मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ५१

ओवीगीते - संग्रह ५१

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


अस्तुरीचा हात पुरुषाच्या हातात

वचन दिलं बाई हिरव्या मांडवात ।

साळू सासर्‍याला जाती आन म्या बांधिले गोडधोड

भूक लागल तिथं सोड ।

साळू जाती सासर्‍याला आयाबायाची लामन

संगं सवळ्याचा बामन ।

साळू जाती सासर्‍याला तिच्या वटीला कवळदान

संगं मुराळी गाडीवान ।

साळू जाती सासर्‍याला ढेळजाला उभ्या राहू

सया बोलल्याता तुझ्या मैनाला वाटं लावूं ।

सासरी जाताना सयाला पुसना

नेनंती बाई माजी हरन गळयाची सुटना ।

सासरी जाताना माया धरीती पोटाशी

शोभाताई माझे कधी हरनी भेटशी ।

सासरी जाते येळी घोडं लागलं चडनी

बाई माझ्या नेनंतीच्या उभ्या मयनाला घडनी ।

सासरी चालली सखे बाई ग लाडाची

वर्‍हे सावली ताडाची तिच्या ग बांदवाची ।

माझ्या ग दारामधी सांडलं कंख पानी

नेनंती माझी मैना सासर्‍याला गेली तानी ।

उंच वसरीला कोन निजला सावळा

माझ्या नेनंत्याचा हात उशाला पिवळा ।

गोठ पाटल्याचा हात कंथाच्या उशाखाली

नेनंत्या बाईला पिरतीची झोप आली ।

भरताराचं राज्य काचाचा बंगला

सुखाचा वाटतो कुंखाच्या ग धन्याला ।

राज्यामंदी राज भोळ राज भरताचं

हळदी कुंखाचं उघडं पाल अत्ताराचं ।

भरताराचं सुख सांगते देवा घरी

कुंकवाच्या करंडयाला खिडक्या नानापरी ।

सासूचा सासरवास नंद तुम्ही हळू बोला

नेनंत्या बाईईचा कंथ बाहेरुन आला ।

यवढा सासूरवास नको करु मायमाता

आपला राम व्हता आली परायाची सीता ।

सासूचा सासरवास कोनापाशी सांगू देवा

भाचा माझा नेनंता मनधरनीचा यावा ।

उन्हाळ्याचं ऊन माझ्या सख्याला सोसना

कुठं सावली दिसना ।

चाफ्या चंदनाची सख्याची नांगरटी

पिकलं पिकलं एका औताला बैल किती ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP