मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह २३

ओवीगीते - संग्रह २३

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


बंधूजी पावईना काई करुं मी जुंदळ्याचं

बंधू हौशाच्या भोजनाला ताट भरती आंबुळ्याचं ।

ज्याला ग न्हाई भैन त्याचं जेवण हिरीवरी

बंधू माझ्या त्या हावशाला तूप वाढीती खिरीवरी ।

ज्याला नाही भैन त्याच्या पदरी चाराचुरा

बंधू माझ्या हावशाला करते जेवन तालीवारा ।

बंदूजी पावईना खुंटी सोप्याची नटईली

बंदू माज्याला देखितांना मला हुषारी वाटईली ।

बसाय बसकर पाट टाकिती ज्येला तेला

बंधु माझ्या त्या हावशाला खुर्ची बसाइ वकिलाला ।

बसाई बसकर ज्यान जमकाना टाकिईती

हावशा माझ्या बंधू बंदुयीबाई दोन्ही नाती ।

बसाया बसकर टाकी ज्येनाबीवर गादी

हावशा माझ्या बंधू खास यीवाया बस मंदी ।

बंधूजी पावईना म्यां का देकीला अंगणात

झारी बुडवीली रांजनात दिली बंदूच्या तळातात ।

जिरसाळीचा करती भात येळ लौंगाची करते शाक

वनगाईचं वर तूप ज्यान जमकाना ढेलजंत ।

बंदूजी पावईना गेला मातला सांगईत

भैन असावी नशिबात केली वहिनीनं चालरीत ।

उन्हाच्या रखामंदी बाईशिकल कुणायाची

बंदू माझ्या त्या हावशानं दिली दवड उनायाची ।

उन्हाच्या रखामंदी टांगा कुणाचा धावा घेतो

भैनी कारणं भाऊ येतो बंदू राया ।

बंदूजी पावईना आला आंब्याच्या दिसामंदी

बंधु माझ्या त्या हावशाला तूप वाढिते रसामंदी ।

चुलत भावा नको येऊसा येगईळ

सरदार माझ बंदू एका राशीचं जुंदईळ ।

चुलत भावईंडं मला चुलत वाटईना

हिरी शेजारी पानमळा त्येचा गारवा तुटईना ।

बंदूजी घेतो चोळी भावज गुजरी खुशालीत

भावज गुजईरी तुझ्या माहेरी चालरीत ।

बंदूजी घेतो चोळी भावज गुजरी माझी बोल

चोळी हालकी घेऊ नका दिली नणदं थोर लोका ।

गार साऊली बघूईनी म्याका उतबीरीलं वज्जं

भावज गुजरी किती सांगू मला ईसाव्या धर तुझं ।

थोरलं माझं घर हंडया झुंबरं लोंबत्याती

सासूबाईचं बाळराज धनी वाडयाला शोभत्याती ।

थोरलं माझं घर चिरेबंदीया त्येला जोतं

ऊंच पायरी तोंड धूती पाणी अंजीबीराला जातं ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP