मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ११ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ११ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ११ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ स्कंधीं वाहूनि वसुदेव भगिनी ॥ कडिये जावळे बंधु घेऊनी ॥ धर्मार्जुनांते क्षणीं ॥ मार्ग दावीत जातसे ॥१॥निबिड वृक्ष वनीं लागले ॥ कीं भूमीवरी आलीं मेघमंडलें ॥ तीं भीम भेदीत चाले बळें ॥ महासमर्थ म्हणोनि ॥२॥माजी न दिसती सूर्य किरण ॥ भयंकर विचरती श्वापद गण ॥ सरिता माळ ओलांडून ॥ महापर्वतीं जातसे ॥३॥विसांवा नाहीं क्षणैक ॥ न सेवितां फल मूल उदक ॥ सप्तप्रहर पर्यंत देख ॥ मार्ग अपार चालती ॥४॥एक याम उरली यामिनी ॥ तों तृषाक्रांत जाहली जननी ॥ म्हणे भीमा उदक आणीं ये क्षणीं ॥ विसांवा घेईं एकदां ॥५॥तों न्यग्रोध वृक्ष तेथें देखा ॥ भूमी पर्यंत लवल्या शाखा ॥ विशाल पारंबिया सुरेखा ॥ गगचुंबित दिसती पैं ॥६॥पक्वफले विखुरलीं धरणीं ॥ जैसे पसरले प्रवालमणी ॥ पक्षी करिती नाना ध्वनी ॥ वटीं जे कां राहती त्या ॥७॥तेथें माता बंधु निजवूनी ॥ उद्क शोधूं गेला काननीं ॥ वनकर्दलीचा द्रोण करूनी ॥ तडागजीवनीं भरियेला ॥८॥जवळी कैंचें पंचपात्र ॥ भिजवूनि घेतलें उत्तरी यवस्त्र ॥ परतोनि आला सत्वर ॥ तंव तीं भूतळीं लोळती ॥९॥तें देखोनि भीम सेन ॥ शोक समुद्रीं गेला बुडोन ॥ म्हणे रे चतुरानन ॥ काय संसारीं घातलें ॥१०॥त्रैलोक्यानाथ चक्रपाणी ॥ त्या चिया जन काची भगिनी ॥ महाराज पंडुराजाची पत्नी ॥ स्त्रुषा विचित्रवीर्याची ॥११॥आम्हां दरिद्यांची जननी ॥ प्रेतवत पडली धरणीं ॥ अजात शत्रु पुण्यखाणी ॥ धर्मराज धर्मात्मा ॥१२॥अनाथ भणंग दीन ॥ तैसें भूमीवरी केलें शयन ॥ शोधितां ब्राह्मांड संपूर्ण ॥ उपमा ज्यासी दुजी नसे ॥१३॥विद्या सागर अर्जुन ॥ उपमे भार्गव कीं जान की जीवन ॥ अहा कर्मा दीन वदन ॥ सव्यसाची पडिलासे ॥१४॥दिव्यरूप पाहून ॥ सुरललना जाती भुलोन ॥ ज्यांचें चातुर्य देखोन ॥ सरस्वती तटस्थ पैं ॥१५॥ते हे नकुल सहदेव निश्चित ॥ जैसे कौस्तुभ आणि स्यमंत ॥ अहा ते धुळींत ॥ भीम करीत शोक ऐसा ॥१६॥ऐसा भीम खेद करीत ॥ तों हिडिंबी राक्षसी आली तेथ ॥ साही जणां देखोनि बोलत ॥ वृक्षीं बैसूनि हिडिंब ॥१७॥हिं साही जणें मारूनी ॥ शीघ्र भक्षा वया आणीं ॥ हिडिंबी धांवली ते क्षणीं ॥ तों भीम सेन देखिला ॥१८॥देखूनि स्वरूप सुंदर ॥ मदनें व्यापिलें तिचें शरीर ॥ म्हणे याचे पाडॆं रतिवर ॥ तुलनीं उणा वाटतसे ॥१९॥यासी भ्रतार करीन ॥ चिरकाल सुख भोगीन ॥ व्यर्य काय कायेसी मारून ॥ मांस भक्षण न करीं मीं ॥२०॥ऐसा विचार करून ॥ राक्ष सीरूप पालटून ॥ रंभेऐसी जाहली कामिन ॥ मधुर वचन बोलतसे ॥२१॥तुम्ही कोण कोठील सुकुमार ॥ दिसतां सभाग्य राजकुमार ॥ नगर त्यागूनि वन घोर ॥ काय निमित्तें सेविलें ॥२२॥परम दुर्घट हिडिंब वन ॥ देवांसी येथें न घडे आगमन ॥ येथें तुम्ही मनुष्यें होऊन ॥ निर्भय निःशंक पहुडलां ॥२३॥हिडिंबराक्षस महादारूण ॥ तुम्हांसी भक्षील न लगतां क्षण ॥ तुज मी स्वबळें वांचवीन ॥ भ्रतार होईं माझा तूं ॥२४॥तुज मी पृष्ठीं वाहुन ॥ द्वीपांतरा सुखें नेईन ॥ या पांचांसी भक्षून ॥ हिडिंव तृप्त होईल कीं ॥२५॥मी राक्ष साची बहीण ॥ परी निष्कपट तुज शरण ॥ या पांचांची आस्था सोडून ॥ वरीं मज सुंदर ॥२६॥यावरी बोले भीम सेन ॥ हिंडिंवासी क्षणें मारीन ॥ जैसा रगडिजे मत्कुण ॥ तेवीं मर्दीन क्षणार्धें ॥२७॥सांडूनि बंधु जननी ॥ तुज वरूं काय राक्षसिणी ॥ कोटयावधि राक्षस अर्धक्षणीं ॥ हिडिंबा ऐसे मारीन ॥२८॥ऐसीं उभयतांचीं वचनें ते काळीं ॥ वृक्षा वरूनि हिडिंबें ऐकिलीं ॥ दांत खाऊनि ते वेळीं ॥ हांक फोडिली कृतांत वत ॥२९॥मग उडी घातली सत्वर ॥ खदिरांगारवत केले नेत्र ॥ विक्राळ वदन विशाळ शरीर ॥ भाळीं सिंदूर चर्चिला ॥३०॥कज्जलपर्वता ऐसा थोर ॥ बाहेर दाढा विक्राळ शुभ्र ॥ ऐसा धांवतां तो असुर ॥ हिडिंबी म्हणे भीमातें ॥३१॥उठवीं बंधु आणि जननी ॥ गगना जेईन स्कंधीं वाहुनी ॥ भीम म्हणे पहुडलीं श्रमोनी ॥ न उठवींच सर्वथा ॥३२॥यांची निद्रा न मोडतां जाण हिडिंब मारूनि करीन चूर्ण ॥ तों राक्षस क्रोधायामान ॥ भगिनी प्रति बोलत ॥३३॥दैवें आहार दिधला पाठवून ॥ त्या तूं पापिणी केलें विघ्न ॥ तूं केवळ आहेसी जारीण ॥ कैंचा भ्रतार मेळविला ॥३४॥आतां साही जणें मारून ॥ शेवटीं तुझा घेईन प्राण ॥ वृक्ष विशाल उपटून ॥ भीमावरी धांविन्नला ॥३५॥बळें वृक्ष भोवंडून ॥ भीमावरी घाली उचलून ॥ तेणें प्रचंड घेऊनि पाषाण ॥ ह्रदया वरी ताडिला ॥३६॥राक्षस खवळला अद्भुत ॥ भीमाचे कंठीं मिठी घालीत ॥ मग मल्लयुद्ध अत्यद्भुत ॥ घटिका एक जाहलें ॥३७॥मुष्ठिप्रहार हाणिती ॥ तेणें दणाणत भयें क्षिती ॥ लत्ता प्रहारें ताडिती ॥ थडका देती परस्परें ॥३८॥राक्षस धांवे मुख पसरून ॥ म्हणे कंठ फोडीन रोंवूनि दशन ॥ भीमें हाणोनि चडकण ॥ दंतपंक्ति पाडिल्या ॥३९॥हिडिंबासी भीम म्हणत ॥ चांडाला शब्द न करीं बहुत ॥ मम माता बंधु समस्त ॥ श्रमें निद्रित जाहलीं ॥४०॥दोघे भिडले अतुलबळी ॥ परी भीमाची शक्ति आगळी ॥ हुमणिया हाणितां वक्षःस्थलीं ॥ शब्द करी राक्षस ॥४१॥दणदणाट ऐकतां कानें ॥ जागीं जाहलीं पांचही जणें ॥ सिंहनाद करितां तेणें ॥ गेले प्राणें पशुपक्षी ॥४२॥झगडती दोघे ऐरावत ॥ कीं पडती पर्वतावरी पर्वत ॥ तों चापासी बाण लावूनि पार्थ ॥ असुरावरी धांविन्नला ॥४३॥नकुल सहदेव घेऊनि खङ्गें ॥ राक्ष सावरी चालिले वेगें ॥ हिडिंब चहूंकडे रागें ॥ पर्वत पाषाण भिरकावी ॥४४॥भीम बंधूंसी वारीत ॥ तुम्हीं असावें स्वस्थचित्ता ॥ धर्मापाशीं बैसूनि कौतुकार्थ ॥ पहा आतां क्षणभरी ॥४५॥बंधु थोपवूनि क्षणभरी ॥ भीम असुराचे चरण धरी ॥ मग उचलू नियां अंबरीं ॥ भूमीवरी आपटिला ॥४६॥सवेंचि हस्त चरण गोंवून ॥ मोट केली गळा बांधून ॥ बळें आकाशीं नेऊन ॥ शिळेवरी आपटिला ॥४७॥भरला मृद्धट पडतां निश्चिती ॥ बहुत तुकडे जैसे होती ॥ तैसा हिडिंब पडतां क्षितीं ॥ गतप्राण जाहला ॥४८॥जय जय कार करून ॥ सुमनें सुरगण ॥ कुंती माता भीमार्जुन ॥ नकुल सहदेव आनंदती ॥४९॥मातेसी नमस्कारी भीम ॥ बंधु आनंदें देती क्षेम ॥ तों हिडिंबी पुढें सकाम ॥ उतावळी वरावया ॥५०॥भीम म्हणे तूं असुरी ॥ मी कदाही तुज न वरीं ॥ बंधूचें वैर अंतरीं ॥ स्मरूनि करशील घात तूं ॥५१॥कुंतीचे चरणीं माया ठेवून ॥ हिडिंबी बोले निश्चय वचन ॥ मी राक्षसी म्हणून ॥ उपेक्षा माझी करूं नका ॥५२॥साही जणांसी पृष्ठीं वाहून ॥ नेईन दुस्तरवनें ओलांडून ॥ महाविघ्नें निवटून ॥ सुख देईन समस्तां ॥५३॥माझे पोटीं होईल सुत ॥ तो शत्रु संहारील समस्त ॥ साक्ष ठेवूनि रुक्मिणीकांत ॥ प्राण रक्षील अर्जुनाचा ॥५४॥आजि आपुले हस्तें करून ॥ माझें भीमाशीं लावीं लग्न ॥ कुंती म्हणे धर्मा लागून ॥ विचार मानसीं आणिंजे ॥५५॥कापटय किंवा शुद्ध मन ॥ हें धर्मरायें जाणून ॥ पुढील भविष्यार्थ संपूर्ण ॥ विदित केला सर्वांतें ॥५६॥भीमासी म्हणे सर्वज्ञ ॥ इजपासूनि अपाय नव्हे पूर्ण ॥ अवश्य लावीं इशीं लग्न ॥ मनांत आन न धरावें ॥५७॥धर्म म्हणे हिडिंबे पाहीं ॥ तूं दिवसा सुखें भीम नेईं ॥ रात्र होतांचि आणूनि देईं ॥ रक्षा वया आम्हांतें ॥५८॥तों भीम बोले उत्तर ॥ एक जाह लिया तुज कुमार ॥ मग संबंध साचार ॥ पुनः तुजशीं घडेना ॥५९॥येरी अवश्य म्हणोनि तत्काळ ॥ भीमाचे गळां घाली माळ ॥ भीमासी पृष्ठीं घेऊनि सबळ ॥ क्रीडावना प्रति गेली ॥६०॥पर्वत मौलीं गंगा जलीं ॥ रमणिकोद्यानीं एकात्न स्थलीं ॥ सुखें सदा सुरतमेळीं ॥ भीमाशीं क्रीडा करीतसे ॥६१॥मानससरोवरीं मैनाक पाठारीं ॥ हिमाचलीं सोमकांतकासारीं ॥ द्रोणाचलीं चंद्राचलीं झडकरी ॥ नेऊनि सुखें क्रीडत ॥६२॥षड्र्सान्न भोजन ॥ नानापरी रस कामवर्धन ॥ अमृता समान फळें भक्षून ॥ मग सुखशयनीं पहुडती ॥६३॥लोटतां एक संवत्सर ॥ जन्मला घटोत्कच कुमार ॥ पितया तुल्य सबळ शरीर ॥ महावीर भीम तो ॥६४॥उपजतांचि शस्त्रास्त्री प्रवीण ॥ भेटला धर्मासी येऊन ॥ कुंती पितृजननी धर्मार्जुन ॥ नकुल सहदेव वंदिले ॥६५॥म्हणे संकट पडतां पूर्ण ॥ माझें तुम्हीं करितां स्मरण ॥ राक्षसदळ असंख्य घेऊन ॥ शत्रु निवटीन संग्रामीं ॥६६॥हिडिंबी सर्वांतें प्रार्थींत ॥ संकटीं येईन पुत्रा सहित ॥ क्षोभलिया तुम्हां वरी कृतान्त ॥ पायें लोटीन माघारा ॥६७॥ऐसें बोलोनि घेतली आज्ञा ॥ नमस्कारूनि साही जणां ॥ पुत्रा सहित महावना ॥ उत्तरपंथें ती गेली ॥६८॥कर्ण प्रेरील शक्रशक्ती ॥ अर्जुनासी रक्षा वया अमरपती ॥ भैमी जन्म विला निश्चिती ॥ भविष्यार्थ जाणू नियां ॥६९॥धर्म म्हणे आतां येथूनी ॥ निघावें हें वन त्यागूनी ॥ भीम कुंती स्कंधीं घेऊनी ॥ निघता जाहला तत्काळ ॥७०॥जटा वल्कल वेष्टित ॥ अजिनां बरें पांघरत ॥ नाना वनें विलोकीत ॥ दर्शनें घेत संतांचीं ॥७१॥ऋष्या श्रमीं राहती ॥ वेदशास्त्रें अभ्यासिती ॥ चौसष्टकला प्रवीण होती ॥ आकळिती चौदा विद्या ॥७२॥रात्रं दिवस कृष्ण स्मरण ॥ सदा करिती कृष्ण कीर्तन ॥ रुक्मिणी वल्ल भाचें पूजन ॥ येणें करून काल क्रमिती ॥७३॥पुढें जाती वेगें करून ॥ तों अकस्मात कृष्णद्वैपायन ॥ त्या दयासिंधूचें दर्शन ॥ महद्भाग्यें जाहलें ॥७४॥साही जणें नमस्कार ॥ साष्टांग घालूनि जोडिती कर ॥ जय जय सद्नुरो जगदुद्धार ॥ करा वया जन्म लासी ॥७५॥एकानन तूं सत्यलोकेश ॥ द्विभुज परी रमा विलास ॥ अभाललोचन व्योमकेश ॥ आम्हां दीनां रक्षिसी ॥७६॥मग बोले वेदव्यास ॥ यावत् शत्रु पावती नाश ॥ कल्याण आहे तुम्हांस भाग्य विशेष प्रकटेल पैं ॥७७॥विजय श्री घालील माळ ॥ पाठ राखील श्री घननीळ ॥ ऐसें बोलूनि तत्काळ ॥ व्यास गुप्त जाहले ॥७८॥एक चक्रनामें नगरीं ॥ सही जणें ते अवसरीं ॥ एका ब्राह्मणाचे घरीं ॥ गुप्त रूपें राह्ती ॥७९॥बोलणें कोमल निनयता ॥ स्त्रेहें करूनि केली आप्तता ॥ सत्य प्रिय भाषण नम्रता ॥ तया वश्य सर्व प्राणी ॥८०॥सहनशील आणि अत्य ॥ तेणें विश्व जिंकिलें समस्त ॥ एंव पांडव सर्व गुण भरित ॥ म्हणूनि वंद्य विश्वातें ॥८१॥जया सर्वा भूतीम दया समान ॥ देवही वंदिती त्याचे चरण ॥ वृत्ति जाहली निरभिमान ॥ तरी तो मान्य हरिहरां ॥८२॥पांचही भिक्षा करूनी ॥ कुंतीपाशीं देती आणूनी ॥ त्यांत ती अर्ध ओपी भीमा लागूनी ॥ आहार फार म्हणो नियां ॥८३॥उरल्यांत आपण आणि चौघे सुत ॥ क्षुधानल करिती शांत ॥ तों ब्राह्मन गृहीं अकस्मात ॥ शोकध्वनि ऐकिला ॥८४॥गृह स्वामी भार्या कन्या सुत ॥ एकाच्या गळां पडत ॥ दीर्घस्वरें रोदन करिती अद्भुत ॥ तों कुंती पुसत तयांसी ॥८५॥तुमचें दूःख असेल जें दारूण ॥ तें क्षणांत टाकीन परिहारून ॥ तुमचे गृःईं बैसलों बहुत दिन ॥ होऊ उत्तीर्ण उपकार ॥८६॥गृहस्थ शोकें व्या कुल पूर्ण ॥ म्हणे मी बकारण्या जाईन ॥ कन्या आणि पुत्र संतान ॥ करीं पालन तयांचें ॥८७॥स्त्री म्हणे मीचि जाईन ॥ कन्या म्हणे मी देह समर्पीन ॥ तों कुमार बोले वचन ॥ देईन पूर्ण देह माझा ॥८८॥कळवळलें कुंतीचें मन ॥ मग म्हणे त्या गृहस्था लागून ॥ तुम्हां काय संकट सांगा पूर्ण ॥ तें परिहारीन क्षणार्धें ॥८९॥द्विज म्हणे पृथेलागून ॥ आमुचें संकट परम दारूण ॥ जें प्रत्यक्ष हरिहरांचेन ॥ न टळे माये आलें तें ॥९०॥नगरा बाहेरी दों कोसां आंत ॥ बक राक्षस आहे वसत ॥ त्यासी नगरलोकीं समस्त ॥ भक्ष भाग नेमिला ॥९१॥एक रथभरी दिव्यान्न ॥ वरी एक पुरूष बैसवून ॥ महिषमहिषी लावून ॥ रथालागीं चाल विती ॥९२॥साठ खंडयांचें अन्न नित्य ॥ दहा खंडया वरी पिशित ॥ शतांचीं शतें अजा बस्त ॥ पुरुष एक त्यावरी ॥९३॥ज्या दिवशीं चुकेल हा नेम ॥ तेव्हां तो भक्षील सर्व ग्राम ॥ आमुचे घरीं पाळी दुर्गम ॥ आली प्राण घ्यावया ॥९४॥गृहा प्रमणो आली पाळी ॥ ती न चुके कदाकाळीं ॥ कुमारासी बालदशा कोंवळी ॥ कैसा देऊं तयातें ॥९५॥जरी आतां मीच जाईन ॥ तरी तिघेंही मरतील अन्ना विण ॥ स्त्रेह भरित माउली तूं पूर्ण ॥ सांगें कैसें करूं आतां ॥९६॥कुंती म्हणे खेद टाकीं समस्त ॥ माझा द्वितीय सुत बलाद्भुत ॥ त्यासी देतेंमी यथार्थ ॥ मारील सत्य बकातें ॥९७॥सर्वारिष्टांची करूनि शांती ॥ विजय रूप येईल मागुती ॥ ब्राह्मणासी भरंवसा चित्तीं ॥ सससाही न वाटे ॥९८॥कुंती सांगे एकांतीं नेऊन ॥ बका सुरा हूनि बल गहन ॥ सहस्त्र राक्षस मर्दून ॥ पुत्र माझा येईल कीं ॥९९॥लोकांत प्रकट न करीं मात ॥ विप्र कुंतीचे चरण धरीत ॥ तों भिक्षा करूनि अकस्मात ॥ पांचही आले गृहातें ॥१००॥बाह्मण म्हणे मनांत ॥ हे साच केवीं मानूं मात ॥ परी न कळे नवखंड मही समस्त ॥ होईल साह्य दिसतें पैं ॥१०१॥तों कुंती सांगे गुप्त रहस्य ॥ भीम म्हणे जातों अवश्य ॥ धर्म् वदे पुण्य विशेष ॥ परोपकार करावा ॥१०२॥असो अन्नें भरिला रथ ॥ सामुग्री घेऊनि त्वरित ॥ भीम त्यावरी बैसत ॥ हर्षयुक्त निर्भय पैं ॥१०३॥लोक आश्चर्य करीत ॥ हा निर्भय बैसला आनंद भरित ॥ भीम आपुले हस्तें रथ पिटीत ॥ गेला तेव्हां बकारण्या ॥१०४॥रथ सोडिला बकारण्यांत ॥ महिष अजा बस्त ॥ ग्रामपंथें पिटिलीं समस्त ॥ आलीं पळत नगरासी ॥१०५॥मनीं काळासी बैसे दचक ॥ ऐशी भीमें फोडिली हांक ॥ म्हणे कोण आहे बक ॥ दावीं मुख काळें तुझें ॥१०६॥हें अन्न प्राप्त नाहीं तुज प्रती ॥ तुझे मुखांत पडली माती ॥ ग्रासही न लाभे निश्चितीं ॥ पावसी हातें मृत्यु माझ्या ॥१०७॥पहिलेंचि जाहलें संध्यास्त्रान ॥ भीम जेवूं लागला अन्न ॥ परम स्वादिष्ट रुचि घेऊन ॥ उप़चारेंसी सेवीतसे ॥१०८॥ऐकतां भीमाची थोर हांक ॥ क्रोधें धांवे असुर बक ॥ तों अन्न भक्षितो निःशंक ॥ मागें पुढें न पाहे ॥१०९॥म्हणे महिष पशु दवडून ॥ माझें भक्षितोसी सर्व अन्न ॥ आतां मी तुजला ग्रासीन ॥ शिर छेदीन क्षणार्धें ॥११०॥म्हणे तूं आहेसी कोण ॥ प्रत्युत्तर नेदी भीम सेन ॥ उगाचि जेवी धरिलें मौन ॥ परतोन पाहेना त्याकडे ॥१११॥जैसे निंदक निंदिती अपार ॥ परी न चळे साधूंचें अंतर ॥ तैसा बडबडे बका सुर ॥ परी वृकोदर न गणी तें ॥११२॥बकशरीर पर्वताकार ॥ विक्राळ तोंड भाळीं शेंदूर ॥ हांक देऊनि परम क्रूर ॥ दांत खाऊनि धांवला ॥११३॥वज्रमुष्टि नेटें वळोन ॥ पृष्ठीवरी ताडिला भीम सेन ॥ जैसा पंचानना प्रति धांवून ॥ ताडी कुंजर शुंडेनें ॥११४॥चूर होती महापर्वत ॥ ऐसे मारी मुष्टिघात ॥ रुचि घेऊनि जेवीत ॥ भीम सेन अन्नातें ॥११५॥विशाल वृक्ष बळें घेतला ॥ पृष्ठीवरी भीमाचे मोडिला ॥ परी न बोलेचि उगला ॥ ग्रास घेतां न राहे ॥११६॥मग घेऊनि चंड पाषाण ॥ बहुत घाली उचलून ॥ कोंपरखिळ्या गुडघे जाण ॥ मारितांही हालेना ॥११७॥माझें भक्षिसी अवघें अन्न ॥ चांडाळा तूं आहेसी कोण ॥ शंख केलिया भीम सेन ॥ सहसाही न बोले ॥११८॥मग भीमाचे दोन्ही हस्त ॥ बक धरावया धांवत ॥ येरें पसरू नियां कर अद्भुत ॥ दोन्ही कर धरी त्याचे ॥११९॥सव्यहस्तें जेवीत ॥ उरों नेदी अन्न किंचित ॥ म्हणे भोक्ता रुक्मिणी कांत ॥ ऐसें स्मरत वारंवार ॥१२०॥भोजन जाहलें संपूर्ण ॥ मग उभा ठाकला भीम सेन ॥ म्हणे तुझें सामर्थ्य गहन ॥ दावीं कैसें राक्षसा ॥१२१॥नागरिक भक्षिक त्वां बहुत ॥ त्याचें उसणें घेईन येथ ॥ राक्षसें थडक अद्भुत ॥ दिधली तेव्हां भीम सेना ॥१२२॥म्हणे माझें अन्न भक्षिलें बहु ॥ यावरी मी काय मृत्तिका खाऊं ॥ राक्षस पसरूनि बाहू ॥ भीमासी कवळूं पाहात ॥१२३॥भीमें लाथ हाणूनि जाणा ॥ बक पाडिला उताणा ॥ मग पाषाण घेऊनि त्या क्षणा ॥ असंख्य टाकी राक्षस ॥१२४॥सहस्त्र वृक्ष उपडिले ॥ राक्षसें भीमावरी टाकिले ॥ परी जैसे ऐरावतें न गणिले ॥ पुष्पभार टाकितां ॥१२५॥मग वामहस्तें केश धरूनी ॥ कटिप्रदेशीं सव्य हस्त देऊनी ॥ माज मोडितां ते क्षणीं ॥ हांका मारी बका सुर ॥१२६॥विनायकें खंडिला दंदशूक ॥ कीं गज मोडी इक्षुदंड देख ॥ तैसा द्विखंड केला बक ॥ प्राण गेला निघो नियां ॥१२७॥अस्थिजाल जाहलें चूर्ण ॥ बाहेरी पडलें उभय नयन ॥ बक सेना प्राणदान ॥ भीमापाशीं मागे तेधवां ॥१२८॥भीम म्हणे मनुष्यें भक्षितां ॥ बका ऐसे मारीन तत्त्वतां ॥ तों ते म्हणती यावरी आतां ॥ सर्वथाही न भक्षूं ॥१२९॥करूनि क्रिया प्रमाण ॥ व्रत धरिती भयें करून ॥ मनुष्यांची मैत्री साधून ॥ नगरांत हिंडूं लागले ॥१३०॥बका सुराचे नवद्वारीं ॥ रक्त वाहत पृथ्वीवरी ॥ प्रेत ओढूनि एकच क्रनगरीं ॥ महाद्वारीं टाकिलें ॥१३१॥भीमें करपाद प्रक्षालून ॥ त्रिपदेचा जप करून ॥ येरूनि वंदी मातृचरण ॥ बंधुवर्गा भेटला ॥१३२॥घरच्या गृह स्थासी सांगत ॥ कोठें स्वामी प्रकटों नेदीं मात ॥ तों जाहला प्रभात ॥ नारी नर ऊठती ॥१३३॥नगरद्वारीं पडिलें प्रेत ॥ लोक धांवती असंख्यात ॥ समस्त जाहले आनंद भरित ॥ म्हणती अद्भुत वर्तलें ॥१३४॥कोणें मारिला निशाचर ॥ बोले एकचक्रींचा नृपवर ॥ ज्याची पाळी त्यासी विचार ॥ कैसा जाहला पुसावा ॥१३५॥बोलावूनि पुसती ब्राह्मणा ॥ येरू म्हणे मी घेऊनि जातां अन्ना ॥ तों एक तपस्वी बलाढय जाणा ॥ अवचित तेथें प्रकटला ॥१३६॥तेणें प्रोक्षूनि उदक ॥ क्षणमात्रें मारिला बक ॥ सवेंचि गुप्त जाहला देख ॥ मज देखतां राया तो ॥१३७॥तुम्हीं सुखी नांदावें सर्वत्रीं ॥ राक्षस मारूनियां रात्रीं ॥ प्रेत टाकिलें नगर द्वारीं ॥ काळा वया तुम्हांतें ॥१३८॥राजा म्हणे तो अत्यद्भुत ॥ न कळे ईश्वराचें कर्तृत्व ॥ असो बाह्मणासी राव पूजीव ॥ विप्र विजयी म्हणो नियां ॥१३९॥द्विज परतोनि सदना जात ॥ हर्षयुक्त जाहला बहुत ॥ मग वैशंपायन म्हणत ॥ परमाद्भुत चरित्र हें ॥१४०॥ऐकतां वाचितां बकाख्यान ॥ कुलीं राक्षसपीडा न होय पुर्ण ॥ भूत पिशाच जाण ॥ सर्व थाही न बाधती ॥१४१॥पुढें कथा ऐका गहन ॥ कोणी एक आला ब्राह्मण ॥ कुंतीसी रहावया लागून ॥ ठाव मागे वस्तीसी ॥१४२॥मग धर्मराजें सन्मानून ॥ राहविला तो ब्राह्मण ॥ निशीमाजीं चरण ॥ चुरीत पार्थ तयाचे ॥१४३॥विप्रासी पुसे अर्जुन ॥ इकदे कोठवरी आहे गमन ॥ तो म्हणे पृषद पुत्र द्रुपद जाण ॥ अहिक्षेत्रीं राज्य करी ॥१४४॥द्रुपदरा जयाची कुमारी ॥ याज्ञ सेनी परम सुंदरी ॥ जन्मली अग्नी माझारीं ॥ अयो निजा सुलक्षणा ॥१४५॥कुमार आणि कुमारी ॥ प्रकटलीं होमा माझारीं ॥ धर्म म्हणे ते अवसरीं ॥ समूळ कथा सांगा हे ॥१४६॥विप्र म्हणे ऐका सादर ॥ द्रोणे गांजिला द्रुपदवीर ॥ पांडवीं हरिलें राज्य समग्र ॥ त्याचि दुःखें आरं बळला ॥१४७॥राज्य सांडूनि लज्जित ॥ वन्नांत हिंडतां नृपनाथ ॥ गंगा तीरीं अकस्मात ॥ ऋषि मंडळी देखिली ॥१४८॥त्याही माजी श्रेष्ठ द्विज ॥ दोघे बंधु याज उपयाज ॥ ज्यांचें अगाध तप स्तेज ॥ महाराज तपस्वी ॥१४९॥ब्रह्मांड जाळील ज्यांचा विषाद ॥ कृपालुत्वें देती सुरे शपद ॥ ऋद्धि सिद्धि अगाध ॥ दासी तिष्ठती जवळी पैं ॥१५०॥वडील याज वसे वनांत ॥ उपयाज आश्रमीं राहात ॥ त्यासी द्रुपद लोटां गण घालीत ॥ बद्ध हस्तें उभा पुढें ॥१५१॥उपयाच म्हणे पृषद नंदना ॥ काय सांग तुझी वासना ॥ म्हणे समरीं संहारील द्रोणा ॥ ऐसा पुत्र देईं मज ॥१५२॥इंदिरा किंवा गौरी ॥ जिच्या उपमेसी न तुले निर्धारीं ॥ ऐसीं देईं एक कुमारी ॥ पार्थासी अंतुरी होईल ते ॥१५३॥पूर्ण होतां ऐशी वासना ॥ अर्बुद संख्य देईन धना ॥ यावरी आवडेल जें मना ॥ ते वासना पुरवीन तुझी ॥१५४॥एक वर्ष पर्यंत ॥ सेवा करी द्रुपद अत्यंत ॥ याज उपयाज प्रसन्न होत ॥ म्हणती इच्छित दीधलें ॥१५५॥सर्व सामुग्री घेऊनी ॥ वना आली द्रुपदपत्नी ॥ हवन द्रव्य ते क्षणीं ॥ उपयाजें मंत्र विलें ॥१५६॥याज ऋषि करीत हवन ॥ पूर्णाहुति होतां जाण ॥ कुमार निघाला धृष्टद्युम्र ॥ हेमकवच मंडित ॥१५७॥किरीट कुंटलां सहित ॥ जैसा उगवला बाला दित्य ॥ दिव्य खङ्गें हस्त मंडित ॥ रथा सहित निघाला ॥१५८॥तों वेदीमधूनि ते अवसरीं ॥ निघाली अकस्मात कुमारी ॥ पुरंदरव निता न पावे सरी ॥ प्रत्यक्ष निर्धारीं अपर्णा ते ॥१५९॥ते नीलोत्पल दल वर्णी ॥ ओतिली इंद्र्नील गाळूनी ॥ अंगाचा सुवास धांवे वनीं ॥ क्रोश एक निर्धारें ॥१६०॥दिव्य हिरे झळकती ॥ तैशा लख लखती दंतपंक्ती ॥ सुवा साकारणें धांवती ॥ मिलिंदचक्रें त्या ठाया ॥१६१॥ऐसी प्रकटतां याज्ञा सेनी ॥ गर्जली तेथें आकाश वाणी ॥ सकल स्त्रियांची स्वामिणी ॥ मनुष्य लोकीं अवतरली ॥१६२॥इच्या योगें क्षत्रियांसी अंत ॥ हे भूभार उतरील समस्त ॥ साह्य हीस श्री भग वंत ॥ प्रज्ञा वंत पुरुष इचे ॥१६३॥पुत्र जाहला जो तुज लागूनी ॥ तो द्रोणासी मारील समरां गणीं ॥ ऐसें ऐकतां द्रुपदाचे मनीं ॥ परमानंद जाहला ॥१६४॥बोलिल्या हूनि चतुर्गुणीं ॥ याज उपयाच गौर विले दोन्ही ॥ कुमार कुमारी सवें घेऊनी ॥ राजा आला स्वनगरा ॥१६५॥उपवर जाहली पांचाली ॥ द्रुपद सचिंत ह्रदय कमलीं ॥ मग अर्जुनासी द्यावी ते बाळी ॥ नेम केला राजेंदें ॥१६६॥पांडव जोहरांत दग्ध जाहले ॥ द्रुपदें जेव्हां कर्णीं ऐकिलें ॥ शोक समुद्रीं पेणें केलें ॥ श्वोसोच्छ्वास टाकोनि ॥१६७॥पांचाली देखोनि सुंदर ॥ मागों येती बहुत नृपवर ॥ परी अर्जुनावीण वर ॥ मना न ये नृपाच्या ॥१६८॥पुरोहित सांगती मात ॥ पांडव वांचले जोहरांत ॥ ऐसें ऋषि बोलती ध्वनित ॥ सत्य मिथ्या नेणवे ॥१६९॥संशयीं पडला नृपनाथ ॥ मग विचार करी मनांत ॥ घोषें मही गाजवूं समस्त ॥ स्वयंवर आहे म्हणोन नियां ॥१७०॥जरी पांडव असती निर्धारीं ॥ तरी प्रकटतील स्वयंवरीं ॥ पार्थासी हे नोवरी ॥ द्यावी हा कृतनिश्चय ॥१७१॥श्रृंगारिलें पांचाल नगर ॥ अमरावती हूनि सुंदर ॥ मिळाले पृथ्वीचे नृपवर ॥ सकल ऋषीश्वर चालिले ॥१७२॥छप्पन्नकोटी यादवां सहित ॥ आला तेथें रुक्मिणीकांत ॥ कौरव पातले समस्त ॥ दुर्यो दन कर्णा सहित पैं ॥१७३॥पांडव आहेत कीं मृत्यु पावले ॥ हें ईश्वरी कर्तृत्व न कळे ॥ द्रुपदाचें चित्त व्या कुळ जाहलें ॥ तयां कारणें तत्त्वतां ॥१७४॥द्रौपदीचे पाटीं कोण वैसेल ॥ कोणा सभाग्यासी माळ घालील ॥ तो महोत्साह पहा वया उतावीळ ॥ मी जातसें त्वरेनें ॥१७५॥राजा वांटील बहुत धन ॥ दरिद्र माझें होईल विच्छिन्न ॥ तुम्ही पांचही बंधु सहस्त्र किरण ॥ केवळ मज दिसतसां ॥१७६॥मज वाटतें मनांत ॥ तुम्ही स्वयंवरा यावें तेथ ॥ न कळे ईश्वरी घटित ॥ तेथें काय वर्तेल तें ॥१७७॥शुद्ध सप्तमी फाल्गुन मास ॥ आजिपासूनि सप्त दिवस ॥ अर्जुन कळा वया विशेष ॥ पण केला पांचाळें ॥१७८॥लोहध नुष्य चढवून ॥ मत्स्य यंत्रीं भेदावा बाण ॥ नलिकायंत्रा मधून ॥ लक्ष्य संधान योजावें ॥१७९॥कुंतीसी म्हणे गृहींची ब्राह्मणी ॥ तुझिया तिसच्या पुत्रा लागूनी ॥ मज वाटतें वरील याज्ञ सेनी ॥ सकल रायां देखतां ॥१८०॥उदया द्रीवरी आलें रविचक्र ॥ बोलतां निशा सरली समग्र ॥ आज्ञा मागोनि तो विप्र ॥ पांचाल पुरा प्रति गेला ॥१८१॥पांडवांसी म्हणे वसुदेव भगिनी ॥ आतां निघावें येथूनी ॥ बक मारिला ये स्थानीं ॥ बहुत दिवस न राहावें ॥१८२॥शत्रूंलागीं प्रकटेल मात ॥ पांचालनगरा जावें त्वरित ॥ मग गृह स्वामीसी पुसोनि प्रेम युक्त ॥ साही जणें निघालीं ॥१८३॥परम निर्भय मनांत ॥ रात्रं दिवस पंथ चालत ॥ भीत स्कंधीं पृथा विराजत ॥ जेवीं नंदीवरी अपर्णा ॥१८४॥सायंकालीं चालिले संध्या सारून ॥ तों उगवला रोहिणीरमण ॥ अर्ध रात्री होतां जाण ॥ शीत किरण मावळला ॥१८५॥काळ पुरुषें कृष्ण कांबळी ॥ ब्रह्मांडावरी घातली ॥ कीं नक्षत्रमुक्ता जाळी लेइली ॥ आकाश देवी नावेक ॥१८६॥ब्रह्मांड करंडीं भरलें काजळ ॥ तें विश्वलोचनीं लेऊनि उरलें पुष्कळ ॥ कीं माया मोहें सबळ ॥ अंध केलें जननेत्रां ॥१८७॥तैलकाष्ठीं दीपिका तेथ ॥ पुढें पाजळोनि चाले पार्थ ॥ त्या प्रकाशें सर्व चालत ॥ तो जान्हवी वाटे लागली ॥१८८॥अंगारपर्ण गंधर्वपती ॥ स्त्रियांसमवेत नग्न रात्रीं ॥ स्वेच्छें जल क्रीडा खेळती ॥ शब्द करिती कौतुकें ॥१८९॥मार्गीं जातां पांडव ॥ तों उग्र वचन बोले गंधर्व ॥ सरा साघारे सर्व ॥ नातरी दंडीन स्वहस्तें ॥१९०॥ दिवसा मनुष्यांचा संचार ॥ रात्रीं यक्ष गंधर्व निशाचर ॥ आपुले प्राण रक्षूनि व्यग्र ॥ पळा आतां माघारे ॥१९१॥पार्थ देत प्रतिवचन ॥ पामरा भूमीवरी मनुष्य गमन ॥ यक्षराक्ष सांसी गगन ॥ शून्य पंथ नेमिला ॥१९२॥सुरगंगा भागीरथी ॥ सव्यगमनार्ह अहो रात्रीं ॥ तूं तस्कर बैस लासी पंथीं ॥ सोडीं मार्ग जाऊं दे ॥१९३॥गंधर्वें रथीं बैसोन ॥ पार्थावरी टाकिले सहस्त्र बाण ॥ मग अग्न्यस्त्र श्वेतवाहन ॥ सोडिता झाला ते वेळे ॥१९४॥रथ अश्व गेले जळोन ॥ खालीं पडला अंगारपर्ण ॥ अर्जुनें केशीं धरून ॥ खङ्ग ओढिलें वधा वया ॥१९५॥गंधर्वस्त्री मुख्य कुंभिनी ॥ धांवोनि लागे धर्माचे चरणीं ॥ म्हणे पवित्र शिरोमणी ॥ पतिदान देईं आम्हांतें ॥१९६॥धर्में अर्जुनासी बोधून ॥ सोडविला अंगारपर्ण ॥ तो स्त्रियां समवेत कर जोडून ॥ स्तुतिवादें गर्जतसे ॥१९७॥मी कुबेर मित्र जाण ॥ हें वन माझें क्रीडास्थान ॥ अंतर पडलें मजपासून ॥ रात्रीमाजी न कळतां ॥१९८॥आतां मज स्वरूप कळलें ॥ नारदें मज पूर्वीं सांगितलें ॥ कुरुकुलीं अवतरले ॥ पंचावतार देवांचे ॥१९९॥आजिपासोनि अंगारपर्ण ॥ सोडूनि दिधलें हें अभिधान ॥ चित्ररथ हें येथून ॥ लोकत्रयीं प्रकटेल ॥२००॥तरी हें अग्न्यस्त्र देईं मज ॥ मी चाक्षुषी विद्या समर्पीन तुज ॥ नर ऋषि सुरराज ॥ त्यांसी विद्या दुर्लभ हे ॥२०१॥जें जें कौतुक जेथें पाहीं ॥ तें तें विलोकावें बैसले ठायीं ॥ हे विद्या द्वादशवर्षें पढतांही ॥ शिष्या सहस नाकळे ॥२०२॥पार्था तुझी बुद्धि तीक्ष्ण ॥ आतांचि तुज शिकवीन ॥ चंद्रे विश्वावसूलागून ॥ विद्या दिधली पूर्वीं ही ॥२०३॥विश्वावसूनें मज ॥ उपदेशिली सतेज ॥ पार्थ म्हणे सग्न्यस्त्र तेजःपुंज ॥ बृहस्पति सांगे भरद्वाजा ॥२०४॥भरद्वाज अग्निवेशा देत ॥ अग्निवेश द्रोणासी सांगत ॥ द्रोणाचार्य कृपावंत ॥ तेणें मज हें दीधलें ॥२०५॥अग्न्य गंधर्व आकळी ॥ चाक्षुषी विद्या पार्थ कवळी ॥ आणिक गंधर्व ते वेळीं ॥ उचित देत पांडवां ॥२०६॥वृत्रा सुराचा हस्ती ॥ वज्रें छेदितां अमरपती ॥ वज्रधारेचीं खंडें निश्चिती ॥ परमतेजाळ उडालीं ॥२०७॥त्याचे वज्रप्राय तुरंग ॥ मनोवेगी जाहले अभंग ॥ इंद्रे मज दिधले सुरंग ॥ पांचशत तेजस्वी ॥२०८॥ते मी तुम्हांसी देईन ॥ संतोष पावले पंडुनंदन ॥ म्हणती आम्ही पावल्या स्वस्थान ॥ मग धाडून देइंजे ॥२०९॥आतां आम्ही गुप्त वनीं ॥ नष्टचर्य भोगितों ये क्षणीं ॥ स्वराज्यासी गेलिया पुण्यखाणी ॥ अश्व मागों पाठवूं ॥२१०॥मग चित्ररथ गेला आज्ञा घेऊन ॥ पुढें चालिले पंडुनंदन ॥ लंघितां वनें गहन ॥ तों वेदव्यास भेटला ॥२११॥साही जणें साष्टांग नमिती ॥ वृक्षतलीं एकांतीं बैसती ॥ वनपुष्पें फलें आणूनि प्रीतीं ॥ जगद्नुरु पूजिला ॥२१२॥मग बोले कृष्ण द्वैपायन ॥ पांचालपुरा तुम्ही जाऊन ॥ द्नुपदसभेसी बैसोन ॥ साधा कारण सर्वही ॥२१३॥पांचालीनें पंचभ्रतारां ॥ पूर्वींच मागितलें पंचवक्रा ॥ ते सती परमपवित्रा ॥ भार्या होईल पांचांची ॥२१४॥मीही तेथें प्रकटेन ॥ साधूनि देईन हें कारण ॥ ऐसें बोलनि कृष्ण द्वैपायन ॥ अंतर्धान पावला ॥२१५॥पुढें आतां द्रौपदीस्वयंवर ॥ कथा रसाळ सुरस फार ॥ ऐकतां महापापांचा संहार ॥ शत्रु समग्र नासती ॥२१६॥महाराज भारत ग्रंथ ॥ प्रयाग तीर्थराज यथार्थ ॥ भक्तिज्ञानवैराग्य युक्त ॥ वाहे निश्चित त्रिवेणी ॥२१७॥प्रेम हाचि माघ मास ॥ मुमुक्षु स्त्राना ॥ लोटती तापस ॥ दोषियां आणि अभविकांस ॥ बिंदु येथींचा स्पर्शेना ॥२१८॥पांडुरंगपुर विला सिया ॥ ब्रह्मा नंदा यति वर्या ॥ जग द्नुरो पंढरीराया ॥ पांडवजन पालका ॥२१९॥ब्रह्मा नंद श्री धर वरद ॥ ठेविलें नांव सांभाळीं ब्रीद ॥ पांडवप्रताप ग्रंथ विशद ॥ शेवटासी पावविंजे ॥२२०॥सुरस पांडावप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यस भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एका दशा घ्यायीं कथियेला ॥२२१॥स्वस्ति श्री पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्री धर कृत ॥ हिडिबवध घटोत्कच जन्म सहित ॥ बका सुरवध कथियेला ॥२२२॥इति श्री श्रीधर कृतपांडव प्रतापादिपर्वणि एकादशाध्यायः ॥११॥॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 08, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP