीं मिळोन ॥ पाचारिला वीर अर्जुन ॥ कृष्णवर्त्मा जाळी कानन ॥ संहारीत उठे तैसा ॥३॥जैसा सघन ॥ वर्षे घन ॥ तैसे पार्थ सोडी मार्गण ॥ अपार शिरें छेदून ॥ राशी पाडिल्या समरांगणीं ॥४॥सम सप्तक टाकिती शर ॥ अपार छेदी पार्थ वीर ॥ इकडे धर्मा वरी सूर्य पत्र ॥ बाण वर्षत धांवत ॥५॥अचूक धर्माचें संधान ॥ विजे ऐसे सोडी बाण ॥ परी सकल वीरांचीं कवचें पूर्ण ॥ छेदी कर्ण समरां गणीं ॥६॥रणतूर्यें वाजती अपार ॥ प्रलय हांक देती असुर ॥ जैसा मध्यान्हींचा भास्कर ॥ कर्ण वीर दिसे तैसा ॥७॥न्याहाळितां कर्णाचें वदन ॥ पाहूं न शकतीं भयें करून ॥ धृष्टद्युम्नाचें सैन्य ॥ अपार कर्णें पाडिलें ॥८॥देशोदेशींचे राजे जाणा ॥ शरीं खिळिल्या त्यांच्या पृतना ॥ तों सुषेण वृषसेन त्या क्षणा ॥ पुत्र कर्णाचे धांवले ॥९॥पितया देखतां दोघां जणीं ॥ ख्याति केली रणांगणीं ॥ संहारिली बहुत वाहिनी ॥ तटस्थ नयनीं वीर पाहती ॥१०॥तों कर्णाचा तृतीय पुत्र ॥ ज्याचें नाम भानुदेव पवित्र ॥ तेंणें सप्त बाणीं वृकोदर ॥ भेदिला तेव्हां समरांगणीं ॥११॥भीमें टाकूनि निर्वाणशर ॥ उडविलें भानुदेवाचें शिर ॥ मग वृकोदरें ॥ अपार ॥ कौरवसेना पाडिली ॥१२॥कृत वर्मा आणि शारद्वत ॥ दोघे धांवले रणपंडित ॥ नकुल सहदेवांवरी बाण वर्षत ॥ सुषेष रागें ऊठला ॥१३॥ बाण सोडूनि बहुत ॥ तेणें खिळिले माद्री सुत ॥ तों सात्य कीनें छेदूनि रथ ॥ केला विरथ सुषेण तो ॥१४॥शरीं मूर्च्छित पाडिला धरणीं ॥ मग दुःशासनें नेला रथीं घालूनी ॥ इकडे द्रौपदीच्या पंच नंदनीं ॥ ख्याति केली कर्णा पुढें ॥१५॥टाकूनि बाण पांच शत ॥ समरीं भेदिला सूर्य सुत ॥ शत बाणीं धर्म नृपनाथ ॥ भेदिता जाहला कर्णातें ॥१६॥त्र्यहात्तर बाण टाकून ॥ भेदिता जाहला धृष्टद्युम्न ॥ ऐशीं बाणीं दारुणा ॥ सात्यकीवीरें भेदिला ॥१७॥शत शत बाणीं तितुके वीर ॥ कर्णें केले समरीं जर्जर ॥ हस्तला घव केलें थोर ॥ सूर्यपुत्रें तेधवां ॥१८॥कर्णाचा थोर प्रताप ॥ घातला बाणांचा मंडप ॥ तीनशें रथी करूनि प्रताप ॥ तरणिसुतें संहारिले ॥१९॥धर्म राज जर्जर ते क्षणीं ॥ कर्णें केला समरांगणीं ॥ तेव्हां सर्व वीर मिळोनी ॥ रक्षिते जाहले धर्मासी ॥२०॥कर्णाचें हस्तला घव थोर ॥ कोणासी हालवूं नेदी कर ॥ शस्त्रां सहित सत्वर ॥ भुजा उडवी तेधवां ॥२१॥दहा बाण टाकून ॥ धर्में भेदिला ह्र्दयीं कर्ण ॥ मग बोले तयासी वचन ॥ ऐकें दुर्जना राधेया ॥२२॥पार्थाशीं झुंजेन समरीं ॥ ऐसीं हांव धरितोसी अंतरीं ॥ कनक कांसें समसरी ॥ कैसें पावेल सांग पां ॥२३॥रात्रि आणि दिवस ॥ वैनतेय आणि वायस ॥ श्रृगाल आणि सिंहास ॥ सरी कैसी होईल पैं ॥२४॥सुधनिक आणि दरिद्र ॥ रावण आणि राम चंद्र ॥ तैसा कर्ण आणि सुभद्रावर ॥ समान कैसे होतील पैं ॥२५॥आनकदुंदुभि ह्रदय रत्न ॥ पद्मज जनक पद्माक्षी जीवन ॥ तो सारथी ज्याचा जगन्मोहन ॥ त्याशीं स्पर्धा करिसी तूं ॥२६॥ऐशा रीतीं धर्म बोलोन ॥ काळदंडा ऐसे सोडी बाण ॥ जर्जर केला मित्र नंदन ॥ चाप बाण गळाले ॥२७॥विकल पडिला वीर कर्ण ॥ धर्म उगाचि न सोडी बाण ॥ कौरव दळ संपूर्ण ॥ हडबडिलें ते काळीं ॥२८॥पांडवदळीं आनंद परम ॥ वर्णिती धर्माचा पराक्रम ॥ तंव तो कर्ण वीरोत्तम ॥ सावध जाहला तेधवां ॥२९॥प्रलयीं खवळे कृतान्त ॥ तैसा राधेय बाण वर्षत ॥ एकषष्टि बाणीं कुंती सुत ॥ समरीं ताडिला पराक्रमें ॥३०॥सवेंचि सोडूनि तीक्ष्ण बाण ॥ छेदिलें धर्माचें सायकासन ॥ युधिष्ठिरें शक्ति तीक्ष्ण ॥ सोडिली तेव्हां कर्णावरी ॥३१॥गभस्तिसुतें सप्त बाणीं ॥ शक्ति छेदूनि पाडिली धरणीं ॥ चार तोमर ते क्षणीं ॥ धर्में टाकिले कर्णावरी ॥३२॥ह्रदयीं एक दुजा शिरीं ॥ दोन बैसले दोहों भुजां वरी ॥ सवेंचि तो वीर भास्करी ॥ उसणें घेता जाहला ॥३३॥दिव्य शर सोडूनि ते काळीं ॥ धर्माचा मुकुट पाडिला तळीं ॥ तेव्हां एकचि हांक गाजली ॥ धर्म मारिला म्हणू नियां ॥३४॥छेदिला ध्वज मारिला सूत ॥ तिल प्राय केला धर्म रथ ॥ धर्म आणिके रथीं बैसत ॥ परतो नि जात तेधवां ॥३५॥धर्में पाठी दिली जाणोन ॥ वायु वेगें धांवला कर्ण ॥ धर्मासी आडवा येऊन ॥ रथाशीं रथ झगट विला ॥३६॥आपुलिया रथा वरून ॥ धर्थ रथीं चढला कर्ण ॥ दोन्ही भुजा आकर्षून ॥ धर्माच्या तेव्हां धरियेल्या ॥३७॥तों धांवला शल्य वीर ॥ म्हणे कर्णा ऐकें विचार ॥ छत्रपति जो नृपवर ॥ त्यासी सर्वथा धरूं नये ॥३८॥तों आठवलें कुंतीचें वचन ॥ एक वेगळा करूनि अर्जुन ॥ चौघांचे रक्षावे प्राण ॥ समरांगणीं सांपडल्या ॥३९॥कर्ण म्हणे धर्मा लागून ॥ तुवां करावे महायज्ञ ॥ किंवा करावें वेदाध्ययन ॥ अनुष्ठान अतिनेमें ॥४०॥आपुला प्रताप पुरुषार्थ ॥ कोणाशीं करूं नको व्यर्थ ॥ तुज मीं सोडिलें आजि जीवंत ॥ जाईं शिबिरा त्वरेनें ॥४१॥त्रूटि न वाजे इतुक्यांत ॥ कर्ण प्रवेशला निजदळांत ॥ धर्म राज परम लज्जित ॥ आज्ञा पीत निजवीरां ॥४२॥म्हणे सर्वही वीर मिळोन ॥ रणीं आजि मारा कर्ण ॥ तों द्रौपदीचे पंच नंदन ॥ वर्षत बाण ऊठले ॥४३॥दळा सहित द्रौपदीचा बंधू ॥ धांवला वेगें प्रताप सिंधू ॥ कर्णाचा इच्छूनि वधू ॥ विराट दळें धांवती ॥४४॥दोन्ही मिसळलीं रणीं ॥ वीरां होत झोड धरणी ॥ कंदुका ऐसीं गगनीं ॥ शिरें तेधवां उसळती ॥४५॥आकांत मांडला दोन्ही दळीं ॥ कोल्हाळ न समाये गगन मंडळीं ॥ उर्वीतळ डळमळी ॥ ग्रीवा डोलवी भोगींद्र ॥४६॥प्रति शब्द उठे निराळीं ॥ ऐसी भीमें हांक गाज विली ॥ विद्युल्लते ऐसा ते वेळीं ॥ कौरव दळीं प्रवेशला ॥४७॥कुंजर ताडी कुंजरें ॥ रहंवर ताडी गदा प्रहारें ॥ तुरंग पळतां धांवोनि त्वरें ॥ चरणीं धरूनि आपटीत ॥४८॥तों शल्यासी म्हणे कर्ण ॥ भीमाकडे चालवीं स्यंदन ॥ इकडे स्ववीरांसी भीम सेन ॥ म्हणे रक्षा धर्म आतां ॥४९॥धर्म राजा ऐसें निधान ॥ नेत होता धरूनि कर्ण ॥ आतां तरी जपून ॥ धर्म राज रक्षावा ॥५०॥शल्य म्हणे कर्णा लागून ॥ आजि काळ रूप दिसे भीमसेन ॥ किंवा पेटला प्रलय कृशान ॥ वीर कानन जाळील तो ॥५१॥अनिवार भीमाचार मार ॥ येणें कीचक मारिले समग्र ॥ तैसे हिडिंब बक किर्मीर ॥ आपटू नियां मारिले ॥५२॥कर्णें सोडूनि शत बाण ॥ वक्षःस्थलीं ताडिला भीमसेन ॥ येरें शत बाणीं नंदन ॥ तरणीचा तेव्हां ताडिला ॥५३॥सवेंचि सोडूनि एक बाण ॥ तोडिलें हातींचें सायकासन ॥ मूर्च्छना येऊनि कर्ण ॥ ध्वज स्तंभीं टेंकला ॥५४॥पांडव दळीं जय जय कार ॥ कौरव दळ उठावलें समग्र ॥ त्यांत विवत्स धार्म राष्ट्र ॥ भीमें रणीं संहारिला ॥५५॥सवेंचि पराक्रमें वृकोदरें ॥ छेदिलीं पांच कौरवांचीं शिरें ॥ हें देखोनियां अर्कपुत्रें ॥ केलें धांवणें तेधवां ॥५६॥कर्णानें एक शत बाणी ॥ भीम भेदिला समरां गणीं ॥ शत चूर्ण स्यंदन करूनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥५७॥गदा घायें वृकोदर ॥ कर्णाचा रथ करी चूर ॥ सात शतें कुंजर ॥ संहारिले कौरवांचें ॥५८॥पांच शतें महारथी ॥ भीमें मारिले रणपंथीं ॥ समरीं वीर न ठरती ॥ भार पळती कौरवांचे ॥५९॥दहा सहस्त्र महावीर ॥ अश्वांसहित केला संहार ॥ पाय दळ शत सह्स्त्र ॥ संहारिलें तेधवां ॥६०॥सहा सहस्त्र सेना तत्त्वतां ॥ शकुनीची पाठविली मृत्यु पंथा ॥ यमदंष्ट्रवर्धिनी पाहतां ॥ रक्तनिम्नगा चालिली ॥६१॥समसप्तकांशीं फाल्गुन ॥ तिकडे युद्ध करी निर्वाण ॥ तंव ते दांडगे अवघे जण ॥ रथ वेढिती पार्थाचा ॥६२॥नाना शस्त्रांचे मार ॥ करिती तेव्हां अनिवार ॥ मग हनुमंतें पुच्छ थोर ॥ पसरो नियां बांधिले ॥६३॥समसप्तकांचे भार ते क्षणीं ॥ बांधोनि कपि फिरवी गगनीं ॥ मग आपटिले धरणीं ॥ मृद्धटवत चूर्ण होती ॥६४॥एकाचे मोडिले चरण ॥ एकाचे तोडिले नासिका कर्ण ॥ एकाच्या ग्रीवा पिळून ॥ गगनपंथें भिरकावी ॥६५॥अनिवार देखोनि पुच्छमार ॥ दशदिशां पळती ते वीर ॥ तों पुढें पुच्छ शेषाकार ॥ आडवें येत तिकडूनी ॥६६॥एक उडती गगनीं ॥ तों पुच्छ येई वळतें वरूनी ॥ लपतां गिरिकंदरीं जाऊनी ॥ पुच्छ येऊनि मारीत ॥६७॥तों पार्थें घातलें सर्पास्त्र ॥ नागपाशें बांधिले समग्र ॥ रथ टाकूनियां पळती वीर ॥ हाहाकार जाहला ॥६८॥तों तिकडूनि सुशर्मा महावीर ॥ तेणें सोडिलें सुपर्णास्त्र ॥ सर्प पळाले समग्र ॥ देखोनि नरवीर कोपला ॥६९॥जैसा प्रदीप्त ज्वालामाली ॥ तैसा किरीटी दिसे ते काळीं ॥ दहा सहस्त्र वीर बळी ॥ शिरें छेदूनि पाडिले ॥७०॥चवदा सहस्त्र रथीं ॥ रणीं पाडी सुभद्रा पती ॥ तीन सहस्त्र हस्ती ॥ विदारूनि पाडिले ॥७१॥इकडे द्रुपद पुत्र सुकेत ॥ कृपाचार्याशीं युद्ध करीत ॥ तंव महावीर शारद्वत ॥ असंख्यात शर सोडी ॥७२॥अर्धचंद्र मुख सोडी शर ॥ छेदिलें सुकेताचें शिर ॥ परमप्रताप गौतमपुत्र ॥ रणपंडित निपुण तो ॥७३॥इकडे दुर्यो धन धृष्टद्युम्न ॥ युद्ध करिती निकरें करून ॥ परस्परें भेदूनि बाण ॥ मय़ूरा ऐसे दिसती पैं ॥७४॥दुर्यो धनाचा स्यंदन ॥ धृष्टद्युम्नें केला चूर्ण ॥ चरणींच पळे दुर्यो धन ॥ पांडवदळ हांसतसे ॥७५॥तों दुर्यो धन बंधु दंडधार ॥ तेणें आपुलिया रथीं सत्वर ॥ बैसवूनि दुर्यो धन नृपवर ॥ नेला अन्यत्र तेधवां ॥७६॥उणें देखोनि सूर्य सुत ॥ कोपला जैसा प्रलय कृतान्त ॥ बाण धारीं अमित ॥ पांडवसेना संहारिली ॥७७॥विद्युल्लता पडे धरणीवरी ॥ तैसे बाण खोंचती शरीरीं ॥ पांडवदळ ते अवसरीं ॥ पळों लागलें दशदिशां ॥७८॥धर्म आला कर्णा समोर ॥ सोडीत सहस्त्रांचे सहस्त्र शर ॥ परी तोही कर्णें जर्जर ॥ करू नियां परा भविला ॥७९॥सोडूनि ते क्षणीं ॥ कोस एक टाकूनि मेदिनी ॥ कर्ण भयें जाऊनी ॥ धर्म राज स्थिरावला ॥८०॥कर्ण नव्हे हा प्रलयाग्न ॥ जाळिलें पांडवदळ कानन ॥ तें दुर्यो धनें देखोन ॥ गौरवीत कर्णातें ॥८१॥म्हणे वीरा ये समयीं ॥ तुझा मी उतराई होऊं कायी ॥ पांडव मारिल्या सर्वही ॥ हें राज्य तुझेंचि असे ॥८२॥दुर्यो धनाशी शपथ ॥ बोलता जाहला आचार्य सुत ॥ धृष्टद्युम्नें माझा तात ॥ असतां ध्यानस्थ मारिला ॥८३॥हेंचि आतां प्रतिज्ञावचन ॥ धृष्टद्युम्नासी मारिल्या विण ॥ अंगींचें कवच जाण ॥ न काढीं मी यावरी ॥८४॥हें जरी न करवे माझेन ॥ तरी ब्रह्म हत्या गोहनन ॥ मातापिता गुरुवध जाण ॥ हें पाप माझे मस्तकीं ॥८५॥पार्थ म्हणे श्रीकर धरा ॥ सतेजर विकरवरांबरा ॥ तिकडे कर्णें जग दुद्धरा ॥ प्रलय केला वाटतें ॥८६॥अहो ते गरुड जावळीचे तुरंग ॥ श्रीरंगें धांवडिले सवेग ॥ अंजनी ह्रदया रविंद भृंग ॥ गगन गाजवी भुभुःकारें ॥८७॥ दिव्य रथ कनकमंडित ॥ ध्वज झळके गगन चुंबित ॥ मनोवेगें आला पार्थ ॥ तों धर्म तेथें दिसेना ॥८८॥समस्तांचे ध्वज रथ सतेज ॥ परी कोठें न दिसे धर्म राज ॥ बंधूकारणें तो तेजःपुंज ॥ परम घाबरा जाहला ॥८९॥मग शिबिरा प्रति धांवोन ॥ येते जाहले कृष्णा र्जुन ॥ तों तेथें धर्म राज देखोन ॥ परम संतोष पावले ॥९०॥कर्णें त्रासिला युधिष्ठिर ॥ तेणें त्याचें संतप्त शरीर ॥ उभय कृष्ण देखोनि उत्तर ॥ बोलता जाहला तेधवां ॥९१॥म्हणे हे पार्था सुगुणा ॥ मम ह्रदया नंदव र्धना ॥ मारू नियां दुष्ट कर्णा ॥ आलासी काय सांग तूं ॥९२॥हे श्रीरंगा यादवेंद्रा ॥ मम ह्र्दया रविंद भ्रमरा ॥ रुक्मिणी चित्त पंकजर विकरा ॥ कर्ण मारिला कीं नाहीं ॥९३॥मज तेणें जर्जर केलें रणीं ॥ मुकुट फोडूनि पाडिला धरणीं ॥ तो तुम्हीं कर्ण मारिला रणीं ॥ तेणें करूनि मी संतोषें ॥९४॥कर्ण नव्हे तो केवळ कृतान्त ॥ पराक्रमें जेवीं पुरुहूत ॥ तेजें प्रत्यक्ष आदित्य ॥ कीं वैवस्वत दूसरा ॥९५॥भार्गव किंवा भूमिजा रमण ॥ तैसा रणपंडित परम प्रवीण ॥ जो आम्हांसी मानी तृणासमान ॥ मारिला कैसा सांग तो ॥९६॥तुम्ही षंढतिळ म्हणोन ॥ बोलिला जो आम्हां वचन ॥ तो तुम्हीं आजि वधिला कर्ण ॥ थोर केला पुरुषार्थ ॥९७॥मग अर्जुन बोले वचन ॥ समसप्तकांसी संहारून ॥ सैन्यांत आलों धांवोन ॥ तों स्यंदन तुझा दिसेना ॥९८॥पहावया तव मुख चंद्र ॥ माझे नेत्र जाहले चकोर ॥ कर्णें आजि प्रलय थोर ॥ रणांगणीं केला असे ॥९९॥सात शत रथी भले ॥ कर्णें आमुचे रणीं मारिले ॥ आतां आज्ञा देईं ये वेळे ॥ जाऊनि मारीन कर्णातें ॥१००॥धर्म बोले दुःखे करून ॥ अजूनि वांचला आहे कर्ण ॥ माझें ह्रदय जळतसे पूर्ण ॥ वर्षें घन पार्था तूं ॥१०१॥मज लागली चिंताव्याधी ॥ तूं देईं सत्वर औषधी ॥ अरे हा कर्ण परम दुर्बुद्धी ॥ द्रौपदीस येणें गांजिलें ॥१०२॥द्रौपदी ऐसें थोर निधान ॥ गांजिलें येणें सभेंत नेऊन ॥ तुझें प्रतिज्ञा वचन ॥ गेलें जळोन मज वाटे ॥१०३॥वृथा शिणविली माता पृथा ॥ तुझी विद्या गेली सर्व वृथा ॥ तुझें सामर्थ्य पार्था ॥ कोणें नेलें हिरूनी ॥१०४॥आम्हांसी कैंचे राज विलास ॥ आमुचे कपाळीं वनवास ॥ गांडीव देईं श्रीकृष्णास ॥ तूं सारथी होईं आतां ॥१०५॥धिक् तूणीर धिक् गांडीव शर ॥ धिक् ध्वज धिक् रहंवर ॥ गांडीवनिंदा ऐकतां सुभद्रावर ॥ प्रलयाग्नी ऐसा क्षोभला ॥१०६॥शस्त्र घेऊनि झडकरी ॥ धर्मावरी धांवली ते अवसरीं ॥ श्रीरंग धांवूनियां आवरी ॥ ह्रदयीं धरी पार्थातें ॥१०७॥जो पंडुनृपसमान धर्म राज ॥ जो सोमवंश विजय ध्वज ॥ जो तपस्व्यां माजी तेजःपुंज ॥ सागर पूर्ण सत्याचा ॥१०८॥जो दयाका शींचा रोहिणी पती ॥ जो सत्यवचनी केवळ गभस्ती ॥ जो क्षमेचा निश्चिती ॥ कनकाचलचि केवळ ॥१०९॥अजातशत्रु समानस्थिती ॥ त्याचा वध इच्छिसी चित्तीं ॥ ब्रह्मांड भरी अपकीर्ती ॥ तुझी होईल जाण पां ॥११०॥मरीचिजलवत संसार ॥ यांत जे सद्विवेकी नर ॥ सत्कीर्ति ठेवूनि अपार ॥ पावती परत्र सुकृती ते ॥१११॥पार्थ म्हणे गांडीव दे सत्वर ॥ ऐसें केवीं बोलिला युधिष्टिर ॥ हा शब्द ऐकतांचि शिर ॥ तयाचें म्यां छेदावें ॥११२॥माझा नेम तरी ऐसा ॥ आतां बुद्धि सांग तूं कमलेशा ॥ ब्रह्मा नंदा ह्रषीकेशा ॥ तुझी आज्ञा प्रमाण ॥११३॥यावरी बोले जग न्मोहन ॥ वडिलांसी शब्द बोलतां कठिण ॥ तरी वधाहूनि श्रेष्ठ पूर्ण ॥ विद्वज्जन बोलती ॥११४॥ऐसें बोलतां श्रीरंग ॥ पार्थासी प्राप्त जाहला अनुराग ॥ मग श्रीकृष्णें तो कृष्ण सवेग ॥ धर्मरायासी भेट विला ॥११५॥अजात शत्रूचे चरण ॥ साष्टांगें नमीत अर्जुन ॥ आपुला अपराध आठवून ॥ उकसाबुकसीं स्फुंदतसे ॥११६॥पार्थ तेव्हां बोले सद्नद ॥ जळो जळो हा पापी क्रोध ॥ क्रोध नव्हें हा प्रमाद ॥ केला होता आजि म्यां ॥११७॥क्रोधें उत्पन्न होय आधी ॥ क्रोधेंचि प्रकटती महाव्याधी ॥ परम सज्ञान जो सुबुद्धी ॥ क्रोधें होय तृण वत ॥११८॥परम सद्विवेकी पंडित ॥ क्रोधें होय पिशाचवत ॥ भूत संचार निश्चित ॥ क्रोधचि ऐसें जाणावें ॥११९॥असो युधिष्ठिरें उचलून ॥ ह्र्दयीं आलिंगिला अर्जुन ॥ म्हणे विजया विजयी होईं पूर्ण ॥ कर्णाप्रति वधूनियां ॥१२०॥धर्म म्हणे जी वनमाळी ॥ तूं आमुची काम धेनु माउली ॥ आपुलें वत्स साभाळीं ॥ वेळोवेळीं काय सांगों ॥१२१॥मग बोले बैकुंठनाथ ॥ आजि कर्णासी वधील पार्थ ॥ संदेह न धरावा मनांत ॥ पाहें तेथें येऊ नियां ॥१२२॥पार्थ म्हणे ते अवसरीं ॥ जरी आजि कर्णासी न वधीन समरीं ॥ तरी मातेचे उदरीं ॥ व्यर्थ जन्मा मी आलों ॥१२३॥हें जरी नव्हे यथार्थ ॥ तरी कृष्ण दास्य गेलें व्यर्थ ॥ सोमवंशा लागीं सत्य ॥ डागचि मग लागला ॥१२४॥जरी आजि न वधीन कर्ण ॥ तरी मातापिता गुरु हनन ॥ माझिया माथां तें पाप पूर्ण ॥ मग वदन काय दावूं ॥१२५॥माझी प्रतिज्ञा समस्त ॥ सिद्धीस नेईल द्वारकानाथ ॥ जय द्रथवधीं पण यथार्था ॥ कोणें केला तया विण ॥१२६॥असो आज्ञा घेऊनि कृष्णार्जुन ॥ मनो वेगें सोडिला स्यंदन ॥ दोन्ही दळां मध्यें येऊन ॥ उभे ठाकले चपलत्वें ॥१२७॥जैसा माध्यान्हीं आदित्य ॥ तैसा दिसे सकलां विजय रथ ॥ वाद्य घाई लागली बहुत ॥ धाकें कांपत भूगोल ॥१२८॥वाटे मेदिनी गेली रसातळा ॥ आकाश मंडप तुटोनि पडिला ॥ शेष कूर्म ते वेळां ॥ भूभार सोडूं इच्छिती ॥१२९॥तेथीं चिया वाद्य गजरें ॥ पावका अंगीं भरलें शहारें ॥ सप्तसमुद्रींची नीरें ॥ तप्त जाहली ते धवां ॥१३०॥इकडे भीम कौरव भारीं ॥ संचरोनि सेना संहारी ॥ इभ पळता पायीं धरी ॥ धरेवरी आपटीत ॥१३१॥रथावरी रथ आपटीत ॥ द्विपावरी द्विप आदळीत ॥ तुरंगही स्वारां सहित ॥ असंख्यात मारिले ॥१३२॥मग सर्व कौरवीं मिळोन ॥ वेढिला तेव्हां भीम सेन ॥ कीं बहुत जंबुकीं जाण ॥ व्याघ्र जैसा वेढिला ॥१३३॥मग गदाघायें भीम सेन ॥ सकल सैन्य करी चूर्ण ॥ करेंचि कुणपें उचलोन ॥ वाहिनी पाडिली अपार ॥१३४॥लोहार्गला लंबाय मान ॥ तैसे हस्तिदंत घेतले उपडोन ॥ वीर पाडिले झोडून ॥ अशुद्धें करून डवरला ॥१३५॥जैसा सिंदूरें घवघवीत पार्वती कुमार ॥ तैसा आरक्त दिसे वृकोदर ॥ कीं तो रणभैरव दुर्धर ॥ चवताळत चहूंकडे ॥१३६॥शकुनीचें सर्व दळ ॥ दंतघायें झोडिलें सबळ ॥ कीं वीर साळी गदा मुसळ ॥ घेऊ नियां कांडीतसे ॥१३७॥स्थूलदेह हा कोंडा केवळ ॥ लिंग शरीर सडिले तांदुळ ॥ उद्धरोनि जाती तत्काळ ॥ भीमहस्तें करू नियां ॥१३८॥कीं रण मंडल हें होम कुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वलित प्रचंड ॥ कौरव बस्त उदंड ॥ आहुति माजी पडताती ॥१३९॥द्वारावतीची कृष्ण भवानी ॥ पांडवांची हे कुल स्वामिनी ॥ ते अर्जुनाचे रथीं येऊनी ॥ कलरू पिणी बैसली ॥१४०॥असो भीमें समरांगणीं ॥ मूर्च्छित पाडिला कपटी शकुनी ॥ तो दुर्यो धनें उचलोनी ॥ नेला घालूनि रथा वरी ॥१४१॥कौरव दळ आटिलें भीम सेनें ॥ पांडव दळीं प्रलय केला कर्णें ॥ मग पार्थ श्रीरंगासी म्हणे ॥ रथ सत्वर धांवडीं ॥१४२॥पार्थ चापाचा सुटला बाण ॥ त्याहूनि पुधें धांवें स्यंदन ॥ शल्य म्हणे कर्णा अर्जुन ॥ तुज लक्षून येत त्वरें ॥१४३॥आतां आपुली विद्या सर्वही ॥ आठवीं तूं ये समयीं दुर्यो धनादि कौरवही ॥ पाठी रक्षिती कर्णाची ॥१४४॥तों पार्थ वीरें ते क्षणीं ॥ गांडीव टणत्कारिलें रणीं ॥ तेव्हां अवघ्या लघुकिंकिणी ॥ झणत्कारल्या एकदांचि ॥१४५॥गांडीव ओढितां सत्वरा ॥ एकसरें वाजलें करकरां ॥ तेव्हां नक्षत्रें रिचवलीं एकसरां ॥ सीमा समुद्रें ओलांडिली ॥१४६॥प्रलय चपल ऐसा रथ ॥ दिव्य कळस वरी झळकत ॥ मुक्तजाळिया मिरवत ॥ लावण्य अद्भुत न वर्णवे ॥१४७॥तों मागें टाकूनि मारु तगती ॥ पुढें धांवले नव्वद रथी ॥ अष्टदिशांनीं पार्था प्रती ॥ विंधिते जाहले तेधवां ॥१४८॥पूर्ण चार घटिकां पर्यंत ॥ युद्ध जाहलें अत्यद्भुत ॥ पार्थ प्रतापी रणपंडित ॥ केला निःपात ॥ तितुक्यांचा ॥१४९॥तों हस्ती वरी बैसवून ॥ दुर्यो धनें म्लेंच्छ तेरा जण ॥ पार्थाचे पाठी मागून ॥ पाठविले मारावया ॥१५०॥पुढेंही वीर मारिती बाण ॥ मागूनि मारिती त्रयो दश यवन ॥ विजय धनुर्विद्येंत निपुण ॥ लघव दाखवी ऐका तें ॥१५१॥पुढें पाहोनि करी संधान ॥ मागें न पाहतां सोडी बाण ॥ गजां सहित तेरा जण ॥ यवन वधून टाकिले ॥१५२॥न पाहतां मारिले सर्व ॥ पाहूनि धनुर्विद्येचें लाघव ॥ तर्जनी शिर वासव ॥ डोलवूनि धन्य म्हणे ॥१५३॥कर्णाचे पाठीशीं लवलाहें ॥ कौरव दडती पार्थ भयें ॥ दुःशासन ते वेळीं पाहें भीमावरी धांविन्नला ॥१५४॥पांच शत सोडूनि शर ॥ विकळ पाडिला वृकोदर ॥ सारथि आणि रहंवर ॥ चूर्ण केला दुःशासनें ॥१५५॥ह्रदय भीमाचें लक्षून ॥ आणीक सोडिले नऊ बाण ॥ मग वृकोदर साव धान ॥ होऊन शक्ति भिरकावी ॥१५६॥ते महा शक्ति दुःशासन ॥ क्षण न लागतां टाकी तोडून ॥ यावरी धर्मा नुज गहन ॥ कर्म करिता जाहला ॥१५७॥स्वदिरांगार धग धगित ॥ तैसे केले नयन आरक्त ॥ करकरां खाऊ नियां दांत ॥ काय बोलत तेधवां ॥१५८॥आजि सर्व वीरां देखतां जाण ॥ तुझें वक्षःस्थल फोडून ॥ करीन मी रक्तपान ॥ तरीच नंदन पंडूचा ॥१५९॥मग महा शक्ति ते वेळीं ॥ दुःशासनें वेगें प्रेरिली ॥ भीमें धरूनि अंतराळीं ॥ पिष्ट केली मोडूनियां ॥१६०॥दहा लोहतोमर जाण ॥ सवेंचि प्रेरी दुःशासन ॥ ते भीमाचे ह्रदयीं येऊन ॥ आदळती वज्रप्राय ॥१६१॥प्रलयीं क्षोभें कृतान्त ॥ तैसा भीम सेन धांवत ॥ कीं वीज पदे अकस्मात ॥ दुःशासन वरी तेवीं आला ॥१६२॥घोडे सारथी स्यंदन ॥ गदाघायें केले चूर्ण ॥ चरणचाली दुःशासन ॥ भिडत तेव्हां भीमाशीं ॥१६३॥अलातचक्रवत भ्रमोनी ॥ दुःशासनाचे मस्तकीं ते क्षणीं ॥ गदा घातली उचलोनी ॥ वज्र जैसें पर्वतीं ॥१६४॥कृतांताचे मनीं बैसे दचक ॥ तैसी भीमें दिधली हांक ॥ दोन्ही दळें मूर्च्छित देख ॥ हांकेसरशीं जाहलीं ॥१६५॥घोर मूर्च्छना येऊन ॥ भूमीवरी पडिला दुःशासन ॥ त्या चिया उरावरी गदा ठेवून ॥ उभा राहिला वृकोदर ॥१६६॥सावध व्हावा म्हणोन ॥ वारा घाली भीम सेन ॥ तंव तेणें उघडिले नयन ॥ भीमा कडे पाहा तसे ॥१६७॥मग त्याच्या उरावरी चरण ॥ देऊनि पुसे भीम सेन ॥ म्हणे द्रौप दीचें कच ग्रहण ॥ कोण्या हस्तें केलें तुवां ॥१६८॥ वीर गुंठी अवभृथस्नानीं ॥ बांधी स्वहस्तें पांचालनंदिनी ॥ ते तुवां हस्तीं धरोनी ॥ नेली सभेसी विटंबावया ॥१६९॥येरू म्हणे वामहस्तें करून ॥ केलें द्रौपदीचें कच ग्रहण ॥ मग भीमें तीच भुजा धरून ॥ मुळा पासून उपडिली ॥१७०॥तेचि भुजेनें वारंवार ॥ वक्षःस्थळीं ताडी तो दुराचार ॥ मग असिलता काढूनि सत्वर ॥ छेदी शिर तयाचें ॥१७१॥तेथूनि नि घालें उष्ण रक्त ॥ तें भीम सेन क्रोधें प्राशीत ॥ सर्वां गासी उटी लावीत ॥ दिसे आरक्त भया नक ॥१७२॥म्हणती हा केवळ कृतान्त ॥ मनुष्याचें रक्त प्राशीत ॥ उरलें दळ ग्रासील समस्त ॥ न उरे येथें कांहीं आतां ॥१७३॥जैसें यागांतीं सोमपान ॥ तैसें रक्त प्राशी भीम सेन ॥ दोन्ही दळें कंपाय मान ॥ भीम सेना देखतां ॥१७४॥भीमाचें भया नक वदन ॥ न शकती पाहूं विलोकून ॥ शस्त्रें हातींचीं सोडून ॥ वीर पळती दशदिशां ॥१७५॥हांक फोडिती वीर सकळ ॥ म्हणती पळ रे पळा आला काळ ॥ कीं हा राक्षस सबळ ॥ घट श्रोत्र दुसरा पैं ॥१७६॥दुःशासनाचा प्राण ॥ गेला न लागतां एक क्षणा ॥ तया प्रति भीम सेन ॥ पुनः बोलत सक्रोधें ॥१७७॥म्हणे गौर्गौः या वचना ॥ आठवीं आतां दुःशासन ॥ षंढतिल आम्हां पांचां जणां ॥ बोलिलासी आठवीं तें ॥१७८॥लाक्षा सदनीं लाविला अग्न ॥ कां रे विष घातलेंमज लागून ॥ घोषयात्रेचें मिष करून ॥ दरवडाघालूं आलां तुम्ही ॥१७९॥पद्मजात जन काची भगिनी ॥ तिचीं वस्त्रें फेडिलीं सभा स्थानीं ॥ वन वास अज्ञातवास करूनी ॥ आजितुज साधिलें पां ॥१८०॥हांक फोडूनि म्हणे भीम सेन ॥ हे पार्था हे पीतवसन ॥ आजि मी तृप्त जाहलों संपूर्ण ॥ प्रतिज्ञा सत्य जाहली ॥१८१॥आतां दुर्यो नाचें शिर ॥ पायें मर्दीन मी साचार ॥ जैसा मुखीं ताडिजे पादोदर ॥ सबळ पाषाण घेऊनी ॥१८२॥कीं उपानहघायें देख ॥ ताडिजे जैसा वृश्चिक ॥ तैसें सुयो धनाचें मस्तक ॥ चूर्ण करीन यावरी ॥१८३॥हकडे धृत राष्ट्राचा नंदन ॥ ज्याचें नाम चित्र सेन ॥ सात्य कीनें त्याचा प्राण ॥ तत्क्षणींच घेतला ॥१८४॥असो दुःशासनाचा घेतला प्राण ॥ स्यंदनारूढ जाहला भीमसेन ॥ घेऊनियां धनुष्यबाण ॥ ख्याति केली समरांगणीं ॥१८५॥आणीक दुर्यो धन बंधु दहा जण ॥ त्यांचीं शिरें छेदिलीं न लागतां क्षण ॥ कौरवदळीं आकांत दारूण ॥ हाहाकार प्रवर्तला ॥१८६॥कर्णा प्रति शल्य म्हणत ॥ पाहें कौरव भार पळत ॥ पहा भीमें केला पुरुषार्थ ॥ कैसा आकांत ओढवला ॥१८७॥समरीं सोडूनियां धीर ॥ पहा हे पळताती नृपवर ॥ हा दुर्यो धन भयातुर ॥ दिसतो कैसा अवलोकीं ॥१८८॥तुज वधूं पाहे तो पार्थ वीर ॥ कर्णा तूं धरीं बरवा धीर ॥ इकडे गदा खांदीं घेऊनि वृकोद ॥ रणरंगीं नाच तसे ॥१८९॥द्रौपदी भवानी यथार्थ ॥ दुःशासन हा मातला बस्त ॥ तिच्या उद्देशें मारूनि स्वस्थ ॥ मन केलें तियेचें ॥१९०॥गदा हाचि पोत पाजळून ॥ दुःशासनरक्त तैल घालून ॥ दिवटा जाहला भीम सेन ॥ गोंधळ घाली रणमंडपीं ॥१९१॥कर्ण पुत्र वृषे सन ॥ धांवला वेगें वर्षत बाण ॥ सहस्त्र बाणीं अर्जुन ॥ भेदिला तेणें तेधवां ॥१९२॥पार्थासी म्हणे तमालनीळ ॥ पहा युद्ध करितो कर्णाचा बाळ ॥ शरजाळीं पांडवदळ ॥ झांकिलें तेणें प्रतापें ॥१९३॥तो प्रतापी कर्ण नंदन ॥ श्रीकृष्णा वरी द्वादश बाण ॥ सप्त बाणीं भीम सेन ॥ भेदिला तेव्हां समरांगणीं ॥१९४॥नकुला वरी बाण दश ॥ सहदेवारी टाकिले वीस ॥ धन्य बाळयोद्धा राजस ॥ दोन्ही दळें मानवती ॥१९५॥असो पार्थें सोडूनि दिव्य शर ॥ छेदिलें कर्ण पुत्राचें शिर ॥ कौरव दळीं हाहाकार ॥ दुःख अपार न सांगवे ॥१९६॥ऐसें देखोनि कर्ण वीर ॥ कोपला जैसा प्रलय रुद्र ॥ पार्था वरी सोडीत शर ॥ चपले ऐसा धांवला ॥१९७॥रुक्मिणी ह्रदया ञमिलिंद ॥ म्हणे पार्था होईं सावध ॥ महाप्रलयीं पेटे जातवेद ॥ कर्ण तैसा दिसतसे ॥१९८॥पहा कर्णाच्या भयें करूनी ॥ पळे पांचाळ विराट वाहिनी ॥ कर्णा पुढें समरां गणीं ॥ काळ धीर धरीना ॥१९९॥तरी तूं महावीर रणपंडित ॥ तुझी विद्या जे कां अद्भुत ॥ ते सतेज आहे कीं समस्त ॥ इंद्रशिवद्त्त जे कां पैं ॥२००॥यावरी बोले सुभद्रा वर ॥ दारु कयंत्रीसूत्र धार ॥ त्याचे आधीन बाहुलीं समग्र ॥ यादवेंद्रा तैसा तूं ॥२०१॥कमला यतना कमललोचना ॥ कमलनाथा कमलशायना ॥ कमलप्रिया कमलवदना ॥ कर्ता कारण सर्व तूंचि ॥२०२॥त्रैलोक्य नगरांर भस्तंभा ॥ या विश्वाची तूचि शोभा ॥ मन्मथ जनका ॥ रुक्मिणी वल्लभा ॥ ब्रह्मा नंदा जग द्नुरो ॥२०३॥पांडवकैवारिया मधु सुदना ॥ तुझें राज्य तुझीं सेना ॥ परा जय जगन्मोहना ॥ तुझी रचना सांभाळीं तूं ॥२०४॥मी एक योद्धा रणपंडित ॥ ऐसें जेव्हां धरीन मनांत ॥ तेव्हां तूं आम्हांसी कैंचा प्राप्त ॥ श्रीराब्धिजा ह्रदय विलासा ॥२०५॥वैसंपायन म्हणे जन मेजया ॥ फाल्गुनें ऐसें बोलू नियां ॥ गांडी वचाप ओढो नियां ॥ टणत्कारिलें समरांगणीं ॥२०६॥ये प्रसंगीं कर्णासी मुक्ती ॥ कृष्णा र्जुनांसी जय प्राप्ती ॥ तें सादर परिसावें श्रोतीं ॥ सावधान होऊ नियां ॥२०७॥ब्रह्मा नंदा जग दुद्धारा ॥ श्रीपांडुरंग नगर विहारा ॥ पांडवपालका श्रीधरवरा ॥ अत्युदारा जग द्नुरो ॥२०८॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्ण पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अठ्ठेचाळिसाव्यांत कथियेला ॥२०९॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापेकर्णपर्वणिदुःशासनवधोनाम अष्टचत्वारिंशाध्यायः ॥४८॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP