मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८५१ ते ५८६०

जनांस शिक्षा अभंग - ५८५१ ते ५८६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८५१॥
हेंचि बरें वर्म तुला । गोष्टी अशाच शिकला ॥१॥
रुका न मिळे धर्माला । रुपें सांटी दारु प्याला ॥२॥
बाबा म्हणती मुलाला । सख्याधिकारी बंधुला ॥३॥
स्वप्नीं न पुजी देवाला । द्रव्य ने तसे वेश्येला ॥४॥

॥५८५२॥
अभिमान उठे अखंड मत्सर । क्रोधाचा विकार बुद्धीहीना ॥१॥
नासला अंतरीं कामादिक खळ । अहंभाअ जाळ ध्यान करी ॥२॥
उभ्या पानव्यथा दासी मागें नीट । नाईकती भ्रष्ट सांगितल्या ॥३॥
कैसी त्यां म्हणावी भलेपण वृत्ती । तुका ह्मणे जाती अधोगती ॥४॥

॥५८५३॥
वेडीं तरी बहू वेडीं । चवी नेणें खातां गोडी ॥१॥
कैसीं उघडीं पडलीं । नेणे भांडजन बोली ॥२॥
वेडीं वेडीं आणी मुकीं जन्मबधिरासारिखीं ॥३॥
शुद्धि आपुलिया नाहीं । जाणे आणिकांतें कांहीं ॥४॥
तुका ह्मणे ऐशा जनीं । नका जाऊं वाटे कोणी ॥५॥

॥५८५४॥
नाहीं दया चित्त हातीं । व्यर्थ होती आळशी ॥१॥
काय बोलोनियां मुखें । वायां मुर्ख फुंदती ॥२॥
काय त्याचे हातीं लागे । नाहीं त्याग विषया ॥३॥
तुका ह्मणे फेडा गोंवी । धन्य दावी करुनि ॥४॥

॥५८५५॥
न करी आंघोळी । टिळे न लावी कपाळीं ॥१॥
नेणे करुं एकादशी ॥ कांरे शहाणा झालासी ॥२॥
न सांवरे आलंकार । माळ तुळसी अव्हेर ॥३॥
तुका ह्मणे वेडें । नाचों लाजे दिंडीपुढें ॥४॥

॥५८५६॥
गुरुच्या शब्दास । नाहीं कोणाचा विश्वास ॥१॥
तेणे स्वहिताचा नाश । होतो नकळे कोणास ॥२॥
धन माया पुत्र दारा । नर्का आवडी हे थारा ॥३॥
तुका ह्मणे धरी मनीं । भोग भोगीं निरयखाणी ॥४॥

॥५८५७॥
वंशीं पुत्र झाला ऐसा । नर्का धाडी पितरांस ॥१॥
त्याचा संग नका कोणी । भार न साहे मेदिनी ॥२॥
करी चाहाडी तो नित्य । दोष सांचले अमित ॥३॥
करी तस्कराचें कर्म । होती मागिलासी श्रम ॥४॥
द्रव्यासाठीं लोकां मारी । झाला जरी परद्वारी ॥५॥
तुका ह्मणे झाला । वंशा कुर्‍हाड जन्मला ॥६॥

॥५८५८॥
दुराचारी पुत्र वंशी । त्याचा धाक पितरांसी ॥१॥
व्यर्थ जन्मला पाषाण । भुमीभार निःकारण ॥२॥  
तुका ह्मणे माता खळ । नाहीं साधियेली वेळ ॥३॥

॥५८५९॥
कथा नावडे तें नाम । त्यासी धाम यमाचें ॥१॥
माता जागे नावडेसी ॥ नर्कवासी अकल्प ॥२॥
संतवाक्या त्रास मानी । झाली हानी सुकृता ॥३॥
तुका अविश्वासी जया । देव तया पाषाण ॥४॥

॥५८६०॥
गुरुच्या प्रसादें । कांहीं बोलियले सुधें ॥१॥
मानी अनुभवीं खरें । पुढें अभावीं काई रे ॥२॥
केलें सांगितलें । तया हित फळा आलें ॥३॥
तुका ह्मणे नष्ट । करी संतजना चेष्टा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP