मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय १७ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय १७ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय १७ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री कृष्ण कृपेनें पांडव समर्थ ॥ अक्षय्य भांडारें अक्षय्य रथ ॥ गांडीव चाप अक्षय्य सत्य ॥ आक्षय्य तूणीर सर्वदा ॥१॥त्यावरी मयासुरें उचित ॥ सभा दिधली अत्यद्भुत ॥ जरासंध मारिला बलोन्मत्त ॥ तो पुरुषार्थ ठसावला ॥२॥बावीस सहस्त्र राजे सोडविले ॥ आपुलेसे करूनि स्थापिले ॥ धर्में यावरी काय केलें ॥ आज्ञापिले चौघे बंधु ॥३॥उत्तर दिशेसी जाय अर्जुन ॥ सवें दलभार घेऊन ॥ प्रताप कल्लोक संपूर्ण ॥ उचंबळत ब्रह्मांड भरी ॥४॥कोणी राजे युद्ध करिती ॥ सवेंचि मागुती शरण येती ॥ एक पहिलेचि मित्र भूपती ॥ जरासंधाचे बंदींचे ॥५॥देशोदेशींचा झाडा पूर्ण ॥ घेत चालिला श्वेतवाहन ॥ समूहनामें राजा जिंकोन ॥ अपार धन घेतलें ॥६॥त्याचा समागमें घेतला भार ॥ पुढें देखिलें प्राग्जोतिष नगर ॥ नरक पुत्र भग दत्त वीर ॥ तीन दिवसांत जिंकिला ॥७॥कुंतलींचा राजा बृहत ॥ त्यासही जिंकी वीर पार्थ ॥ तो पद्मराग रत्नें ओपीत ॥ शतकोटि पांडवांतें ॥८॥सेनविदनामें महारथ ॥ सुनाभ सुवर्चस बहुत ॥ पर्वतवासी हे समस्त ॥ मार्गघ्न तस्कर जिंकिले ॥९॥हिमाचल ओलांडोनि समस्त ॥ पुढें जिंकीत चालिला पार्थ ॥ धन रत्नें सुवर्ण पर्वत ॥ असंख्य येत करभार ॥१०॥पुरुषखंड हाटक देश ॥ गोरक्ष पर्वत सुवर्ण विशेष ॥ मानससरोवरीं अतिप्रकाश ॥ रत्न खाणी देखिल्या ॥११॥येथींचा पाट वाहे शुद्ध ॥ तेचि जाणिजे सरयू प्रसिद्ध ॥ संख्या एक अर्बुद ॥ हस्ती भरिले सुरत्नें ॥१२॥गंधर्वदेश जिंकून ॥ नाना दुर्गस्थानें कठिण ॥ जेथें नाहीं मनुष्यांचें गमन ॥ तेथें अर्जुन पावला ॥१३॥ज्या ज्या देशीं धन घेतलें ॥ त्यांचे हातीं शक्रप्रस्था पाठविलें ॥ आश्व रथ गज भरिले ॥ पावते केले धर्मातें ॥१४॥एवं उत्तर दिशा जिंकून ॥ अपार वस्तु सामग्री घेऊन ॥ धर्मराजा पुढें आपूण ॥ पार्थ वीर समर्पी ॥१५॥भांडारें भरलीं संपूर्ण ॥ नगरांत न मावे धन ॥ मग शक्र प्रस्था बाहेरी नेऊन ॥ धनराशी ठेविल्या ॥१६॥पूर्व दिशेसी भीम सेन ॥ देश जिंकीत चालिला संपुर्ण ॥ पांचालपुरा येऊन ॥ नगरा बाहेर राहिला ॥१७॥द्रुपद प्रेमें धांवला ॥ वृकोदरासी भेटला ॥ अपार करभार दिधला ॥ सवें चालिला साह्यातें ॥१८॥गंडकी ओलांडूनि जात ॥ विदेह भेटला मिथिलानाथ ॥ पुढें सुशर्मा जिंकीत ॥ अपार भेटत नृपती पैं ॥१९॥धन देऊनि पुष्कळ ॥ आदरें भेटला शिशुपाल ॥ तेरा दिवस सहदल ॥ भीमसेन राहिला ॥२०॥बृहद्वल कोसलपति सबल ॥ जिंकीत जात म्लेच्छ मंडल ॥ ते धन देऊनि पुष्कळ ॥ पाय वंदिती भीमाचे ॥२१॥ पर्वत वासी येती तस्कर ॥ वस्त्रें ललामें देती अपार ॥ नाना शस्त्रजातींचे संभार ॥ अलंकार विचित्र पैं ॥२२॥मलयागर कृष्णागर चंदन ॥ केशर कस्तूरी जवादी पूर्ण ॥ पोतास पाच कचोरे सुगंध जाण ॥ अपार देती भीमातें ॥२३॥पूर्व दिशा सर्व जिंकून ॥ अपार संपत्ति पर्वत घेऊन ॥ धर्मासी भेटला भीमसेन ॥ आनंदें गगन पूर्ण जाहलें ॥२४॥दक्षिणा घ्यावया निश्चित ॥ सहदेव पाठविला माद्रीसुत ॥ पृतना घेऊनि असंख्यात ॥ जाता जाहला बलाब्धि ॥२५॥शूरसेनासी जिंकून ॥ दंतवक्रासी आलिंगून ॥ कुंतिभोजें भेटोन ॥ अपार धन दीधलें ॥२६॥मत्स्य सुकुमार सुमित्र ॥ युद्धीं जिंकोनि पटच्चर ॥ रत्नधनराशी अपार ॥ अर्तिते जाहले सहदेवा ॥२७॥भोजकटकनगरीं जाण ॥ रुक्मिया झुंजला द्वयदिन ॥ मग दासत्व अंगीकारून ॥ पूजासंभार समर्पी ॥२८॥बहुत जिंकीत सहदेव ॥ धाकें भेटती सर्वही राव ॥ किष्किंधा वेढी बलार्णव ॥ युद्ध असंभाव्य जाहलें ॥२९॥मैद द्विविद वानर ॥ केशधरणीं युद्ध अपार ॥ जालिया मग वालीनें भांडार ॥ फोडोनि द्र्व्य दीधलें ॥३०॥शुक्रबृहस्पती ऐशीं तेजाळ ॥ रत्न मुक्तें दिधलीं पुष्कळ ॥ पुढें माहिष्मती पुरी सबळ ॥ नीळ राज्य करी तेथें ॥३१॥जो दुसरा शक्र म्हणवीत ॥ वन्हि जयाचा जामात ॥ तया नगर प्रदेशीं दला समवेत ॥ येत जाहला सहदेव ॥३२॥तों अग्नि क्षोभला अकस्मात ॥ सहदेवाचें दल जाळीत ॥ अश्व गज वीर रथ ॥ हव्यवाट जाळीतसे ॥३३॥संकटीं पडला पंडुकुमार म्हणे दूर राहिला श्रीकरधर ॥ सव्यसाची विद्यासमुद्र ॥ वृकोदर दुरावला ॥३४॥नसे दलभार किंचित ॥ कृशान आम्हांसीं झुंजत ॥ वैश्वानर होय शांत ॥ ऐसा प्रकार समजेना ॥३५॥माहिष्मती नगरीं तत्त्वतां ॥ चहूंवर्णांच्या योषिता ॥ जारकर्मीं परम रता ॥ विधिनिषेध नसेचि ॥३६॥राजा नील याग करीत ॥ फुंकितां कष्टले बहुत ॥ परी न पेटेचि पुरुहूत ॥ मग येत राज कन्या ॥३७॥ते लावण्यसरिता गुणराशी ॥ रूपासी न तुळे रंभा उर्वशी ॥ अंगीं परिमल अहर्निशीं ॥ सुंगधासी सीमा नसेचि ॥३८॥तिणें फुंकितां तथे वेळीं ॥ मन्मथें व्यापिला ज्वाला माली ॥ अनलही विरहानलीं ॥ पप्त जाहला तेधवां ॥३९॥वदनद्वयें चुंबावें ॥ कीं सप्तहस्तीं आलिंगावें ॥ मग तो त्रिचरण स्वभावें ॥ विप्रवेषें प्रकटला ॥४०॥मग जाहलें पाणि ग्रहण ॥ त्यावरी बोले विभावसु आपण ॥ व्यभिचार करितां निर्दोष पूर्ण ॥ स्त्रिया नगरींच्या करीन मी ॥४२॥दक्षिण दिशे समुद्रतीर ॥ केरल मल्याळ देश थोर ॥ जारकर्मरीति अपवित्र ॥ तेथें चालत अद्यापि ॥४३॥आणि श्वशुरा प्रति बोले अग्न ॥ परकें दल येतां जाळीन ॥ मग घरजांवयी कृशान ॥ नीलें करून ठेविला ॥४४॥यालागीं अग्नि जाळीत ॥ मग सहदेव होऊनि शुचिर्भूत ॥ अग्नीचें स्तवन करीत ॥ हात जोडूनि तेधवां ॥४५॥चित्र भानू अनल बृहद्भानु ॥ कृशानु ज्वलन हुताशनु ॥ विभावसु वीतिहोत्र हव्यवाहनु ॥ वैश्वानर कृष्णवर्त्मा ॥४६॥भूरितेजा लोहिताश्व पावक ॥ मेषवाहन मरुन्मित्र देख ॥ चत्वरिश्रृंग त्रिपद अधो मुख ॥ द्विमूर्धा सप्तपाणी ॥४७॥महाराज तूं जातवेद ॥ ज्वाला माली वेद प्रतिपाद्य ॥ सकल देवांत मुख्य तूं वंद्य ॥ सागर जीवन शोषक तूं ॥४८॥मदन दहन तृतीय नयनीं ॥ वास करिता तूं सदा अग्नी ॥ विश्वाचे जठरीं अवतरोनी ॥ पालन करिसी पवित्रा ॥४९॥तूं व्हावया पूर्ण ॥ आरंभिला राजसूय यज्ञ ॥ तुज दिधलें आमंत्रण ॥ सामुग्री जाण मेळवितों ॥५०॥ऐसें स्ववन ॥ प्रत्यक्ष प्रकटला हुताशन ॥ शीतळ केलें सकळ सैन्य ॥ क्षेमालिंगन देऊनियां ॥५१॥सहदेवासी म्हणे वैश्वानर ॥ पार्थें मजवरी केला उपकार ॥ खांडववन देऊनि समग्र ॥ रोग माझा दवडिला ॥५२॥श्री कृष्ण भक्तांसी विघ्न ॥ मी न करीं गेलिया प्राण ॥ प्रर्हाद म्यां रक्षिला पूर्ण ॥ लंकादहनीं हनुमंत ॥५३॥जे न करिती हरिस्मरण ॥ न ऐकती पांडवांचे कीर्तन ॥ नाचरती स्वधर्माचरण ॥ जाळीन सदनें तयांचीं ॥५३॥जे निंदक अभक्त दुर्जन ॥ न करिती माझें स्तवन पूजन ॥ जे न करिती सूर्याराधन ॥ त्यांसी जाळीन क्षणमात्रें ॥५५॥काय असूनि उत्तम सदन ॥ जेथें नाहीं ब्राह्मण भोजन ॥ जेथें नव्हेचि हरिकीर्तन ॥ तें मी जाळीन अकस्मात ॥५६॥अतिथि जाय निराश ॥ मातापितयांचा करी द्वेष ॥ गुरुदर्शनीं जया आळस ॥ जाळीन सर्व तयांचें ॥५७॥वडील बंधु माझा धर्म ॥ त्यासी न मानिती जे अधम ॥ मी क्षोभोनि करीन भस्म ॥ नृप तस्कर नागविती ॥५८॥यालागीं सहदेवा अवधारीं ॥ मी तुमचा साह्यकारी ॥ असो नीलराज ते अवसरीं ॥ भेतविला सहदेवा ॥५९॥संपूर्ण होय राजसूय यज्ञ ॥ ऐसें नीलें दिधलें धन ॥ म्हणे राज सूययज्ञीं येईन ॥ श्री कृष्ण चरण पहा वया ॥६०॥पुढें सहदेव चालिला बळें ॥ सागर द्वीपीं म्लेच्छ मंडळें ॥ पुरुषार्थें जिंकोनि सकलें ॥ करभार घेतला ॥६१॥फिरंगी हबसान ताम्र ॥ मंडलें जिंकिलीं समग्र ॥ निषाद राक्षस अपार ॥ जिंकिले बळें तेधवां ॥६२॥कर्णव सनहीन एकचरण ॥ काल मुखे गुदहीन ॥ जलचर पति तिमिंगिल जिंकून ॥ द्र्व्यरत्नें घेतलीं ॥६३॥चोल मंडल द्रविड देश ॥ कर्नाटक त्रिगुल निःशेष ॥ पत्र धाडिलें लंकेस ॥ बिभी षणास सहदेवें ॥६४॥बिभीषण म्हणे दिवस धन्य ॥ भेटला सहदेवासी येऊन ॥ रावण भांडारींचीं रत्नें आणून ॥ असंख्यात समर्पिलीं ॥६५॥नाना वस्तूंचे संभार ॥ जे त्रिभुवनीं दुर्लभ साचार ॥ राक्ष समाथां देऊनि अपार ॥ शक्रप्रस्था पाठ विले ॥६६॥सहदेव म्हणे बिभीषणा ॥ आपण यावें राज सूययज्ञा ॥ असो तयाची घेऊनि आज्ञा ॥ शक्र प्रस्था परतला ॥६७॥वंदोनियां धर्मनृपती ॥ अर्पिल्या सकळ संपत्ती ॥ यावरी नकुल दला प्रती ॥ घेऊनि चालिला पश्चिमे ॥६८॥नकुलाचा बल प्रताप ॥ जिंकिले पश्चिमेचे भूप ॥ असो द्वारकेसमीप ॥ नकुल बाहेर उतरला ॥६९॥दूताहातीं सत्वर ॥ धर्म राज मुद्रांकित पत्र ॥ द्वारकेसी धाडी माद्रीपुत्र ॥ करभार देइंजे म्हणोनि ॥७०॥पत्र देखोनि राजीवनेत्र ॥ मस्तकीं वंदी जल जगात्र ॥ सच्चिदानंद सर्वेश्वर ॥ हर्षनिर्भर जाहला ॥७१॥इंदिरावर कृपाघन ॥ काय बोलत हांसोन ॥ मी धर्माचा अंकित पूर्ण ॥ सर्व देईन मज सहित ॥७२॥अपार करभार द्या रे नेऊन ॥ मीही जाईन आणिक घेऊन ॥ धनर त्नांचे पर्वत पूर्ण ॥ पाठविले नकुलाप्रती ॥७३॥तो लावण्या मृतसागर ॥ भक्तवल्लभ करुणाकर ॥ नकुलासी येऊनि सत्वर ॥ नगरा बाहेर भेटला ॥७४॥येतां देखोनि तमालनील ॥ सप्रेम होऊनि धांवे नकुल ॥ द्दढ धरिले चरण कमल ॥ नेत्री जल वाहातसे ॥७५॥श्री कृष्ण चरण क्षालन ॥ केलें नेत्रोदकेंकरून ॥ श्रीरंगें तया उचलोन ॥ ह्रदयीं धरिलें आवडीं ॥७६॥प्रेमें स्फुंदत नकुल ॥ मी अन्यायी दास केवळ ॥ तूं माउली परम स्त्रेहाळ ॥ अपराध पोटीं घालिसी ॥७७॥मी अन्यायी यादवेंद्रा ॥ पत्राचे मस्तकीं करूनि मुद्रा ॥ भक्तमान सचकोर चंद्रा ॥ तुजलागीं पाठविलें ॥७८॥महा पुण्याचे पर्वत ॥ तुजलागीं धर्म संस्थापनीं घेतले ॥ अवतार म्यां युगानुयुगीं ॥८०॥असो आज्ञा घेऊनि त्वरित ॥ पुरंदर प्रस्था जात माद्री सुत ॥ दया सागर भगवंत ॥ गुण वर्णी तयाचे ॥८१॥खर्व अर्बुद पद्म शंख ॥ निधींच्या निधि न करवे लेख ॥ द्र्व्य रत्नें आणूनि देख ॥ धर्म राज संतोष विला ॥८२॥जे ते देशींचीं मनुष्यें पाहीं ॥ वेठीसी धरू नियां सर्वही ॥ संपत्तिभार मस्तकीं लवलाहीं ॥ घेऊनि येती शक्र प्रस्था ॥८३॥संपूर्ण जाहला दिग्वि जय ॥ उदय पावला प्रताप सूर्य ॥ शत्रुखद्योत समुदाय ॥ तेजहीन दीसती ॥८४॥ऐसे दिवस कांहीं लोटले ॥ मग धर्म राज बंधू प्रती बोले ॥ हें कर भार द्रव्या आणिलें ॥ त्याचें करावें सार्थक ॥८५॥पडले द्र्व्याचे पर्वत ॥ सहस्त्र गज भरी वेंचिलें नित्य ॥ तरी सहस्त्र वर्षें पर्यंत ॥ द्र्व्य न सरे सर्वथा ॥८६॥सर्व सामुग्री सिद्ध जाहली ॥ याग आरं भावा ये काळीं ॥ आप्त सुह्रद सोयरे सकळी ॥ पाचारावे यज्ञातें ॥८७॥पाचारावे ब्राह्मण समस्त ॥ जे शापानु ग्रह समर्थ ॥ वेदो नारायण साक्षात ॥ ज्यांचें ह्रदयीं नांदतसे ॥८८॥सप्तपुर्या तीर्थें अगाध ॥ तेथें जे जे वसती ब्रह्म वृंद ॥ जे वेदांत ज्ञानी ब्रह्मा नंद ॥ निज सुखें डोलती ॥८९॥शाण्णव कुलींचे भूपाळ ॥ आप्त सोयरे द्रुपदादि सकळ ॥ विराटा दिक महानृपाळ ॥ यज्ञालागीं पाचारा ॥९०॥द्वारकेसी आधीं पाठवावें दूत ॥ जगद्वंद्य आमुचें कुलदैवत ॥ तो स्वामी श्री कृष्णनाथ ॥ रुक्मिणी सहित पाचारा ॥९१॥द्रोणाचार्य कृपाचार्य ॥ धृतराष्ट्र भीष्मादि आर्य ॥ जे केवल ज्ञान सूर्य ॥ पाचारावें आधीं येथें ॥९२॥दुर्योधना दिक बंधु सर्व ॥ पाचारावे सर्व कौरव ॥ विदुर महाज्ञानी कृपार्णव ॥ आधीं येथें बोलावा ॥९३॥ऐसी आज्ञा देतां भूपती ॥ लक्षा नुलाक्ष दूत धांवती ॥ धर्माची आज्ञा सर्वांची सांगती ॥ नृप निघती वेगेंशीं ॥९४॥तों दैव उदेलें अद्भुत ॥ दूत न पाठवितां अकस्मात ॥ निज भारेशीं वैकुंठनाथ ॥ नगरा जवळी पातला ॥९५॥दूत धांवत आले धर्मा जवळी ॥ सांगती समीप आले वनमाळी ॥ कुंजर भेरी गर्जती निराळीं ॥ प्रति शब्द न समाये ॥९६॥ऐकतां धर्म राज गहिंवरला ॥ दूत म्यां अजूनि नाहीं पाठविला ॥ अंतर ओळखोनि धांविन्नला ॥ स्वामी माझा मजलागीं ॥९७॥एक प्रेम धरितां हरिपायीं ॥ मूळाविण येतो लवलाहीं ॥ माझ्या भाग्यासी अंत नाहीं ॥ आला जांवई भीमकाचा ॥९८॥बंधूं सहित धर्मराव ॥ नगरा बाहेरी घेतसे धांव ॥ तों सेने सहित इंदिराधव ॥ पंडुपुत्रें देखिला ॥९९॥सवें सोळा सहस्त्र कामिनी ॥ मुख्य रुक्मिणी विश्व जननी ॥ छप्पन्न कोटी यादव श्रेणी ॥ तितुक्या तेव्हां असती संगें ॥१००॥साठ लक्ष कृष्ण कुमार ॥ कन्या स्नुषा आल्या समग्र ॥ चौदा सहस्त्र भेरी प्रचंड थोर ॥ गज पृष्ठावरी धडकती ॥१०१॥गज तुरंग पदाति रथ ॥ अनुपम अलंकार मंडित ॥ ध्वज अपार लख लखित ॥ जेवीं पुष्करीं सौदामिनी ॥१०२॥मित्रा ऐसीं मित्र पत्रें ॥ चंद्र मंडला तुल्य तळपती छत्रें ॥ नील आरक्त वर्ण ॥ विचित्रें ॥ संख्येरहित दिसताती ॥१०३॥कुंचे चामरें झळकती ॥ गज महानादें किंकाटती ॥ हिरे जडिले दंतोदंतीं ॥ कर्णीं डोलती मुक्ताघोंस ॥१०४॥रत्न जडित पाखरा सुरेख ॥ घंटा गर्जती अधो मूख ॥ मज वाटतें ते कृष्णो पासक ॥ हरिनामें किंकाटती ॥१०५॥अतिरथी जे उद्भट वीर ॥ पाठीसी चालती कृष्ण कुमार ॥ महारणपांडित धनुर्धर ॥ प्रचंड शूर हरीचे ॥१०६॥गज स्कंधीं बैसोनि बंदी जन ॥ हिर प्रताप वाखाणिती गर्जोन ॥ पुढें कनकवेत्र धारी धांवोन ॥ वाव करिती चाला वया ॥१०७॥श्री कृष्णा भोंवते राजे घनदाट ॥ आदळती मुकुटांसी मुकुट ॥ ऐसा द्वारकानाथ वरिष्ठ ॥ धर्मराजें देखिला ॥१०८॥पांचही जणांसी ते काळीं ॥ क्षेम देतसे वनमाळी ॥ धर्म हरीचे अंघ्रिकमळीं ॥ मस्तक ठेवी आदरें ॥१०९॥हरि म्हणे तूं दीक्षित सहजीं ॥ तुझी पूजा करावी आजी ॥ असो धर्में श्रीरंग नगरा माजी ॥ मंदिरासी आणिला ॥११०॥चौदा सहस्त्र मत्त वारण पातले करभार ॥ अठयायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ शिष्यां सहित पातले ॥११२॥जे जरा संधाचे बंदीं पडिले ॥ बावीस सहस्त्र राजे सोडविले ॥ तितुकेही यज्ञ पहा वया आले ॥ संगें करभार घेऊ नियां ॥११३॥धनाच्या राशी अपार ॥ स्वर्गाहूनि पाठवी कुबेर ॥ त्रिदशां सहित सुरेश्वर ॥ विमानारुढ पाहातसे ॥११४॥नव ग्रह सुप्रसन्न ॥ जय लाभ उभे कर जोडून ॥ श्री राम भक्त बिभीषण ॥ आनंदें पाहों पातला ॥११५॥सप्त द्वीपें छप्पन्न देश ॥ नवखंडींचे नराधीश ॥ भीष्मद्रोणादिक कौरवेश ॥ प्रत्रां सहित धृतराष्ट ॥११६॥जे जे आले राजेश्वर ॥ त्यांसी धर्में जाऊनि समोर ॥ बहुत करू नियां आदर ॥ इंद्रप्रस्था आणिलें ॥११७॥कोटी शिल्पकारीं अगोदर ॥ चंदन सदनें निर्मिलीं विचित्र ॥ सकल ऋषी राजे यांसी पवित्र ॥ तींचि सदनें दीधलीं ॥११८॥धर्म म्हणे सहदेवातें ॥ धौम्यपुरो हिताचे अनुमतें ॥ जे जे सामुग्री लागेल यज्ञातें ॥ ते सिद्ध करीं सत्वर ॥११९॥मग भीष्म आणि जगन्मोहन ॥ एकासनीं बैसवून ॥ कृष्णपदीं मस्तक ठेवून ॥ धर्मराज विनवीतसे ॥१२०॥जें जें मनीं इच्छिलें ॥ तें तें रमाधवें पुरविलें ॥ सकल राजे भृत्य जाहले ॥ द्र्व्य सांचलें असंभाव्य ॥१२१॥तरी येथें कार्यें वांटिल्याविण ॥ सिद्धी न पावे कदा यज्ञ ॥ कोणा योग्य कोण कारण ॥ तूं नारायण जाणसी ॥१२२॥आम्ही नेणतीं लेकुरें श्रीरंगा ॥ आम्हांसी एक कार्य सांगा ॥ कंसांतका भक्त भव भंगा ॥ आज्ञा करीं सत्वरी ॥१२३॥मग बोले श्रीकरधर ॥ मी चतुर नव्हे नृपवर ॥ मी नंदाचा गोरक्षक साचार ॥ मज हा विचार समजेना ॥१२४॥यावरी अर्जुनाचा सारथि होय ॥ हें तों जाणे भुवनत्रय ॥ धर्में धरिले द्दढ पाय ॥ तरी मी काय करूं आतां ॥१२५॥ हरि म्हणे मी इतुकें करीन ॥ द्विजांचीं चरणां बुजें क्षालीन ॥ उच्छिष्टपात्रें काढीन ॥ इतुकें कारण मज देईं ॥१२६॥ऋषींसी लागतील जे उपचार ॥ ते विदुरें द्यावे समग्र ॥ राजपूजेसी चतुर ॥ संजय शिष्य व्यसाचा ॥१२७॥द्रव्य लागेल जें अपार ॥ तें तें पुरवावें समग्र ॥ द्रोणाचे आज्ञें द्रोण पुत्र ॥ अश्वत्थामा करील हें ॥१२८॥अपार आल्या राज पृतना ॥ त्यांसी भक्ष्य भोज्याची विचारणा ॥ हें कार्य सांगावें दुःशासन ॥ अवश्य म्हणे धर्मराव ॥१२९॥ब्राह्मणांसी दक्षिणा सहज ॥ देईल कृपाचार्य महाराज ॥ जो प्रताप सूर्य तेजःपुंज ॥ वेदज्ञ आणि रणपंडित ॥१३०॥राजे आणिती बहु धनें ॥ तें ॥ द्दष्टीं पाहोनि दुर्योधनें ॥ मग भांडारीं ठेविजे यत्नें ॥ अवश्य म्हणे पंडुपुत्र ॥१३१॥यज्ञासी येतील महाविघ्नें ॥ तितुकीं निवारावीं अर्जुनें ॥ ब्राह्मणांची प्रार्थना भीमसेनें ॥ भोजन समयीं करावी ॥१३२॥सुमन माला गंधाक्षता ॥ धूप दीप परिमल द्रव्य तत्त्वतां ॥ हीं अर्पावीं समस्तां ॥ नकुलासी हें सांगिजे ॥१३३॥घृतमध्वादिक पंचामृतें ॥ हीं सहदेवें वाढिजे एकचित्तें ॥ न्यून पूर्ण होईल तेथें ॥ गंगात्मजें विलोकावें ॥१३४॥विप्रराजांच्या बैसती पंक्ती ॥ त्यांसी वाढील द्रौपदी सती ॥ जे अन्नपूर्णा केवळ भगवती ॥ करीत तृप्ति समस्तां ॥१३५॥प्रतिविंध्यादि जे राजकुमार ॥ अत्यंत सुंगध करूनि नीर ॥ भोजन करितां वारंवार ॥ पुरविजे शीघ्र तयांनीं ॥१३६॥त्रयोदश गुणी विडे विचित्र ॥ एक तांभूल सहस्त्रपत्र ॥ हा धृष्टधुम्ना सांगावा विचार ॥ धर्मराज अवश्य म्हणे ॥१३७॥धर्मराया तूं यजमान ॥ भोंवतीं घेऊनि दिव्य ब्राह्यण ॥ यथासांग करीं यज्ञ ॥ जेणें त्रिभुवन धन्य म्हणे ॥१३८॥ऋत्विज नेमिले चौघे जण ॥ त्यांत कमलोद्भव मुख्य पूर्व ॥ दुजा सत्यवती ह्रदयरत्न ॥ वेदज्ञ केवळ सूर्य जो ॥१३९॥तिजा ब्रह्म नंदन वसिष्ठ ॥ चौथा याज्ञ्वल्क्य अतिवरिष्ठ ॥ हे चौघे ऋत्विज स्पष्ट ॥ धर्मराया योजीं कीं ॥१४०॥राजा आणि भणंग दीन ॥ सर्वांसी अन्न सम समान ॥ हें मुख्य प्रभूचें लक्षण ॥ यज्ञा पूर्ण होय तेणें ॥१४१॥ऐसी आज्ञा देऊनि सकळां ॥ मग यज्ञासी आरंभ केला ॥ दीक्षा ग्रहणीं धर्म बैसला ॥ विप्रां सहित मखा जवळी ॥१४२॥एक संवत्सर पर्यंत ॥ वसुधारा अखंड चालत ॥ जातवेद जाहला तृप्त ॥ न्यून पदार्थ एकही नसे ॥१४३॥विभाग पावोनि समस्त ॥ जय जय कारें देव गर्जत ॥ असं भाव्य पुष्प वृष्टी होत ॥ शक्र प्रस्थावरी तेधवां ॥१४४॥ऋषी राजे थोर लहान ॥ रत्नताटीं करिती भोजन ॥ षड्रसान्नें जेविती पूर्ण ॥ जीं दुर्लभ सुरांतें ॥१४५॥तों विप्रांसी प्रार्थी भीम सेन ॥ बोले परम कठिण वचन ॥ म्हणे टाकाल जरी अन्न ॥ तरी मी बांधीन शेंडीसी ॥१४६॥उदरापुरतेंचि मागोनि घ्यावें ॥ पात्रीं सांडितां बरवें नव्हे ॥ म्हणे माझे स्वभाव ठावे ॥ तुम्हांसी आहेत सर्वही ॥१४७॥भीमाच्या धाकेंकरून ॥ ब्राह्मण जेविती किंचित अन्न ॥ विप्र गेले शुष्क होऊन ॥ तें जगज्जीवनें जाणीतलें ॥१४८॥भीमासी म्हणे जगन्मोहन ॥ गंध मादन ऋषि परम निपुण ॥ त्यासी सत्वरी बोलावून ॥ अगत्य कारण असे त्याचें ॥१४९॥भीमाचे ठायीं अभिमान ॥ मी एक बळें आगळा पूर्ण ॥ वृकोदर जात वेगें करून ॥ गंध मादन आणा वया ॥१५०॥तों वाटेसी एका पर्वतांत ॥ वृद्धवेष धरूनि बहुत ॥ बैसला होता हनुमंत ॥ पुच्छ आडवें टाकूनि ॥१५१॥त्यासी भीम बोले प्रौढी ॥ वानरा वाटेचें पुच्छ काढीं ॥ मज जाणें आहे तांतडी ॥ ऋषि दर्शना कारणें ॥१५२॥तो हनुमंत बोले नम्र वचन ॥ भीमा मज आलें वृद्धपण ॥ हें पुच्छ जड जाहलें पूर्ण ॥ आतां माझ्यानें उचलेना ॥१५३॥तरी तूं बळिया भीम सेन ॥ एकीकडे ठेवीं उचलोन ॥ अवश्य म्हणे कुंती नंदन ॥ पुच्छ उचलूं पाहातसे ॥१५४॥नव सहस्त्र वारणांचें बळ ॥ तें भीम सेनें वेंचिलें सकळ ॥ तों पुच्छ न ढळे अढळा ॥ जैसा अचल पडियेला ॥१५५॥हतबल जाहला भीमसेन ॥ गदगदां हांसे वायुनंदन ॥ म्हणे धर्मानुजा गर्व सांडून ॥ कृष्ण भजनीं राहीं तूं ॥१५६॥मग भीमें स्वतूनि हनुमंता ॥ म्हणे तूं आवडसी रघुनाथा ॥ आणि दशास्य बलहंता ॥ सीताशोकहर्ता तूंचि पैं ॥१५७॥निरभिमान भीमासी देखिलें ॥ मग पुच्छ हनुमंतें काढिलें ॥ गंध मादन पर्वतासी ते वेळे ॥ धर्मानुज पातला ॥१५८॥द्दष्टी देखिला गंध मादन ॥ अंग जैसें दिव्य सुवर्ण ॥ परी तया सूकराचें वदन ॥ दुर्गांधि पूर्ण येतसे ॥१५९॥भीमें केला नमस्कार ॥ उभा राहिला जोडूनि कर ॥ म्हणे तुम्हांसी पाचारी यादवेश्वर ॥ यग होतसे धर्मसदनीं ॥१६०॥मग बोले गंध मादन ॥ हें परम दुर्गंधि सूकरवदन ॥ मी तेथें न येंचि घेऊन ॥ उपहासिती सर्वही ॥१६१॥भीम म्हणे महाऋषी ॥ तुझी कांती सुवर्णा ऐसी ॥ ऐसें तुज मुख व्हावयासी ॥ काय कारण सांग पां ॥१६२॥येरू म्हणे ऐकें सावधान ॥ पूर्वीं मी होतों बहुत सधन ॥ सर्व दानें केलीं पूर्ण ॥ यथाविधी करूनियां ॥१६३॥परी ब्राह्मणांचा जाय प्राण ॥ ऐसें बोलिलों कठिण वचन ॥ यालागीं ऐसे जाहलें वदन ॥ पंडुनंदना जाण आं ॥१६४॥भीमा तूं तरी सावधान ॥ नको बोलूं कठोर वचन ॥ मनांत दचकला भीमसेन ॥ आला परतोन इंद्र प्रस्था ॥१६५मग विप्रांसी म्हणे ॥ स्वामी सावकाश जी जेवा ॥ न रुचे त्याचा त्याग कराव ॥ प्रासद ठेवावा निजपात्रीं ॥१६६॥विप्र म्हणती नवल जाहलें ॥ यासी हे गुण कोणें लाविले ॥ प्रार्थना करितां नम्र बोले ॥ आमुचें फळलें भाग्य वाटे ॥१६७॥असो धर्माची संपदा बहुत ॥ देखतां दुर्योधन संतापत ॥ म्हणे याचा साह्याकारी कृष्णनाथ ॥ त्याचेनि समस्त पूर्ण होय ॥१६८॥श्री कृष्णासी म्हणे दुर्योधन ॥ तुझें पांडवांवरी बहु मन ॥ तूं एवढा देव होऊन ॥ समता नसे तुझे ठायीं ॥१६९॥पांडवांशीं धरिसी प्रीती ॥ तैसी आम्हांकडे नाहीं रीती ॥ तुझे ठायीं द्वैत श्रीपती ॥ नवल मज वाटतें ॥१७०॥हरि म्हणे दुर्योधना ॥ मी समसमान अवघ्या जणां ॥ एकासी अधिक एकासी उणा ॥ सर्वथा नाहीं विचारीं ॥१७१॥दरिद्री राजा हो कां रंक ॥ सर्वांसी समान जैसा अर्क ॥ किंवा गंगेचें उदक ॥ सर्वां सही सम जैसें ॥१७२॥कीं सर्वां घटीं समान अंबर ॥ कीं सर्वांसी समान जैसा समीर ॥ कीं गगनीं उगवतां रोहिणीवर ॥ शीतल जैसा सर्वांतें ॥१७३॥तैसा मी दुर्योधना असें जाण ॥ परी जेकां कुटिल जन ॥ ते समत्व विषमत्व संपूर्ण ॥ माझ्या ठायीं भाविती ॥१७४॥जे भक्त धरिती अत्यादर ॥ त्यांसी जवळी वाटें मी यादवेंद्र ॥ मी समीप असोनि साचार ॥ अभक्त दूरी भाविती ॥१७५॥त्याची दावा वया प्रचीती ॥ दुर्योधनासी म्हणे यदुपती ॥ एक कारण असे निश्चिती ॥ तें तूं ऐकें सुयोधना ॥१७६॥इतुके हे बैसले ब्राह्मण ॥ त्यांत एक सत्पात्र निवडून ॥ लवकरी आणीं उत्तम दान ॥ देणें असे तयासी ॥१७७॥दुर्योधन चालिला पहावया ॥ मग बोला विलें धर्मराया ॥ म्हणे एक द्विज नष्ट पाहूनियां ॥ वेगें आणीं आतांचि ॥१७८॥धर्म जों पाहे ब्राह्मण ॥ तों केवळ दिसती सूर्य नारायण ॥ महातपस्वी पुण्यपरायण ॥ नष्ट एकही दिसेना ॥१७९॥परतोनि आला हरीपाशीं ॥ म्हणे अवघे आहेत पुण्यराशी ॥ अपवित्र गुण एकासी ॥ न दिसे कोठें सर्वथा ॥१८०॥इकडे दुर्योधन शोधीत शोधीत ॥ अवघें ऋषि मंडळ पहात ॥ एकही धड नाहीं त्यांत ॥ दुषणें बहुत दिसती तया ॥१८१॥हरिजवळी आला सत्वर ॥ म्हणे अवघेचि अपवित्र ॥ एकही न दिसे सत्पात्र ॥ दोष सर्वत्र असती पैं ॥१८२॥दुर्योधनासी म्हणे जगज्जीवन ॥ तुझें ह्रदय कपटी मलिन ॥ सदोषिया निर्दोष जाण ॥ त्रिभुवनींही दिसेना ॥१८३॥दुरात्मा जो दुर्बुद्धि खळ ॥ त्यासी अवघे दिसती अमंगळ ॥ द्दष्टीं कोणी न दिसे निर्मळ ॥ पापें समूळ वेष्टिला ॥१८४॥वेश्येचिया नयनीं ॥ सकळ स्त्रिया दिसती जारिणी ॥ तैसा दुरात्मा तूं पापखाणी ॥ मलिन मनीं सर्वथा ॥१८५॥धर्मासी अवघे दिसती पुण्यवंत ॥ तेचि तुज दोषी भासत ॥ दुर्योधन न बोले तटस्थ ॥ जो उन्मत्त विषयांध ॥१८६॥असो एक वर्ष पर्यंत ॥ राजसूययज्ञीं उत्साह होत ॥ तों नवल एक वर्तलें तेथ ॥ श्रोते सावचित्त ऐकोत पां ॥१८७॥जान्हवीचे तीरीं जाण ॥ कोणी एक तपस्वी ब्राह्मण ॥ अरण्यामाजी गुफा बांधोन ॥ स्त्रियेसहित राहातसे ॥१८८॥परम तेजस्वी ब्राह्मण ॥ सदा करी शिवो पासन ॥ नित्य कैला साहूनि विमान ॥ संध्या समयीं येतसे ॥१८९॥तये विमानीं बैसोनि दोघें ॥ कैलासासी जाती सवेगें ॥ शिवार्चन करूनि निजांगें ॥ येती परतोनि आश्रमासी ॥१९०॥ऐसें असतां एके काळीं ॥ दोघें हिंडती बनस्थलीं ॥ विमान यावयाची वेळ जाहली ॥ पुष्पें तोडिती सर्वग ॥१९१॥तों तेथें एकान्तवन देखोन ॥ कामातुर जाहला ब्राह्मण ॥ स्त्रियेसी म्हणे भोगदान ॥ देईं मज येथेंचि ॥१९२॥तंव ती म्हणे भ्रतारासी ॥ चंडांशु आला मध्यान्हासी ॥ पुढें जाणें असे शिवपूजेसी ॥ ही गोष्ट मानसीं धरूं नका ॥१९३॥तुम्ही सर्व शास्त्रीं निपुण ॥ बरवें पहा विचारून ॥ तंव तो कामें व्यापिला पूर्ण ॥ घूर्णित नयन जाहले ॥१९४॥अंतर भरलें अनंगें ॥ पंथ सोदूनि जाय आडमार्गें ॥ तों काल सर्पें डंखिला वेगें ॥ प्राण गेले तत्काळ ॥१९५॥अचेतन पडिलें प्रेत ॥ जवळी आली स्त्री धांवत ॥ अट्टहासें शोक करीत ॥ तों नारद तेथें पातला ॥१९६॥नारद पुसे काय जाहलें ॥ तिनें जाहलें तें सर्व कथिलें ॥ नारद म्हणे हें काय केलें ॥ कां वचन मोडिलें भ्रतारचें ॥१९७॥तंव ते म्हणे नारदमुनी ॥ कांहीं उपाय सांगा ये क्षणीं ॥ येरू म्हणे शक्र प्रस्था घेऊनी ॥ प्रेत जाईं सवेग ॥१९८॥यज्ञापाशीं टाकीं प्रेत ॥ तेथें मिळाले श्रेष्ठ समस्त ॥ मी तुज दावितों शक्र प्रस्थ ॥ उचलीं कुणप वेगेंशीं ॥१९९॥पुढें चाले नारद मुनी ॥ मागें ते येई प्रेत घेऊनी ॥ यज्ञ मंडपांत आणूनी ॥ अकस्मात टाकिलें ॥२००॥म्हणे सर्पदंशें मेला भ्रतार ॥ कोणीं उठवावा उठवावा सत्वर ॥ तरीच मखफल होय साचार ॥ देखोनि युधिष्ठिर घाबरला ॥२०१॥म्हणे यज्ञासी विघ्न ओढवलें ॥ जैसें दुग्धामाजी जैंधव पडलें ॥ स्वाहाकार ॥ खोळंबले ॥ ह्स्त आखुडिले ब्राह्यणीं ॥२०२॥धर्म जाहला दीन वदन ॥ समस्तांसी विनवी कर जोडून ॥ कोणी तरी तपस्तेज वेंचून ॥ उठवा शीघ्र कुणप हें ॥२०३॥तटस्थ पाहती सभाजन ॥ कोणी न बोले कांहीं वचन ॥ धर्में उदकें भरूनि नयन ॥ जगद्वंद्याकडे पाहिलें ॥२०४॥म्हणे कैवारिया भक्तवत्सला ॥ शेवटीं हा अनर्थ ओढवला ॥ जैसा विदेशाहूनि ग्रामासी आला ॥ वेशींत नागविला तस्करीं ॥२०५॥हातासी लागावें जों निधान ॥ तों तेथें विवशी पडे येऊन ॥ म्हणे मायबाप तूं जगज्जीवन ॥ तुझा यज्ञ सांभाळीं ॥२०६॥मी किंकर तुझा दीन ॥ तूं सांभाळीं आपुला यज्ञ ॥ मी यज्ञकर्ता म्हणवीन ॥ तरी जिव्हा हे झडोन पडो ॥२०७॥ऐकोनि धर्माचें वचन ॥ गहिंवरले अवघे भक्तजन ॥ जे शिशुपाला दिक दुर्जन ॥ हर्ष पूर्ण मनीं त्यांच्या ॥२०८॥खुणाविती एकासी एक ॥ बरें म्हणती जाहलें कौतुक ॥ चांडाल दुरात्मे देख ॥ उणें पाहती भक्तांचें ॥२०९॥परी धर्माचा पाठिराखा थोर ॥ वैकुंठपुरींचा सुकुमार ॥ तो उणें पडों नेदी अणुमात्र ॥ कमलनेत्र ॥२१०॥मेघगंभीर गिरा गिरी गजोंन ॥ बोले रुक्मिणी प्राणजीवन ॥ मन्मथजनक जनार्दक ॥ पांडवजनरक्षक जो ॥२११॥म्हणे वेंचावें कांहीं निजतप ॥ तरी उठेल हें कुणप ॥ यावरी विरिंचीचा बाप ॥ काय करिता जाहला ॥२१२॥जो पीतवसन श्रीकरधर ॥ सुरंग रुळे उत्तरीयवस्त्र ॥ मंदहास्य वारिजनेत्र ॥ पेताजवळी आला तो ॥२१३॥हातीं घेतलीं रत्नजडित झारी ॥ सव्यकरें ओती पुण्यवारी ॥ कृष्णद्वेषी जे पापकारी ॥ हांसों लागले गदगदां ॥२१४॥शिशुपालादि कौरव दुर्जन ॥ म्हणती हा काय आचरला पुण्य ॥ कोणतें तप केलें निर्वाण ॥ जन्मादारभ्य आजिवरी ॥२१५॥महाकपटी चोर जार ॥ गोवळ्यांचें उच्छिष्ट खाणार ॥ एक म्हणती धरा धीर ॥ कौतुक पहा उगेचि ॥२१६॥तों काय बोले मधुकैटभारी ॥ मी आजन्म पर्यंत असेन ब्रह्मचारी ॥ तों अवघे हांसती दुराचारी ॥ हस्तीसी हस्त मेळवूनि ॥२१७॥ब्रह्मचर्य संकल्प करून ॥ ब्राह्मणाचे मुखीं जीवन ॥ जगज्जीवनें घालितांचि खडबडून ॥ उठला विप्र ते वेळे ॥२१८॥जाहला एकचि जय जय कार ॥ देव वर्षती सुमन संभार ॥ प्रेमें दाटला युधिष्ठिर ॥ भक्त अपार स्वविती तेव्हां ॥२१९॥खळ दुर्जन ते वेळीं ॥ अधोवदन पाहती सकळी ॥ आनंदली भक्त मंडळी ॥ पिटिली टाळी सकळिकीं ॥२२०॥असो उठविला जो ब्राह्मण ॥ त्याचें धर्में केलें पूजन ॥ स्त्रियेसहित गौरवून ॥ वस्त्रें भूषणें अर्पिलीं ॥२२१॥तों यज्ञामधूनि एक जंबुक ॥ अकस्मात निघाला एका एक ॥ कुंडवेदिकेवरी बैसोनि देख ॥ पुढील भविष्य वाखाणी ॥२२२॥गर्जोनि बोले जंबुक शब्द ॥ एथें एकाचा होईल शिरश्छेद ॥ पुढें दिसतो मोठा विरोध ॥ कलह अगाध माजेल ॥२२३॥एथोनि तेरा वर्षें अवधारा ॥ निर्वेंर होईल वसुंधरा ॥ जितुके नृप आले धर्म मंदिरा ॥ तितुकेही आटतील ॥२२४॥ऐसें तो जंबुक बोलिला ॥ तेथेंचि मग अद्दश्य जाहला ॥ असो पुढें स्वाहाकार चालिला ॥ ब्राह्मण हस्तें करू नियां ॥२२५॥हें जैमिनि भारतींचें मत ॥ श्रोतीं पहावें असे यथार्थ ॥ श्री कृष्णें उठविलें प्रेत ॥ हेंही कथानक तेथींचें ॥२२६॥कथा हे गोड ऐकिली ॥ म्हणोनि ती एथें योजिली ॥ शिशुपालाचें शिर वनमाळी ॥ छेदील तें परिसा आतां ॥२२७॥पुढिले अध्यायीं सुरस ॥ द्रौपदी वाढील समस्तांस करितां आवर्तन ॥ सकल पुरती मनोरथ ॥२२९॥संपत्ति विद्या पुत्र धन ॥ कामिक पावती करितां श्रवण ॥ हें श्री विठ्ठलें वरदान ॥ पंढरीसी दीधलें ॥२३०॥पंढरीनगरींच यथार्थ ॥ प्रकाटला पांडवप्रताप ग्रंथ ॥ श्रवणें सकल संकटें वारीत ॥ सत्य सत्य श्रोते हो ॥२३१॥श्री धरवरदा अभंगा ॥ रुक्मिणीवल्लभा पांडुरंगा ॥ पांडवरक्षका भक्तभवभंगा ॥ अव्यया निःसंगा सुखाब्धें ॥२३२॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सप्तदशाध्यायीं कथियेला ॥२३३॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्री धरकृत ॥ भीमगर्वमोचन उठविलें प्रेत ॥ जंबुकें भविष्य कथियेलें ॥२३४॥इति श्री श्रीधरकृत पांडवप्रतापे सभापर्वणि सप्तद्शाध्यायः समाप्तः ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥॥ श्री पांडवप्रताप सभापर्व सप्तदशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 08, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP