मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ७४

ओवीगीते - संग्रह ७४

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


लांब लांब केस वेणी येते ग केसांची

तुला हौस लेकाची वहिनीबाई ।

माझ्या ग आयुष्याचा विणते मी लेप

आता दादाराया पांघरा बापलेक ।

गायी आल्या गाई आल्या करवली

बंधवाला पाट मी मांडिते ।

माळ्याला शिडया मी लाविते

साळी डाळी मी काढीते ।

दुधाचं आंदण ठेविते

साळी डाळी येळीते ।

गुळाचं लिंपाण फोडिते

बंधूला भोजन वाढिते ।

काळी चंद्रकळा पदरी रामबाण

मायबाई नेस तुला माझी आण ।

काळी चंद्रकळा पदरी मोती जाळी

माझी मायबाई नेसली संध्याकाळी ।

काळी चंद्रकळा वर कशीदा भिंगाचा

आता मायबाई तुला प्रसाद गंगेचा ।

काळी चंद्रकळा फेकुनी दिली अंगणात

आता बाबाराया आणाया गेला बाजारात ।

बया नि म्हणू बया, बया चंदबीनाची शिडी ।

बया तंवर माझी उडी ।

बाप नी म्हणू बाप, बाप चंदबीनाचा पाट

बाप तंवर माझा हाट्‌ट ।

आई बापांनी दिली लेक, खेड सोडूनी कोकणात

लेक बापाच्या सपनात ।

लांब नी लांब क्यास बयाबाईनं वाढविलं

बाप्पाजी दौलतीनं पाणी गंगेचं आडविलं ।

लुगडं घेतईलं आत रेशमी न्हाइ काडी

सावळ्या भाऊराया न्हाई नेसत घाल घडी ।

लुगडं घेतईलं दोन्ही पदर राजाराणी

माहेर मला केलं, माझ्या बंधूच्या मैतरानी ।

लुगडं घेतईलं, दोन्ही पदर मोतीघस

माझे तू बाळाबाई, द्रिष्ट हुईल खाली बस ।

वैराळ सादवितो, आदी सादीव वईल्या येशी

बया राहिली परदेशी हाट्‌ट करु मी कुणापाशी ।

वैराळ सादवितो चुडे लियाच्या बाया किती

बया माझी ती मालईन लेकी सुनांची नांवं घेती ।

वैराळ सादवितो बस सोप्याच्या पायरी

मी जायाची सासरी बया गेली या बाहिईरी ।

माझ्या आंगायाची चोळी शिंपी दादाला काय ठावं

बंधू आपली भूज दावं ।

बहिणा चालली सासरी नको रडूस माळावरी

घाल पदर बाळावरी ।

सासर एवढा वस जिर्‍या मि‍र्‍याबी याचा घस

माझे तू बहिणाबाई जातीवंताचे लेकी सोस ।

सासर एवढा वस जसा डोंगरी आल्या महू

तिथं नांदून मला दावूं ।

लेकाया परायास लेक कशानं उनी झाली

आईबापाला गाते ववी कैलासी ऐकू गेली ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP